मेरे हातों में नौ-नौ चुडिया है...म्हणत सूर छेडत, गाणे गात बोलक्या डोळ्यांतून प्रेम व्यक्त करणारी ती, हवा हवाई...मध्ये विनोदी हास्य ओठांवर फुलवणारी ती, काटे नही कटते ये दिन ये रात... म्हणत या हॉट गाण्यावरील तिची मादक अदा, किसी के हात ना आएगी ये लडकी म्हणत...पावसात चिंब भिजणारी आणि मे तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा ... या गाण्यात दामिनीसारख्या कडक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ती श्रीदेवीच. तिचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. २४ फेब्रुवारीला तिचा स्मृतिदिन.
तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्यापैकी काही चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. पाहा हे पुढील १० चित्रपट.
हिम्मतवाला
बॉलिवूडमध्ये ८० च्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'हिम्मतवाला'. तिचे सौंदर्य आणि अदा पाहून प्रेक्षक घायाळ झाले. श्रीदेवी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली गाणी 'नैनों में सपना', 'लडकी नहीं है', 'ताकी ओ ताकी', 'वाह वाह खेल' सुपरहिट ठरली.

चांदनी
१९८९ मध्ये आलेला 'चांदनी' चित्रपट श्रीदेवी यांच्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. यश चोप्रा यांचा हा चित्रपट श्रीदेवी यांच्यासाठी करिअरचा मैलाचा दगड ठरला.
सदमा
१९८३ मध्ये आलेला चित्रपट सदमामध्ये श्रीदेवी यांनी नेहालता मल्होत्राची भूमिका साकारली. या चित्रपटातील कमल हासन आणि श्रीदेवी याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'सदमा' हा चित्रपट तमिळ चित्रपट 'मूंदरम पिरई'चा रिमेक होता.
मिस्टर इंडिया
१९८७ मध्ये रिलीज झालेला चित्रपट मिस्टर इंडियाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. या चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते.

चालबाज
१९८९ मध्ये आलेल्या चालबाज चित्रपटाने श्रीदेवी यांच्या अभिनयाला वेगळ्या उंचीवर नेले. अंजू आणि मंजूची दुहेरी भूमिका त्यांनी साकारली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला.
लम्हे
१९९१ मध्ये श्रीदेवी 'लम्हे' चित्रपटात दिसली. लम्हे बॉक्स यातील शानदार अभिनयासाठी श्रीदेवी यांना फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

लाडला
गंभीर भूमिका कशा कराव्यात, हे लाडला आणि सदमा या दोन्ही चित्रपटातून श्रीदेवी यांनी सिध्द करून दाखवले. त्यांनी 'आर्मी', 'सरफरोश', आणि 'गुमराह' यासारख्या जवळपास ३०० चित्रपटामध्ये काम केले. लम्हे चित्रपटात श्रीदेवी यांनी एक वेगळी भूमिका साकारली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी अनेकदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसली.
खुदा गवाह
१९९२ मध्ये आलेला खुदा गवाह चित्रपट साइन करण्याआधी श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, अमिताभ सुपस्टार अमिताभ यांच्यासमोर अभिनेत्री मागे पडतात. या चित्रपटात तेव्हाच काम करेन, ज्यावेळी हिरोसोबत हिरोईनचीही दमदार भूमिका असेल. खुदा गवाहमध्ये श्रीदेवी यांची भूमिका अमिताभ यांच्याइतकीच दमदार ठरली.
इंग्लिश विंग्लिश
२०१२ मध्ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवी यांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केले होते. श्रीदेवी एक गृहिणी असल्याबरोबर ती इंग्लिश शिकायचा प्रयत्न करत असते. यात श्रीदेवी यांचा दमदार अभिनय होता.

मॉम
श्रीदेवी यांना एका गृहिणीची भूमिका साकारली होती.
जिरो
शाहरुख, कॅटरिना आणि अनुष्का शर्मा स्टारर चित्रपटात श्रीदेवी यांचा कॅमियो रोल होता. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.















