Tuesday, August 13, 2019

फड सांभाळ तुऱ्याला गं आला...



मराठी सिनेसृष्टीमध्ये तीन वसंत नावाजलेले आहेत वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार. यापैकी वसंत पवार यांचा आज स्मृतिदिन (६ऑगस्ट १९६५).
संगीतकार म्हणून त्यांनी खूप मराठी सिनेमांना संगीत दिले. मराठी सिनेसृष्टीचा तो सुवर्णकाळ होता एकाहून एक मात्तबर मंडळी गाण्याच्या क्षेत्रात काम करत होती. अजरामर शब्दरचना तयार होत होत्या. गोड गळ्याचे गायक गायिका आपला स्वरसाज त्यावर चढवत होते. त्यांना तेवढेच सुमधुर संगीत देऊन तयार झालेली ही अवीट गोडीची गाणी आजही ऐकताना अपार आनंद देतात.वसंत पवारांना आपल्यातून जाऊन ५० वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आपण त्यांची गाणी आवडीने ऐकतो यामध्येच त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या सगळ्या सिनेमांचा मागोवा घेणे तसे अशक्य, म्हणून त्यांनी संगीत दिलेल्या थोड्या मराठी सिनेमांची यादी व त्यापुढे त्यातली गाजलेली गाणी देत आहे इतर गाजलेली भावगीते पण आहेतच.
वरदक्षिणा - घन घन मला नाभी दाटल्या 
अवघाचि संसार-जे वेड मजला लागले 
तू सुखी राहा-दिवा लाविते दिवा 
सवाल माझा ऐका-सोळावा वारीस धोक्याचं 
रंगल्या रात्री अशा -मला हो म्हणत्यात लवंगी मिरची 
मानिनी - अरे खोप्या मधे खोपा
बाळा जो जो रे - बाळा जो जो जो रे (शीर्षक गीत)
मल्हारी मार्तंड - फड सांभाळ तुऱ्याला ग आला
आकाशवाणीवर पत्रोत्तराचा कार्यक्रम लागतो त्याची सुरूवात देखील वैजयंता सिनेमामधील - " सप्रेम नमस्कार विनंती विशेष" या वसंत पवार यांनी संगीत दिलेल्या गाण्याने होते.

या सिनेमाच्‍या शूटवेळी श्रीदेवींना झालेली दुखापत








बॉलिवूडची चांदणी, सुपरस्टार श्रीदेवी यांचे गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला निधन झाले. श्रीदेवी दुबईला आपला भाचा मोहित मारवाहच्‍या लग्नासाठी गेल्या होत्या. तेथील एका हॉटेलमध्‍ये बाथटबमध्‍ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. २८ फेब्रुवारीला त्‍यांचा मृतदेह भारतात आणला गेला. त्‍यांच्‍या निधनाने बॉलिवूडवरच नाही तर संपूर्ण देशात शोककळा पसरली. अनेक बॉलिवूड स्‍टार्सनी त्‍यांना सोशल मीडियावरून श्रध्‍दांजली वाहिली. अनेक स्‍टर्सनी श्रीदेवी यांच्‍यासोबतचे आपले फोटो शेअर केले. 

श्रीदेवी यांनी हिंदी भाषेसोबतच अन्‍य भाषांमधील जवळपास ३०० चित्रपट केले. अनेक दिग्‍गज स्‍टार्ससोबत त्‍यांनी काम केले. 
Related image
श्रीदेवी यांनी सलमान खानसोबतही चित्रपट केले ते म्‍हणजे-चंद्रमुखी (१९९३) आणि चांद का टुकडा (१९९४). चंद्रमुखी हा चित्रपट हिट ठरला. 
Related image
या चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी श्रीदेवी यांना दुखापत झाली होती. प्रसिध्‍द कोरिओग्राफर प्रभुदेवा यांनी एका पोर्टलशी ही घटना सांगितली होती. ते म्‍हणाले होते, श्रीदेवी यांनी हाय स्पीड शॉट मॅच एकदम परफेक्‍ट दिला होता. चित्रपटाच्‍या एका शॉटमध्‍ये त्‍यांना दुखापत झाली. परंतु, त्‍यांनी कधी तक्रार केली नाही. त्‍यांना दुखत असणार तरीही त्‍यांनी सीन मधून सोडला नाही. त्‍या शूट करतच राहिल्‍या. 
Image result for salman khan and sridevi
मध्‍यंतरी, सलमान खान आणि श्रीदेवी यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाला होता. या फोटोत सलमान आणि श्रीदेवी खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या फोटोत श्रीदेवींनी पाढऱ्या रंगाचा सूट घातला आहे आणि सलमान खान शर्ट आणि जीन्समध्‍ये दिसत आहे.  
श्रीदेवी आणि सलमानचा हा फोटो Wembley Stadium च्या कार्यक्रमाच्यावेळी १६ सप्टेंबर १९९० रोजी घेण्यात आला होता. या दोघांबरोबर अभिनेत्री नीलम कोठारी ही या फोटोत दिसत आहे. 

