Tuesday, November 27, 2018

इंटिमेट सीनला जया प्रदाने लगावलेली कानाखाली



बॉलिवूडमध्‍ये #MeToo मोहीम तीव्र झाल्‍यानंतर अभिनेते सतर्क झाले आहेत. नुकताच अभिनेते दलीप ताहिल यांनी एका चित्रपटातील रेप सीन शूट करण्‍यास नकार दिला. दिग्‍दर्शकांनी त्‍यांना समजवलं की, हा सीन चित्रपटासाठी गरजेचा आहे. त्‍यावेळी दलीप ताहील म्‍हणाले, 'आधी त्‍या अभिनेत्रीकडून लिहून घ्‍या की, रेप सीन करण्‍याआधी आणि नंतर तिला कोणतीही हरकत नसेल.' 

दलीप यांनी एका मुलाखतीत म्‍हटले की, ''२५-३० वर्षांपूर्वी एका रेप सीन दरम्‍यान घटना घडली होती. एका चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी दिग्‍दर्शकाने मला बाजूला बोलावून म्‍हटले की, रेप सीन खराखुरा वाटलं पाहिजे, अशी ॲक्‍शन करा.' हे ऐकून मी अवाक झालो. मी म्‍हणालो, 'मी एक थिएटर आर्टिस्‍ट आहे, प्रोफेशनल देखील आहे. आणि माझं मन हे करण्‍यास परवानगी देत नाही.' त्‍यावेळी दिग्‍दर्शक म्‍हणाला, 'काय दलीप भाई, कसल्‍या गोष्‍टी करत आहात.' मग मी म्‍हणालो, 'तुम्‍ही जे हे बोलत आहात, ते अभिभनेत्रीसमोर बोलून दाखवा.' हे ऐकल्‍यानंतर दिग्‍दर्शक घाबरला. अभिनेत्रीला ही गोष्‍ट समजल्‍यानंतर ती रडू लागली.'' 
Image result for dalip tahil
एका चित्रपटात दलीप ताहिल आणि जया प्रदा एकत्र काम करत होते. शूटिंग दरम्‍यान, जया प्रदासोबत असं काही घडलं की, दलीप यांना सर्वांसमोर मान खाली घालावी लागली. खरं म्‍हणजे, एका चित्रपटात जया प्रदा यांना दलीप ताहिलसोबत इंटीमेट सीन शूट करायचा होता. जशी शूटची सुरूवात झाली, दलीप ताहील यांनी भान ठेवता ॲक्‍शन करायला सुरुवात केली. जया प्रदा स्‍वत:ला सोडवण्‍याचा प्रयत्‍न करत होती. अखेर जया यांनी दलीपला जोरात  कानाखाली लगावली. जया दलीप यांना म्‍हणाली, 'ही रील लाईफ आहे, रियल लाईफ नाही.' या घटनेमुळे काही वेळ शूटिंग ठप्‍प झाले होते.

मल्लिकाने दुसर्‍या चित्रपटात दिलेले १७ किस सीन!


अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा आज ४२ वा वाढदिवस. तिचा जन्‍म २४ ऑक्‍टोबर १९७६ ला हिसारमधील मोथ येथे झाला. 

