Monday, August 13, 2018

श्रावणमास विशेष

shravan month special : भारतातील १२ ज्योतिर्लिंगपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एक ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे. येथे फक्त शिवलिंग नसून ब्रह्मा, विष्णु, महेश या देवता लिंगरूपात आहेत. जाणून घ्‍या त्र्यंबकेश्‍वरचं महात्‍म्‍य; व्‍हिडिओ पाहण्‍यासाठी क्‍लिक करा ...https://goo.gl/QWc3f4

Sunday, August 12, 2018

https://goo.gl/QWc3f4

shravan month special : भारतातील १२ ज्योतिर्लिंगपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एक ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे. येथे फक्त शिवलिंग नसून ब्रह्मा, विष्णु, महेश या देवता लिंगरूपात आहेत. जाणून घ्‍या त्र्यंबकेश्‍वरचं महात्‍म्‍य; व्‍हिडिओ पाहण्‍यासाठी क्‍लिक करा ...https://goo.gl/QWc3f4

Thursday, August 9, 2018

राजेश खन्‍नांची आठवण सांगणारी सुंदर गाणी पाहा

राजेश खन्ना आज आपल्‍यात नाहीत. परंतु, त्‍यांची आठवण नेहमीच मनात कायम आहे. सदाबहार भूमिकांनी आणि गाण्‍यांनी चाहत्‍यांना, सिनेरसिकांच्‍या मनात कायम लक्षात राहणारे सुपरस्‍टार राजेश खन्‍ना यांची आज ६वी पुण्‍यतिथी. राजेश खन्‍ना 'काका' नावानेही ओळखले जायचे. राजेश खन्ना यांचं निधन २०१२ मध्‍ये झालं होतं. त्‍यांनी आपल्‍या करिअरची सुरूवात १९६६ मध्‍ये आलेला चित्रपट 'आखिरी खत'पासून केली होती. 

आयुष्‍य जगायला शिकवतात राजेश खन्ना यांचे सदाबहार डायलॉग्‍ज-
* पुष्‍पा, मुझसे ये आंसू नहीं देखे जाते. आय हेट टीयर्स
- अमर प्रेम १९७२
* जिसमें इंसान की भलाई हो, वो काम कभी बुरा नहीं होता
- बावर्ची १९७२
* बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए...लंबी नहीं
- आनंद १९७१ 
* ऐ, बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं उसे न आप बदल सकते हैं न मैं.
- आनंद १९७१ 
* ये तो मैं ही जानता हूं कि जिंदगी के आखिरी मोड पर कितना अंधेरा है.
-सफर १९७० 
* मैं मरने से पहले मरना नहीं चाहता
- सफर, १९७० 
* एक छोटा सा जख्‍म बहुत गहरा दाग बन सकता है और एक छोटी सी मुलाकात जीवनभर का साथ बन सकती है
- आराधना, १९६९  
अनेक चित्रपटातील त्‍यांचा रोमँटिक अंदाज, त्‍यांच्‍या अभिनयातील वेगळा अंदाज आजही लक्षात राहणारा आहे. राजेश खन्‍ना यांच्‍या चित्रपटातील काही सुंदर गाणी एकदा पाहाच. 

B'day Girl : प्रियांका चोप्राच्‍या खास गोष्‍टी, वाचा

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा यशस्‍वी अभिनेत्री आहे. चित्रपट इंडस्‍ट्रीत तिने स्‍वत:ची एक प्रतिमा निर्माण केली. तिचा आज ३६ वा वाढदिवस. बॉलिवूडबराबेरच हॉलिवूडमध्‍येही तिने आपला ठसा उमटवला आहे. सुंदर प्रियांकाच्‍या आयुष्‍याविषयी थोडक्‍यात जाणून घेऊयात. 

