माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता प्रसिध्द आहेत. त्यांच्या कवितांना अनेक बॉलिवूड गायकांनी आपला जादुई आवाज दिला आहे. ज्यावेळी अटलजी पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांच्या कवितांवर म्युझिक अल्बम बनवण्यात आले होते. या अल्बमला लता मंगेशकर, गझल गायक जगजीत सिंह, हरिहरन, पद्मजा जग आणि शंकर महादेवन यांनी आवाज दिला होता.
जगजीत सिंह यांनी अटलजी यांच्या कवितांवर 'नई दिशा' हा अल्बम आणला होता. १९९९ मध्ये आलेल्या या अल्बमला बेस्ट नॉन फिल्म लिरिक्स कॅटेगरीत स्क्रीन अॅवॉर्ड दिला होता. अटलजी नेते असताना मनोरंजन जगतात हा अॅवॉर्ड मिळवणारे पहिले व्यक्ती होते. परंतु, वेळेच्या अभावी ते या ॲवॉर्ड सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. नंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानित करण्यात आले.
यानंतर २००२ मध्ये जगजीत यांनी 'संवेदना' अल्बममध्ये अटल बिहारी यांच्या कवितांना आपला आवाज दिला. हा अल्बम यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. शाहरुख खानचा त्यात भूमिका होती. जगजीत यांनी अल्बममध्ये ८ कवितांना स्वरसाज चढवला. अटल बिहारी यांचा कविता संग्रह 'मेरी इक्यावन रचनाएं' यातील काही कविता या लता मंगेशकर यांनी स्वरबध्द केल्या होत्या. या अल्बमने जगजीत सिंह, जावेद अख्तर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि यश चोप्रा यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणलं होतं. 'संवेदना'ची प्रस्तावना जावेद अख्तर यांनी लिहिली होती. तर आवाज अमिताभ बच्चन यांनी दिला होता. शाहरुखने 'क्या खोया क्या पाया' या कवितेवर अभिनय केला होता.
अटल बिहारी वाजपेयी फक्त नेतेच नाही तर ते उत्तम कवी, लेखक होते. त्याचबरोबर बॉलिवूडशी त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी हे गायिका लता मंगेशकर यांच्याशीही खास नातं होतं. लता मंगेशकर यांनी अटलजी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.
लता मंगेशकर म्हणाल्या, 'मला वाटतयं की, भारतमधून एक साधु पुरुष गेला. ते खूप उत्तम लेखक आणि कवी होते. अटलजी यांच्या भाषणात सर्व काही सत्य असायचं, ते चांगले व्यक्ती होते. त्यांनी कुणाचं कधीही मन दुखावलं नाही. मी त्यांना माझ्या वडिलांप्रमाणे मानत होते. जेव्हा मी त्यांना म्हणाले, मी आपल्याला माझ्या वडिलांप्रमाणे मानते. हे ऐकून ते म्हणाले होते की, मी देखील आपल्याला माझी मुलगी मानतो. त्यानंतर मी त्यांना दद्दा म्हणू लागले. ते माझ्या प्रेम करत होते. ते सगळ्यांवर प्रेम करत होते.'
'१९४२ मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता, आज तितकाच मोठा धक्का मला बसला आहे,' असे लताजी म्हणाल्या.
लता मंगेशकर यांनी एक आठवण सांगितली की, 'ज्यावेळी आम्ही आमच्या वडिलांच्या नावे एक हॉस्पिटल उभारले होते. त्यावेळी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला अटल बिहारी वाजपेयींना आमंत्रित केलं होतं. उद्घाटन समारंभाच्या शेवटी त्यांनी भाषण केलं होतं. ते म्हणाले होते, आपलं हॉस्पिटल चांगले चालावे, अशा शुभेच्छा मी देणार नाही. कारण, अशा शुभेच्छा देण्याचा अर्थ लोक आजारी पडू देत असा होईल. हे ऐकून मी पुढे काही बोलू शकले नाही.'
लता मंगेशकर यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, 'अटलजी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून असं वाटलं की, डोंगर कोसळला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.'
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता प्रसिध्द आहेत. त्यांच्या कवितांना अनेक बॉलिवूड गायकांनी आपला जादुई आवाज दिला आहे. ज्यावेळी अटलजी पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांच्या कवितांवर म्युझिक अल्बम बनवण्यात आले होते. या अल्बमला लता मंगेशकर, गझल गायक जगजीत सिंह, हरिहरन, पद्मजा जग आणि शंकर महादेवन यांनी आवाज दिला होता.
