Friday, June 7, 2019

... म्‍हणून अमृताने नाकारलेला सलमानचा चित्रपट



आपल्‍या अदाने अमृता रावने प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवलं. 'इश्क विश्क', 'विवाह', 'मैं हूं ना' यांसारख्‍या चित्रपटातून दमदार अभिनय साकारणार्‍या अभिनेत्री अमृता रावचा आज वाढदिवस. अमृताने चित्रपट ठाकरेमधून मोठ्‍या पडद्‍यावर वापसी केली होती. 

dinsta
७ जून, १९८१ रोजी अमृताचा जन्‍म मुंबईमध्‍ये झाला होता. अमृताने आपले करिअर मॉडलिंगमधून सुरू केले. ती अचानक मॉडलिंगच्‍या विश्‍वात आली. ती कॉलेजमध्‍ये होती, त्‍यावेळी तिला एका क्रीमच्‍या जाहिरातीसाठी निवडण्‍यात आलं. जवळपास १८ महिन्‍यांमध्‍ये तिने ३५ हून अधिक जाहिरातीमध्‍ये काम केलं. 
dinsta
त्‍याचा पहिला चित्रपट होता- अब के बरस (२००२). त्‍याचे दिग्‍दर्शन राज कंवरने केले होते. पण, तिला प्रसिध्‍दी मिळाली ती, के. एन. घोष यांचा चित्रपट 'इश्क विश्क'मधून. त्‍यानंतर, तिने २००४ मध्‍ये 'मस्ती,' 'मैं हूं ना' आणि २००५ मध्‍ये 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटांमध्‍ये झळकली. या चित्रपटातील तिच्‍या अभिनयाचे खूप कौतुकही करण्‍यात आले होते. 
dinsta
तिचा सर्वात यशस्‍वी चित्रपट म्‍हणजे विवाह. यामध्‍ये शाहिद कपूरची मुख्‍य भूमिका होती. 
dinsta
... म्‍हणून नाकारला सलमानचा हा चित्रपट 
dinsta
अमृता रावला सलमान खानचा चित्रपट प्रेम रतन धन पायोदेखील ऑफर झाली होती. परंतु, तिने हा चित्रपट नाकारला. या चित्रपटामध्‍ये अमृताला सलमान खानच्‍या बहिणीची भूमिका ऑफर करण्‍यात आली होती. परंतु, तिने हा चित्रपट नाकारला. नंतर ही भूमिका स्‍वरा भास्‍कर मिळाली. 
dinsta
अमृता रावला अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे. मराठी चित्रपटामध्‍ये बेस्‍ट डेब्‍यूसाठी दादासाहेब फाळके एक्‍सीलन्‍स ॲवॉर्डने तिला सन्‍मानित करण्‍यात आले आहे. फिल्‍मफेयर ॲवॉर्ड, आयफा ॲवॉर्ड, स्‍टारडस्‍ट ॲवॉर्डदेखील आपल्‍या नावे तिने केले आहेत. 
dinsta
अमृता रावने २०१६ मध्‍ये आर. जे. अनमोलशी विवाह केला होता. दोघांनी ७ वर्षे डेटिंग केल्‍यानंतर विवाहबंधनात अडकले. 
dinsta
dinsta

एकता कपूरने 'या' सेलेब्‍सना केलं होतं टीव्‍हीवर लॉन्‍च


टीव्‍ही निर्माती एकता कपूरचा ७ जूनला ४४ वा वाढदिवस. एकता कपूरचे अधिकतर टीव्‍ही शो हिट ठरले. त्‍यामध्‍ये उल्‍लेखनीय म्‍हणजे, 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांचा समावेश करावा लागेल. सर्व मालिकांनी टीआरपी लिस्टमध्‍ये टॉपमध्‍ये आपले स्‍थान मिळवले होते. एकता कपूरने आपल्‍या मालिकांमध्‍ये अनेक नव्‍या चेहर्‍यांना लॉन्च केले होते. टीव्‍हीवर प्रसिध्‍दी मिळवल्‍यानंतर हे सेलिब्रिटीज आता बॉलिवूडमध्‍ये आपली जादू दाखवत आहेत. पाहुता, ते कोणकोणते सेलिब्रिटीज आहेत, ज्‍यांना एकता कपूरने टीव्‍हीवर लॉन्च केले होते. 