मल्लिकाने 'जीना सिर्फ मेरे लिए'मधून बॉलिवूडमध्‍ये पाऊल ठेवलं. मल्लिकासोबत चित्रपटात करीना आणि तुषार कपूर मुख्‍य भूमिकेत होते. त्‍यानंतर मल्‍लिकाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिला ओळख मिळाली ती 'मर्डर' या चित्रपटातून. त्‍यामध्‍ये इम्रान हाशमीची प्रमुख भूमिका होती. 
मल्लिका सध्‍या लाईमलाईटपासून दूदर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमी ॲक्‍टिव्‍ह राहते. आपले बोल्‍ड आणि हॉट फोटोज ती शेअर करत असते. 
मल्लिकाने चित्रपटांशिवाय, टीव्‍ही मालिकामध्‍येही काम केलं आहे.  'साराभाई vs साराबाई', 'द बॅचलैरेट इंडिया' या मालिकांचा समावेश आहे.  'साराभाई vs साराबाई' मधली तिची भूमिका प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली होती. 
मल्‍लिकाने दुसर्‍या चित्रपटात १७ किसींग सीन दिले होते. अभिनेता इमरान हाशमीसोबत 'मर्डर' चित्रपटात बोल्ड सीन दिल्‍यानंतर तिने 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटात देखील बोल्‍ड सीन दिले होते. विशेष म्‍हणजे तिने ६५ वर्षीय अभिनेते ओमपुरी यांच्‍यासोबत इंटिमेट सीन्स दिले होते. या चित्रपटात  मल्लिकाने 'अनोखी देवी'ची भूमिका साकारली होती. 
पारंपरिक जाट फॅमिलीतून असल्‍यामुळे मल्‍लिकाला चित्रपटात येण्‍यासाठी आपल्‍या फॅमिलीविरोधात जावं लागलं होतं. चित्रपटात येण्‍यापूर्वी मल्‍लिकाने अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान सोबत जाहिरातीत काम केलं होतं. विावाहपूर्वीचे आडनाव शेरावत होते. 
खूप कमी लोकांना माहितीये की, मल्लिकाने आयएएस व्‍हावं, असं तिचे वडिल मुकेश लाम्बा यांना वाटत होतं. एका मुलाखतीत त्‍यांनी म्‍हटलं होतं की, 'मला मल्‍लिकाला आयएएस बनवायचं होतं. परंतु, तिला अभिनय क्षेत्रात जायचं होतं. चित्रपटात आली नसती तर ती एअरहोस्‍टेस झाली असती.' 

सारा अली खानचं नाही तर 'या' स्‍टारकिड्‍सचीही बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री!


बॉलिवूड स्‍टार्सची मुले देखील आपल्‍या आई-वडिलांच्‍या पावलावर पाऊल ठेवून सिनेइंडस्‍ट्रीत येताना दिसताहेत. श्रीदेवी यांची मुलगी जान्‍हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्‍टर या स्‍टारकिड्‍सनी इंडस्‍ट्रीत पाऊल ठेवलं आहे. तर जान्‍हवी कपूरची बहिण खुशी कपूर, अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन, सुनील शेट्‍टीचा मुलगा अहान शेट्‍टी आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्‍या पांडे हे बॉलिवूड इंडस्‍ट्रीत येण्‍यास सज्‍ज झाले आहेत. 