dinsta
छोट्‍या गावातली मुलगी
प्रियांकाचा जन्म १८ जुलै, १९८२ ला झारखंडच्‍या जमशेदपुरमध्‍ये झाला. प्रियांकाने छोट्‍या गावातून मायानगरीत झेप घेतली. ती २००० मध्‍ये तिने मिस वर्ल्ड बनली. मॉडेल म्‍हणून प्रियांकानेही काम केलं होतं. खूप लोकांना माहिती आहे की, मिस वर्ल्ड होण्‍यापूर्वी प्रियांकाने एका राजकीय व्‍यक्‍तीच्‍या आयुष्‍यावर आधारित बायोपिकमध्‍ये काम केलं होतं. प्रियांकाला सर्वांत आधी एक चित्रपट मिळाला होता तो म्‍हणजे  'गुड नाईट प्रिंसेज'. हा चित्रपट एटली बरार यांनी दिग्‍दर्शित केला होता. २००० मध्‍ये प्रियांकाला हा चित्रपट मिळाला. आणि त्‍याचवर्षी तिला मिस वर्ल्डने सन्‍मानित करण्‍यात आलं. प्रियांकाने मिस वर्ल्ड स्‍पर्धेत जाण्‍याकरिता एका महिन्‍यात शूटिंग पूर्ण केलं होतं. हा चित्रपट प्रियंका गांधी यांच्‍या जीवनावर आधारित होता. प्रियंका गांधी त्‍यावेळी २८ वर्षांच्‍या होत्‍या. हा चित्रपट हिंदी आणि इंग्‍लिश दोन्‍ही भाषेत तयार होत होता. प्रियांका चोप्रासोबत चित्रपटात पूजा बत्रा आणि राहुल देव होते. परंतु, हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 
dinsta
१३ वर्षांची असताना प्रियांका तिच्‍या काकीसोबत अमेरिकेत राहत होती. तेथे तीन वर्षे राहिली. अमेरिकेतील शाळेत तिला वर्णभेदालाही सामोरे जावं लागलं होतं. नंतर ती भारतात परतली. तिने बरेलीच्‍या आर्मी पब्लिक स्कूलमध्‍ये शिक्षण घेतलं. 
dinsta
प्रियांकाचा पहिला चित्रपट २००२ मध्‍ये आलेला तमिळ चित्रपट 'तमिझन' आणि पहिला हिंदी चित्रपट २००३ मध्‍ये आलेला 'द हीरो : लव स्टोरी ऑफ अ स्पाय' होता. नंतर महिन्‍याभरातच प्रियांकाचा 'अंदाज' चित्रपट आला. प्रियांकाची अंदाजमधील भूमिका लक्षात राहण्‍यासारखी होती. 
dinsta
यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले. 'तमिझन' (२००२), 'अंदाज' (२००३), 'द हीरो' (२००३), 'मिस इंडिया : द मिस्ट्री' (२००३), 'प्लॅन' (२००४), 'असंभव' (२००४), 'एतराज' (२००४), 'मुझसे शादी करोगी' (२००४), 'किस्मत' (२००४), 'ब्लफ मास्टर' (२००५), 'बरसात' (२००५), 'यकीन' (२००५), 'वक्त' (२००५), 'आप की खातिर' (२००६), 'डॉन' (२००६), 'क्रिश' (२००६), '३६ चायना टाऊन' (२००६), 'सलाम-ए-इश्क' (२००७), 'किस्मत टॉकीज' (२००७), 'बिग ब्रदर', (२००७), 'कुबार्नी' (२००७), 'लंडन ड्रिम्स' (२००७), 'गॉड तुस्सी ग्रेट हो' (२००८), 'फॅशन' (२००८), 'वॉट्स युअर राशी?' (२००८), 'सात खून माफ' (२०११), 'बर्फी' (२०१२), 'मेरी कोम' (२०१४), 'दिल धडडकने दो' (२०१५), 'बाजीराव मस्तानी' (२०१५) यासारख्‍या चित्रपटात प्रियांका चोप्राने काम केलं आहे. 
dinsta
हॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री 
बॉलिवूडबरोबरच प्रियांकाने हॉलिवूडमध्‍येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आगामी ‘इजन्ट इट रोमँटिक’ या हॉलिवूडपटात या चित्रपटात हॉलिवूड स्टार लियाम हेम्सवर्थबरोबर झळकणार आहे.  प्रियांकाचा तिसरा हॉलिवूडपट आहे. यापूर्वी तिने ‘बेवॉच’ आणि ‘अ किड लाईक जेक’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘क्वाँटिको’ ही टीव्ही मालिकेसाठी तिने काम केलयं. ती गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होती. २०१६ मध्ये आलेल्या ‘जय गंगाजल’नंतर तिने हिंदी चित्रपट स्वीकारला नव्हता. आता मात्र ती ‘भारत’, ‘क्रिश-४’ आणि ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ‘द स्काय इज पिंक’चे शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार असून, यामध्ये तिच्यासमवेत फरहान अख्तर आणि झायरा वसिम हे कलाकार आहेत. 
dinsta
प्रियांकाचे नाव निक जोनसशी जोडलं गेलं
दरम्‍यान, प्रियांकाचे नाव अमेरिकन गायक निक जोनसबरोबर जोडलं गेलं होतं. निक प्रियांकासोबत भारतात आला होता. त्‍यानंतर तिने निकला आपल्‍या आईशी भेटवले. निक-प्रियांकाने आकाश अंबानी यांच्‍या एका इव्‍हेंटलाही हजेरी लावली. दोघेही अनेकदा एकत्र स्‍पॉट झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. 
dinsta

