Tuesday, August 13, 2019

मीना कुमारी यांना अनाथालयाबाहेर सोडून आले होते वडील



'ये हसीन पैर जमीन पे मत रखिये, मैले हो जायेगे' असे मीना कुमारी यांच्या सुंदर पायांचे वर्णन अभिनेते राजकुमार यांनी पाकिजामध्ये केले होते. जिच्या पायांचे इतके सुंदर वर्णन केले जाते, तिच्या सौंदर्याची तारीफ काय करावी? नव्‍वदच्‍या दशकात आपल्‍या अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणार्‍या अभिनेत्री मीना कुमारी यांना 'ट्रॅजिडी क्वीन' नावाने ओळखलं जातं. त्‍यांनी आपल्‍या अभिनयाने, सौंदर्याने रसिकांची मने जिंकून घेतली. मीना कुमारी यांना प्रसिध्‍दी, सन्‍मान, पैसा, सर्वकाही मिळालं, परंतु, खरं प्रेम नाही. मीना कुमारी यांच्‍या जन्‍मदिनी त्‍यांच्‍याबद्‍दलच्‍या खास गोष्‍टी जाणून घेऊया. 

Image result for meena kumari
बॉलिवूडमध्‍ये मीना कुमारी हे नाव प्रसिध्‍दचं. परंतु, त्‍यांना 'फीमेल गुरु दत्त' नावदेखील दिलं गेलं. केवळ अभिनेत्रीच नाही तर त्‍या कवयित्रीही होत्‍या.
मीना कुमारी यांना अनाथालयाबाहेर सोडून आले होते वडील 
मीना कुमारी यांचा जन्‍म १ ऑगस्‍ट, १९३२ रोजी झाला. त्‍यांच मूळ नाव महजबीन होतं. मीना कुमारी यांचा जन्‍म झाला होता, त्‍यावेळी त्‍यांचे वडिल अली बख्‍श आणि आई इकबाल बेगम (मूळ नाव प्रभावती) यांच्‍याजवळ डॉक्‍टरांना देण्‍यासाठी देखील पैसे नव्‍हते. परिस्‍थिती अशी होती की, दोघांनी मीना कुमारी यांना अनाथालयाच्‍या बाहेर सोडण्‍याचा निर्णय घेतला. परंतु, त्‍यांच्‍या वडिलांनी हा निर्णय बदलला आणि मीना कुमारी यांना ते परत घरी घेऊन आले. 
Related image
बालपणातच मोठी जबाबादारी 
मीना कुमारी यांच्‍यावर बालपणीच मोठी जबाबदारी आली. सात वर्षांच्‍या असताता त्‍या चित्रपटात काम करू लागल्‍या. त्‍या 'बेबी मीना' या नावाने पहिल्‍यांदा ‘फरजद-ए-हिंद’ चित्रपटात दिसल्‍या. यानंतर त्‍यांनी 'लाल हवेली,' 'अन्‍नपूर्णा,' 'सनम,' 'तमाशा' यासारखे चित्रपट केले. पण, १९५२ मध्‍ये आलेला चित्रपट ‘बैजू बावरा’ने त्‍यांना खरी ओळख दिली. ‘बैजू बावरा’साठी मीना कुमारी यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्‍कार देण्‍यात आला. हा पुरस्‍कार मिळवणार्‍या त्‍या पहिल्‍या अभिनेत्री होत्‍या. यानंतर त्‍यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. 'परिणीता,' 'दिल अपना प्रीत पराई,' 'श्रद्धा,' 'आजाद,' 'कोहिनूर'...'बहरहाल, 'शारदा,' 'गोमती के किनारे', 'यहुदी,' 'मिस मेरी,' 'भाभी की चुडिया', 'फुल और पत्‍थर', 'चिराग कहा, रोशनी कहा', 'मैं चुप रहूंगी', 'मेरे अपने' यासारखे चित्रपट केले. 
असे म्हटले जाते की, मीना कुमारी अभिनयासाठी कधी ग्लिसरीनचा वापर करत नसत.
Related image
मीना कुमारी-राजकुमार यांची सुपर केमिस्ट्री 