सुशांत सिंह राजपूत:
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरने टीव्‍हीवर लॉन्च केलं होतं. एकता कपूरचा शो पवित्र रिश्तामधून सुशांत लोकप्रिय बनला. पुढे सुशांतला बॉलिवूडमध्‍ये संधी मिळाली. सुशांतने काय पो छे, शुध्‍द देसी रोमान्‍स, एम. एस. धोनी, केदारनाथ यासारख्‍या चित्रपटात काम केले आहे. 
Image result for sushant singh rajput
रोनित रॉय :
एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी कीमध्‍ये मिस्टर बजाजची भूमिका रोनित रॉयने साकारली होती. रोनित रॉयला या मालिकेतून खूप प्रसिध्‍दी मिळाली होती. रोनित रॉयने बॉलिवूड चित्रपटांमध्‍येही काम केले आहे.
Image result for ronit roy
विद्या बालन:
प्रसिध्‍द बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला एकता कपूरने हम पांच या मालिकेतून टीव्‍हीवर लॉन्‍च केले होते. या शोनंतर विद्या बालनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. 
Image result for vidya balan
प्राची देसाई :
एकता कपूरच्‍या 'कसम से' या मालिकेतून प्राची देसाईने टीव्‍ही जगतमध्‍ये आपली चांगली ओळख बनवली. पुढे प्राचीने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले. 
Image result for prachi desai

Tuesday, May 21, 2019

वयापेक्षा मोठा पार्टनर...'बडे अच्‍छे लगते हैं'

मुंबई : पुढारी ऑनलाईन  
प्रेम न बाडी उपजै, प्रेम न हाट बिकाय।
राजा परजा जेहि रूचै, सीस देइ ले जाय।। 

