Tuesday, September 3, 2019

बर्थडे स्‍पेशल : अनेक पिढ्यांना 'दिवाना' करणारा ऋषी



‘बॉबी’मधला तो ऋषी कपूर पाहिला की, अंगात स्‍वेटर घातलेला २१ वर्षांचा तो तरुण आठवतो. भारतीय मनोरंजन जगताला ऋषी कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी, जी त्‍याने सुंदर अभिनेत्रींसोबत चित्रीत केली होती. त्‍यांची त्‍या-त्‍या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत असलेली केमिस्‍ट्रीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस कायमस्‍वरूपी उतरली.

एकेकाळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरने ‘बॉबी’ या चित्रपटातून नव्हाळीतल्या प्रेमाचा विषय हाताळला. 'बॉबी'मध्‍ये ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचा ऐन तारुण्‍यातील प्रेम पडद्‍यावर दाखवण्‍यात आलं. बॉबी पाहिल्‍यानंतर ऋषीचा अभिनयासाठीच जन्‍म झाला असावा, असं वाटतं. प्रेमातील अनेक प्रसंग ऋषी कपूरने अजरामर करून ठेवले आहेत. त्याचा काळ आणि त्याच्या नंतरच्या काळानेही ऋषीच्या प्रेमासारखं आपलं प्रेम पाहिजे म्‍हणून प्रेमात पडणारी पिढी त्याकाळी निर्माण झाली होती, आणि त्याच्या प्रेमाखातरच मग ऋषीच्या स्‍वेटरचा जमानाही अस्‍तित्‍वात आला म्‍हणून त्याचं उत्‍कृष्‍ट अभिनेता म्‍हणून त्‍याचं कौतुक होत राहतं.

राज कपूर यांनी शंकर-जयकिशनऐवजी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन 'बॉबी'साठी काम केलं तर ऋषी कपूरच्‍या गाण्‍यांना मुकेश यांना गायला न सांगता शैलेंद्र सिंग यांना गायला सांगितले. विशेष म्‍हणजे, 'बॉबी'तली गाणी सुपरडूपर हिट ठरली म्‍हणून काळ लोटला तरी ऋषी कपूरची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळतात.

हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्‍वप्‍न म्‍हणजे राज कपूर. प्रत्येक भूमिकेला त्याने जिवंतपणाचा ओलावा दिला. त्‍यांच्‍याच मुलांपैकी एक ऋषी कपूर. ऋषी कपूरसारखं स्‍पिरीट इतरांकडे म्‍हणावं तसं नव्‍हतं. 'बॉबी'ला मिळालेल्‍या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट ऋषीने दिले. ऋषीने डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्‍या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत काम केले.

ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्‍यांना डेब्यू चाईल्ड अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्‍हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्‍यांना उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार मिळाला.

सिनेजगतातल्‍या २५ वर्षांच्‍या करकिर्दीत स्वेटर्स घालून, अभिनेत्रींभोवती पिंगा घालण्‍याशिवाय आणि गाणी गाण्यापलीकडे आपण काहीच केले नसल्‍याने त्‍यांनी खुद्‍द कबूल केले आहे.

... तेव्‍हा खचला ऋषी

राज कपूर यांनी आर. के. फिल्म्सची कंपनी स्थापन करून चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्‍टुडिओत झाले होते. 'बॉबी' चित्रपटाचे चित्रीकरणही तेथेच झाले होते. ‘श्री. ४२०’चं शूटिंगदेखील तिथलंचं. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं आठवतयं? ‘श्री. ४२०’ मधील या रोमँटिक गाण्‍यात ऋषी केवळ दोन वर्षांचे होते. त्‍यावेळचा शूटिंगचा एक किस्‍सा सांगितला जातो. दोन वर्षांच्‍या ऋषीला भर मुसळधार पावसातून रडत चालायचे होते. परफेक्‍ट सीनसाठी रिटेकवर रिटेक होतात. शूटिंग लांबते. त्‍यामुळे चिंब भिजलेला ऋषी वैतागतो आणि पावसात न जाण्‍याचा हट्‍ट धरतो. तेव्हा ‘तू पपा सांगतील, त्याप्रमाणे केलंस, तर मी तुला चॉकलेट देईन’, असे आमिष अभिनेत्री नर्गिस ऋषीला दाखवले होते. तेव्हापासून ऋषीचं आर. के. स्टुडिओशी वेगळं नातं आहे. म्हणूनच आर. के. स्‍टुडिओला आग लागली, तेव्हा ऋषी पुरता खचला होता.