मीना कुमारी इतक्‍या सुंदर होत्‍या की, त्‍यांना पाहून सुपरस्‍टार राजकुमार डायलॉग्‍ज विसरत असे. सेटवर मीना डायलॉग्ज म्‍हणताना राजकुमार त्‍यांना पाहतच राहायचे. अनेकदा ते आपले डायलॉग्ज विसरायचे. 
Image result for raaj kumar and meena kumari
'आपके पांव देखे, बहुत हसीन हैं. इन्हें जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जाएंगे' हा प्रसिध्द डायलॉग मीना कुमारी-राजकुमार यांच्या 'पाकिजा' या चित्रपटातील आहे. राजकुमार यांनी मीना कुमारी यांच्या सौंदर्याचे केलेले हे वर्णन आहे. 
Image result for raaj kumar and meena kumari
कमाल अमरोही यांचा चित्रपट 'पाकीजा' हा पूर्णपणे मीना कुमारी यांच्यावर केंद्रित करण्‍यात आला होता. तरीही राजकुमार यांच्‍या अभिनयाने 'पाकिजा' चित्रपट ओळखला जाऊ लागला. राजकुमार यांना मीना कुमारी खूप आवडायच्‍या. मीना कुमारीसोबत एक सीन करताना पहिल्‍यांदा ज्‍यावेळी राजकुमार यांनी जवळून मीना कुमारी यांचे पाय पाहिले, त्‍यावेळी त्‍यांना मीना कुमारी यांच्‍या सौंदर्याने घायाळ केलं होतं. 
राजकुमार यांच्‍यावर कमाल अमरोही जळायचे 
कमाल अमरोही राजकुमार यांच्‍यावर जळायचे. त्‍यांनी आपल्‍या चित्रपटात मीना कुमारी आणि राजकुमार यांचे कमी सीन्‍स शूट केले. चित्रपटातील एक गाणं खूप रोमँटिक होतं आणि ते चित्रित करणं खूप गरजेचं होतं. कमालने मीना कुमारी यांच्‍या डोळ्‍यांतूनच प्रेम व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केला. सीनमध्‍ये दोघांना एकत्र न दाखवता रोमँटिक वातावरण आणि निसर्गावर अधिक फोकस केलं होतं. ते गाणं होतं - 'चलो दिलदार चलो, चांद के पार चलो...' त्‍यानंतर कमाल अमरोही यांनी राजकुमार यांना आपल्‍या कोणत्‍याही चित्रपटात घेतलं नाही. राजकुमार आणि मीना कुमारी यांनी 'दिल अपना और प्रीत पराई'मध्‍येही काम केलं होतं. 
Related image
कमाल अमरोही प्रेमात 
मीना कुमारी यांनी आपल्‍या अभिनयाच्‍या जोरावर असा इतिहास रचला, ज्‍याला विसरणे कठिण आहे. 'बैजू बावरा' चित्रपटामुळे मीना कुमारी स्‍टार झाल्‍या. त्‍यांची १९५१ मध्‍ये कमाल अमरोही यांच्‍याशी भेट झाली होती. त्‍याचदरम्‍यान, मीना कुमारी यांच्‍या कारचा अपघात झाला होता. त्‍यावेळी कमाल यांनी मीना कुमारी यांची खूप काळजी घेतली. याचदरम्‍यान त्‍यांच्‍यात जवळीक निर्माण झाली होती. बरेच दिवस त्‍यांनी आपलं लग्‍न लपवून ठेवले होते. नंतर कमाल आणि मीना कुमारी यांच्‍यात दुरावा निर्माण झाला आणि १९६४ मध्‍ये दोघे वेगळे झाले. 
मीना कुमारीला दिला होता 'तीन तलाक' 
मीना कुमारी यांनी चित्रपट 'पाकीजा'चे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी विवाह (निकाह) केला होता. एकदा कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारी यांना तीन वेळा 'तलाक' म्हटलं होतं आणि दोघांचा घटस्फोट झाला. नंतर कमाल अमरोही यांना पश्चाताप झाला. मीना कुमारी यांच्याशी पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. 