संत कबीर यांच्‍या या दोह्‍याने प्रेमाचा खरा अर्थ लक्षात येतो. प्रेम न कुठल्‍या शेतात उगवते न कुठल्‍या बागेत, हा तर तो खजिना आहे जो कुण्‍या व्‍यक्‍तीला आवडला तर ती व्‍यक्‍ती राजा असो वा प्रजा, तो आपल्‍या जीवापेक्षाही अधिक मिळवण्‍यासाठी तत्‍पर असतो. प्रेमाची कोणती सीमा असते ना वय. त्‍यामुळेच आपले प्रेम मिळवण्‍यासाठी इतर कुणाचाही विचार केला जात नाही. कोण काय म्‍हणेल, याची पर्वा त्‍यांना नसते. मग, ती व्‍यक्‍ती वयाने मोठी असो वा लहान. प्रेमामध्‍ये त्‍यांचे वय कधीच आड येत नाही. 
बॉलिवूडमध्‍ये अशा अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत, ज्‍यांना 'बडे अच्छे लगते हैं'. आपल्‍यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्‍या किंवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी त्‍यांनी विवाह केला आहे. प्रेमात लोक वेडे होतात. लग्‍न करण्‍यासाठी येथे कोणतेही स्‍टेटस पाहिले जात नाही, पैसे पाहिले जात नाही, धर्म, जात-पात पाहिली जात नाही. येथे केवळ प्रेम पाहिलं जातं. वय लहान असो वा मोठे येथे त्‍याला अजिबात महत्त्‍व दिलं जात नाही. आपल्‍या वयापेक्षा मोठं अथवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी विवाह करणे हे अलिकडे वाढल्याचे दिसत असले तरी हा आजचाच ट्रेंड नाही तर जुन्‍या जमान्‍यातही हा ट्रेंड होता.  
अर्जुन कपूर आणि मलायका 
सध्या चर्चेत असलेली हॉट जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका. दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा मध्‍यंतरी सुरू होती. अर्जुन कपूर ३३ वर्षांचा आहे तर मलायका ४५ वर्षांची. अर्थात मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. मलायकाने अरबाज खानशी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर अर्जुन आणि मलायकाची जवळीक वाढली. दोघे अनेकदा एकत्र स्‍पॉट झाले आहेत. yes
Related image
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस 
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जोधपूरमध्‍ये लग्‍नबंधनात अडकले. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २६ वर्षे. म्‍हणजेच दोघांच्‍या वयात १० वर्षांचे अंतर आहे. दोघांची भेट पहिल्‍यांदा मेट गाला २०१७ च्‍या इव्‍हेंटमध्‍ये झाली होती. smiley
Image result for priyanka nick
मिलिंद सोमन आणि अंकिता 
heartप्रेम आंधळं असतं, असं म्‍हटलं जातं. प्रेमाच्‍या आड कोणतीच गोष्‍ट येत नाही. मॉडेल मिलिंद सोमणचेदेखील तसेच झाले आहे. त्‍याच्‍यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने विवाह केला. मिलिंद सोमणचे वय ५२ तर अंकिता २४ वर्षांची आहे. 
मिलिंदची दुसरी पत्नी अर्थात अंकिता ही आसामची असून तिचे खरे नाव सुनकुस्मीता कोणवार असे आहे. मिलिंद सोमनने अंकिताशी २२ एप्रेल २०१८ ला महाराष्‍ट्रीयन पद्‍धतीने लग्‍न केले होते. मिलिंद सोमन आणि अंकिता यांच्‍या वयात २५ वर्षाचे अंतर आहे. अंकिता मिलिंदपेक्षा लहान आहे. या कारणावरुन या जोडीला ट्रोल करण्‍यात आले होते. याआधी मिलिंद सोमनने २००६ मध्‍ये फ्रान्‍समधील अभिनेत्री मिलिन जैम्पेनोई हिच्‍याबरोबर लग्‍न केले होते. त्‍यांचे हे लग्‍न फार काळ टिकू शकले नाही. तीन वर्षांतच ते वेगळे झाले. 
Related image
शाहिद कपूर-मीरा राजपूत 
शाहिद आणि मीराचे लग्‍न २०१५ मध्‍ये झाले होते. आणि त्‍यावेळी मीरा २१ वर्षांची होती तर शाहिद ३४ वर्षांचा. दोघांच्‍यामध्‍ये १३ वर्षांचे अंतर आहे.  मीरा राजपूतने आपल्‍या इ्‍स्‍टाग्राम चॅटमध्‍ये फॅन्‍सनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना म्‍हटले होते, मी लग्‍नापूर्वी काही वर्षे आधी शाहिदला भेटले होते. त्‍यावेळी माझे वय ६ होते. एक फॅन म्‍हणून मी त्‍याला भेटले होते. 
Related image
सैफ अली खान-करीना कपूर 
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी मोठ्‍या पडद्‍यावर सुपरहिट राहिली. रिअल लाईफमध्‍येही या दोघांची जोडी हिट आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीना कपूर सैफ अली खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. सैफ करीनावर इतके प्रेम करत होता की, त्‍याने आपल्‍या हातावर करीनाचे नाव गोंदवले आहे. विशेष म्‍हणजे, सैफ विवाहित होता, त्‍याला दोन मुले आहेत. हे माहिती असतानाही करीना सैफशी विवाहबध्‍द झाली. 