ऋषीची खास आठवण

ऋषी आणि नीतू यांच्या विवाहानंतरच्या जंगी पार्ट्या आर. के. स्‍टुडिओतच झाल्‍या होत्‍या. त्यामुळे ऋषीला आर. के. स्‍टुडिओची लाईफटाईम आठवण राहणारी आहे.

ऋषीचं 'त्‍या' तरुणीशी अफेअर 

अभिनेत्री नीतू सिंह यांच्‍याशी लग्‍न होण्‍यापूर्वी ऋषीने यास्मीन नावाच्‍या तरुणीला डेट केल्‍याचे म्‍हटले जाते. परंतु, आपण नीतूला कधी धोका दिला नाही, असे खुद्‍द ऋषीने एका मुलाखतीत म्‍हटलं होतं. जेव्‍हा बॉबी चित्रपट आला होता, त्‍यावेळी ऋषी २१ वर्षांचा होता. बॉबी रिलीज झाला, त्‍यावेळी ऋषीचा ब्रेकअप झाल्‍याचे त्‍याने सांगितले होते.

रोमॅटिंक ऋषीच्‍या गंभीर भूमिका

गेल्या काही वर्षांमध्‍ये ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, कपूर ॲण्‍ड सन्‍स, राजमा चावल, बेशरम, स्‍टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, ‘मुल्क’ अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ऋषीने रंगवल्‍या. प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट असणारा ऋषीने रोमँटिकचं नव्‍हे तर गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 'मुल्‍क' या चित्रपटातील त्‍याची एका मुस्‍लिम व्‍यक्‍तीची रेखाटलेली भूमिका कौतुकास्पद आहे. 'मुल्‍क'मधील त्‍याची अत्‍यंत सुंदर भूमिका आहे, त्‍यात तापसी पन्‍नूचीदेखील महत्त्‍वाची भूमिका होती.

या चित्रपटांतून साकारल्‍या वेगळ्‍या भूमिका

मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज, प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्‍थोनी, बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्‍ह आज कल, प्‍यार के काबिल, नमस्‍ते लंडन, रफू चक्‍कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्‍या चित्रपटांतून ऋषी कपूरने वेगवेगळ्‍या भूमिका पार पाडल्‍या.

Friday, August 23, 2019

पत्नी सायरा असतानाही दिलीपकुमार यांनी केलं होतं दुसरं लग्‍न


सायरा बानो आणि दिलीपकुमार यांची खास लव्हस्टोरी 












बॉलिवूडचे सुपरस्टार, हॅण्‍डसम अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची प्रेम कहाणी खूपच रोमँटिक आहे. बॉलिवूडच्या या कपलचा रोमँटिक प्रवास सर्वश्रृत आहे. सायरा सुरूवातीपासूनच दिलीपकुमार यांची चाहती होती. सायरा बानो यांचा २३ ऑगस्टला वाढदिवस. या औचित्याने सायरा यांच्याविषयी जाणून घेऊया या खास गोष्टी.

आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या सायरा बानो दिलीपकुमार यांच्‍या पत्‍नी. दोघांना पुत्रसुख नाही. सायरा बानो आई का बनू शकल्‍या नाहीत? याचा खुलासा खुद्‍द दिलीपकुमार यांनी केला होता. 
Image result for saira banu and dilip kumar
सायरा बानो यांचा जन्म १९४४ मध्ये मसूरीमध्ये झाला होता. त्यांच्या आयुष्याची कथा फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाही. सायरा हिंदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्‍या. सायरा यांचं बालपण लंडनमध्‍ये गेलं. १९६० मध्‍ये त्‍या मुंबईत आल्‍या. सायरा यांना आपल्या आईप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री बनायचे होते. त्यांचे वडील मियां एहसान-उल-हक चित्रपट निर्माते होते. त्यांनी मुंबईत 'फूल' आणि पाकिस्तानमध्ये 'वादा' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. 
सायरा यांचे 'जंगली'मधून डेब्‍यू
सायरा १९६० मध्‍ये मुंबईत आल्‍या. त्‍यावेळी त्‍यांची भेट निर्माता-दिग्‍दर्शक शशीधर मुखर्जी यांच्‍याशी झाली. येथून त्‍यांच्‍या करिअरला सुरूवात झाली. १९६१ मध्‍ये त्‍यांनी बॉलिवूडमध्‍ये चित्रपट 'जंगली'मधून डेब्यू केलं. त्‍यात शम्मी कपूर यांची मुख्य भूमिका होती. जंगलीमध्ये सायरा यांची काश्मीरी मुलीची भूमिका होती. त्यांची चांगली अभिनेत्री म्‍हणून ओळख असली तरी त्‍या त्‍यांच्‍या लव्‍हस्‍टोरीमुळे त्या अधिक ओळखल्‍या जातात. 
Image result for saira banu
१९६८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'पडोसन'ने सायराला लोकप्रियता मिळवून दिली. सायरा यांच्यासाठी १९६४ चं वर्ष खूपच खास होतं. यावर्षी त्याचा दूर की आवाज, आओ प्यार करें, आई मिलन की बेला आणि अप्रैल फूल यासारखे चित्रपट केले. साठ-सत्तरच्या दशकात सायरा बानोचे नाव बॉलिवूडच्या प्रसिध्द आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतलं जायचं. 
Image result for saira banu
बालपणापणापासूनच सायरा यांना दिलीपजींचे आकर्षण 
सायरा बानो १२ वर्षांच्‍या होत्या. त्यांना सुपरस्टार दिलीपकुमार आवडायचे. एक फॅन ते एक पत्नी होण्‍यापर्यंतचा त्‍यांचा प्रवास इंटरेस्‍टिंग आहे. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, '१२ वर्षांची असल्‍यापासून ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार मला आवडायचे.' 
Image result for saira banu
सायरा यांनी पहिल्‍यांदा दिलीपकुमार यांना १९५२ मध्‍ये 'आन' चित्रपटात पाहिलं होतं. तेव्‍हाच त्‍यांना दिलीपकुमार यांच्‍याशी प्रेम झालं. १९६६ मध्‍ये सायरा यांनी अभिनेता दिलीपकुमार यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी सायरा २२ वर्षांच्‍या तर दिलीपकुमार ४४ वर्षांचे होते. लग्‍नानंतर दोघांच्‍याही जीवनात अनेक चढ-उतार आले. दिलीपकुमार यांनी दुसरं लग्‍न देखील केलं. दिलीप कुमार यांनी आसमा नावाच्‍या महिलेशी लग्‍न केलं होतं. सायरा बानो आई होऊ शकत नव्‍हत्‍या, म्‍हणून दिलीप यांनी हे लग्‍न केल्‍याचं म्हटलं जातं. परंतु, हे लग्‍न फार काळ टिकू शकलं नाही. दिलीप पुन्‍हा सायरा यांच्‍याकडे आले. 
Image result for saira banu
सायरा का आई बनू शकल्‍या नाहीत?
अभिनेता दिलीपकुमार यांनी आपल्‍या पुस्‍तकात 'द सब्सटेंस ॲण्‍ड द शॅडो'मध्‍ये सायरा बानो यांच्‍याशी लग्‍न केल्‍याचं म्‍हटलं होतं. १९७२ मध्‍ये सायरा प्रेग्नेंट होत्‍या, हा खुलासाही खुद्‍द दिलीप यांनी केला होता. दिलीपकुमार यांनी पुस्‍तकात म्‍हटलं होतं की, 'प्रेग्नेंसीच्‍या आठव्‍या महिन्‍यात सायरा बानो यांना हाय ब्‍लड प्रेशरचा त्रास होता. त्‍याचदरम्‍यान, आम्‍ही आमचं बाळ गमावलं. नंतर आम्‍हाला कळालं की, मुलगा होता. आम्‍ही त्‍याला वाचवू शकलो नाही. त्‍यानंतर सायरा कधी आई बनू शकल्‍या नाहीत.'
Image result for saira banu and dilip kumar