धर्मेंद्र यांच्‍यासोबत अफेअरची चर्चा
अभिनेते धर्मेंद्र यांना चित्रपट 'पाकीजा'साठी साईन करण्‍यात आलं होतं. परंतु, धमेंद्र आणि मीना कुमारी यांच्‍या अफेअरच्‍या चर्चेमुळे कमाल यांनी चिडून धर्मेंद्र यांना चित्रपटातून बाहेर केले. नंतर मीना कुमारीसोबत धमेंद्र यांनी अनेक चित्रपट केले. , असे म्‍हटले जाते की, मीना कुमारी यांच्यासोबत काम केलं नसतं तर धर्मेंद्र इतके मोठे अभिनेते झाले नसते. धमेंद्र यांचं मीना कुमारी यांच्‍यावर प्रेम होतं, असंही म्‍हटलं जातं. 
मीना कुमारीसोबत रोमान्‍स करण्‍याची संधी मिळणार होती, म्‍हणून राजकुमार यांनी 'काजल' चित्रपटात काम केलं. राजकुमार रोमँटिक हिरो नव्‍हते. परंतु, 'काजल' मध्‍ये एक रोमँटिक गाणं 'छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं हैं जाम हैं ये, कुदरत ने जो हमको बख्शा है, वो सब से हसीं इनाम है ये...' हे त्‍यांच्‍यावर आणि मीनाकुमारी यांच्‍यावर चित्रित करण्‍यात आलं होतं. 
Related image
ज्‍यावेळी निर्माते-दिग्‍दर्शक राम माहेश्वरी यांनी राजकुमार यांना 'काजल' चित्रपटासाठी विचारलं, त्‍यावेळी राजकुमार खुश झाले होते. ते म्‍हणाले, 'मीनाजी यांच्‍यासोबत रोमान्‍स करायला कुणाला आवडणार नाही.' या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र देखील होते. 
भारत भूषणने यांनीही व्‍यक्‍त केलं होतं प्रेम 
विजय भट्ट यांनी भारत भूषण-मीना कुमारी यांना साईन करून कमी बजेट असणारा 'बैजू बावरा' हा चित्रपट बनवला. अभिनेते भारत भूषण यांनी देखील मीना कुमारी यांच्‍याबद्‍दल प्रेम व्‍यक्‍त केलं होतं. 
Related image
मीना कुमारी यांनी कमाल यांच्‍यासोबत घटस्‍फोट झाल्‍यानंतरही 'पाकिजा' चित्रपट केला. हा चित्रपट १४ फेब्रुवारी, १९७२ रोजी रिलीज झाला. पाकिजातील गाणी आजही अमर आहेत. दरम्‍यान, त्‍यांची तब्‍येत सातत्‍याने बिघडत होती. आजारी असतानाही त्‍यांनी अनेक चित्रपट केले. परंतु, हा आजार बळावला. प्रेमात अयशस्‍वी झालेल्‍या मीना यांनी मद्‍य पिण्यास सुरूवात केली, ज्‍यामुळे त्‍यांना लिव्‍हर सिरोसिस झाला. 'पाकिजा' चित्रपट रिलीज झाल्‍यानंतर काही आठवड्‍यांनी ३१ मार्च १९७२ ला त्‍यांचं निधन झालं. त्‍यावेळी मीना कुमारी ३९ वर्षांच्‍या होत्‍या.  
Image result for meena kumari
पुरस्‍कारासाठी स्‍वत:शीच स्‍पर्धा 
१९६३ मध्‍ये १०व्‍या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्‍ये सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीच्‍या कॅटेगरीत तीन चित्रपट नॉमिनेट करण्‍यात आले होते. 'मैं चुप रहूंगी,' 'आरती', 'साहिब बीवी और गुलाम' हे तीन चित्रपट नॉमिनेट झाले होते. त्‍यांना हा अॅवॉर्ड 'साहिब बीवी और गुलाम'मधील ‘छोटी बहू’च्‍या भूमिकेसाठी मिळाला होता. विशेष म्‍हणजे, तिन्‍हीही चित्रपटात मीना कुमारी होत्‍या. म्‍हणजेच या ॲवॉर्डसाठी त्‍यांची स्‍पर्धा स्‍वत:शीच होती. 