Related image
सैफचा विवाह अभिनेत्री अमृता सिंहशी झाला होता. त्यांच्याही वयात खूपच अंतर होते. हे अंतर तब्बल १२ वर्षांचे होते. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान होती. म्हणजे सैफच्या दोन बायकांच्यामध्ये तब्बल २४ वर्षांचे अंतर आहे हा एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत. broken heartअमृतापासून वेगळे झाल्‍यानंतर सैफने करीनाशी विवाह केला. सैफ-करीनाला एक मुलगा तैमूर आहे. विशेष म्‍हणजे सैफची दुसरी बायको करीना, सैफ आणि अमृता सिंगच्‍या विवाहात उपस्‍थित होती. 
Image result for saif amruta
रितेश देशमुख आणि जेनेलिया 
रितेश देशमुख आणि जेनेलियाची केमिस्‍ट्री मोठ्‍या पडद्‍याबरोबरच रिअल लाईफमध्‍येही जुळली. तुझे मेरी कसम या चित्रपटात दोघे एकत्र आले ते कायमचेच. खर्‍या आयुष्‍यातही ते दोघे फेब्रुवारी २०१२ मध्‍ये एकमेकांचे झाले. रितेश जेनेलियापेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. पण म्हणतात ना प्रेमाला वयाची काय कशाचीच मर्यादा बांधून ठेऊ शकत नाही.  heart
Related image
संजय दत्त-मान्‍यता दत्त 
मुन्ना भाई अर्थातच संजय दत्तने मान्यता दत्तशी तिसरा विवाह केला होता. मान्‍यता संजयला लग्‍नाआधी ९ वर्षांपासून ओळखत होती. संजय दत्तचे अनेक अफेअर्सही होते. संजय मान्‍यतापेक्षा १९ वर्षांनी मोठा आहे. तरीही मान्‍यताने संजय दत्तशी २००८ मध्ये विवाह केला. 
संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचे कॅन्सरने १९९६ मध्ये निधन झाले. यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्याशी लग्न केले होते. पंरतु, संजय दत्त आणि त्याचे संबंध बिघडल्याने २००८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय यांनी मान्यतासोबत विवाह केला.  
Image result for sanjay manyta
आमिर खान आणि किरण राव 
आमिर खान आणि किरण राव ही चर्चित जोडी. कारण आमिर खानने एक अभिनेता म्‍हणून नाव कमावले तर आमिर-किरण आपल्‍या विविध सामाजिक कामांमुळे चर्चेत राहिले आहेत. आमिर किरण रावपेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. 
आमिरने किरण रावसाठी आपले पहिले प्रेम सोडले. 'लगान' चित्रपटाने आमिरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्‍ही बदलले. लगान चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी आमिर आणि किरणची पहिली भेट झाली होती. heart या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. किरणलाही आमिर आवडायचा. लगानच्‍या सेटवर आमिरने किरणकडे तिच्‍या कानातील बाली (ईअररिंग्‍ज) मागितले होती आणि तेथूनच दोघांची लव्‍हस्टोरी सुरू झाली होती. २००५ मध्‍ये आमिरने किरणशी विवाह केला. आमिरने २००२ मध्‍ये आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्‍फोट घेतला. घटस्‍फोटानंतर आमिरला रिनाला जवळपास ५० कोटी रुपये द्‍यावे लागले होते. 
आमिर आणि रीना दत्ताचे लव्‍ह मॅरेज होते. त्‍यांनी आपल्‍या आई-वडिलांच्‍या मर्जीविरुध्‍द जाऊन लग्न केले होते. अनेक दिवस त्‍यांनी आपले लग्‍न लपवून ठेवले होते. आमिर-रीना दत्ताचे लग्‍न झाले, त्‍यावेळी रीना विद्‍यार्थिनी होती. आमिर त्‍यावेळी 'कयामत से कयामत तक' चित्रपटाचे शूटिंग करत होता. 
Related image
फराह खान आणि शिरीष कुंदर
फराह खान शिरीषपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. त्‍यांना तीन मुले आहेत. दोघे ९ डिसेंबर, २००४ रोजी लग्नगाठीत अडकले. शिरीषचा जन्म २४ मे, १९७३ रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म ९ जानेवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आई-वडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.
Related image
श्रीदेवी आणि बोनी कपूर