श्रीदेवी आणि 'ती' बहिणीसारख्‍या दिसायच्‍या

दिव्‍या भारती : स्‍मृतीदिनानिमित्त 
सर्वोत्तम अदाकारा दिव्या भारती आणि बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी यांच्या निधनाने सर्वांनाच ‘धक्‍का’ बसला होता. त्‍यांनी जगाचा अचानकपणे निरोप घेणे हे अनपेक्षित होते. श्रीदेवी आणि अभिनेत्री दिव्या भारती यांच्याबद्दलचा हा एक विचित्र योगायोग घडला, तो म्‍हणजे दिव्या भारती यांच्या जन्मादिवशीच श्रीदेवी यांचा मृत्यू (२५ फेब्रुवारी) झाला. आज ४ एप्रिलला दिव्‍या भारतीचा स्‍मृतीदिन. या औचित्‍याने दिव्‍याच्‍या करिअरमधील विविध पैलू थोडक्‍यात जाणून घेऊया. 
श्रीदेवी आणि दिव्या या दोघींच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य होते. म्हणूनच त्या दोघींना चाहते बहिणी म्हणायचे. दिव्याने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली; पण तिने अकाली जगाचा निरोपही घेतला. दिव्याने मोजकेच चित्रपट केले. या अभिनयाद्वारे दिव्याने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. 
Image result for sridevi and divya bharti
दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. दिव्याचा ५ एप्रिल, १९९३ मध्ये आकस्मिक मृत्यू झाला होता. त्‍यावेळी दिव्‍या केवळ १९ वर्षांची होती. अपार्टमेंटच्‍या खिडकीतून पडून तिचा मृत्‍यू झाला. पण, ही आत्‍महत्‍या होती की हत्‍या? हे शेवटपर्यंत समजले नाही. त्‍यामुळे पोलिसांनी दिव्‍याच्‍या मृत्‍यूच्‍या केसची फाईल बंद केली होती. 
दिव्‍याचा आकस्‍मिकपणे झालेला मृत्‍यू तर श्रीदेवी यांची झालेली अचानक एक्‍झिटही मन पिळवटून टाकणारीच होती. श्रीदेवी आणि दिव्या भारती या दोघींना बहिणी म्हणण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे दिव्याच्या एक्‍झिटनंतर तिचे अपुरे राहिलेले चित्रपट श्रीदेवी यांना रिप्लेस करून करण्यात आले होते. 
Image result for sridevi and divya bharti
नव्‍वदच्‍या दशकातील सुपरहिट चित्रपट 'लाडला'मध्‍ये दिव्या भारतीच्‍या जागी श्रीदेवी यांना रिप्लेस करण्‍यात आले होते. या चित्रपटाचे काही बागाचे शूटिग दिव्‍या भारतीने शूट केले होते. परंतु, अचानक दिव्याचा मृत्‍यू झाला. यामुळे हा चित्रपट कसा पूर्ण करायचा?  या मोठा प्रश्न दिग्दर्शकापुढे होता. दिव्याशीच मिळता-जुळता चेहरा म्हणून श्रीदेवी यांचीच निवड करण्यात आली. 'लाडला' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 
श्रीदेवी यांनी या भूमिका दमदारपणे साकारल्या. 'मोहरा' आणि 'विजयपथ' हे दोन चित्रपट दिव्याने साईन तर केले. मात्र, ते पूर्ण करण्याआधीच ती जग सोडून गेली. नव्‍वदच्या दशकात दिव्या सर्वात अधिक बिझी अभिनेत्रींपैकी एक होती.
Image result for sridevi and divya bharti
दिव्या श्रीदेवीच्या लहान बहिणीसारखीच दिसते, अशा अनेक कॉमेंट्स चाहते करत होते. मोठ-मोठ्या दिग्दर्शकानींही ते मान्य केले होते. या दोघींमधील आणखी एक महत्वाचे साम्य म्हणजे दिव्या आणि श्रीदेवी या दोघींनीही करिअरची सुरूवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली होती. 
सेटवर घडली होती विचित्र घटना  
मृत्‍यूनंतर दिव्याचे दोन चित्रपट रिलीज झाले होते. एक 'रंग' आणि दुसरा  'शतरंज'. दिव्याने त्‍यावेळी अनिल कपूरसोबत लाडला चित्रपटाचे जवळपास ८० टक्‍के शूटिंग पूर्ण केले होते. नंतर तिच्‍या जागी श्रीदेवींना घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्‍यात आला. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी एक विचित्र घटना घडली होती. रवीना टंडनने एकदा सांगितले होते की, ऑफिसच्‍या एका सीनमध्‍ये ज्‍या डायलॉगवर दिव्या भारती अडखळत होती. श्रीदेवीदेखील त्‍या डायलॉगवर अडखळायच्‍या, या घटनेनंतर चित्रपटाची टीम शूटिंगवेळी घाबरली होती. 
Related image
ज्‍यावेळी दिव्या भारतीने बॉलिवूडमध्‍ये पाऊल ठेवले होते. त्‍यावेळी ती १४ वर्षांची होती. पुढे तिने 'दीवाना', 'बलवान', 'दिल आशना है', 'दिल ही तो है' आणि 'रंग' यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. आपल्‍या छोट्‍या करिअरमध्‍ये तिने १२ चित्रपट केले. ते सुपरहिट ठरले.  

