Tuesday, November 27, 2018

शाहरुख चित्रपटात कसा आला, माहिती आहे का?


छोट्‍या पडद्‍यावरून आपल्‍या करिअरची सुरुवात करणार्‍या शाहरुखला 'बॉलिवूडचा बादशाह' म्‍हणून ओळख निर्माण करायला बराच संघर्ष करावा लागला. आजदेखील लाखो-करोडो लोकांच्‍या मनावर रुजी घालणारा तो शाहरूखच आहे. 

चित्रपट इंडस्‍ट्रीत 'किंग खान' अशी ओळख असलेल्‍या शाहरुखचा जन्‍म २ नोव्‍हेंबर १९६५ रोजी दिल्‍लीत झाला. त्‍याचे वडिल टान्‍सपोर्ट व्‍यवसायाशी संबंधित होते. 

शाहरुखने जामिया मिलिया इस्‍लामिया विद्‍यापीठातून पदवी घेतली. 
Image result for shahrukh khan in tv serial circus
१९९८ मध्‍ये शाहरुख खानने टीव्‍हीवरील 'फौजी' मालिकेतून करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्‍ये आपले स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो मुंबईत आला. अजीज मिर्झा यांनी शाहरुखला आपली मालिका सर्कसमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. त्‍याचवेळी हेमा मालिनी यांना त्‍यांचा पहिलाच दिग्‍दर्शित चित्रपट 'दिल आशना है'साठी नायक म्‍हणून नव्‍या चेहर्‍याचा शोध सुरू होता. त्‍यात दिव्‍या भारतीची प्रमुख भूमिका होती. 
Related image
शाहरुखला ज्‍यावेळी ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी आपल्‍या मित्रांच्‍या मदतीने या चित्रपटाच्‍या स्‍क्रिन टेस्‍टसाठी जाण्‍याचा शाहरुखने निर्णय घेतला. 
हेमा मालिनी यांना अखेर नायक सापडला...
हेमा मालिनी यांना मात्र, 'त्‍या' अज्ञात नायकाबद्‍दल खात्री वाटत नव्‍हती. ठरवल्‍याप्रमाणे हेमा मालिनी हैदराबादचा कार्यक्रम आटोपून मुंबईला आल्‍या. सवयीनुसार, घरी आल्‍यानंतर हेमा यांनी टीव्‍ही लावला. चॅनेल बदलत असताना अचानक टीव्‍हीचा रिमोट 'फौजी' मालिकेजवळ येऊन थांबला. तिथे त्‍यांना एक लक्षवेधी चेहरा दिसला होता. त्‍या तरुण नटाचा चेहरा असामान्‍य देखणा नव्‍हता; पण एक वेगळाच उत्‍साह 'त्‍या' तरुणात दिसत होता. हेमा यांनी तत्‍काळ ऑफिसमधल्‍या माणसांना त्‍या नटाचं नाव आणि पत्ता शोधायला सांगितलं. हेमा यांच्‍या स्‍टाफने त्‍या नटाचा पत्ता शोधून काढला. नाव होतं-शाहरुख खान. पत्ता-दिल्‍ली. त्‍याचा फोन नंबरही मिळाला होता. त्‍यानुसार, प्रभा यांनी (हेमा यांची मावस बहिण) शाहरुखला फोन लावला. खुद्‍द शाहरुखने फोन उचलला. हेमा यांच्‍या ऑफिसमधून फोन आलाय, याचा शाहरुखला विश्‍वासच बसेना. आपली कुणीतरी चेष्‍टा करतयं, असं वाटल्‍याने शाहरुखने प्रभा यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खरचं हा फोन हेमा यांच्‍या हुकमाप्रमाणे करण्‍यात आलाय, हे पटवून देण्‍यासाठी प्रभा यांना तारेवरची कसरत करावी लागली. अखेर प्रभा म्‍हणाल्‍या, 'तुला मी हेमाचा डायरेक्‍ट नंबर देते. तू स्‍वत:च फोन करून खात्री करून घे. मग शाहरुखने होकार देत हेमा यांना फोन केला.' 
Image result for shahrukh khan and hema malini
जेव्‍हा हेमा यांना पहिल्‍यांदाच भेटला शाहरुख
त्‍यानंतर दोनच दिवसांनी शाहरुख खान मुंबईत हेमा यांच्‍या घरी चाचणीसाठी आला. हेमा यांना त्‍याचा अभिनय माहित होता. त्‍याचा अभिनय त्‍यांना आवडलाही होता. हा नट मोठ्‍या पडद्‍यावर कसा दिसेल, याचा विचार हेमा यांच्‍या डोक्‍यात सुरू होता. त्‍यांची प्रत्‍यक्ष भेटही झाली. शाहरुखच्‍या चेहर्‍यावर तेज होतं, आत्‍मविश्‍वास होता, ते हेमा यांना आवडलं. 
सारखे कपाळावर येणार्‍या त्‍याच्‍या केसामुळे त्‍याचा चेहरा झाकून जात होता. हेमा त्‍याला म्‍हणाल्‍या, 'तू जरा केस एका जागी ठेवशील का?' लगेच शाहरुखने केसातून हात फिरवला. आता तो व्‍यवस्‍थित दिसत होता. परंतु, हेमा यांनी मेकअप मॅनला बोलावलं. त्‍याने शाहरुखच्‍या केसांना जेल लावून केस नीटनेटके बसवले. हे सुरु असताना धर्मेंद्र यांची एन्‍ट्री झाली. 'हा माझ्‍या नव्‍या सिनेमाचा हिरो- शाहरुख खान' असे म्‍हणत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्‍याशी शाहरुखची ओळख करून दिली. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍या चॉईसला दाद दिली. त्‍यावेळी 'दिल आशना है'साठी शाहरुखची नायक म्‍हणून निवड झाली. 
Image result for shahrukh khan hair
याबद्‍दल एकदा हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या, 'फौजी बनवणार्‍यांना शाहरुख चांगला नट आहे, हे लगेचं कळत होतं. पण, तो एक दिवस देशाचा इतका मोठा स्‍टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसले.' 
