Thursday, August 16, 2018

भगतसिंग यांच्‍यावरील हे सिनेमे माहिती आहेत का?




भारतीय चित्रपटसृष्‍टीत देशक्‍तीवर आधारित अनेक चित्रपट आले. क्रांतिकारकांवर आलेल्‍या चित्रपटांपैकी सर्वांत जास्‍त चित्रपट भगतसिंग यांच्‍या आयुष्‍यावर आधारित होते. अवघ्‍या २३ व्‍या वर्षी देशासाठी आपल्‍या प्राणाची आहुती देणार्‍या भगतसिंग यांच्‍यावर बॉलिवूडमध्‍ये आलेले हे पुढील चित्रपट. 

शहीद भगतसिंग (१९६३)
खूप कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेते शम्मी कपूर यांनीही भगतसिंग यांची भूमिका केली होती. १९६३ मध्‍ये आलेल्‍या या चित्रपटाचे दिग्‍दर्शन के.एन बन्‍सल यांनी केलं होतं. शम्मी कपूर यांच्‍यासोबत या चित्रपटात प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. 
Image result for bhagat singh ajay devgan
शहीद (१९६५)
एस राम शर्मा दिग्‍दर्शित या चित्रपटात मनोज कुमार यांनी सरदार भगतसिंग यांची भूमिका केली होती. याशिवाय, या चित्रपटात कामनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा, निरुपा रॉय आणि मदन पुरी देखील होते. या चित्रपटातील गाणी स्वातंत्र्य सेनानी राम प्रसाद बिस्मिल यांनी लिहिले होते. १३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटानंतर त्यांनी 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यासारखे चित्रपटही केले. 
Image result for manojkumar in film shahid poster
द लेजेंड ऑफ भगतसिंग (२००२)
२००२ मध्‍ये सरदार भगतसिंग यांच्‍या जीवनावर राजकुमार संतोषी यांनी बनवलेल्‍या चित्रपटात भगतसिंग यांची व्‍यक्‍तिरेखा अभिनेता अजय देवगनने साकारली होती. अजयच्‍या या भूमिकेचे कौतुकही झाले होते. याचशिवाय, चित्रपटातील गाणीही प्रसिध्‍द झाले होते. या चित्रपटात अजयसोबत सुशांत सिंह, अखिलेंद्र मिश्रा, राज बब्बर, फरीदा जलाल यांच्‍या भूमिका होत्‍या. पियूष मिश्रा यांनी चित्रपटाचे डायलॉग्‍ज लिहिले होते. या चित्रपटामध्ये इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास याचं चित्रण करण्यात आलं होतं. या चित्रपटाला २ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला आहे.
Image result for ajay devgan bhagat singh
शहीद-ए-आजम (२००२)
अभिनेता सोनू सूदने या चित्रपटात सरदार भगतसिंग यांची भूमिका केली होती. हा चित्रपटा वादातही सापडला होता. देशाच्‍या अनेक राज्‍यांत हा चित्रपट बॅन करण्‍याची मागणी करण्‍यात आली होती. 
India Tv - Bhagat Singh
२३ मार्च १९३१ शहीद (२००२) 
या चित्रपटाची निर्मिती सनी देओल, बॉबी देओल या दोघांनी केली होती. या चित्रपटामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल आणि अमृता सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये भगतसिंग यांच्याबरोबर राजगुरु आणि सुखदेव यांच्या देश कार्याचा आढावा देखील घेण्यात आला होता. शहीद भगत सिंग यांची भूमिका बॉबी देओलने तर सनी देओलने चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती. अमृता सिंगने या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. 
Related image
रंग दे बसंती (२००६)
आजच्या तरुणाईला भगतसिंग यांचं देशप्रेम आणि त्यांचं बलिदान समजावं यासाठी 'रंग दे बसंती' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपटात अभिनेता आमिर खानची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं होतं. चित्रपटात आमिर खान सोबत सिद्धार्थ नारायण, अतुल कुलकर्णी, कुणाल कपूर, वाहिदा रहमान, शरमन जोशी आणि आर माधवन यांच्‍याही भूमिका होत्‍या. 
Related image