जान्‍हवी कपूर 
अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्‍हवी कपूरचा डेब्‍यू चित्रपट 'धडक' २० जुलै २०१८ रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. परंतु, या चित्रपटाला म्‍हणावे तसे यश मिळाले नाही. या चित्रपटात जान्‍हवीसोबत ईशान खट्‍टरची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात नेगेटिव्‍ह भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष राणाने जान्‍हवीबद्‍दल प्रतिक्रिया देताना म्‍हटले होते, 'गेल्‍या काही काळापासून जान्‍हवी इंडस्ट्रीत आहे. तिच्‍याजवळ श्रीदेवींसारखा चार्म नाही. आणि तशा प्रकारचा चार्म आणण्‍याचा प्रयत्‍नही तिने केला नाही. मी तिच्‍यासोबत काम करताना एन्‍जॉय केला. ती खूप प्रोफेशनल आहे. आणि लक्ष देऊन कामही करते. तिच्‍या कामावरून वाटतयं की ती बॉर्न ॲक्‍टर आहे.' 
Image result for janhvi kapoor
'धडक'नंतर जान्‍हवीच्‍या झोळीत आणखी एक चित्रपट पडला. तो म्‍हणजे करण जोहरचा 'तख्त'. हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार आहे. रणवीर सिंग, करीना कपूर खान, जान्हवी कपूर, अनिल कपूर आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांच्‍या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. खुद्‍द करण जोहरने 'तख्त' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
त्‍यानंतर जान्‍हवीला आणखी एक चित्रपट मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी चित्रपटात जान्‍हवी वरुण धवनसोबत रोमान्‍स करताना दिसणार आहे. 'रणभूमी' असे चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट शशांक खैतान बनवत आहेत. वरुण पहिल्‍यांदाच जान्‍हवीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली 'रणभूमी'ची निर्मिती होत आहे. 
सारा अली खान 
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या सारा अली खानचा 'केदारनाथ' हा चित्रपट रखडत का होईना, प्रदर्शनाच्‍या मार्गावर आहे. ‘केदारनाथ’बरोबरच ‘सिम्बा’ देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यापैकी ‘सिम्बा’ हा २८ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. 
Image result for sara ali khan
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘हटके’ चित्रपट करण्यासाठी मोठे धाडस साराने दाखवले. पहिलाच चित्रपट ‘केदारनाथ’मुळे पदार्पण लांबणीवर पडलेल्या सारा अली खान अतिशय काळजीपूर्वक चित्रपटाची निवड करत आहे. 'केदारनाथ,' 'सिम्‍बा' असे चित्रपट सुरुवातीलाच मिळाल्‍यानंतर तिला ‘हिंदी मीडियम-२’साठी विचारण्‍यात आले होते. दिनेश विजान आपला हिट चित्रपट ‘हिंदी मीडियम’चा सिक्वेल बनवणार आहे. परंतु, या सिक्‍वेलसाठी साराने नकार दिला होता. 
Image result for sara ali khan kedarnath
ईशान खट्‍टर 
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्‍ये माजिद मजीदी यांच्‍या 'बियॉन्‍ड द क्‍लाऊड्‍स' या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्‍यात ईशानसोबत मालविका मनमोहन हिने  भूमिका साकारली होती. ए. आर. रहमान यांनी संगीत दिले होते. त्‍यानंतर त्‍याला 'सैराट' या मराठी चित्रपटाचा रिमेक असलेला चित्रपट 'धडक' मिळाला. जान्‍हवी कपूर आणि ईशानची त्‍यात मुख्‍य भूमिका होती. ईशान हा त्‍याच्‍या डान्‍समुळे ओळखला जातो. कारण, ईशानचे डान्‍सचे अनेक व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत. 
मीडिया रिपोर्टनुसार, ईशानला आणखी एक चित्रपट मिळाला होता. परंतु, त्‍याच्‍या एक्‍स गर्लफ्रेंडमुळे त्‍याला हा चित्रपट गमवावा लागला. टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द ईअर-२' ईशान मुख्‍य भूमिकेत दिसणार होता. परंतु, अभिनेत्री तारा सुतारियामुळे त्‍याला हा चित्रपट मिळू शकला नाही. आधी तारा आणि ईशान एकमेकांना डेट करत होते. त्‍यामुळे हे एक्स लव्‍हबर्ड्स चित्रपटात यायला नको, असे करण जोहरला वाटले होते. त्‍यामुळेच ईशानला हा चित्रपट मिळाला नाही.  
प्रनूतन
सलमान खान बॉलिवूडमध्‍ये अनेकांचा गॉडफादर आहे. सलमान लेजेंडरी अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतचा गॉडफादर बनला आहे. सलमान प्रनूतनला बॉलिवूडमध्‍ये लॉन्च करणार आहे. प्रनूतन बहल आपल्‍या डेब्यू चित्रपटात न्यूकमर जहीर इकबालसोबत दिसणार आहे. चित्रपटाला सलमान खान फिल्मस, मुराद खेतानी, अश्विन वर्देच्‍या बॅनर खाली प्रोड्यूस केलं जाणार आहे. हा चित्रपट नितीन कक्कड डायरेक्ट करणार आहे.  
अहान शेट्‍टी 
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी पुढच्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियादवाला अहानला लॉन्‍च करणार आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘RX 100’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत. २०१९च्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे साजिद यांनीच सुनील शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्‍च केले होते. ‘वक्त हमारा है’ या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Related image
अनन्‍या पांडे 
'स्टुडंट ऑफ द ईअर-२'मध्‍ये टायगर आणि तारासोबत अभिनेते चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे. अनन्‍या या चित्रपटातून डेब्यू करत आहे. हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्‍दर्शित करत असून करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली तयार केला जात आहे. अनन्‍या स्‍टारर 'स्‍टुडंट ऑफ द ईअर-२' हा चित्रपट करण जोहरचा २०१२ मध्‍ये आलेला 'स्टुडंट ऑफ द ईअर'चा सीक्वेल आहे. 
अनन्या ही शाहरूखची कन्या सुहाना आणि संजय कपूरच्या कन्येची खास मैत्रीण आहे. या तिघींचे फोटो नेहमीच सोशल मीडियात झळकत असतात. त्यावेळेपासूनच अनन्या चित्रपटसृष्टीत हिरोईन होण्यासारखीच आहे, असे म्हटले जात होते. जुन्या जमान्यातील अभिनेत्री नलिनी जयवंत यांची आठवण करून देणारा तिचा चेहरा आहे. फराह खानने तर ‘चंकीची कन्या आणि इतकी सुंदर?’ असे गंमतीने म्हटले होते!  
Image result for chunky pandey daughter ananya pandey
स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टारकिड्सनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, आर्यन खान, आहाना पांडे यांसारखे स्टारकिड्स येत्या एक-दोन वर्षात मोठ्‍या पडद्‍यावर झळकतील, असे म्‍हटले जात आहे. 