अल्बम 'नई दिशा' मिळाला होता स्क्रीन अॅवॉर्ड
जगजीत सिंह यांनी अटलजी यांच्या कवितांवर 'नई दिशा' हा अल्बम आणला होता. १९९९ मध्ये आलेल्या या अल्बमला बेस्ट नॉन फिल्म लिरिक्स कॅटेगरीत स्क्रीन अॅवॉर्ड दिला होता. अटलजी नेते असताना मनोरंजन जगतात हा अॅवॉर्ड मिळवणारे पहिले व्यक्ती होते. परंतु, वेळेच्या अभावी ते या ॲवॉर्ड सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. नंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानित करण्यात आले.
यानंतर २००२ मध्ये जगजीत यांनी 'संवेदना' अल्बममध्ये अटल बिहारी यांच्या कवितांना आपला आवाज दिला. हा अल्बम यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. शाहरुख खानचा त्यात भूमिका होती. जगजीत यांनी अल्बममध्ये ८ कवितांना स्वरसाज चढवला. अटल बिहारी यांचा कविता संग्रह 'मेरी इक्यावन रचनाएं' यातील काही कविता या लता मंगेशकर यांनी स्वरबध्द केल्या होत्या.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. एक नेते, कवी, लेखक म्हणून त्यांची ख्याती. इतकेच नाही तर अटल बिहारी वाजपेयी हे अभिनेत्री हेमा मालिनी यांचे मोठे फॅन होते. त्यांना हेमा मालिनी यांचा १९७२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'सीता और गीता' इतका आवडला होता की, त्यांनी हा चित्रपट २५ वेळा पाहिला होता. खुद्द हेमा मालिनी यांनी ही माहिती दिली होती. चित्रपट 'सीता और गीता'मध्ये हेमा मालिनी यांची दुहेरी भूमिका होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. या चित्रपटात हेमा मालिनी सोबत धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांच्यादेखील मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात हेमा मालिनी यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.
हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, 'मला आठवतयं की, ज्यावेळी मी पदाधिकार्यांना म्हणाले होते की, मी माझ्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करते. परंतु, मी त्यांना कधी भेटलेले नाही. त्यानंतर माझी अटलजी यांच्याशी भेट झाली. या भेटीत अटल बिहारी वाजपेयी माझ्याशी बोलले नाहीत. मग तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेला मी विचारलं की, अटलजी माझ्याशी का बोलत नाहीत? तर ती महिला म्हणाली, अटलजी आपले खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी १९७२ मध्ये आलेला चित्रपट 'सीता और गीता' हा २५ वेळा पाहिला आहे.'
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती नाजूक आहे. याचदरम्यान, एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आयुष्यावर येणारा चित्रपट 'द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'मधला आहे.
या चित्रपटात मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत. अभिनेता राम अवतार भारद्वाज हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक फोटो अनुपम खेर यांनी ट्विट करुन या चित्रपटातील कलाकारांबद्दल माहिती दिली होती.
द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट डॉ. मनमोहन सिंह यांचे तत्कालीन मीडिया सल्लागार संजय बारू यांचं पुस्तक ‘The Accidental Prime Minister: The Making And Unmaking of Manmohan Singh’ यावर आधारित आहे. हा चित्रपट विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटातून विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
हंसल मेहता या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते आहेत. अक्षय खन्ना संजय बारू यांच्या तर जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्ट या सोनिया गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. राहुल गांधी यांची भूमिका अर्जुन माथुर साकारत आहेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच नाव राजकारणात मोठं आहे. भाजप पक्षाचे अध्यक्ष ते पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. १९९८ मध्ये ज्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुचाचणी केली होती. अणुचाचणीने जगभरात खळबळ माजली होती.
ही घटना जॉन अब्राहमचा चित्रपट 'परमाणु'मध्ये दाखवण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित परमाणु चित्रपटात जॉनने IAS अधिकारी रैनाची भूमिका साकारली आहे.
१९९८ साली भारताने एकूण ५ चाचण्या केल्या होत्या.११ मे १९९८ ला राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात तीन अणुचाचण्या केल्या. मग दोन दिवसांनी १३ मे राजी आणखी दोन चाचण्या केल्या. या तीन अणुचाचण्यांनी सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्काच बसला. न्यूक्लियर राष्ट्रांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले. ही घटना देशासाठी अभिमानाची होती. या अणु चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २० मे ला पोखरणला भेट दिली होती.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना न्यूक्लियर स्टेटला हिरवा कंदील दाखवला होता. ११ मे ला दुपारी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकारी घर ७ रेस कोर्समध्ये एक पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत त्यांनी अणुचाचणी योजनेची माहिती माध्यमांना दिली होती.