नागराज मंजुळेंचा येतोय नवा चित्रपट? (Video)



 
मराठी सिनेसृष्‍टीत यशस्‍वी दिग्दर्शक म्‍हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते. त्‍यांचे 'फँड्री,' 'सैराट' असे एकापेक्षा एक चित्रपट आले. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसादही दिला. 'सैराट'च्‍या अफाट यशानंतर नागराज यांचा 'झुंड' हा चित्रपट चर्चेत होता. 'सैराट'नंतर त्‍यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याबाबत नागराज यांच्‍याकडूनही अधिक माहिती मिळाली नव्‍हती. 

नागराज मंजुळे पुढचा चित्रपट कुठला आणणार, याची उत्‍सुकता नेहमीच त्‍यांच्‍या फॅन्‍सना लागून राहिलेली असते. दरम्‍यान, नागराज यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एक व्‍हिडिओ पोस्‍ट केला आहे. हा व्‍हिडिओ आटपाट प्रोडक्‍शनच्‍या यू-ट्‍यूब चॅनलवरदेखील अपलोड करण्‍यात आला आहे. व्‍हिडिओत 'फँड्री', 'सैराट'चा उल्‍लेख आहे आणि शेवटी 'लवकरच...' असा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. हा व्‍हिडिओ नागराज यांनी फेसबुक पेजवरही पोस्‍ट केला आहे. व्‍हिडिओने प्रेक्षकांची उत्‍कंठा वाढली आहे. कारण, नागराज या व्‍हिडिओतून नव्‍या चित्रपटाबद्‍दल सांगायचा प्रयत्‍न करताहेत. तसा इशारा त्‍यांनी या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून दिला आहे. त्‍यामुळे नागराज नवं काही तरी घेऊन येणार, हे नक्‍की! 
 

शम्‍मी कपूर यांनी 'या' अभिनेत्रीला केलं होतं प्रपोज



शम्मी कपूर भारतीय सिनेसृष्‍टीत अशा बॉलिवूड अभिनेत्‍यांपैकी एक आहेत, ज्‍यांना त्‍यांच्‍या डान्‍सच्‍या खास स्‍टाईलसाठी ओळखले जात होते. आज शम्मी कपूर यांची आज सहावी पुण्यतिथी. बॉलिवूडच्‍या या पहिल्‍या सुपरकूल डूड अभिनेत्‍याबद्‍दल काही गोष्‍टी जाणून घेऊयात. 