रेखासोबत अफेअरमुळे चर्चेत होते विनोद मेहरा


बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी पंजाब अमृतसरमध्‍ये झाला होता. विनोद मेहरा चित्रपटांपेक्षा आपल्‍या अफेअर्स आणि लग्‍नामुळे चर्चेत राहिले होते. विनोद मेहरा यांनी १९५० च्‍या दशकात चाईल्ड आर्टिस्ट करिअरची सुरूवात केली होती. त्‍यांनी 'गुरुदेव' यासारख्‍या चित्रपटांचे दिग्‍दर्शनही केले होते. हा चित्रपट विनोद यांच्‍या निधनानंतर ३ वर्षांनी रिलीज झाला होता. 

विनोद मेहरा हे सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्‍यासोबत असलेल्‍या अफेअरमुळे चर्चेत राहिले होते. इतकेच नाही तर रेखा यांनी विनोद मेहरा यांच्‍याशी लग्‍न केल्‍याचे वृत्त देखील पसरले होते. परंतु, रेखा यांनी एका मुलाखतीत ही गोष्‍ट खोटी असल्‍याचे म्‍हटले होते. विनोद मेहरा माझे शुभचिंतक होते, असे रेखा यांनी म्‍हटले होते.
Image result for rekha and vinod mehra
चित्रपटांची सफर
विनोद मेहरा यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्‍ये काम केले होते. त्‍यांनी १९५८ मध्‍ये 'रागिनी' चित्रपटात बालकलाकार म्‍हणून काम केले होते. १९७१ मध्‍ये त्‍यांनी 'एक थी रीटा' या चित्रपटातून अभिनेता म्‍हणून काम केले. 'जानी दुश्मन', 'नागिन', 'घर', 'स्वर्ग नरक', 'कर्तव्य', 'साजन बिना सुहागन', 'एक ही रास्ता' आणि 'खुद्दार' यासारखे त्‍यांचे गाजलेले चित्रपट होय. 'अनुरोध', 'अमर दीप' आणि 'बेमिसाल'मध्‍ये देखील त्‍यांच्‍या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. 
रेखा यांच्‍यासोबत जोडलं गेलं नाव 
'पर्दे के पिछे' या चित्रपटामुळे दिसायला देखणा असणारे विनोद मेहरा प्रकाशात आले होता. पाली हिलला ते 'निभाना' अपार्टमेंटमध्‍ये राहायचे. त्‍यावेळी 'रामपूर का लक्ष्‍मण'मुळे रेखा प्रसिध्‍दीच्‍या झोतात होत्‍या. विनोदबरोबर रेखा यांना 'ऐलान' चित्रपटात काम करायची संधी मिळाली. हा चित्रपटही चालला. त्‍यामुळे विनोद मेहरा आणि रेखा यांच्‍या रोमान्‍सचे किस्‍से पसरू लागले. असेही वृत्त आले होते की, रेखा आणि विनोद मेहरा यांनी गुपचुप लग्‍न केले होते. परंतु, एका टीव्‍ही शोमध्‍ये रेखा यांनी या वृत्ताला नकार देत विनोद आपले चांगले मित्र असल्‍याचे म्‍हटले होते. रेखा आणि विनोद यांच्‍यामध्‍ये दूरी निर्माण होण्‍यामागे विनोद यांची आई हे एक कारण होते. विनोद यांच्‍या आईला रेखा आवडायची नाही. 
Image result for rekha and vinod mehra
दुसरीकडे रेखा यांनी धर्मेंद्रसमवेत 'किमत' चित्रपट केला. त्‍यामध्‍ये त्‍यांनी बोल्‍ड दृश्‍ये दिली होती. ही गोष्‍ट विनोद यांना खटकायची. 
Related image
तीन विवाहामुळे चर्चेत 
विनोद मेहरा यांचे पहिले लग्‍न मीना ब्रॉकासोबत झाले होते. हे अरेंज्ड मॅरेज होते. नंतर त्‍यांनी अभिनेत्री बिंदिया गोस्वामीशी लग्‍न केले. त्‍यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. बिंदिया गोस्वामी विनोद यांच्‍याशी वेगळी झाली आणि जे. पी. दत्ताशी लग्‍न केले. त्‍यानंतर विनोद मेहरा आणि रेखा यांच्‍या अफेअरची चर्चा सुरू झाली. १९८८ मध्‍ये विनोद यांनी किरणशी लग्‍न केले. १९९० मध्‍ये विनोद मेहरा यांचे निधन झाले. त्‍यांना एक मुलगा रोहन आणि  मुलगी सोनिया ही मुले आहेत.
विनोद मेहरा आणि राजेश खन्‍ना 
विनोद मेहरा १९६५ मध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्टचे फायनलिस्ट बनले होते. या स्‍पर्धेचे आयोजन युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरने केलं होतं. विशेष म्‍हणजे, राजेश खन्ना टॉपला पोहोचले. आणि विनाद मेहरा यांना रनर अप बनून समाधान मानावे लागले. 