किशोर कुमारने घेतला होता इंदिरा गांधींशी पंगा


आंदोलन ते शाब्बास या ७४ चित्रपटांमध्ये भूमिका करणारे नशीली, रसीली आणि फडकती गाणी गाणारे किशोर कुमार यांचा ४ ऑगस्टला जन्मदिन. किशोर कुमार यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये अभिनेते म्हणून एन्ट्री घेतली होती. किशोर कुमार यांचा पहिला चित्रपट 'शिकारी' १९४६ मध्ये रिलीज झाला होता. यात किशोर कुमार यांचे मोठे भाऊ अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते. किशोर कुमार यांना पहिल्यांदा देव आनंद यांचा चित्रपट 'जिद्दी' (१९४८) मध्ये गाण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेश-खंडवा शहरात जन्मलेले किशोर कुमार यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. परंतु, अशी एक वेळ आली की, ज्यावेळी त्यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. 

Image result for kishore kumar
ज्यावेळी १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी किशोर कुमार यांची गाणी बॅन करण्यात आले होते. किशोर कुमार आपल्या नियमांचे काटेकोर पालन करत असत. आणीबाणीच्या वेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, सरकारी योजनांची माहिती किशोर कुमार आपल्या आवाजात गाऊन द्यावी. काँग्रेसने किशोर कुमारशी संपर्क केला. इंदिरा गांधी सरकारमध्ये तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला होते. त्यांनी किशोर कुमार यांना सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधींसाठी गाणे गावे. परंतु, किशोर कुमार यांनी नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांची गाणी ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शनवर बॅन करण्यात आली. 
Image result for kishore kumar
अभिनेतापेक्षा म्हणून प्रसिध्दीपेक्षा गायक म्हणूनच अधिक लोकप्रियता किशोरकुमार यांनी मिळवली. तरीही तेव्हाच्या आघाडींच्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी चित्रपटात काम केले होते. यात रेहाना-छम छमा छम, बेबी शकुंतला-फरेब, मीनाकुमारी-नया अंदाज, मधुबाला-चलती का नाम गाडी, वैजयंतीमाला-लडकी, उषाकिरण-धोबी डॉक्टर, नूतन-दिल्ली का ठग, निम्मी-भाईभाई, माला सिन्हा-जालसाज, वहिदा रेहमान-गर्लफ्रेंड, बीना रॉय-मद भरे नैन, साधना-मनमौजी, तनुजा-दो दुनी चार, मुमताज-लडका लडकी यांचा समावेश आहे. 
किशोरकुमार आणि मधुबाला यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 
Image result for kishore kumar
किशोरकुमार आणि मधुबाला
'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोककुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. आणि मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले. किशोरकुमार आणि मधुबाला यांनी लग्‍न केले होते. त्‍यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले. 

फड सांभाळ तुऱ्याला गं आला...



मराठी सिनेसृष्टीमध्ये तीन वसंत नावाजलेले आहेत वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार. यापैकी वसंत पवार यांचा आज स्मृतिदिन (६ऑगस्ट १९६५).
संगीतकार म्हणून त्यांनी खूप मराठी सिनेमांना संगीत दिले. मराठी सिनेसृष्टीचा तो सुवर्णकाळ होता एकाहून एक मात्तबर मंडळी गाण्याच्या क्षेत्रात काम करत होती. अजरामर शब्दरचना तयार होत होत्या. गोड गळ्याचे गायक गायिका आपला स्वरसाज त्यावर चढवत होते. त्यांना तेवढेच सुमधुर संगीत देऊन तयार झालेली ही अवीट गोडीची गाणी आजही ऐकताना अपार आनंद देतात.वसंत पवारांना आपल्यातून जाऊन ५० वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आपण त्यांची गाणी आवडीने ऐकतो यामध्येच त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या सगळ्या सिनेमांचा मागोवा घेणे तसे अशक्य, म्हणून त्यांनी संगीत दिलेल्या थोड्या मराठी सिनेमांची यादी व त्यापुढे त्यातली गाजलेली गाणी देत आहे इतर गाजलेली भावगीते पण आहेतच.
वरदक्षिणा - घन घन मला नाभी दाटल्या 
अवघाचि संसार-जे वेड मजला लागले 
तू सुखी राहा-दिवा लाविते दिवा 
सवाल माझा ऐका-सोळावा वारीस धोक्याचं 
रंगल्या रात्री अशा -मला हो म्हणत्यात लवंगी मिरची 
मानिनी - अरे खोप्या मधे खोपा
बाळा जो जो रे - बाळा जो जो जो रे (शीर्षक गीत)
मल्हारी मार्तंड - फड सांभाळ तुऱ्याला ग आला
आकाशवाणीवर पत्रोत्तराचा कार्यक्रम लागतो त्याची सुरूवात देखील वैजयंता सिनेमामधील - " सप्रेम नमस्कार विनंती विशेष" या वसंत पवार यांनी संगीत दिलेल्या गाण्याने होते.