अजुनही आठवतोय तो 'पांडू हवालदार'

अभिनेते दादा कोंडके अवलिया व्‍यक्‍तीमत्त्‍व होतं. मराठी सिनेसृष्‍टीत त्‍यांनी आपल्‍या विनोदाने इतरांना हसवण्‍याचा विडा उचलला. त्‍यांचा आज स्‍मृतीदिन. दादा कोंडके यांचा जन्‍म ८ ऑगस्‍ट १९२८ रोजी मुंबईत झाला होता. दादा कोंडके यांनी आपल्‍या अभिनयाने सिनेरसिकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवलं. त्‍यांच्‍या जन्‍माची कथा, मराठी चित्रपटसृष्‍टीतला त्‍यांचा प्रवास थोडक्‍यात जाणून घेऊयात.

नाव ठेवलं कृष्‍णा
त्‍यांचा जन्‍म लालबाग जवळच्‍या एका चाळीत राहणार्‍या कुटुंबात झाला. वडिल मिलमध्‍ये काम करायचे. कृष्‍णाष्‍टमी दिवशी जन्‍म झाल्‍याने दादा कोंडके यांचं नाव 'कृष्‍णा' असं ठेवण्‍यात आलं होतं. दादा कोंडके सारखे आजारी असायचे. त्‍यामुळे कुणीतरी नाव बदलण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यानंतर 'दादासाहेब' असे नाव ठेवण्‍यात आले. 
Image result for dada kondke
मोठ्‍या भावाच्‍या जन्‍मानंतर २० वर्षांनी जन्‍म 
दादा कोंडके आणि त्‍यांचे मोठे भाऊ यांच्‍यात २० वर्षांचं अंतर होतं. म्‍हणजे मोठ्‍या भावाच्‍या जन्मानंतर त्‍यांचा २० वर्षांनी जन्‍म झाला. 
नको असतानाही दादांचा झाला जन्‍म
दादांच्‍या जन्‍मापूर्वी चार-पाच अपत्‍ये होऊन त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याने दादांच्‍या आईला मूल नको होते. तरीही दादांचा जन्‍म झाला. 
ज्‍यावेळी दादा कोंडके यांचं मृत्‍यू झाल्याचं कळालं...
दादा रुग्‍णालयात असताना त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त एका गैरसमजामुळे त्‍यांच्‍या वडिलांना कळालं होतं. त्‍यावेळी त्‍यांचे वडिल काम करत असलेली मिलचे कामही बंद ठेवण्‍यात आले होते. 
Image may contain: 2 people, people standing
कॉमेडीकडे वळले 
दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं. 'सोंगाड्या' चित्रपटापासून त्‍यांचा सुरू झालेला सिनेसृष्टीतील प्रवास हा मराठी चित्रपटसृष्टीला कलाटणी देणारा ठरला, असे म्हणावयास हरकत नाही. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस लिखित वगनाट्‍यापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास नंतर सिनेसृष्टीकडे वळला. विनोदी भूमिकेसाठी ते ओळखले जाऊ लागले. 
Image result for dada kondke film
सलग ९ रौप्य महोत्सवी मराठी चित्रपटांचा विक्रम 
‘सोंगाड्या’ चित्रपट ही दादा कोंडके यांची पहिली निर्मिती. हा चित्रपट त्‍यांच्‍या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दादांनी त्या काळामध्ये एकापेक्षा एक चित्रपट दिले. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्‍हणून त्‍यांनी भूमिका पार पाडल्‍या. सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन त्‍यांनी मराठी चित्रपटसृष्‍टीत विक्रम घडवला. 
भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातून सिनेसृष्‍टीत पाऊल
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. 
Related image
गाजलेले चित्रपट 
सोंगाड्या (१९७१)
आंधळा मारतो डोळा १९७३)
पांडू हवालदार (१९७५)
राम राम गंगाराम (१९७७)
बोट लावीन तिथे गुदगुल्या (१९७८) 
Related image