जीव घुटमळला, तरीही तो आगीतून पळत सुटला


बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान चित्रपटसृष्‍टीत २६ वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेसृष्‍टीत शाहरुख खानने स्‍वत:ची प्रतिमा निर्माण करून किंग ऑफ बॉलिवूड म्‍हणून ओळख निर्माण केली. शाहरुखने १९९२ मध्‍ये  'दीवाना' या चित्रपटातून डेब्‍यू केलं होतं. त्‍यानंतर त्‍याच्‍या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट पडले. आपल्‍या करिअरमध्‍ये शाहरुखने प्रत्‍येक प्रकारच्‍या भूमिका पडद्‍यावर साकारल्‍या. 

Image result for shahrukh khan in koyla
जवळपास १५० हून अधिक चित्रपटांत शाहरुखने काम केले आहे. लाखों करोडो लोकांच्‍या मनावर शाहरुखने अधिराज्‍य गाजवलं. पडद्‍यावर देखील अनेक अभिनेत्रींसोबत त्‍याची जोडी हिट ठरली. काजोल, माधुरी दीक्षित या अभिनेत्रींसोबत त्‍याची केमिस्‍ट्री चांगली जुळली. त्‍यामुळेच त्‍याला 'रोमान्‍स ऑफ किंग' असेही म्‍हटले जाऊ लागले. 
Image result for madhuri and shahrukh khan
शाहरुख खानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्‍यापैकी एक चित्रपट म्‍हणजे 'कोयला.' या चित्रपटात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची पडद्‍यावरील जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली होती. जबरदस्त स्टंटने भरपूर या चित्रपटातील एक प्रसंग आठवणीत राहणारा आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एक घटना घडली होती. त्‍या घटनेमुळे शाहरुखच्‍या जीवाला धोका होता. खुद्‍द शाहरुख खानने या प्रसंगाचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. 
Related image
'कोयला' चित्रपटात एक सीन होते. ज्‍यावेळी शाहरुखच्‍या शरीरावर आग लागलेली असते आणि तो पळत असतो. हा खतरनाक स्टंट खुद्‍द शाहरुख खानने केला होता. त्‍याने या सीनमध्‍ये चेहर्‍यावर मास्क देखील लावलेलं नव्‍हते. शाहरुख खानने फायरप्रूफ कपडे घातले होते आणि वॉटर जेल लावले होते. परंतु, यामुळे केवळ १५ सेकंदासाठीच सुरक्षितता मिळते. तरीही शाहरुखने धाडसाने हे सीन शूट केले. 
Image result for shahrukh khan fire
Image result for madhuri and shahrukh khan in koyala
शाहरुखने मुलाखतीत म्‍हटले होते, 'हा सीन करताना आग अधिकच भडकली आणि त्‍यामुळे मला त्रास होऊ लागला. त्‍यानंतर मी जमिनीवर पडलो आणि आजूबाजूचे लोक आग विझवू लागले. माझा श्‍वास घुटमळत होता. माझ्‍यावर चादर फेकली गेली. परंतु, त्‍याचा काही उपयोग झाला नाही. नंतर एका क्रू मेंबरला वाटलं की, माझा चेहरा जळाला आहे. त्‍याने माझ्‍या चेहर्‍यावर कार्बन डाईऑक्साइडचा फवारा केला. ही घटना माझ्‍या आयुष्‍यातील सर्वांत भीतीदायक होती.' 
Related image