बोनी कपूर श्रीदेवी यांच्‍यापेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत. श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला, त्‍यावेळी बोनी कपूर  दोन मुलांचे बाप होते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्‍हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. 
बोनी कपूर हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन  'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरता अमेरिकेला घेऊन जावे लागले. त्‍यावेळी श्रीदेवी बोनी कपूर यांना आपल्‍यासोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी कपूर नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी कपूर यांच्‍याशी जवळीक वाटून प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी कपूरही श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. त्‍यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍याशी दुसरा विवाह केला. त्‍यावेळी बोनी कपूर यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. 
Image result for sridevi boney
धर्मेंद आणि हेमा मालिनी 
आणखी एक हिट जोडी म्‍हणजे धर्मेंद आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी. 'शोले'च्‍या सेटवर हेमा यांच्‍याशी धर्मेंद्र यांना प्रेम झालं. मग काय, धमेंद्र आधीपासूनच विवाहित असतानाही हेमा यांनी त्‍यांचं प्रेम स्‍वीकारलं. आपल्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे असणारे धर्मेंद्र यांच्‍याशी हेमा यांनी विवाह केला. धर्मेंद्र हे हेमा यांच्‍यावर इतके प्रेम करत होते की, हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी त्‍यांनी आपला धर्म बदलला होता. 
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी १९७० मध्‍ये पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर दोघांमध्‍ये जवळीक निर्माण झाल्‍याची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी १९७९ मध्‍ये विवाह केला.  
धर्मेंद्र यांच्‍या पहिली पत्‍नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. त्‍यांना चार मुले- सनी, बॉबी, अजिता आणि विजिता आहेत. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्‍या दोन मुली ईशा आणि अहाना आहेत.
Image result for dharmendra hema
दिलीप कुमार आणि सायरा बानो 
दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीने एक काळ गाजवला. ही  जोडी त्‍यावेळची फेमस जोडी. १९६६ मध्‍ये २२ वर्षांच्या सायरा बानोला दिलीप कुमार आवडायचे. दिलीप यांचे त्यावेळी वय होते ४४ वर्षे. परंतु, प्रेमापोटी आपल्‍या वयापेक्षा दुपटीने असलेल्‍या दिलीप यांच्‍यासोबत विवाह करण्‍याचं धाडस सायरा यांनी केलं होतं. १९८० मध्‍ये त्‍यांच्‍या नात्‍यात काही काळासाठी दुरावा आला होता. परंतु, काही काळानंतर दोघे पुन्‍हा एकत्र आले. 
Related image
एज-डिफरन्‍स लव्‍ह 
एकेकाळी वयात इतके अंतर म्‍हटलं की, भुवया उंचवायच्‍या. आपल्‍यापेक्षा ५-७ वर्षांनी मोठ्‍या असणार्‍या व्‍यक्‍तीबरोबर लग्‍न करायचे म्‍हणजे, जगातील दहाव्‍या आश्‍चर्याप्रमाणे असायचं. परंतु, अशा प्रकारची नाती तेव्‍हाही बनायची आणि आताही तो सिलसिला कायम आहे.  बॉलिवूडमध्‍ये अशा नात्‍यांना नेहमीच मान्‍यता दिली गेली. आता बॉलिवूडमध्‍ये ऐज-डिफरन्‍स लव्‍ह कॉमन गोष्‍ट बनली आहे. 
सलमान खान
तरी बरं सल्‍लू भाईने आपल्‍या लग्‍नाचा विषय ड्रॉप केला आहे. जर सलमान आणि कॅटरीनाचं प्रेम पक्‍क झालं असतं तर येथे १९ वर्षांचं अंतर पाहायला मिळालं असतं. एवढेच नाही तर जर लुलियासोबत त्याने लग्न करायचे ठरवले तर दोघांमध्ये १५ वर्षांचे अंतर असेल. 
Image result for salman khan
Image result for salman khan lulia vantur
वयातील अंतर या कपल्‍सच्‍या आयुष्‍यात गौण आहे. त्‍यामुळेच या जोड्‍या जीवनाता यथासांग आनंद घेत आहेत. लग्नामध्ये एज गॅप हा विषय आता कॉमन झाला आहे. म्‍हणजेच जर तुमचे लग्‍नाचे वय होऊन गेले आहे आणि घरचे स्‍थळ शोधत असतील तर जरा पेशन्‍स ठेवा. तुम्‍हालाही कदाचित अगदीच कमी वयाचा किंवा खूपच एजेड मॅच्युअर्ड पार्टनरही मिळू शकतो. आताच्या ट्रेंडचे विचाराल तर आजची तरुणाई गुणगुणत आहे... 'बडे अच्‍छे लगते हैं'.