श्रीदेवी यांच्‍या १० चित्रपटांचे किस्‍से

मेरे हातों में नौ-नौ चुडिया है...म्‍हणत सूर छेडत, गाणे गात बोलक्‍या डोळ्‍यांतून प्रेम व्‍यक्‍त करणारी ती, हवा हवाई...मध्‍ये विनोदी हास्‍य ओठांवर फुलवणारी ती, काटे नही कटते ये दिन ये रात... म्‍हणत या हॉट गाण्‍यावरील तिची मादक अदा, किसी के हात ना आएगी ये लडकी म्‍हणत...पावसात चिंब भिजणारी आणि मे तेरी दुश्‍मन, दुश्‍मन तू मेरा ... या गाण्‍यात दामिनीसारख्‍या कडक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणारी ती श्रीदेवीच. तिचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. २४ फेब्रुवारीला तिचा स्‍मृतिदिन. 
तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्‍यापैकी काही चित्रपटांचा उल्‍लेख करावा लागेल. पाहा हे पुढील १० चित्रपट.
हिम्मतवाला
बॉलिवूडमध्‍ये ८० च्‍या दशकातील सर्वात यशस्‍वी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्‍हणजे 'हिम्मतवाला'. तिचे सौंदर्य आणि अदा पाहून प्रेक्षक घायाळ झाले. श्रीदेवी यांच्‍यावर चित्रीत करण्‍यात आलेली गाणी 'नैनों में सपना', 'लडकी नहीं है', 'ताकी ओ ताकी', 'वाह वाह खेल' सुपरहिट ठरली. 
Image result for himmatwala sridevi
चांदनी 
१९८९ मध्‍ये आलेला 'चांदनी' चित्रपट श्रीदेवी यांच्‍या रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. यश चोप्रा यांचा हा चित्रपट श्रीदेवी यांच्‍यासाठी करिअरचा मैलाचा दगड ठरला. 
सदमा 
१९८३ मध्‍ये आलेला चित्रपट सदमामध्‍ये श्रीदेवी यांनी नेहालता मल्होत्राची भूमिका साकारली. या चित्रपटातील कमल हासन आणि श्रीदेवी याची जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली. 'सदमा' हा चित्रपट तमिळ चित्रपट 'मूंदरम पिरई'चा रिमेक होता. 
मिस्टर इंडिया 
१९८७ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट मिस्टर इंडियाने अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार जिंकले. या चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर मुख्‍य भूमिकेत होते. 
Image result for chandani sridevi
चालबाज  
१९८९ मध्‍ये आलेल्‍या चालबाज चित्रपटाने श्रीदेवी यांच्‍या अभिनयाला वेगळ्‍या उंचीवर नेले. अंजू आणि मंजूची दुहेरी भूमिका त्‍यांनी साकारली होती. बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला. 
लम्हे
१९९१ मध्‍ये श्रीदेवी 'लम्हे' चित्रपटात दिसली. लम्हे बॉक्स यातील शानदार अभिनयासाठी श्रीदेवी यांना फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्‍मानित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर श्रीदेवी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 
Image result for lamhe sridevi
लाडला 
गंभीर भूमिका कशा कराव्‍यात, हे लाडला आणि सदमा या दोन्‍ही चित्रपटातून श्रीदेवी यांनी सिध्‍द करून दाखवले. त्‍यांनी 'आर्मी', 'सरफरोश', आणि 'गुमराह' यासारख्‍या जवळपास ३०० चित्रपटामध्‍ये काम केले. लम्हे चित्रपटात श्रीदेवी यांनी एक वेगळी भूमिका साकारली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी अनेकदा एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसली. 
खुदा गवाह  
१९९२ मध्‍ये आलेला खुदा गवाह चित्रपट साइन करण्‍याआधी श्रीदेवी म्‍हणाल्‍या होत्‍या की, अमिताभ सुपस्टार अमिताभ यांच्‍यासमोर अभिनेत्री मागे पडतात. या चित्रपटात तेव्‍हाच काम करेन, ज्‍यावेळी हिरोसोबत हिरोईनचीही दमदार भूमिका असेल. खुदा गवाहमध्‍ये श्रीदेवी यांची भूमिका अमिताभ यांच्‍याइतकीच दमदार ठरली. 
इंग्लिश विंग्लिश 
२०१२ मध्‍ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवी यांनी मोठ्‍या पडद्‍यावर कमबॅक केले होते. श्रीदेवी एक गृहिणी असल्‍याबरोबर ती इंग्‍लिश शिकायचा प्रयत्‍न करत असते. यात श्रीदेवी यांचा दमदार अभिनय होता.
Image result for english vinglish sridevi
मॉम
श्रीदेवी यांना एका गृहिणीची भूमिका साकारली होती. 
जिरो 
शाहरुख, कॅटरिना आणि अनुष्‍का शर्मा स्‍टारर चित्रपटात श्रीदेवी यांचा कॅमियो रोल होता. हा त्‍यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

