अभिनेत्री ऐश्वर्या रायला मिस वर्ल्डचं मुकूट १९९४ मध्ये मिळालं. मिस वर्ल्ड जमैकाची रहिवासी असणारी लिसा हन्नाने घातलं होतं. ऐश्वर्याने आंतरराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत एक वर्षापर्यंत मॉडेलिंग, चित्रपटात काम करू शकत नव्हती. विशेष म्हणजे याकाळात तिच्याकडे २४ चित्रपटांचे प्रस्ताव आले होते. त्यानंतर ऐश्वर्या चित्रपटात आली. मणीरत्नम यांचा 'इरुवर' या तामीळ चित्रपटातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. तिचे एकामागोमाग एक तीन चित्रपट फ्लॉप ठरले. परंतु, ऐश्वर्याने हार मानली नाही.

१९९९ मध्ये अभिनेता अक्षय खन्नासोबत तिने 'आ अब लौट चले' चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर एकापेक्षा एक चित्रपट तिला मिळत गेले. संजय लीला भन्साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट केला. त्यात अजय देवगण आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये तिने यशाचं शिखर गाठलं. सुभाष घई यांचा 'ताल' आणि भन्साळी यांच्या 'देवदास'ने ऐश्वर्याच्या अभिनयात चारचाँद लावले. ऐश्वर्या दुसरी इंडियन मॉडल आहे. ऐश्वर्या राय बच्चनला २०१४ च्या 'मिस वर्ल्ड पीजेंट' दरम्यान 'सक्सेसफूल मिस वर्ल्ड'ने गौरवण्यात आलं होतं. डिसेंबर २०१४ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत ऐश्वर्याला चीफ गेस्ट म्हणूनही आमंत्रित करण्यात आलं होतं.
'देवदास'मुळे नवी ओळख
ऐश्वर्या राय आणि शाहरुख खानने एकत्र ‘देवदास’ चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. परंतु, एक वेळ अशी होती की, ॲश आणि शाहरूख एकमेकांकडे पाहायचे देखील नाहीत. शाहरुखने ॲशला आपल्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. शिवाय, तिच्यासोबत सर्व संबंध संपुष्टात आणले होते.

खरंतरं, दोघे एकमेकांच्यासोबत बोलत नव्हते. सलमान खानमुळे ॲश-शाहरुख बोलत नसल्याचं म्हटलं जात होतं. तब्बल १४ वर्षे शाहरुख आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत बोलत नव्हते. त्यावेळी शाहरुख आणि सलमान खानची घट्ट मैत्री होती. त्यावेळी ऐश्वर्या सलमानला डेट करत होती. सलमान ॲशसोबत राहायचा नेहमी प्रयत्न करायचा. कधी-कधी भांडण देखील करायचा. त्यादिवशीही असाच वाद झाला.
ऐश्वर्या शाहरुखसोबत 'चलते चलते' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यावेळी सलमानने सेटवर जाऊन गदारोळ घातला. ॲशच्या गाडीची देखील तोडफोड केली. शाहरुखने कुठलाही विचार न करता आपल्या मित्राचे समर्थन केले. आणि ॲशला 'चलते चलते'मधून डच्चू दिला. इतकच नाही तर आणखी ४ चित्रपटांतून ऐश्वर्याला बाहेर केले.

या प्रकारामुळे ऐश्वर्याला दु:ख झालं. तिच्या करिअरवर देखील बराच परिणाम झाला. शाहरुख आणि सलमानची मैत्री तुटल्याच्या काही वर्षांनंतर ॲशची माफी मागितली. आज शाहरुख-ॲशची चांगली मैत्री आहे.
'चलते चलते'मधून बाहेर केल्यानंतर देखील ॲशने शाहरुखसोबत 'देवदास' चित्रपटात एकत्र काम केलं. ते दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले.
No comments:
Post a Comment