Saturday, May 11, 2019

कान २०१९ : बॉलिवूड-हॉलिवूड क्‍वीन्‍सच्‍या मदमस्‍त अदा

Cannes चित्रपट महोत्‍सवाबद्‍दल माहितीये ना? या महोत्‍सवातील ऐश्‍वर्य तुम्‍ही पाहिलं असेल. परंतु, तुम्‍हाला माहितीये का की, कान्‍स (Cannes) असं जरी म्‍हटलं जात असलं तरी त्‍याचा उल्‍लेख 'कान' असा केला जातो. या महोत्‍सवात फोटोज, बॉलिवूड अभिनेत्रींशी संबंधित अनेक वृत्त वाचली असतील. परंतु, या महोत्सवाला 'कान' हे नाव कसं पडलं, कदाचित तुम्‍हाला माहिती नसेल. तर जाणून घेऊयात या महोत्‍सवाला कान (Cannes) हे नाव कसं पडलं. त्‍याचबरोबर बी-टाउनच्‍या ब्‍युटी क्‍वीन्‍स या महोत्‍सवासाठी काय तयारी करत आहेत? 

फ्रान्‍समध्‍ये प्रत्‍येकवर्षी होणारा कान चित्रपट महोत्सव यंदा १४ मे २०१९ ते २५ मे २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. यंदाचं कानचं हे ७२वं वर्ष आहे.  येथे जगभरातून लोक रेड कार्पेटवर नव्‍या अंदाजात पोहोचतात. हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सेलेब्‍स 'कान'ला हजेरी लावतात. 
Image result for cannes film festival
कान फेस्टिव्‍हलच्‍या नावाचं कोडं अनेकांना पडलेलं असतं. याचं नाव एखाद्या पेपरमध्ये कान असं येतं. तर दुसऱ्या एखाद्या पेपरमध्ये कान्स असं येतं. मग प्रश्न पडतो ही भानगड तरी काय आहे. वास्तविक कोल्हापूरचे ते कोल्हापूरकर, पणजीचे ते पणजीकर तसेच इंग्रजीमध्ये कोल्हापूरर्स, पणजीज तसेच कानचे कान्स झाले. पण मराठीमध्ये थेट कान महोत्सव असेच म्हटले पाहिजे.. असो ते म्हणतात ना, नावात काय आहे...   
कोठून आला हा शब्‍द 
 'कान'  हा एक फ्रेंच शब्द आहे. कान शहरात चित्रपट महोत्‍सव आयोजित केला गेला. म्‍हणून या महोत्‍सवाला 'कान चित्रपट महोत्‍सव' असे नाव पडले. 
प्रारंभ कधी झाला 
१९३२ मध्‍ये फ्रान्‍सचे शिक्षण मंत्री जीन जे यांनी पहिल्‍यांदा या महोत्‍सवाबद्‍दल विचार केला होता. परंतु, पैशांच्‍या अभावामुळे हा महोत्‍सव होऊ शकला नाही. २० सप्‍टेंबर १९४७ मध्‍ये या महोत्‍सवाची सुरूवात झाली आणि जगभरात कान महोत्‍सव प्रसिध्‍द झाला. 
Related image
कसं आहे हे शहर 
कान हे फ्रान्सच्या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व इटलीच्या सीमेजवळ वसलेले एक सुंदर शहर आहे. समुद्रकिनार्‍यावरील सोनेरी बीच, अपमार्केट बूटीक्‍स आणि अनेक प्रसिध्‍द हॉटेल्‍स येथे आहेत. ज्‍यावेळी या शहरात हा महोत्‍सव सुरू होतो, त्‍यावेळी जगभरातून सिनेसृष्‍टीतील अनेक दिग्‍गज कलाकार येथे येतात आणि आपल्‍या अदाकारीने सर्वांची मने जिंकतात. 
इतिहास
या शहराला प्राचीन इतिहास आहे. मात्र याची भरभराट इ.स. १८३० च्या पुढेच झाली. काही ब्रिटिश अधिकारी इटलीला जाताना येथे राहात होते, त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी फ्रेंच लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. येथे कान चित्रपट महोत्सव सुरू झाल्‍यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले. 
Image result for cannes film festival 2018 bollywood celebs
देशाचं प्रतिनिधीत्‍व करायला जागतिक व्‍यासपीठ
हॉलिवूडबराबेरच अनेक बॉलिवूड कलाकारही या महोत्‍सवाला हजेरी लावतात. बॉलिवूड कलाकारांना जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्‍यासाठी हे व्‍यासपीठ मानाचे मानले जाते. हॉलिवूडमध्ये चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रींची संख्या वाढती असली तरी तिथे जाऊन विविध व्यासपीठावरून देशाचे प्रतिनिधीत्व करणे वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच 'कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेणार्‍या अभिनेते-अभिनेत्री या महोत्सवात येऊन आपल्‍या देशाचे प्रतिनिधित्व करतात. 
Related image
दीपिकाची जबरदस्‍त तयारी 
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने यंदाच्‍या कान महोत्‍सवाची जोरदार तयारी केली आहे. हेअरस्टायलिस्ट क्लेराबेल सल्दान्हाने सोशल मीडियावरून दीपिका पदुकोणचे काही फोटोज शेअर केले होते. त्‍यामध्‍ये हेअर कट आणि कलर्ड हेअरचे फोटो शेअर करण्‍यात आले होते.
Image result for cannes film festival 2018 bollywood celebs
या फोटोजमध्‍ये दीपिका पदुकोणची स्किन ग्लो करत आहे. परंतु, तिची हेअर स्‍टाईल आपणास आकर्षित करेल, अशी आहे. २०१९ चा कान महोत्सव १४ मे ते २५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. गेल्या वर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने अवघ्या फॅशन विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधले होते. तिच्यासाठी २०१९ हे वर्षे देखील खास ठरणार आहे.
Image result for cannes film festival 2018 bollywood celebs
मागच्या वर्षी ७१ व्‍या कान चित्रपट महोत्सवात सिल्वर स्क्रीनवर दिसणार्‍या हुमा कुरेशी, कंगना राणावत, गायिका रवीना मेहता, मल्‍लिका शेरावत या अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपल्‍या अदांनी सर्वांना घायाळ केले होते. आता २०१९ च्‍या कानमध्‍ये बी-टाऊनच्‍या कोणकोणत्‍या अभिनेत्री आपली फॅशन स्‍टाईल घेऊन रेड कार्पेटवर उतरतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 
आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांसमोर मराठीची चलती 
जागतिक पातळीवर चित्रपट क्षेत्रात सर्वात मानाचा असा ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ओंकार शेट्‍टी यांचा  ’आरॉन’ची वर्णी लागली आहे. या महोत्सवासाठी ‘आरॉन’सोबत ज्‍येष्‍ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे यांचा 'दिठी' त्‍याचबरोबर मिलींद लेले यांचा 'बंदिशाला' या चित्रपटांचीही निवड झाली आहे. हे तिन्‍ही चित्रपट अधिकृतरित्या फ्रान्‍समधील ‘कान’ चित्रपट महोत्सवात सहभागी होतील. 
Related image
‘आरॉन’ हे एक फ्रेंच नाव आहे आणि या चित्रपटाचा संबंध फ्रान्सशी आहे. इतकेच नव्हे तर या मराठी चित्रपटाचा संबंध एकूण सहा देशांशी आहे. फ्रान्स रोमेनिया, इस्राएल, कॅनडा, हंगेरी आणि अर्थातच इंडिया. या चित्रपटाचा डीओपी आहे हंगेरीचा, क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे इस्राएलचा, आर्ट डिरेक्टर आहे रोमेनियाचा. त्याचप्रमाणे बहुतांश पॅरिसमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटामध्ये कॅनेडियन, फ्रेंच आणि इंडियन कलाकार आहेत.‘आरॉन’ या मराठी चित्रपटाची कथा युरोप मधील पॅरिस या रोमँटिक आणि नयनरम्य शहरात घडते. या चित्रपटाचे जवळपास ८०% चित्रण फ्रान्स मध्ये झाले असून उर्वरित भाग भारतातील लहानशा गावात चित्रित झाला आहे. 
Image result for cannes film festival 2018 bollywood celebs
जगाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपटप्रेमी तिथे येत असतात. त्‍यामुळे हॉलिवूडपटांबरोबरच मराठी चित्रपटाचाही डंका येथे वाजणार आहे. अनेक आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांबरोबरच प्रेक्षक, सिनेरसिकांचे लक्ष मराठी चित्रपटांकडे असते. त्‍यामुळे आता आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेला मराठी चित्रपट आरॉन फ्रान्‍समध्ये कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्‍या नजरा आहेत. 