'त्‍याने' चित्रपट नाकारला म्‍हणून शाहरुखला मिळाला 'डर'

शाहरूख खानचा आज २ नोव्‍हेंबरला वाढदिवस. त्‍याच्‍या चित्रपटात रोमान्‍सचे अनेक रंग दिसले. चित्रपटाच्‍या माध्‍यमातून प्रेमाचे वेड दाखवणे, सर्वांनाच जमेलच असे नाही. परंतु, करून दाखवलं ते शाहरूखने. शाहरूखचे वेडे प्रेम त्‍याच्‍या एका चित्रपटात दिसले. तो चित्रपट म्‍हणजे 'डर.' डरमध्‍ये जुही चावलाची प्रमुख भूमिका होती. 

Image result for yash chopra and shahrukh khan
यश चोप्रा यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरस्टार दिले. त्‍यापैकी एक स्‍टार आहे, किंग खान अर्थातच शाहरुख खान. यश चोप्रा आणि शाहरुख खान यांची मैत्री सुरू झाली ती 'डर' या चित्रपटापासून. या चित्रपटाशी संबंधित एक प्रसंगही मजेदार आहे.
Image result for shahrukh khan in film darr
'डर'मध्‍ये शाहरुखने राहुल मेहराची भूमिका साकारली होती. खूप कमी लोकांना माहिती आहे की, 'डर' या चित्रपटासाठी यश यांनी राहुलची भूमिका शाहरुखला दिली नव्‍हती. या भूमिकेची ऑफर अजय देवगनला देण्‍यात आली होती. परंतु, वेळेअभावी अजयने ही ऑफर नाकारली. नंतर आमिर खानला ऑफर देण्‍यात आली, त्‍यावेळी आमिरकडूनही या चित्रपटासाठी होकार आला नाही. अजय देवगन आणि आमिरने नकार दिल्‍यानंतर शेवटी ही ऑफर शाहरुखला देण्‍यात आली. 
Image result for shahrukh khan in film darr
'डर'मध्‍ये मुख्‍य अभिनेता म्‍हणून सनी देओलने काम केले. परंतु, प्रसिध्‍दी मिळाली ती खलनायक अर्थातच शाहरुखला. 'डर' चित्रपटामुळे शाहरुख रातोरात सुपरस्टार बनला. विशेष म्‍हणजे, शाहरुख आणि सनी देओलने या चित्रपटानंतर कुठल्‍याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही. एका मुलाखतीत सनी देओलने नाराजी व्‍यक्‍त करत म्‍हटलं होतं की, 'चित्रपटात खलनायकाला अभिनेत्‍यापेक्षा अधिक दमदार असल्‍याचे दाखवण्‍यात आले. ज्‍यावेळी मला माहिती झालं की, चित्रपटाचा एन्‍ड असा होणार आहे, तेव्‍हा मला आश्‍चर्य वाटले.'
Image result for shahrukh khan in film darr
ही भूमिका केल्‍यानंतर शाहरुखला भीती होती की, त्‍याचं करिअर कदाचित संपुष्‍टात येईल. परंतु, असं घडलं नाही. उलट, शाहरुखला प्रचंड प्रसिध्‍दी मिळाली. 