Image result for shammi kapoor
जन्म
आपल्‍या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणारे अभिनेते शम्‍मी कपूर यांची इंडस्‍ट्रीत एक खास ओळख होती. पृथ्वीराज कपूर यांच्‍या घरी २१ ऑक्‍टोबर, १९३१ रोजी शम्मी कपूर यांचा जन्‍म झाला होता. पृथ्वीराज यांच्‍या चार मुलांपैकी एक शम्‍मी होते. त्‍यांच्‍या आईचे नाव रामशरणी कपूर होतं. शम्मी कपूर यांचं बालपणीचं नाव शमशेर राज कपूर होतं. राजकपूर आणि शशी कपूर हे त्‍यांची दोन भाऊदेखील वेटरन ॲक्टर होते. 
Image result for shammi kapoor
डेब्यू
शम्मी कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर चित्रपट इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेते होते. शम्मी कपूर यांनी 'जीवन ज्योति' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्‍यू केलं होतं. त्‍यांचा अंदाज इतर अभिनेत्‍यांपेक्षा वेगळा होता.
Image result for shammi kapoor
'या' अभिनेत्रीला केलं होतं प्रपोज 
अभिनेत्री मुमताज ज्‍यावेळी १८ वर्षांच्‍या होत्‍या, त्‍यावेळी शम्मी कपूर यांनी लग्‍नासाठी त्‍यांना प्रपोज केलं होतं. असं म्‍हटलं जातं की, मुमताज यांचंदेखील शम्मी यांच्‍यावर प्रेम होतं. मुमताज यांनी आपलं चित्रपटातील करिअर सोडून आपल्‍याशी लग्‍न करावं, असं शम्मी यांना वाटत होतं. परंतु, मुमताज यांनी नकार दिला. त्‍यावेळी कपूर फॅमिलीत सुना चित्रपटात काम करू शकत नव्‍हत्‍या, असं म्‍हटलं जातं. 
Related image
घरच्‍या मंडळींविरोधात जाऊन गीता बाली यांच्‍याबरोबर शम्‍मी यांनी लग्‍न केलं होतं. १९६५ मध्‍ये गीता बाली यांचं निधन झालं. त्‍यानंतर त्‍यांनी आपल्‍या करिअरकडे फारसं लक्ष दिलं नाही.  
Related image
दुसर्‍या लग्‍नासाठी ठेवली होती मोठी अट
गीता बाली यांचं निधन झाल्‍यानंतर शम्मी कपूर यांनी दुसरे लग्‍न करावे, यासाठी त्‍यांच्‍या घरच्‍या मंडळींनी शम्‍मी यांच्‍यावर दबाव आणला. कारण, शम्मी यांची मुले लहान होती. गीता यांच्‍या निधनानंतर ४ वर्षांनी त्‍यांनी नीला देवी यांच्‍याशी लग्‍न केलं. नीला एका रॉयल फॅमिलीतील होत्‍या. परंतु, शम्‍मी यांनी नीला यांच्‍यासमोर एक अट ठेवली की, ती आई बनू शकत नाही. नीला यांनीच गीता यांच्‍या मुलांचे संगोपन करावे, असे शम्‍मी यांचे म्‍हणणे होते. नीला देवी यांनी ही अट मान्‍य करून शम्‍मी यांच्‍याशी लग्‍न केलं. 
Related image
जवळपास २०० चित्रपटांत काम  
शम्मी कपूर यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये जवळपास २०० चित्रपटांत काम केलं. 'रंगीन रातें', 'तुमसा नही देखा', 'मुजरिम', 'उजाला', 'दिल देके देखो', 'जंगली', 'प्रोफेसर चायना टाउन', 'ब्लफ मास्टर', 'कश्मीर की कली', 'राजकुमार', 'जानवर', 'तिसरी मंझील', 'ॲन ईव्‍हनिंग इन पॅरिस', 'ब्रह्मचारी', 'तुमसे अच्छा कौन है', 'प्रिन्‍स', 'अंदाज', 'विधाता'इत्‍यादी त्‍यांचे काही चित्रपट. 
Related image
जेव्‍हा चित्रपट फ्‍लॉप ठरले
लग्‍नानंतर शम्मी यांनी  ऑन स्क्रीन गीता बाली यांच्‍यासोबत चित्रपट केले. 'रंगीन रातें'मध्‍ये गीता यांच्‍यासोबत दिसलेल्‍या शम्मी यांचे एकानंतर एक चित्रपट फ्लॉप ठरले, त्‍यावेळी ते निराश झाले. एक दिवस त्‍यांनी गीता यांच्‍याशी चर्चा केली. ते म्‍हणाले, 'जर पुढचा चित्रपट फ्लॉप झाला तर चित्रपट सोडेन आणि आसामच्‍या चहाच्‍या बागेत मॅनेजरची नोकरी करेन.' गीता बाली यांनी त्‍यांना धीर दिला आणि चित्रपट न सोडण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यानंतर एका चित्रपटाने शम्‍मी यांचं नशीब बदललं. 'तुमसा नहीं देखा' हा नासिर हुसैन यांचा चित्रपट हिट ठरला. नासीर यांनी याआधी देव आनंद यांच्‍यासाठी 'पेईंग गेस्ट' आणि 'मुनीम जी' यासारखे हिट चित्रपट बनवले होते. यानंतर शम्‍मी यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. 'जानवर,' 'जंगली,' 'प्रोफेसर,' 'दिल देके देखो' या चित्रपटांतून त्‍यांची वेगळी ओळख बनली. या बॉलिवूडच्‍या सुपरहिट चित्रपटांचे ते हिट हिरो ठरले. 
Image result for shammi kapoor
शम्मी कपूर यांचे १४ ऑगस्‍ट २०११ ला निधन झाले. 