Thursday, April 4, 2019

चित्रपटसृष्‍टीला मिळालेला 'अनुपम' कलावंत

रेल्‍वे स्‍टेशनवर झोपत होता 'हा' अभिनेता 











बॉलिवूड इंडस्‍ट्रीतील प्रसिध्‍द अभिनेते अनुपम खेर यांचा ७ मार्चला वाढदिवस. त्‍यांचा जन्‍म ७ मार्च १९५५ रोजी शिमला येथे झाला. अभिनेता बनण्‍याचे स्‍वप्‍न घेऊन ते मुंबईत आले. पण, त्‍यांना अभिनेता बनण्‍यासाठी इंडस्‍ट्रीमध्‍ये प्रचंड स्‍ट्रगल करावे लागले. स्‍ट्रगलिंग डेजमध्‍ये अनुपम खेर हे मुंबई रेल्‍वे स्‍टेशनवर झोपत होते. 
Image result for anupam kher old

रंगभूमी आणि हिंदी चित्रपटातील एक विविधरंगी कलाकार म्‍हणून अभिनेते अनुपम खेर यांची ओळख. चित्रपटात काम करणार्‍या अनुपम यांना रंगभूमीचाही प्रदीर्घ अनुभव आहे. अभिनयाचे विविध पैलू जोपासणार्‍या या कलाकाराला पाच वेळा सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी अभिनयाचा फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाला. रंगभूमी ते बॉलिवूड असा त्‍यांचा प्रवास कसा झाला, जाणून घेऊयात. 