या सिनेमाच्‍या शूटवेळी श्रीदेवींना झालेली दुखापत








बॉलिवूडची चांदणी, सुपरस्टार श्रीदेवी यांचे गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला निधन झाले. श्रीदेवी दुबईला आपला भाचा मोहित मारवाहच्‍या लग्नासाठी गेल्या होत्या. तेथील एका हॉटेलमध्‍ये बाथटबमध्‍ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. २८ फेब्रुवारीला त्‍यांचा मृतदेह भारतात आणला गेला. त्‍यांच्‍या निधनाने बॉलिवूडवरच नाही तर संपूर्ण देशात शोककळा पसरली. अनेक बॉलिवूड स्‍टार्सनी त्‍यांना सोशल मीडियावरून श्रध्‍दांजली वाहिली. अनेक स्‍टर्सनी श्रीदेवी यांच्‍यासोबतचे आपले फोटो शेअर केले. 

श्रीदेवी यांनी हिंदी भाषेसोबतच अन्‍य भाषांमधील जवळपास ३०० चित्रपट केले. अनेक दिग्‍गज स्‍टार्ससोबत त्‍यांनी काम केले. 
Related image
श्रीदेवी यांनी सलमान खानसोबतही चित्रपट केले ते म्‍हणजे-चंद्रमुखी (१९९३) आणि चांद का टुकडा (१९९४). चंद्रमुखी हा चित्रपट हिट ठरला. 
Related image
या चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी श्रीदेवी यांना दुखापत झाली होती. प्रसिध्‍द कोरिओग्राफर प्रभुदेवा यांनी एका पोर्टलशी ही घटना सांगितली होती. ते म्‍हणाले होते, श्रीदेवी यांनी हाय स्पीड शॉट मॅच एकदम परफेक्‍ट दिला होता. चित्रपटाच्‍या एका शॉटमध्‍ये त्‍यांना दुखापत झाली. परंतु, त्‍यांनी कधी तक्रार केली नाही. त्‍यांना दुखत असणार तरीही त्‍यांनी सीन मधून सोडला नाही. त्‍या शूट करतच राहिल्‍या. 
Image result for salman khan and sridevi
मध्‍यंतरी, सलमान खान आणि श्रीदेवी यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाला होता. या फोटोत सलमान आणि श्रीदेवी खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या फोटोत श्रीदेवींनी पाढऱ्या रंगाचा सूट घातला आहे आणि सलमान खान शर्ट आणि जीन्समध्‍ये दिसत आहे.  
श्रीदेवी आणि सलमानचा हा फोटो Wembley Stadium च्या कार्यक्रमाच्यावेळी १६ सप्टेंबर १९९० रोजी घेण्यात आला होता. या दोघांबरोबर अभिनेत्री नीलम कोठारी ही या फोटोत दिसत आहे. 