...म्हणून बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना आणायचंच!

अभिनेत्री श्रीदेवी आज या जगात असत्या तर ५६ वर्षांच्या असत्या. श्रीदेवी यांचा १३ ऑगस्टला जन्मदिवस. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांचे प्रेम सर्वश्रृत आहे. कुठलाही कार्यक्रम असो वा सोहळा बोनी कपूर यांनी आपल्यासोबत श्रीदेवी यांना कधी नेले लाही, असे झाले नाही. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्‍या लव्‍हस्‍टोरीला सुरूवात झाली ती एका चित्रपटाच्या निर्मितावेळी.  

आपण चित्रपट निर्माते बनावे, अशी बोनी यांची तीव्र इच्‍छा होती. बोनी यांनी काही बिग बजेट चित्रपट आणले. ते ब्लॉकबस्टरही झाले. झगमगत्‍या दुनियेत वावरताना बोनी यांच्‍या आयुष्‍यात आली ती सुंदर तरुणी. जिचे नाव होते-श्रीदेवी. 
Image result for boney and sridevi
बोनी यांनी १९८० ते २०१२ या कालावधीत त्‍यांनी तब्‍बल ३२ चित्रपटांची निर्मिती केली. आपला धाकटा भाऊ अनिल कपूरला अभिनेता म्‍हणून त्‍यांनी चित्रपटसृष्‍टीत आणले. 
बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना आपल्या चित्रपटात आणायचंच
बोनी यांची 'मिस्टर इंडिया' चित्रपट आणण्‍याची मोठी योजना होती आणि त्‍यानुसार त्‍यांनी हा चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर आणला. 'मिस्टर इंडिया'साठी अभिनेत्रीचा शोध सुरू असताना त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री म्‍हणून श्रीदेवी यांचे नाव होते. बोनी कपूर यांना या चित्रपटात श्रीदेवी यांनाच साईन करायचे होते. 
Image result for boney and sridevi
श्रीदेवी यांना या चित्रपटात आणणे इतके सोपे नव्‍हते. श्रीदेवी आधी विचार करूनच मगच चित्रपट साईन करायच्‍या. बोनी चेन्नईमध्‍ये श्रीदेवी यांना साईन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी पोहोचले. त्‍यांना श्रीदेवी यांच्‍याकडून वेळ मिळाला नाही. बोनी सतत श्रीदेवी यांच्‍या घरी जायचे आणि श्रीदेवी यांना भेटायचा प्रयत्‍न करायचे. बोनी यांनी खुद्‍द निवेदन दिल्‍यानंतर ७ दिवसांनी त्‍यांना भेटण्‍यासाठी वेळ देण्‍यात आला. बोनी यांना वाटलं की, टाळाटाळ केली जात आहे.
Image result for boney and sridevi
त्‍यांनी चेन्नईमध्‍ये थांबण्‍याचा निर्णय घेतला. एक दिवस, बोनी श्रीदेवी यांना भेटलेच आणि आपल्‍या चित्रपटात काम करावे, अशी विनंती केली. अखेर त्‍यांच्‍या विनंतीला मान देऊन श्रीदेवी चित्रपटात काम करायला तयार झाल्‍या. नंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपट आला आणि चित्रपटाने १९८७ मध्‍ये मोठे यश मिळवले.