'चांदणी' निखळली; पण...









बॉलिवूडची 'चांदणी' अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. त्‍यांचं निधन झालं त्‍यावेळी कुणालाही विश्‍वास बसला नव्‍हता. परंतु, ते सत्‍य होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईमध्ये भाच्याच्या विवाहसोहळ्यामध्ये बाथटबमध्ये पडून काळाच्या पडद्याआड गेल्या.  

श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला होता. श्री अम्मा यंगर अय्यपन असे त्‍यांचं नाव होतं.  १९६७ साली त्‍यांनी मल्‍याळम चित्रपटात काम केले होते. यासाठी त्यांना केरळ सरकारकडून सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले होते. श्रीदेवी यांच्या जाग उठा इंसान, लम्‍हे, आर्मी, सदमा, नगिना, जानबाज, मि. इंडिया, चांदणी, चालबाज, जुदाई, इंग्लिश विंग्लिश या त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविले. 
dinsta
श्रीदेवी यांचे गाजलेले चित्रपट
जाग उठा इंसान, सदमा, चांदणी, चालबाज, लम्‍हे , आर्मी, जुदाई,  नगिना, जानबाज, मि. इंडिया, इंग्लिश-विंग्लिश. 
Image result for sri devi
श्रीदेवी यांचे चित्रपट 
जैसे को तैसा (१९७३), 
जूली (१९७५), 
सोलहवां साल (१९७८), 
हिम्मतवाला (१९८३), 
जस्टिस चौधरी (१९८३), 
जानी दोस्त (१९८३), 
कलाकार (१९८३), 
सदमा (१९८३), 
अक्लमंद (१९८४), 
इन्कलाब (१९८४), 
जाग उठा इंसान (१९८४), 
नया कदम (१९८४), 
मकसद (१९८४), 
तोहफा (१९८४), 
बलिदान (१९८५), 
मास्टर जी (१९८५), 
सरफ़रोश (१९८५), 
आखिरी रास्ता (१९८६), 
भगवान दादा (१९८६), 
धर्म अधिकारी (१९८६), 
घर संसार (१९८६), 
नगीना (१९८६), 
कर्मा (१९८६), 
सुहागन (१९८६), 
सल्तनत (१९८६), 
औलाद (१९८७), 
हिम्मत और मेहनत (१९८७), 
नज़राना (१९८७), 
मजाल (१९८७), 
जोशीले (१९८७), 
जवाब हम देंगे (१९८७), 
मिस्टर इंडिया (१९८७), 
शेरनी (१९८८), 
राम अवतार (१९८८), 
वक्‍त की आवाज़ (१९८८), 
सोने पे सुहागा (१९८८), 
चालबाज़ (१९८९), 
चांदनी (१९८९), 
गुरु (१९८९), 
गैर कानूनी (१९८९), 
निगाहें (१९८९), 
बंजारन (१९९१), 
फरिश्ते (१९९१),
पत्थर के इंसान (१९९१), 
लम्हे (१९९१), 
खुदा गवाह (१९९२), 
हीर राँझा (१९९२), 
चन्द्रमुखी (१९९३), 
गुमराह (१९९३), 
गुरुदेव (१९९३), 
रूप की रानी चोरों का राजा (१९९३), 
चाँद का टुकड़ा (१९९४), 
लाडला (१९९४), 
आर्मी (१९९६), 
मि. बेचारा (१९९६), 
कौन सच्चा कौन झूठा (१९९७), 
जुदाई (१९९७), 
प्रदीर्घ कालखंडानंतर श्रीदेवी यांनी सेकंड इनिंगला सुरुवात करताना २०१२ मध्ये रुपेरी पडद्यावर दणक्यात पुनरागमन केले होते. दिग्दर्शिका म्हणून गौरी शिंदे यांचा पहिलाच चित्रपट असलेल्या इंग्लिश विंग्लीशमधून श्रीदेवी यांनी आपली अभिनयाची जादू पुन्हा दाखवून दिली. मध्यमवर्गीय स्त्री ची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर न भूतो न भविष्यती यश लाभले. या चित्रपटानंतर २०१७ साली प्रदर्शित झालेला मॉम हा श्रीदेवी यांच्या जीवनातील अखेरचा चित्रपट ठरला. 
dinsta
श्रीदेवी यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी २०१३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 
दुबईत निधन
मोहित मारवाह यांच्या लग्न सोहळ्यासाठी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह श्रीदेवी दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्‍या. चित्रपट दिग्दर्शक सुरिंदर कपूर नात आणि नोयडा फिल्म सिटीचे संस्थापक संदीप मारवाह यांचा मुलगा मोहित यांचा विवाह दुबई आयोजित करण्यात आला होता. येथील एका हॉटेलमध्‍ये रूममधील बाथटबमध्‍ये बुडून श्रीदेवी यांचा २४ फेब्रुवारी, २०१८ रोजी मृत्‍यू झाला होता. 