श्रीदेवी आणि 'ती' बहिणीसारख्‍या दिसायच्‍या

दिव्‍या भारती : स्‍मृतीदिनानिमित्त 
सर्वोत्तम अदाकारा दिव्या भारती आणि बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी यांच्या निधनाने सर्वांनाच ‘धक्‍का’ बसला होता. त्‍यांनी जगाचा अचानकपणे निरोप घेणे हे अनपेक्षित होते. श्रीदेवी आणि अभिनेत्री दिव्या भारती यांच्याबद्दलचा हा एक विचित्र योगायोग घडला, तो म्‍हणजे दिव्या भारती यांच्या जन्मादिवशीच श्रीदेवी यांचा मृत्यू (२५ फेब्रुवारी) झाला. आज ४ एप्रिलला दिव्‍या भारतीचा स्‍मृतीदिन. या औचित्‍याने दिव्‍याच्‍या करिअरमधील विविध पैलू थोडक्‍यात जाणून घेऊया. 
श्रीदेवी आणि दिव्या या दोघींच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य होते. म्हणूनच त्या दोघींना चाहते बहिणी म्हणायचे. दिव्याने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली; पण तिने अकाली जगाचा निरोपही घेतला. दिव्याने मोजकेच चित्रपट केले. या अभिनयाद्वारे दिव्याने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. 
Image result for sridevi and divya bharti
दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. दिव्याचा ५ एप्रिल, १९९३ मध्ये आकस्मिक मृत्यू झाला होता. त्‍यावेळी दिव्‍या केवळ १९ वर्षांची होती. अपार्टमेंटच्‍या खिडकीतून पडून तिचा मृत्‍यू झाला. पण, ही आत्‍महत्‍या होती की हत्‍या? हे शेवटपर्यंत समजले नाही. त्‍यामुळे पोलिसांनी दिव्‍याच्‍या मृत्‍यूच्‍या केसची फाईल बंद केली होती. 
दिव्‍याचा आकस्‍मिकपणे झालेला मृत्‍यू तर श्रीदेवी यांची झालेली अचानक एक्‍झिटही मन पिळवटून टाकणारीच होती. श्रीदेवी आणि दिव्या भारती या दोघींना बहिणी म्हणण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे दिव्याच्या एक्‍झिटनंतर तिचे अपुरे राहिलेले चित्रपट श्रीदेवी यांना रिप्लेस करून करण्यात आले होते. 
Image result for sridevi and divya bharti
नव्‍वदच्‍या दशकातील सुपरहिट चित्रपट 'लाडला'मध्‍ये दिव्या भारतीच्‍या जागी श्रीदेवी यांना रिप्लेस करण्‍यात आले होते. या चित्रपटाचे काही बागाचे शूटिग दिव्‍या भारतीने शूट केले होते. परंतु, अचानक दिव्याचा मृत्‍यू झाला. यामुळे हा चित्रपट कसा पूर्ण करायचा?  या मोठा प्रश्न दिग्दर्शकापुढे होता. दिव्याशीच मिळता-जुळता चेहरा म्हणून श्रीदेवी यांचीच निवड करण्यात आली. 'लाडला' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 
श्रीदेवी यांनी या भूमिका दमदारपणे साकारल्या. 'मोहरा' आणि 'विजयपथ' हे दोन चित्रपट दिव्याने साईन तर केले. मात्र, ते पूर्ण करण्याआधीच ती जग सोडून गेली. नव्‍वदच्या दशकात दिव्या सर्वात अधिक बिझी अभिनेत्रींपैकी एक होती.
Image result for sridevi and divya bharti
दिव्या श्रीदेवीच्या लहान बहिणीसारखीच दिसते, अशा अनेक कॉमेंट्स चाहते करत होते. मोठ-मोठ्या दिग्दर्शकानींही ते मान्य केले होते. या दोघींमधील आणखी एक महत्वाचे साम्य म्हणजे दिव्या आणि श्रीदेवी या दोघींनीही करिअरची सुरूवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली होती. 
सेटवर घडली होती विचित्र घटना  
मृत्‍यूनंतर दिव्याचे दोन चित्रपट रिलीज झाले होते. एक 'रंग' आणि दुसरा  'शतरंज'. दिव्याने त्‍यावेळी अनिल कपूरसोबत लाडला चित्रपटाचे जवळपास ८० टक्‍के शूटिंग पूर्ण केले होते. नंतर तिच्‍या जागी श्रीदेवींना घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्‍यात आला. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी एक विचित्र घटना घडली होती. रवीना टंडनने एकदा सांगितले होते की, ऑफिसच्‍या एका सीनमध्‍ये ज्‍या डायलॉगवर दिव्या भारती अडखळत होती. श्रीदेवीदेखील त्‍या डायलॉगवर अडखळायच्‍या, या घटनेनंतर चित्रपटाची टीम शूटिंगवेळी घाबरली होती. 
Related image
ज्‍यावेळी दिव्या भारतीने बॉलिवूडमध्‍ये पाऊल ठेवले होते. त्‍यावेळी ती १४ वर्षांची होती. पुढे तिने 'दीवाना', 'बलवान', 'दिल आशना है', 'दिल ही तो है' आणि 'रंग' यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. आपल्‍या छोट्‍या करिअरमध्‍ये तिने १२ चित्रपट केले. ते सुपरहिट ठरले.  