१६ चित्रपटांची निर्मिती
दादांनी एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्‍हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. 
Image result for dada kondke
दादा कोंडके यांच्या कामाक्षी प्रॉडक्शनने प्रदर्शित केलेले चित्रपट
एकटा जीव सदाशिव (१९७२)
आंधळा मारतो डोळा  (१९७३)
पांडू हवालदार (१९७५)
तुमचं आमचं जमलं (१९७६)
राम राम गंगाराम (१९७७) 
बोटं लावीन तेथे गुदगुल्या (१९७८)
ह्योच नवरा पाहिजे (१९८०) आली अंगावर (१९८७)
मुका घ्या मुका (१९८८)
पळवा पळवी (१९९०)
येऊ का घरात (१९९२)
सासरचे धोतर (१९९४)

Tuesday, July 17, 2018

Exclusive : 'संजू'चे ८ लूक्स डिझाईन करणारे मराठमोळे सुरेंद्र–जितेंद्र

कुठलाही सिनेमा असो, पडद्‍यावरील कलाकारांना प्रसिध्‍दी मिळतेच. पण, पडद्‍यामागच्‍या कलाकारांची भूमिका महत्त्‍वाची असली तरी, ते चेहरे सर्वांसमोर येत नाहीत. अशीच एक जोडी आहे, ज्‍यांनी पडद्‍यामागे राहूनही आपलं नाव कमावलं. ही जोडी आहे, सुरेंद्र शिवराम साळवी आणि जितेंद्र शिवराम साळवी या दोन भावांची. चर्चेतला चित्रपट 'संजू'मधल्‍या अभिनेता रणबीर कपूरला लुक्‍स देणारी ही जोडी आहे. संजूचे आठ लूक्स डिझाईन करणारे, रणबीर कपूरला संजय दत्त बनवण्‍यात ज्‍यांचं योगदान आहे, त्याचे शिल्पकार म्‍हणून सुरेंद्र आणि जितेंद्र यांचं नाव घेतलं जातं. याच निमित्ताने 'पुढारी ऑनलाईन'ने जितेंद्र साळवी यांच्‍याशी केलेली खास बातचीत. 

सुरेंद्र साळवी आणि जितेंद्र साळवी हे मूळचे कवी केशवसुत यांचे स्मारक असलेले मालगुंड ( गणपतीपुळे, रत्‍नागिरी) इथले. साळवी बंधुंचे वडिल शिवराम साळवी हे मुंबईत नोकरीसाठी आले. दादरला त्‍यांनी नोकरी करण्‍यास सुरूवात केली. लहानपणापासूनच जितेंद्र साळवीही मुंबईत आहेत. साळवी बंधु बरीच वर्षे बॉलिवूड इंडस्‍ट्रीत कार्यरत आहेत. सुरेंद साळवी ३८ ते ४० वर्षे तर जितेंद्र साळवी २० वर्षे या इंडस्‍ट्रीत कार्यरत आहेत. 'संजू'च्या प्रमुख स्टार कास्टसाठी या बंधुंनी वीग डिझाईन केले आहेत. 'संजू' चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांचा लूक खुलवण्यामागेसुध्दा सुरेंद्र-जितेंद्र या भावांचा सिंहाचा वाटा आहे. जितेंद्र यांचे मोठे भाऊ सुरेंद्र साळवी यांनी सुनील दत्त यांच्‍याबरोबर काम केलं आहे. तसेच किशोर कुमार, शम्‍मी कपूर यांच्‍यासोबतही काम केलं आहे. 