त्‍यानंतर बोनी यांनी आपला आणखी एक महत्वाकांक्षी चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' श्रीदेवी यांना मुख्‍य भूमिकेत घेऊन बनवला. हा चित्रपट अयशस्‍वी ठरला. श्रीदेवी सहजतेने कुणावर विश्‍वास करायच्‍या नाहीत. परंतु, बोनी यांच्‍यावर त्‍यांचा विश्वास बसला. 
Image result for boney and sridevi
बोनी हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी स्‍टारर 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. त्‍यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना सोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. 
'जुदाई'च्‍या निर्मितीवेळी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले बोनी 
श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी यांच्‍याशी प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते.
Image result for boney and sridevi
त्‍यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी बोनी यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. मीडियापासूनची ही गोष्‍ट लपवून ठेवण्‍यात आली होती. श्रीदेवी यांनी जुदाईनंतर काही काळासाठी अभिनय संन्‍यास घेतला होता. 

Friday, July 26, 2019

कादर खान यांच्‍या अभिनयाने इम्‍प्रेस झाले होते दिलीप कुमार


Image result for kader khan
कादर खान काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर होते. मोठ्‍या पडद्‍यावर खळखळून हसवणारे कादर खान यांचा अभिनय चित्रपटात आहे म्‍हटल्‍यावर प्रेक्षक आवर्जुन तो चित्रपट पाहायला जायचे. कादर खान यांचे चित्रपट म्‍हणजे त्‍या चित्रपटाला मिळालेले यश, असे समीकरण असायचे. त्‍यांनी आपल्‍या दमदार अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावले. जितक्‍या विनोदात्‍मक भूमिका केल्‍या, तितक्‍याच गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 

कादर खान यांनी 'डाग' या चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्‍यांनी 'होशियार,' 'हत्‍या,' 'कुली' यासारख्‍या चित्रपटांचे लेखन केले. नव्‍वदच्‍या दशकात तर अनेक चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी उत्तम अभिनय केला. उत्तम अभिनयाकरिता आणि लेखनासाठी त्‍यांना आजपर्यंत अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते.

अफगानिस्तानमधील काबुल येथे १९३७ मध्‍ये जन्मलेल्‍या कादर खान यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले. त्‍यांनी लेखनापासून अभिनयापर्यंत अनेक चित्रपटात काम केले. कादर खान यांनी चित्रपट करिअरमध्‍ये वेगवेगळ्‍या भूमिका निभावून प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. प्रेक्षकांना त्‍यांच्‍या नेगेटिव्‍ह आणि कॉमिक दोन्‍ही भूमिका आवडल्‍या. सातत्‍याने प्रकृती बिघडत असल्‍याने ते चित्रपटांपासून दूर होते. 