श्रीदेवी यांच्‍या १० चित्रपटांचे किस्‍से

मेरे हातों में नौ-नौ चुडिया है...म्‍हणत सूर छेडत, गाणे गात बोलक्‍या डोळ्‍यांतून प्रेम व्‍यक्‍त करणारी ती, हवा हवाई...मध्‍ये विनोदी हास्‍य ओठांवर फुलवणारी ती, काटे नही कटते ये दिन ये रात... म्‍हणत या हॉट गाण्‍यावरील तिची मादक अदा, किसी के हात ना आएगी ये लडकी म्‍हणत...पावसात चिंब भिजणारी आणि मे तेरी दुश्‍मन, दुश्‍मन तू मेरा ... या गाण्‍यात दामिनीसारख्‍या कडक अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणारी ती श्रीदेवीच. तिचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. २४ फेब्रुवारीला तिचा स्‍मृतिदिन. 
तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्‍यापैकी काही चित्रपटांचा उल्‍लेख करावा लागेल. पाहा हे पुढील १० चित्रपट.
हिम्मतवाला
बॉलिवूडमध्‍ये ८० च्‍या दशकातील सर्वात यशस्‍वी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्‍हणजे 'हिम्मतवाला'. तिचे सौंदर्य आणि अदा पाहून प्रेक्षक घायाळ झाले. श्रीदेवी यांच्‍यावर चित्रीत करण्‍यात आलेली गाणी 'नैनों में सपना', 'लडकी नहीं है', 'ताकी ओ ताकी', 'वाह वाह खेल' सुपरहिट ठरली. 
Image result for himmatwala sridevi
चांदनी 
१९८९ मध्‍ये आलेला 'चांदनी' चित्रपट श्रीदेवी यांच्‍या रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. यश चोप्रा यांचा हा चित्रपट श्रीदेवी यांच्‍यासाठी करिअरचा मैलाचा दगड ठरला. 
सदमा 
१९८३ मध्‍ये आलेला चित्रपट सदमामध्‍ये श्रीदेवी यांनी नेहालता मल्होत्राची भूमिका साकारली. या चित्रपटातील कमल हासन आणि श्रीदेवी याची जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली. 'सदमा' हा चित्रपट तमिळ चित्रपट 'मूंदरम पिरई'चा रिमेक होता. 
मिस्टर इंडिया 
१९८७ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट मिस्टर इंडियाने अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार जिंकले. या चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर मुख्‍य भूमिकेत होते. 
Image result for chandani sridevi
चालबाज  
१९८९ मध्‍ये आलेल्‍या चालबाज चित्रपटाने श्रीदेवी यांच्‍या अभिनयाला वेगळ्‍या उंचीवर नेले. अंजू आणि मंजूची दुहेरी भूमिका त्‍यांनी साकारली होती. बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला. 
लम्हे
१९९१ मध्‍ये श्रीदेवी 'लम्हे' चित्रपटात दिसली. लम्हे बॉक्स यातील शानदार अभिनयासाठी श्रीदेवी यांना फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्‍मानित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर श्रीदेवी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 
Image result for lamhe sridevi
लाडला 
गंभीर भूमिका कशा कराव्‍यात, हे लाडला आणि सदमा या दोन्‍ही चित्रपटातून श्रीदेवी यांनी सिध्‍द करून दाखवले. त्‍यांनी 'आर्मी', 'सरफरोश', आणि 'गुमराह' यासारख्‍या जवळपास ३०० चित्रपटामध्‍ये काम केले. लम्हे चित्रपटात श्रीदेवी यांनी एक वेगळी भूमिका साकारली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी अनेकदा एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसली. 
खुदा गवाह  
१९९२ मध्‍ये आलेला खुदा गवाह चित्रपट साइन करण्‍याआधी श्रीदेवी म्‍हणाल्‍या होत्‍या की, अमिताभ सुपस्टार अमिताभ यांच्‍यासमोर अभिनेत्री मागे पडतात. या चित्रपटात तेव्‍हाच काम करेन, ज्‍यावेळी हिरोसोबत हिरोईनचीही दमदार भूमिका असेल. खुदा गवाहमध्‍ये श्रीदेवी यांची भूमिका अमिताभ यांच्‍याइतकीच दमदार ठरली. 
इंग्लिश विंग्लिश 
२०१२ मध्‍ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवी यांनी मोठ्‍या पडद्‍यावर कमबॅक केले होते. श्रीदेवी एक गृहिणी असल्‍याबरोबर ती इंग्‍लिश शिकायचा प्रयत्‍न करत असते. यात श्रीदेवी यांचा दमदार अभिनय होता.
Image result for english vinglish sridevi
मॉम
श्रीदेवी यांना एका गृहिणीची भूमिका साकारली होती. 
जिरो 
शाहरुख, कॅटरिना आणि अनुष्‍का शर्मा स्‍टारर चित्रपटात श्रीदेवी यांचा कॅमियो रोल होता. हा त्‍यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

...म्हणून बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना आणायचंच!