अनुपम खेर यांचे वडिल पुष्‍कर नाथ हे क्‍लार्क होते. अनुपम यांनी शिमलाच्‍या डी. ए.व्‍ही स्‍कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तसेच दिल्लीच्‍या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. अनुपम यांना अभिनेता व्‍हायचे होते. पण, ते त्‍यांच्‍या वडिलांना ते मान्‍य नव्‍हते. 
Image result for anupam kher old
करिअरची सुरूवात
अनुपम खेर यांनी १९७१ मध्‍ये 'टायगर सिक्‍स्‍टीन' आणि १९८२ मध्‍ये 'आगमन' या चित्रपटातून त्‍यांनी करिअरची सुरूवात केली. पण, त्‍यांचे भाग्‍य उजळले ते १९८४ मध्‍ये आलेला चित्रपट 'सारांश'ने. बॉलिवूडमध्‍ये अनुपम यांची प्रतिभा हेरली ती महेश भट्‍ट यांनी. सारांश या चित्रपटात अनुपम यांनी २९ व्‍या वयात एका रिटायर्ड वृध्‍दाची भूमिका केली होती. यानंतर त्‍यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्‍यांनी बहुतांशी चित्रपटात सहाय्‍यक अभिनेता म्‍हणून काम केलं. तरीदेखील, त्‍यांची बॉलिवूडमध्‍ये एक खास अशी ओळख निर्माण झाली. 
Image result for anupam kher old
पुढे त्‍यांनी सुभाष घई यांच्‍या 'कर्मा'मध्‍ये काम केले. या चित्रपटात त्‍यांनी डॉ. डँगची भूमिका साकारली होती. तर 'डॅडी' चित्रपटातील तलत अझीझ यांच्‍या 'आईना मुझसे मेरी पहलीसी नजर मांगे' ही आर्त गझल पडद्‍यावर गातानाही ते दिसले. पुढे महेश भट्‍ट यांच्‍यासोबत पुन्‍हा काम करण्‍याची संधी मिळाली. 
विजया मेहता यांच्‍या 'रावसाहेब'मध्‍ये विक्रम गोखलेंच्‍या विरोधातील भूमिका साकारली. तर तारुण्‍यात असताना 'संसार'मध्‍ये एव्‍हरग्रीन रेखा यांच्‍या सासर्‍याची भूमिका साकारली. 'जानू' नावाच्‍या एका चित्रपटात त्‍यांच्‍याच वयाच्या खूशबू या अभिनेत्रीच्‍या वडिलांची भूमिका साकारली होती. 'अर्जुन' चित्रपटात सभ्‍यतेचा बुरखा पांघरणारा राजकीय गुंडाची भूमिका साकारली.  
Related image
दिग्‍दर्शक आणि निर्माताही
अनुपम यांनी केवळ अभिनयच नव्‍हे तर दिग्‍दर्शक आणि निर्माताही आहेत. चित्रपट 'ओम जय जगदीश' त्‍यांनी दिग्‍दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. तर 'मैंने गांधी को नहीं मारा' हा चित्रपट त्‍यांनी प्रोड्‍युस केला. अनुपम यांना भारत सरकारने २००४ साली 'पद्मश्री' आणि २००६ साली 'पद्मभूषण' पुरस्‍कार देऊन सन्‍मानित केले. 
अनुपम यांचं खासगी जीवन 
Image result for anupam kher old
अनुपम यांनी मधुमालती यांच्‍याशी लग्‍न केले होते. मात्र, काही कारणास्‍तव हे लग्‍न टीकू शकले नाही. यानंतर १९८५ मध्‍ये त्‍यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्‍याशी लग्‍न केले. किरण खेर यांचही हे दुसरं लग्‍न होते. 
परदेशी चित्रपटातही काम
बॉलिवूड शिवाय अनुपम खेर यांनी अमेरिकन, ब्रिटीश आणि चायनीज चित्रपटात काम केलं आहे.  
Image result for anupam kher old
पाच वेळा फिल्‍मफेअर पुरस्‍कार 
अनुपम यांना पाच वेळा सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी अभिनयाचा फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाला. अर्थात विनोदी कलाकार म्‍हणून त्‍यांची ओळख कधीच नव्‍हती. एकाच प्रकारच्‍या भूमिका लागोपाठ केल्‍याने त्‍यांची ओळख विनोदी भूमिका अशी झाली. सन २००० नंतर त्‍यांनी अनेक आशयघन चित्रपटात काम केले. 'मैंने गांधी को नहीं मारा,' 'खोसला का घोसला,' 'बेबी,' 'स्‍पेशल २६' यांसारख्‍या चित्रपटातील अनुपम खेर यांची वेगळी भूमिका पाहायला मिळाली.  
या चित्रपटाची चर्चा 
Related image
पत्रकार संजय बारू यांचे पुस्‍तक 'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग ॲण्‍ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह'यावर आधारित चित्रपटात अनुपम खेर यांनी भूमिका साकारली होती. अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली होती. 
चित्रपटसृष्‍टीत अनेक दशके काढल्‍यानंतर अभिनयाचे शास्‍त्रशुध्‍द शिक्षण देणारी संस्‍थाही सुरू करून अभिनयातील पुढची पिढी घडवण्‍याचे काम त्‍यांनी केले. अनेकदा वेगवेगळी विधाने करूनही ते चर्चेत राहिले होते. उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची भाजपमधून हकालपट्‍टी करावी, अशी मागणी त्‍यांनी २०१६ मध्‍ये केली होती. एफटीआयमधील गोंधळ सावरून त्‍या संस्‍थेचे कामकाज पुन्‍हा सुरळीत करण्‍याचे आव्‍हान खेर यांच्‍यासमोर होते. 
अनुपम खेर यांची भूमिका असलेले हिंदी-इंग्रजी चित्रपट -
A Wednesday and Baby
एस एस धोनी : द अनटोल्‍ड स्‍टोरी
कम
कुछ कुछ होता है
खोसला का घोसला
जानेमन
डॅडी
दिल बोले हडिप्‍पा
दिलवाले दुल्‍हनिया ले जायेंगे
प्रेम रतन धन पायॊ
Bend It Like Beckham
The Big Sick
Bride and Prejudice
मैंने गाँधी को नहीं मारा
लम्‍हे
लागा चुनरी में दाग
विजय
वीर झारा
सलाखें
सारांश
स्‍पेशल २६
हम, वगैरे वगैरे.
अनुपम खेर यांनी लिहिलेली पुस्‍तके -
* Anupam Kher Presents Bharatvarsha Stories of Great Indians
* The Best Thing about You is You!
* आप खुदही बेस्‍ट है )हिंदी)

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...