अटल बिहारी वाजपेयी हे या अणुचाचण्यांचे श्रेय माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना देतात. राव यांना श्रद्धांजली देताना अटल यांनी म्हटलं होतं की, ‘मे १९९६ मध्ये राव यांच्यानंतर मी पंतप्रधानपदाची खुर्ची सांभाळली. त्यावेळी राव मला म्हणाले होते की, बॉम्ब तयार आहे.’
तसेच अनेक भाषणांमध्ये वाजपेयी यांनी अणुचाचणीचे श्रेय ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम आणि एपीजे अब्दुल कलाम यांना दिलं होतं.
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिर. चालुक्य शिल्प स्थापत्यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्यस्थितीत सुस्थितीत असले तरी पावसाळ्यात या मंदिरातील पडझड झालेल्या स्तंभांना, कमानीला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्या विकासाकडे लक्ष देण्याची तर पुरातत्व विभागाने या मंदिराची देखभाल करण्याची आवश्यकता आहे.
कोपेश्वर मंदिराला केंद्रीय पुरातत्व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. कोपेश्वर मंदिर अप्रतिम स्थापत्यशैलीसाठी प्रसिध्द आहे. बेसॉल्ट आणि ग्लास पॉलिशिंग केल्याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्यात ऊबदारपणा आणि उन्हाळ्यात गारवा टिकून राहावा, त्यादृष्टीने तत्कालीन स्थापत्य विशारदांनी केलेला प्रयत्न येथे दिसून येतो.
कोपेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये
या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे गजपट्ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे.
उत्कृष्ट शिल्पकलेचा अविष्कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्या मंदिराशी केली जाते. या स्थानाचे मूळ नाव कोप्पम किंवा कोप्पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्पम जिंकल्यानंतर त्याच्या नावावरून खिद्रापूर असे नाव त्याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्वराचा उल्लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्लेख सापडतो.
मंदिरात २ शिवलिंग
गाभार्यात कोपेश्वर (महेश) आणि धोपेश्वर (विष्णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्ट्य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्याचे दुसरे वैशिष्य होय. मंदिराचे वेगळेपण म्हणजे स्वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्या दर्शनी भागात आकाशाच्या दिशेने १३ फूट व्यासाचे गवाक्ष आहे. त्याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्त्रधारी द्वारपाल, सप्तमातृकांच्या प्रतिमा आहेत. यावरून, तत्कालीन समाजातील स्त्रियांना असणारे उच्च स्थान समजते.
मंदिर परिसरात १२ शिलालेख
मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्यातील ८ शिलालेख कन्नड भाषेतील आहेत. त्यापैकी एक संस्कृतमध्ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्याच्या दक्षिण बाजूच्या विरगळावर जुन्या कन्नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्वराची स्थिती, कुसुमेश्वर, कुटकेश्वर या नावांचा उल्लेख मिळतो.
दक्षिण स्थापत्यशैलीचा प्रभाव
मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्या पायथ्याशी खुरशिला, गजपट्ट त्यावर नरपट्ट आणि त्यावरील देवकोष्ट (चौकट असल्यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्याने दक्षिणेतील स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो.
मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्णू, ब्रम्हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्प आदी शिल्पे जैन मंदिराची वैशिष्ट्ये दशर्वणारी आहेत.
मंदिरात आढळते आखाती शिल्प
मंदिरावर इराणी किंवा आखाती व्यक्तीचे शिल्प आहे. इराणचा बादशहा दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्हणून त्या इराणी राजदुताचे शिल्प कोरले असावे.
सप्टेंबर, १७०२ मध्ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्या महापुरातदेखील मंदिर सुस्थितीत राहिले होते. मध्यंतरी, स्वर्गमंडप, काही स्तंभाची पडझड झाली होती. पुरातत्व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आता आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते.
पर्यटन केंद्र म्हणून आजही दुर्लक्षित
‘‘धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्यक आहे. पुरातत्व खात्याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्यवस्था करण्याची गरज आहे.’’
- प्रा. शशांक रामचंद्र चोथे (इतिहास संशोधक)
खिद्रापूरला जाण्याचा मार्ग
एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे जाता येते.