कादर खान यांनी लिहिलेले डायलॉग्‍ज
हळूहळू कादर इंडस्‍ट्रीमध्‍ये सेटल झाले. त्‍यांनी अभिनयाबारोबरच 'सत्‍ते पे सत्‍ता', 'अमर अकबर एंथोनी', 'मिस्‍टर नटवर लाल', 'दो और दो पांच', 'अग्निपथ' यांसारख्‍या चित्रपटांचे डायलॉग्‍ज लिहिले. अमिताभ बच्‍चन यांचे बहुतांशी डायलॉग्‍ज कादर यांनी लिहिले होते. त्‍यानंतर त्‍यांना चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. सुरुवातीला निगेटिव्‍ह  भूमिका मिळाली. पुढे दाक्षिणात्‍य चित्रपट 'हिम्‍मतवाला'मध्‍ये काम करण्‍याची संधी त्‍यांना मिळाली. या चित्रपटातील त्‍यांच्‍या भूमिकेने कादर खान यांच्‍यासाठी कॉमेडीचे दरवाजे उघडले. 
कादर खान एक दिग्‍दर्शक, स्क्रीन रायटर, कॉमेडियन देखील होते. चित्रपट रोटीचे (१९७४) डायलॉग लिहिण्‍यासाठी  राजेश खन्ना आणि मनमोहन देसाई यांनी त्‍यांना १.२१ लाख रुपये मानधन दिले होते. त्‍यावेळीहे मानधन जास्‍त असल्‍याचे म्‍हटले जायचे. 

कादर यांच्‍या अभिनयावर इम्‍प्रेस झाले होते ट्रॅजिडी किंग 
कॉलेजमध्‍ये कादर यांनी एक नाटक लिहिले होते. या नाटकासाठी त्‍यांना पुरस्‍कारदेखील मिळाला होता. त्‍यांनी बेस्‍ट ॲक्‍टर, बेस्‍ट रायटर, बेस्‍ट डायरेक्‍टर या कॅटेगरीमध्‍ये पुरस्‍कार जिंकला होता. पुरस्‍काराची राशी म्‍हणून त्‍यांना १५०० रुपयांचे कॅश प्राईज मिळाले होते. असे म्‍हटले जाते की, कॉलेजमध्‍ये असताना कादर खान ज्‍यावेळी वार्षिक समारंभात परफॉर्म करत होते. त्‍यावेळी दिलीप कुमार त्‍यांच्‍या अदाकारीने इम्‍प्रेस झाले होते. पुढे दिलीप यांनी कादर खान यांना आपल्‍या चित्रपटात साईन केले. त्‍यानंतर कादर खान यांचे कुटुंबीय मुंबईत आले. 
कादर खान यांचे उल्‍लेखनीय चित्रपट असे -
कुली
कुली चित्रपटात त्‍यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. दमदार अभिनय करून त्‍यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. 
तकदीरवाला 
तकदीरवाला चित्रपटात कादर खान यांनी यमराज भूमिका साकारली होती. यमराजची भूमिका असूनही ते विनोदात्‍मक पध्‍दतीने सादर करणे, हे त्‍यांना सहजरित्‍या जमले होते. या चित्रपटातील त्‍यांचा 'यम है हम' हा संवाद फेमस झाला होता.  
राजा बाबू 
या चित्रपटात अभिनेता गोविंदाच्‍या वडिलांची भूमिका कादर यांनी निभावली होती. राजा बाबू चित्रपट हिट ठरला. 

हिरो नं  १
या चित्रपटातदेखील कादर खान यांनी गोविंदाच्‍या वडिलांची भूमिका साकारली होती. हिरो नंबर १ मध्‍ये त्‍यांनी गोविंदासोबत अभिनय करून मोठ्‍या पडद्‍यावर धुमाकूळ घातला.  
आंटी नं १
कादर खान आणि गोविंदा यांची जोडी लोकप्रिय ठरली. आंटी नंबर १ मध्‍येदेखील दोघांची जोडी हिट ठरली. 
मिस्टर ॲण्ड मिसेज खिलाडी
मिस्टर ॲण्ड मिसेज खिलाडीमध्‍ये अभिनेत्री जुही चावला प्रमुख भूमिकेत होती. जुही चावलाच्‍या स्ट्रिक्ट वडिलांची भूमिका कादर खान यांनी साकारली होती. 
बाप नंबरी बेटा दस नंबरी 
बाप नंबरी बेटा दस नंबरीमध्‍ये कादर यांच्‍यासोबत शक्ती कपूर मुख्‍य भूमिकेत होते. दोघांनी मिळून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले. 
 