थाटामाटात चित्रपटाचा मुहूर्त
मुंबईच्‍या एका हॉटेलमध्‍ये मोठ्‍या थाटामाटात हेमा यांच्‍या चित्रपटाचा मुहूर्त झाला. 'दिल आशना है' असं चित्रपटाचं नाव. 'दिल आशना है'ची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्‍या 'लेस' या गाजलेल्‍या कादंबरीवर आधारीत होती. तीन स्‍त्रियांमध्‍ये विशिष्‍ट परिस्‍थितीत निर्माण होणार्‍या भावबंधनाची ती कथा आहे. या चित्रटासाठी हेमा यांनी डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया या त्‍याकाळी गाजलेल्‍या अभिनेत्री आणि दिव्‍या भारतीची निवड केली होती. हा चित्रपट स्‍त्री प्रधान होता. तर शाहरुख खान, कबीर बेदी, जीतेंद्र, असीफ हे मुख्‍य नायक होते. स्‍त्री प्रधान चित्रपट म्‍हणजे त्‍याकाळी 'भलतचं काहीतरी' असं असायचं. त्‍याची या नायकांना जाणीव होती. याबद्‍दल हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'कुणी नाराज नव्‍हतं. सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. हे नट सेटवर आले की, वातावरण बदलायचं. मी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करीत होते, तरीही कॅमेर्‍यातून त्‍यांच्‍याकडे पाहताना माझ्‍यातली अभिनेत्री जागी व्‍हायची आणि त्‍यांचं निरीक्षण करायची. आणि या नात्‍यानंसुध्‍दा कॅमेर्‍यासमोर उभं राहून त्‍यांच्‍या चेहर्‍यावरचे भघव न्‍याहाळण्‍याऐवजी कॅमेर्‍यामागून ते वाचणं वेधक वाटत होतं.'
१९९१ मध्‍ये 'दिल आशना है' रिलीज झाला.
Related image
दरम्‍यान, दीवानामध्‍ये काम करण्‍याची शाहरुखला संधी मिळाली. ऋषी कपूर या प्रसिध्‍द अभिनेत्‍याबरोबर काम करून शाहरुखने त्‍याला मिळालेल्‍या संधीचं सोनं केलं. 'दीवाना'साठी शाहरुखला फिल्‍मफेअर पुरस्‍कार देखील मिळाला. त्‍याचवेळी दिग्‍दर्शक अली अब्‍बास यांची नजर शाहरुखवर पडली. अली अब्‍बास यांना इंग्रजी कादंबरी 'ए किस बिफोर डेथ'वर एक चित्रपट काढायचा होता. शाहरुखला त्‍यांच्‍या चित्रपटात घेण्‍यात आलं. १९९३ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'बाजीगर' सुपरहिट ठरला. त्‍यामुळे इंडस्‍ट्रीत शाहरुखला वेगळी ओळख मिळाली. 
१९९३ मध्‍ये यश चोप्रा यांच्‍या 'डर' चित्रपटात काम करण्‍याची संधी शाहरुखला मिळाली. 'क...क...क...किरण' हा शाहरुखचा डायलॉग चांगला गाजला. १९९५ मध्‍ये यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'मध्‍ये काम दिलं. हा चित्रपट ब्‍लॉकबस्‍टर ठरला. 
निर्मिती क्षेत्रात पदार्पण
१९९९ मध्‍ये शाहरुख खानने चित्रपट निर्मितीकडे लक्ष वळवले. अभिनेत्री जूही चावलासोबत मिळून शाहरुखने ड्रीम्‍स अनलिमिटेडची स्‍थापना केली. या बॅनरअंतर्गत शाहरुखने 'फिर भी दिल है हिंदुस्‍तानी' चित्रपट बनवला. चांगली पटकथा आणि अभिनय असतानाही बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही. याच बॅनरखाली त्‍यांनी 'अशोका' चित्रपट बनवला. हा देखील चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. परंतु, तिसरा चित्रपट 'चलते चलते' सुपरहिट झाला. 
२००४मध्‍ये शाहरुख खानने 'रेड चिली एंटरटेनमेंट' कंपनीची निर्मिती केली. या बॅनरखाली 'मैं हू ना' बॉक्‍स ऑफिसरवर आणला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्‍यानंतर 'पहेली,' 'ओम शांती ओम,' 'बिल्‍लू बार्बर,' 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'हॅप्‍पी न्‍यू इयर,' 'दिलवाले' यासारखे चित्रपट बनवले. 
२००७ ला त्‍याचा लंडनमध्‍ये मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभा करण्‍यात आला. 
Image result for shahrukh khan statue in london madame tussaud museum
सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता
शाहरूखला त्‍याच्‍या सिनेकरिअरमध्‍ये आठ वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता फिल्‍म फेअर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. शाहरुखची ऑनस्‍क्रीन जोडी काजोल आणि माधुरी दीक्षित यांच्‍यासोबत चांगली जमली. 
आता शाहरुखचा 'जीरो' चित्रपट रिलीज होण्‍याच्‍या मार्गावर आहे. आनंद एल राय यांच्‍या दिग्‍दर्शनाखालील 'जीरो'मध्‍ये शाहरुखने बुटक्‍या व्‍यक्‍तीची भूमिका केली आहे. 
 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...