संजूच्‍या लुकसाठी रणबीरने रोज पाच तास घालवले
चित्रपट 'संजू'मधील रणबीरला विग लावल्‍यानंतर आणि पुन्‍हा मेकअप झाल्‍यानंतर ते परफेक्‍ट सेटअपसाठी १ तास लागायचा. संजूचं शूटिंग सुरू झाल्‍यानंतर जितेंद्र स्‍वत: सेटवर जाऊन हेअरस्‍टाईलकडे लक्ष द्‍यायचे.
रणबीरचा लूक पाहून संजयला स्वत:ला आरशात पाहिल्याचा भास झाला!
'संजू'च्‍या सेटवर एक दिवस संजय दत्त आल्‍यानंतर त्‍यांनी रणबीरचा लूक पाहून ‘क्षणभर मी स्वत:ला आरशात पाहिल्याचा मला भास झाला’ असं म्हटलं आणि आम्हांला आमच्या कामाची पोचपावती मिळाली, असे जीतेंद्र साळवी म्‍हणाले. रणबीर खूप चांगला माणूस आहे. एवढा मोठा स्‍टारकिड असून कुठल्‍याही त्‍याला प्रकारचा गर्व नाही. धम्‍माल करत, मजेत आम्‍ही रणबीरसोबत काम करत होतो. त्‍याच्‍याशी खास बॉन्‍डिंग असल्‍याचेही जितेंद्र म्‍हणाले. 
संजय दत्तला सेम कॉपी करणं आव्‍हानात्‍मक
रणबीरला संजूचा लुक करायचा होता. पहिला दिवस होता. गेट अप रणवीर ट्राय करायच होतं. पहिली ट्रायल ठरली. संजू तुरुंगातून बाहेर आल्‍यानंतरचा जो लुक आहे. तो खरचं कायमचा लक्षात राहण्‍यासारखा आहे. तो लुक पाहून दिग्‍दर्शक राजू हिरानी हेदेखील आश्‍चर्यचकित झाले. कारण, या लुकसाठी आम्‍ही प्रचंड मेहनत घेतली होती, असे जितेंद्र म्‍हणाले. रणबीरचा लुक पाहून सर्वच टीमने टाळ्‍या वाजवून 'ग्रेट' अशी रिॲक्‍शन दिली. संजय दत्तला सेम कॉपी कारण आमच्‍यासाठी आव्‍हानात्‍मक असल्‍याचेही जितेंद्र म्‍हणाले. चित्रपटात संजूचे लुक्‍स जे होते, त्‍यानुसार, विग तयार करण्‍यात आले होते. प्रत्‍येक वेळेला विविध सेटअप होते. प्रत्‍येक लुकवर काम करत गेलो. त्‍यानुसार, दाढी-मिशा आणि केसाचं रणबीरवर ट्रायल घेत होतो. त्‍यासाठी प्रचंड मेहनत घेतली. १५-२० विग्‍ज रणवीरवर ट्राय करणं, मग ते फायनल करणं आणि शूटिंगला सुरूवात करणं, हे म्‍हणावं तसं सोपं नव्‍हतं. रात्री एक-एक, दीड वाजता स्‍टडी करून कुठे चुकतयं, हे पाहून ट्रायल घेतली जायची. राजू हिरानी यांच्‍या टीमचेही त्‍यात कष्‍ट आहेत, असे जितेंद्र यांनी सांगितले. संजूमधील अनुष्‍का शर्मा, परेश रावल, सोनम कपूर, मनिषा कोईराला यांचेही हेअरस्‍टाईल, विग डिझाईन लुक्‍स जितेंद्र यांनीच केले आहेत. 
चारशेहून अधिक चित्रपटाकरिता काम
जितेंद्र साळवी यांनी ४००-५०० हून अधिक चित्रपट आतापर्यंत केले. हिंदी चित्रपटसृष्‍टीबरोबरच दाक्षिणात्‍य चित्रपटसृष्‍टीतल्‍या स्‍टार्ससोबत जितेंद्र यांनी काम केलं आहे. शिवाय, हॉलिवूड चित्रपटासाठी काम केल्‍याचे त्‍यांनी सांगितलं. बिग बी अमिताभ बच्‍चन यांचं नाव त्‍यांनी आवर्जुन घेतलं. बिग बी यांच्‍या अनेक जाहिरातींमध्‍ये त्‍यांची हेअरस्‍टाईल, त्‍यांचा लुक,दाढी-मिशांचं सेटअप हे त्‍यांनी डिझाईन केलं आहे. सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी यांनी 'कुली,' 'खुदा गवाह,' 'बाजीराव-मस्तानी,' '3-इडियट्स,' 'अग्निपथ,' 'बाहूबली,' 'पद्मावत,' '102 नॉट आऊट', 'पीके', 'मुन्‍नाभाई' अशा चारशेहून अधिक चित्रपटासाठी वीग डिझाईन केले आहेत. 'पद्‍मावत'मधील रणवीर सिंगची अल्‍लाउद्‍दीन खिलजीसाठीची हेअरस्‍टाईल तसेच शाहिद कपूरसाठी विग डिझाईन असो वा '102 नॉट आऊट' मधील अमिताभजी आणि ऋषी कपूर यांचा हेअर लुक असो, हे लुक्‍स करण्‍यात साळवी बंधुंचा मोठा वाटा आहे. बॉलिवूडच्या ९५ टक्के चित्रपटांसाठी वीग डिझाईन जितेंद्र यांनी केले आहेत. 'कुली' चित्रपटांपासून सुरू झालेला हा सिलसिला आता 'संजू'पर्यंत अविरतपणे सुरू आहे. हेअरस्‍टाईल, परफेक्‍ट विग डिझाईन करणे, तसा त्‍या-त्‍या भूमिकेप्रमाणे वा व्‍यक्‍तिरेखाप्रमाणे लुक देणे तसेच विग नॅच्‍युरल दिसणे हे मोठं कौशल्‍याचे काम असल्‍याचे जितेंद्र म्‍हणतात. 