अभिनेत्री श्रीदेवी आज या जगात असत्या तर ५६ वर्षांच्या असत्या. श्रीदेवी यांचा १३ ऑगस्टला जन्मदिवस. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांचे प्रेम सर्वश्रृत आहे. कुठलाही कार्यक्रम असो वा सोहळा बोनी कपूर यांनी आपल्यासोबत श्रीदेवी यांना कधी नेले लाही, असे झाले नाही. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्‍या लव्‍हस्‍टोरीला सुरूवात झाली ती एका चित्रपटाच्या निर्मितावेळी.  

आपण चित्रपट निर्माते बनावे, अशी बोनी यांची तीव्र इच्‍छा होती. बोनी यांनी काही बिग बजेट चित्रपट आणले. ते ब्लॉकबस्टरही झाले. झगमगत्‍या दुनियेत वावरताना बोनी यांच्‍या आयुष्‍यात आली ती सुंदर तरुणी. जिचे नाव होते-श्रीदेवी. 
Image result for boney and sridevi
बोनी यांनी १९८० ते २०१२ या कालावधीत त्‍यांनी तब्‍बल ३२ चित्रपटांची निर्मिती केली. आपला धाकटा भाऊ अनिल कपूरला अभिनेता म्‍हणून त्‍यांनी चित्रपटसृष्‍टीत आणले. 
बोनींनीही ठरवलं होतं श्रीदेवींना आपल्या चित्रपटात आणायचंच
बोनी यांची 'मिस्टर इंडिया' चित्रपट आणण्‍याची मोठी योजना होती आणि त्‍यानुसार त्‍यांनी हा चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर आणला. 'मिस्टर इंडिया'साठी अभिनेत्रीचा शोध सुरू असताना त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री म्‍हणून श्रीदेवी यांचे नाव होते. बोनी कपूर यांना या चित्रपटात श्रीदेवी यांनाच साईन करायचे होते. 
Image result for boney and sridevi
श्रीदेवी यांना या चित्रपटात आणणे इतके सोपे नव्‍हते. श्रीदेवी आधी विचार करूनच मगच चित्रपट साईन करायच्‍या. बोनी चेन्नईमध्‍ये श्रीदेवी यांना साईन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी पोहोचले. त्‍यांना श्रीदेवी यांच्‍याकडून वेळ मिळाला नाही. बोनी सतत श्रीदेवी यांच्‍या घरी जायचे आणि श्रीदेवी यांना भेटायचा प्रयत्‍न करायचे. बोनी यांनी खुद्‍द निवेदन दिल्‍यानंतर ७ दिवसांनी त्‍यांना भेटण्‍यासाठी वेळ देण्‍यात आला. बोनी यांना वाटलं की, टाळाटाळ केली जात आहे.
Image result for boney and sridevi
त्‍यांनी चेन्नईमध्‍ये थांबण्‍याचा निर्णय घेतला. एक दिवस, बोनी श्रीदेवी यांना भेटलेच आणि आपल्‍या चित्रपटात काम करावे, अशी विनंती केली. अखेर त्‍यांच्‍या विनंतीला मान देऊन श्रीदेवी चित्रपटात काम करायला तयार झाल्‍या. नंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपट आला आणि चित्रपटाने १९८७ मध्‍ये मोठे यश मिळवले.
त्‍यानंतर बोनी यांनी आपला आणखी एक महत्वाकांक्षी चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' श्रीदेवी यांना मुख्‍य भूमिकेत घेऊन बनवला. हा चित्रपट अयशस्‍वी ठरला. श्रीदेवी सहजतेने कुणावर विश्‍वास करायच्‍या नाहीत. परंतु, बोनी यांच्‍यावर त्‍यांचा विश्वास बसला. 
Image result for boney and sridevi
बोनी हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी स्‍टारर 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. त्‍यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना सोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. 
'जुदाई'च्‍या निर्मितीवेळी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले बोनी 
श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी यांच्‍याशी प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते.
Image result for boney and sridevi
त्‍यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी बोनी यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. मीडियापासूनची ही गोष्‍ट लपवून ठेवण्‍यात आली होती. श्रीदेवी यांनी जुदाईनंतर काही काळासाठी अभिनय संन्‍यास घेतला होता. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...