Tuesday, November 27, 2018

... म्‍हणून ॲश-सलमानचा झाला ब्रेकअप

सलमानच्‍या आयुष्‍यात अनेक अभिनेत्री आल्‍या. पण, अशी एक अभिनेत्री त्‍याच्‍या आयुष्‍यात आली, जिची सर्वांत अधिक चर्चा रंगली. ती सुंदर अभिनेत्री म्‍हणजे ऐश्वर्या राय. ॲश सलमानच्‍या आयुष्‍यात आली आणि सलमानच्‍या प्रेमकहाणीला पुन्‍हा सुरुवात झाली. रुपेरी पडद्‍यावर देखील सलमान ॲशची प्रेम कहाणी हिट ठरली. सलमान खान आणि ऐश्वर्याची लव्‍ह स्टोरी बॉलिवूडमधील चर्चित प्रेमकहाणींमध्‍ये न विसरण्‍याजोगी आहे. आज ऐश्वर्या रायचा वाढदिवस. त्‍याऔचित्‍याने सलमान आणि ऐश्‍वर्याच्‍या रिलेशनशीपबद्‍दल जाणून घेऊयात. 

Image result for aishwarya rai and salman khan
सलमानशी असं सुरू झालं नातं 
सलमान आणि ऐश्वर्याची प्रेम कहाणी १९९७ मध्‍ये सुरू झाली होती. सलमान खान सुपरस्टार होता. तर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री केली होती. त्‍यावेळी सलमान आणि सोमीच्‍या अफेअरची चर्चा रंगली होती. सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमान सोमीबद्‍दल खूप सीरिअस होता आणि तिच्‍याशी लग्‍न देखील करणार होता. सलमानची नजर ऐश्‍वर्यावर पडली. आणि सलमानने सोमी अलीचा साथ सोडला.
एका मासिकाने दिलेल्‍या माहितीनुसार, मन्‍सूर अलीचा चित्रपट 'जोश'मध्‍ये ऐश्‍वर्याची मुख्‍य भूमिका होती. या चित्रपटात काम करण्‍यास सलमानने यासाठी नकार दिला, कारण ऐश्वर्याच्‍या भावाची भूमिका सलमानला करायची होती. नंतर ॲशच्‍या भावाची भूमिका शाहरुख खानने साकारली. 
Related image
सलमानने ऐश्वर्याची मदत केली
सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमानने ऐश्वर्याची इंडस्‍ट्रीतील नौका पार केली. तिचं करिअर घडवण्‍याची जबाबदारी सलमानने आपल्‍यावर घेतली. त्‍यामुळे ऐश्‍वर्याला 'हम दिल चुके सनम' या चित्रपटात मोठा ब्रेक मिळाला. सलमानचे मित्र संजय लीला भन्‍साळी यांनी ॲशला या चित्रपटात संधी दिली. येथून सलमान आणि ऐश्वर्याच्‍या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. चित्रपटाच्‍या शूटिंग वेळी दोघांची जवळीक वाढली. 
सलमानचे मित्र ॲशला म्‍हणत होते वहिनी भाभी
ऐश्वर्या राय आणि सलमानच्‍या अफेअरच्‍या चर्चा रंगू लागल्‍या होत्‍या. ॲश सलमानच्‍या कुटुंबीयांना देखील भेटत असे. सूत्रांच्‍या माहितीनुसार,  सलमानचे मित्र ॲशला वहिनी म्‍हणून बोलावत असत. परंतु, ॲशच्‍या आई-वडिलांना तिची सलमानसोबत असलेली मैत्री आवडत नव्‍हती. इतकचं नाही तर त्‍यांनी ॲशला सलमानशी दूर राहायला सांगितलं होतं. त्‍यानंतर, ॲश इतकी निराश झाली की, घर सोडून एकटी राहू लागली. 
Related image
सलमान-ॲशच्‍या नात्‍यात फूट
सूत्रांच्‍या माहितीनुसार, एक दिवस मध्‍यरात्री सलमान ॲशच्‍या घरी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. संतापलेल्‍या सलमानने १९ व्‍या मजल्‍यावरून उडी मारण्‍याची धमकी देखील दिली. मध्‍यरात्री ३ वाजेपर्यंत सलमान दरावाजा वाजवत होता. सलमानच्‍या हातातून रक्‍त येत होतं, असेही काहीजण म्‍हणतात. सलमानने घातलेल्‍या गोंधळामागे कारण होतं, ते म्‍हणजे सलमानला ॲशशी लग्‍न करायचं होतं. परंतु, ॲशची इंडस्‍ट्रीत चलती होती. त्‍यावेळी तिला लग्‍न करायचं नव्‍हतं. नंतर ॲशच्‍या वडिलांनी सलमानविरोधात पोलिस ठाण्‍यात केस देखील दाखल केली होती, असे वृत्त समोर आले होते. 
Image result for aishwarya rai and salman khan break up
सलमान-ॲशचा ब्रेकअप
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ॲश-सलमानची मैत्री असताना सोमी अलीचा सलमानला फोन आला. सोमी अलला आपल्‍या वडिलांच्‍या ऑपरेशनसाठी मदत हवी होती. सलमान ऐश्वर्याला न सांगताच अमेरिकेला निघून गेला. ज्‍यावेळी ॲशला ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी नाराज झालेल्‍या ॲशने नातं संपवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यानंतर सलमानने ऐश्वर्याचा चित्रपट 'कुछ ना कहो'च्‍या सेटवर पुन्‍हा एकदा गोंधळ घातला. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्‍य भूमिकेत होता. सलमानने ॲशच्‍या गाडीची तोडफोड देखील केली होती. त्‍यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. 
अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटांमध्‍ये अभिनय केला आहे. दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' आणि 'कुछ न कहो'मध्‍ये काम केलं होतं. चित्रपटामुळे ॲश-अभिषेकची केवळ मैत्री होती.
Image result for aishwarya rai and salman khan
अभिषेकने ॲशला असं केलं प्रपोज
त्‍यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने 'बंटी आणि  बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्‍यात एकत्र काम केलं. सूत्रांच्‍या माहितीनुसार, या गाण्‍याच्‍या शूटिंगनंतर दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. 
प्रपोज केल्‍यानंतर लग्‍न
ॲश-अभिषेकने मणिरत्‍नम यांच्‍या 'गुरु' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आणि चित्रपटाच्‍या प्रीमियरनंतर टोरांटोमध्‍ये अभिषेकने अॅशला लग्‍नासाठी प्रपोज केलं. ॲशनेही पटकन होकार दिला. २० एप्रिल २००७ मध्‍ये दोघे विवाहबंधनात अडकले. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...