राजकुमार हिरानी यांच्‍याशी खास नातं
ज्‍यावेळी ट्रेलर लॉन्‍च झाला. त्‍यावेळी साळवी यांनीही लॉन्‍च सोहळ्‍याला हजेरी लावली. हिरानी यांची भेट घेतल्‍यानंतर साळवी यांना पाहूत ते खूश झाले. 'बाळा आपका काम दिख रहा है' अशी प्रतिक्रिया हिरानी यांनी साळवींना दिली. जितेंद्र यांना हिरानी नेहमी 'बाळा' नावाने हाक मारतात.)  सुरुवातीला हिरानी यांनी साळवींना मिटिंगकरिता बोलावल्‍यानंतर संजूच्‍या लुक्‍सविषयी चर्चा करण्‍यात आली होती. संजूचा लुक खूप बारिकाईने करायचा होता. त्‍यात हिरानी यांनी १५ दिवसांत विग करण्‍यास सांगितले. १५ दिवसांत ३ दिवसांत तयार करण्‍यात आले. आठ लुक्‍ससाठी विग डिझाईन करण्‍यात दोन-अडीच महिन्‍यांच्‍या कालावधी लागला, असे जितेंद्र यांनी सांगितले. 
आगामी चित्रपट 
'पानीपत,' 'समशेरा,' 'पु. ल. देशपांडे,' 'भारत' या आगामी चित्रपटांची कामे साळवी यांच्‍याकडे आहे. त्‍यातील मुख्‍य भूमिकांसाठी साळवी बंधूंची मेहनत सुरू आहे. 

रणबीरचा 'संजू' कसा झाला?, 'संजू'चे ८ लूक्स डिझाईन करणारे मराठमोळे सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी या जोडीतील जितेंद्र यांच्‍याशी 'पुढारी ऑनलाईन'ने केलेली खास बातचीत (व्‍हिडिओ).... https://goo.gl/6vc6Qd

रणबीरचा 'संजू' कसा झाला?, 'संजू'चे ८ लूक्स डिझाईन करणारे मराठमोळे सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी या जोडीतील जितेंद्र यांच्‍याशी 'पुढारी ऑनलाईन'ने केलेली खास बातचीत (व्‍हिडिओ).... https://goo.gl/6vc6Qd

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...