जेव्हा 'ती' मुंबईच्या रस्त्यावर न्यूड धावली...


स्मृतीदिनानिमित्त 

न 
धाडसी कामे तर खूप लोक करतात, परंतु या धाडसामध्ये काहीतरी वेगळे करून दाखवण्याची हिम्मत खूप कमी लोकांमध्ये असते. ओडीसी नृत्यांगना आणि मॉडल प्रोतिमा बेदीने असेच धाडस केले होते. ते धाडस पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली होती. प्रोतिमा बेदी सिनेब्लिड्ज मासिकासाठी मुंबईच्या जुहू बीचवर अशी धावली होती की, ती रातोरात चर्चेत आली. प्रोतिमा बेदीचा आज स्मृतिदिन. तिच्या आयुष्याची कहाणी जरा हटकेच होती. कुणालाही विश्वास बसणार नाही, अशी घटना तिच्या आयुष्यात घडली. 
Image result for protima bedi
दिल्लीची राहणारी प्रोतिमा बेदीने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७० मध्ये मॉडलिंग सुरू केले. तिनं मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश करावा, हे तिच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हतं. आपल्या कुटुंबीयांविरोधात जाऊन ती मॉडलिंग क्षेत्रात उतरली. परंतु, तिने घेतलेला हा निर्णय चुकीचा नव्हता. या निर्णयानेच तिला तिच्या आयुष्यात यश मिळवून दिले. 
सत्तरच्या दशकातील गोष्ट. मॉडेल असणारी प्रोतिमा बेदीने मुंबईच्या रस्त्यावर चक्क नग्न धाव घेतली होती. ही घटना होती १९७४ मधील. त्या काळात न्यूड सीन्स देणेही फार धाडसाचं काम होतं आणि चक्क नग्न धावणे म्हणजे किती भयानक असेल! किती मोठं धाडस असेल ना! पण, इतका धाडसीपणा तिच्यात आला तरी कुठून? आणि हे धाडस तिने का केलं असावं?
Image result for protima bedi
'सिनेब्लिट्झ' नावाचं मासिक होतं. त्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्व गप्पाटप्पा पाहायला मिळायच्या. त्यावेळी बाजारात चित्रपटविषयक बरीच मासिके येत होती. परंतु, त्यामध्ये ‘सिनेब्लिट्झ’चं वेगळंपण असावं, असं मासिकाच्या मालकाला वाटत होतं. त्यामुळे नग्न धावणाऱ्या मॉडेलचे छायाचित्र असलेले मासिक बाजारात आले. न्यूड मॉडेल म्हणून प्रोतिमा बेदीसारखं धाडस कुणीही करू शकणार नाही, असे धाडस तिने केलं होतं. सर्व बंधने झुगारून प्रोतिमा १९७४ मध्ये मुंबईच्या जुहू बीचवर न्यूड धावली आणि मासिकाच्या छायाचित्रकाराने तिचे फोटो कॅमेराबध्द केले होते.   
असं म्हटलं जातं की, प्रोतिमा ही बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध होती. प्रोतिमा बेदीचे आयुष्य वादग्रस्त होते. कधी लिव्ह इन, कधी एक्‍स्‍ट्रा मॅरिटल अफेअर, घटस्फोट तर कधी अफेअर्स. प्रोतिमाने आपल्या आत्मचरित्रात (Timepass) या सर्व गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत. 
प्रोतिमाने त्यावेळचे सिनेइंडस्ट्रीतील सर्वात हॅण्डसम मॅन कबीर बेदीशी प्रेम केलं होतं. ती कबीर बेदीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांचं हे नातं प्रोतिमाच्या कुटुंबीयांना अजिबात मान्य नव्हतं. 
Image result for protima bedi
१९६९ मध्ये प्रोतिमाने कबीर बेदीशी लग्न केले. दोघे १९७८ मध्ये वेगळे झाले. दोघांची दोन मुले होती, पूजा बेदी आणि सिद्धार्थ बेदी. १९९७ मध्ये सिद्धार्थने आत्महत्या केली. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्रोतिमाने एकटी राहू लागली. 
Image result for protima bedi
१८ ऑगस्ट, १९९८ मध्ये उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे भूस्खलनमध्ये तिचा मृत्यू झाला.