Wednesday, June 26, 2019

खुबसुरत मधुबालाला चित्रपटात अशी मिळाली संधी






तिच्‍या नटखट अदा, सुंदर हास्‍याने भुरळ घालणारी ती मधुबाला. मधुबालाला चार बहिणी. मधुबाला तिसर्‍या क्रमांकाची. मोठी बहिण कनीज फातिमा, दुसरी बलसारा, तिसरी मधुबाला, धाकटी चंचल आणि पाचव्‍या क्रमांकाची शहिदा. 

मधुबालाचे वडील अताऊल्‍ला खाँ. ते जुन्‍या दिल्‍लीत राहायचे. तेव्‍हा ते इंम्‍पिरिअल टोबॅको कंपनीमध्‍ये नोकरीला होते. परंतु, तंबाखूच्‍या कारखान्‍यात काम केल्‍यामुळे त्‍यांना त्रास झला. त्‍यामुळे त्‍यांची नोकरी सुटली. मधुचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम-देहलवी. तिचं बालपणापासूनच आकर्षक व्‍यक्‍तिमत्त्‍व. तिचं हासणं म्‍हणजे सुमधूर, सूरमय. 
असे म्‍हटले जाते की, घरातल्‍या घरात बसून ती सोहराब मोदींच्‍या 'पुकार'मधले सीन करायची. हे तिच्‍या वडिलांनी पाहिलं आणि चित्रपटसृष्‍टीत तिचे नशीब आजमावण्‍यासाठी तिला मुंबईला घेऊन आले. ते मुंबईत स्‍टुडिओमध्‍ये मधुला काम मिळण्‍यासाठी चकरा मारायचे. 
अखेर मधुला एका चित्रपटात काम करायला मिळाले. बॉम्‍बे टॉकिजने १९४२ ला बसंत (मुमताज शांती, उल्‍हास) मध्‍ये बालतारका म्‍हणून काम मिळालं. महिन्‍याला शंभर रुपये पगारही मिळाला. 'बसंत' हा चित्रपट अमिया चक्रवर्ती यांनी दिग्‍दर्शित केला होता. त्‍यात 'मेरे छोटे से मन की छोटी सी दुनिया रे' हे गाणे मधुवर चित्रित करण्‍यात आलं होतं. 
'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणीला मधुचं काम आवडलं. संस्‍थेच्‍या ज्‍वारभाटासाठी त्‍यांनी मधुला बोलावले. त्‍याचबराबेर, राजकपूरसोबत 'नीलकमल'मध्‍ये मधुला मुख्‍य नायिका म्‍हणून काम द्‍यायचं असं त्‍यांनी ठरवलं होतं. 
'ज्‍वारभाटा'मध्‍ये दिलीपकुमार (त्‍यांचा पहिला सिनेमा) व मृदूला यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. तर बालकलाकार म्‍हणून मधु दिसणार होती. परंतु, काही कारणांमुळे देविका राणी यांनी मधुला घेतले नाही. मात्र, सेटवरच दिलीपकुमार यांची मधुशी ओळख झाली. केदार शर्मा यांच्‍या 'नीलकमल'मध्‍ये राजकपूर नायक म्‍हणून दिसणार होते. केदार यांच्‍या पत्‍नी कमला चॅटर्जी या नायिकेची भूमिका साकारणार होत्‍या. आणि त्‍यांच्‍या लहानपणीची भूमिका मधुबाला साकारणार होती. तिचे अकाली निधन झाले. त्‍यामुळे हा चित्रपट थांबला. परंतु, मधुच्‍या वडिलांनी केदार यांच्‍या मागे लागून हा चित्रपट करावरास लाला. आणि या चित्रपटात मधुला नायिका म्‍हणून घेण्‍याची विनंती केली. केदार यांनी ती मान्‍य केली. 
केदार यांचा 'नीलकमल' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील राज कपूर आणि मधु यांचा दमदार अभिनयाने दिग्‍दर्शक मोहन सिन्‍हांना मोहून टाकले. मोहन यांनी 'चितोड विजय' आणि 'दिल की रानी'मध्‍ये त्‍या दोघांनाही संधी दिली. केदार यांनी मधुला 'नेकी और बंदी' चित्रपटात पुन्‍हा संधी दिली. यामध्‍ये केदार स्‍वत: नायक बनले. परंतु, हा चित्रपट चालला नाही. 