मोहित बोनी कपूर यांचे भाचे आहेत. तर अर्जुन कपूर आणि सोनम कपूर यांचे चुलत भाऊ आहेत. श्रीदेवी ज्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या, त्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ श्रीदेवी यांचा अखेरचा ठरला. 
Responsive image
श्रीदेवी-दिव्‍या भारती बहिणीसारख्या वाटायच्या
अभिनेत्री दिव्‍या भारती आणि श्रीदेवी यांच्‍या चेहर्‍यात साम्‍य होतं. म्हणूनच त्या दोघींना चाहते बहिणी म्हणायचे. दिव्याने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली. पण, तिने अकाली जगाचा निरोपही घेतला. दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. दिव्याचा मृत्यू १९९३ मध्ये झाला होता. श्रीदेवी आणि दिव्या भारती या दोघींना बहिणी म्हणण्याचे आणखी एक महत्‍वाचे कारण म्हणजे दिव्याच्या एक्‍झिटनंतर तिचे अपुरे राहिलेले चित्रपट श्रीदेवी यांना रिप्लेस करून करण्यात आले होते. 
‘लाडला’ या चित्रपटाचे शूट सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी दिव्याच्या मृत्यूची बातमी आली. यामुळे हा चित्रपट कसा पूर्ण करायचा हा मोठा प्रश्न दिग्दर्शकापुढे होता. दिव्याशीच मिळता-जुळता चेहरा म्हणून श्रीदेवी यांची निवड करण्यात आली. मोहरा आणि विजयपथ हे दोन चित्रपट दिव्याने साईन तर केले मात्र ते पूर्ण करण्याआधीच ती जग सोडून गेली. 
dinsta
बॉलिवूडमध्ये श्रीदेवी विरुद्ध माधुरी 
श्रीदेवी व माधुरी या दोघीत पहिला सामना १९८९ साली झाला. श्रीदेवीला ‘चांदनी’ आणि ‘चालबाज’ या तर माधुरीला ‘प्रेम प्रतिज्ञा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या वेळेस मात्र ‘चालबाज’साठी श्रीदेवीने पुरस्कार पटकावला. या दोघीत दुसरा सामना झाला १९९१ साली. श्रीदेवीला ‘लम्हे’ तर माधुरीला ‘साजन’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. यावेळीही श्रीदेवीने पुरस्कार पटकावला. १९९२ ला तिसरा सामना झाला. श्रीदेवीला ‘खुदा गवाह’ तर माधुरीला ‘बेटा’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. जुही चावला (‘बोल राधा बोल’ या चित्रपटासाठी) ही सुद्धा यावेळी स्पर्धेत होती. यावेळीही हा पुरस्कार कोण जिंकणार याबद्दल कमालीची उत्सुकता असताना माधुरीने ‘बेटा’साठी हा पुरस्कार पटकावत श्रीदेवीवर मात केली.
१९९३ साली श्रीदेवीला ‘गुमराह’ तर माधुरीला ‘खलनायक’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. जुही चावला ‘हम है राही प्यार के’साठी यावेळी स्पर्धेत होती. यावेळी मात्र, जुही चावलाने श्रीदेवी आणि माधुरी या दोघींवरही मात केली. श्रीदेवी व माधुरी या दोघीत पाचवा सामना झाला १९९४ साली. श्रीदेवीला ‘लाडला’ तर माधुरीला ‘अंजाम’ व ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. यावेळेस माधुरीने हा पुरस्कार जरी ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटासाठी पटकावला असला तरी यावेळेसची माधुरीची ‘अंजाम’मधील भूमिका हीच दुसर्‍याही स्थानावर आली होती. १९९७ साली श्रीदेवीला ‘जुदाई’ तर माधुरीला ‘दिल तो पागल है’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. यावेळेस माधुरीनेच हा पुरस्कार पटकावला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 
थायलंडची राजधानी बँकॉक येथे आयफा अॅवॉर्ड्स २०१८ च्‍या सोहळ्‍यात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्‍कार त्‍यांचे पती बोनी कपूर यांनी स्‍वीकारला होता. 