शाहरुख गौरीसाठी दिल्‍ली सोडून आलेला मुंबईत


बॉलिवूडमध्‍ये शाहरुख खान आणि त्‍याची पत्‍नी गौरी खान हे बॉलिवूडमध्‍ये क्‍यूट कपल्‍सपैकी एक आहेत. २७ वर्षांचा त्‍यांचा प्रवास आजही सुरळीतपणे सुरू आहे. २५ ऑक्‍टोबर, १९९१ मध्‍ये दोघांनी विवाह केला. शाहरुख २ नोव्‍हेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. या औचित्‍याने त्‍याची पत्‍नी गौरी खान आणि शाहरूख खानबद्‍दल जाणून घेऊयात या खास गोष्‍टी. 
Image result for shahrukh khan and gauri khan
शाहरुख खानशी विवाह करण्‍यापूर्वी गौरी खानचं नाव गौरी छिब्बर होतं. गौरी आज एक यशस्‍वी उद्‍योजिका आहे. गौरी रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-ओनर आहे. तिने आपला पहिला चित्रपट 'मैं हूं ना' २००४ मध्‍ये प्रोड्यूस केला होता. इंटीरियर डिझायनर गौरी खानने आपलं करिअर २०१२ मध्‍ये सुरू केलं होतं. 
Image result for shahrukh khan and gauri khan
Related image
गौरी खान आणि शाहरूख खान याची लव्‍ह स्‍टोरीही हटके आहे. परंतु, त्‍यांच्‍या आयुष्‍यात असं एक वळण आलं की, दोघांचा ब्रेकअप झाला. पण, दोघे पुन्‍हा भेटणार, हे कोणाला माहित होतं. शाहरुख खान आणि गौरी शाळेत असल्‍यापासून एकमेकांशी प्रेम करत होते. आणि अनेक वर्षांच्‍या अफेअरनंतर दोघांनी आपल्‍या प्रेमाबद्‍दल घरच्‍या मंडळींना सांगितले. शाहरुख खान मुस्लिम असल्‍याने गौरीच्‍या घरच्‍यांना हे लग्‍न मान्‍य नव्‍हतं. 
Related image
Related image
गौरीप्रमाणेच शाहरुखही दिल्लीचा रहिवासी होता. दोघांची पहिली भेट १९८४ मध्‍ये एका कॉमन फ्रेंडच्‍या पार्टीत झाली. त्‍यावेळी  शाहरुख फक्‍त १८ वर्षांचा होता आणि गौरी १४ वर्षांची. मजेशीर म्‍हणजे शाहरुखच्‍या लाजाळू स्‍वभावामुळे गौरीसमोर तो आपलं प्रेम व्‍यक्‍त करू शकला नाही. गौरी ज्‍या-ज्‍या पार्टीत जायची, तेथे पहिल्‍यांदा तो हजर राहायचा. गौरी आणि शाहरुखचं फ्रेंड सर्कल कॉमन होते. मित्रांच्‍या मदतीने आणि थोड्‍याशा हिम्‍मतीने त्‍याने गौरीचा नंबर मागितला आणि गौरीने देखील आपला फोन नंबर शाहरुख दिला. त्‍यानंतर दोघांचं बोलणं नित्‍याचचं झालं. थोड्‍या दिवसांनंतर शाहरुख आणि गौरीमध्‍ये वाद होऊ लागले. हे वाद अधिकच वाढल्‍याने गौरी दिल्ली आणि शाहरुखला सोडून मुंबईत आली. शाहरुख खान सुरुवातीला गौरीबद्‍दल खूप पझेसिव्‍ह होता. दुसर्‍यांशी बोलणे आणि केस मोकळे ठेवणं हे शाहरुखला आवडायचं नाही. या गोष्‍टीला कंटाळून गौरीने शाहरूखशी ब्रेकअप घेतला होता. नंतर शाहरुख तिला भेटण्‍यासाठी पुन्‍हा मुंबईत गेला. गौरीसाठी शाहरुखला कसरत करावी लागली. तिच्‍या आई-वडिलांना इम्‍प्रेस करण्‍यासाठी त्‍याने आपण हिंदू असल्‍याचं सांगितलं होतं. 
Image result for shahrukh khan and gauri khan
Related image
... आणि दोघांनाही रडू कोसळले
शाहरुखला ज्‍यावेळी समजलं की, गौरी मुंबईला निघून गेली, त्‍यावेळी शाहरुखही मुंबईत आला. त्‍यावेळी शाहरुखजवळ पैसेही नव्‍हते. पैशांची जमवाजमव करून गौरीला शोधण्‍यासाठीत तो मुंबईत पोहोचला. शाहरुखने गौरीला खूप शोधलं, पण तिचा पत्ता लागेना. निराश होऊन शाहरुख मुंबईच्‍या एका बीचवर जाऊन बसला. त्‍याचवेळी तेथे त्‍याला गौरी दिसली. ती आपल्‍या मैत्रीणींसोबत तेथे आली होते. त्‍यांनी एकमेकांना पाहिले आणि दोघांनाही रडू कोसळले. त्‍यानंतर दोघांनीही लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. 
Image result for shahrukh khan and gauri khan

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...