१९६० च्या दशकात आला ‘मुगल-ए-आझम.’ त्यातील सलीमच्या विविध छटा दिलीपकुमार यांनी सुंदर साकारल्या. ‘मोगल-ए-आझम’मध्ये एकही गीत नव्हतं. मात्र, चित्रपटाचा नायक हा राजकुमार असल्यामुळे सर्वसामान्य तरुणाप्रमाणे नायिकेसह प्रेमगीत किंवा तिच्यासाठी विरह गीत गाणार नाही, हे दिग्दर्शक के. असीफ यांनी पटवून दिल्यावर दिलीपकुमार यांनी गाण्याचा हट्ट बाजूला ठेवला होता. या चित्रपटामध्ये त्यांची नायिका होती त्यांची प्रेयसी मधुबाला. चित्रपट सुरू होताना नायिकेसाठी दिलीपकुमारनीच मधुबालाचं नाव के. असिफना सुचवलं होतं. 'प्‍यार किया तो डरना क्‍या' हे गाणे मधुबालाने भरसभेत 'मुघल-ए-आझम'मध्‍ये गायिलं.
पुढे १९५१ मध्‍ये मधु आणि दिलीपकुमार 'तराना'मध्‍ये एकत्र आले. मधुबालाला दिलीपकुमार आवडायचे. बी. आर. चोप्रा यांच्‍या 'नया दौर'मध्‍ये सुरुवातीला मधुबालाला घेणार होते. चित्रपटाचे एक शूटिंग सुरू होते. तेथे मधुला जाण्‍यास तिच्‍या वडिलांनी मज्‍जाव केला. त्‍यामुळे मधुने चोप्रा यांना आपला नकार कळवला आणि 'नया दौर'साठी वैजयंती मालाची निवड करण्‍यात आली. त्‍यावेळी 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ टिकट' या चित्रपटांमुळे मधु ही किशोरकुमार यांच्‍या सहवाहात आली होती. त्‍या सुमारास मधु लोकप्रिय बनली होती. मधुने १९६० मध्‍ये किशोरकुमार यांच्‍याशी लग्‍न केले. 
किशोरकुमार यांचा भाऊ अशोककुमार. अशोककुमार यांच्‍यासोबत मधुबालाने 'महल' आणि 'हावडा ब्रीज' हे चित्रपट केले. ते तुफान गाजले. 'पराई आग' या चित्रपटाच्‍या सेटवर पहिल्‍यांदा मधुबालाने कमाल अमरोहींना पाहिले. तेव्‍हा ते संगीतकार गुलाम मोहम्‍मदशी बोलत उभे होते. कमालजींची उर्दूमिश्रित काव्‍यभाषा ऐकून मधुबाला प्रभावीत झाली होती. ती आपल्‍याकडे बघत आहे, हे समजल्‍यावर आदाब अर्ज हे असे कमाल म्‍हणाले. महल हा चित्रपट कमाल यांनी दिग्‍दर्शित केला. मधुबालाच त्‍याची नायिका म्‍हणून त्‍यांना हवी होती. परंतु, काही जणांना ते मान्‍य नव्‍हते. त्‍यामुळे स्‍क्रिन टेस्‍ट घ्‍याचे ठरवले. आणि मधुने दिलेल्‍या शूटनंतर सुरैय्‍याऐवजी मधुला घेण्‍यात आले. सुरैय्‍या त्‍यावेळी ४ हजार रुपये घेत होती. परंतु, मदुला ७ हजार रुपये द्‍यावे लागले होते. 
संत, नीलकमल, दुलारी, बेकसूर, तरगना, अमर, मिस्‍टर ॲण्‍ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, हावडा ब्रीज, मुघल-ए-अआझम, असे एकापेक्षा एक चित्रपट मधुबालाने सिनेइंडस्‍ट्रीला दिले. तिला हॉलिवूडमधूनही ऑफर आली होती. परंतु, तिच्‍या वडिलांनी नकार दिल्‍याने तिला हॉलिवूडमध्‍ये जाता आले नाही.  
नियतीने मधुबालाला खरे प्रेम मिळवून दिले नाही. 'आयेगा आनेवाला' अशी साद घालत तिने जगाचा निरोप घेतला.  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...