Wednesday, August 15, 2018

जॅकलीन फर्नांडिसचे पाहा हॉट फोटोज

जॅकलीन फर्नांडिस फिट अभिनेत्री आहे. ती आपल्‍या हेल्‍थकडे नेहमीच विशेष लक्ष देते. त्‍यामुळे ती तिकीच सुंदर आणि हॉट दिसते. स्पोर्ट्स वेअर असो वा रेड कार्पेट, ती कुठल्‍याही इव्‍हेंटच्‍या ड्रेसमध्‍ये गॉर्जियस दिसते. तिने जिम वर्कआऊट करून स्‍वत:ला मेन्‍टेन ठेवले आहे. फिटनेससाठी जॅकलीन वेगवेगळ्‍या प्रकारचे वर्कआउटदेखील करते. 

dinsta
dinsta
dinstadinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
जॅकलीन आपल्‍या चेहर्‍याकरिता घरगुती उपचारदेखील करते. दही आणि मध तिचा फेवरेट असल्‍याने हे दोन्‍ही प्रोडक्ट्स ती वापरते. ओठांसाठी ती नेहमी मधाचा वापर करते. 
dinsta
dinsta
जॅकलीन लवकरच सलमान खानसारखं एका क्लोथिंग ब्रॅण्‍ड लॉन्च करणार आहे. 
dinsta
जॅकलीनने सलमान खान, कॅटरीना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा सोबत 'दबंग टूर' पूर्ण केले आहे. टूरच्‍या शेवटच्‍या दिवसाचा फोटो जॅकलीनने  इन्‍स्‍टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. 
dinsta
dinsta
जॅकलीन लवकरच चित्रपट 'ड्राईव्‍ह'चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, विक्रमजीत विर्क आणि सपना पब्बी मुख्‍य भूमिकेत आहेत.
dinsta
जॅकलीन फर्नांडिस श्रीलंकन ब्यूटी आहे. परंतु, अभिनयाच्‍या जोरावर तिने बॉलिवूडमध्‍ये आपले नाव कमावले. 
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta
dinsta

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...