Tuesday, August 13, 2019

जरीना में वो 'फिल्मोवाली बात नही है'


बॉलिवूड अभिनेत्री जरीना वहाब यांचा १७ जुलैला ६३ वा वाढदिवस. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. पुणे येथील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनेत्री व्हायचे स्वप्न घेऊन त्या स्वप्ननगरी मुंबईत आल्या. येथे येऊन त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. खूप कमी लोकांना माहिती आहे की, याआधी जरीना यांना सिनेमासाठी अभिनेते राज कपूर यांनी रिजेक्ट केलं होते. जरीना सिंपल दिसणारी तरूणी होती. त्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. जरीनाबाबत सांगण्यात आले की, या तरूणीमध्ये ग्लॅमर नाही. राज कपूरच्या मते, तिच्यात फिल्मोवाली बात नव्हती. 
dinsta
जरीना यांच्या जागी जया बच्चनला मिळाला चित्रपट 
ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी चित्रपटात जरीना वहाब यांच्या जागी अभिनेत्री जया बच्चन यांना घेतलं. तरीही जरीना यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वत:कडे लक्ष दिलं. आपल्या लुक्सवर खूप लक्ष दिले. त्यांनी हाय सोसायटीतील तरूणींसारखे जीवनशैली, राहणीमान शिकले आणि स्वत:मध्ये बदल केला. 
dinsta
देव आनंद यांनी दिला पहिली ब्रेक
अभिनेते देव आनंद यांनी जरीना वहाब यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिला. जरीना वहाब यांना 'इश्क इश्क इश्क' हा चित्रपट मिळाला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट मिळाले आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ला सिध्द केले. आणि  जरीना यांचे नाव बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये समाविष्ट झाले. 
dinsta
आदित्य पंचोलीशी लग्न 
चित्रपट कलंक का टीकाच्या सेटवर जरीना वहाब यांची भेट अभिनेता आदित्य पंचोलीशी झाली. यानंतर १९८६ मध्ये  दोघांनी लग्न केले. दोघांची दोन मुले सारा आणि सूरज आहेत.  

आयुष्‍य जगायला शिकवतात राजेश खन्ना यांचे सदाबहार डायलॉग्‍ज (Videos)

राजेश खन्ना आज या जगात नाहीत. परंतु, त्‍यांची आठवण नेहमीच मनात कायम आहे. सदाबहार भूमिकांनी आणि अविट, हिट गाण्‍यांनी चाहत्‍यांना, सिनेरसिकांच्‍या मनात कायम लक्षात राहणारे सुपरस्‍टार राजेश खन्‍ना यांचे निधन १८ जुलै, २०१२ मध्‍ये झाले. राजेश खन्‍ना 'काका' नावानेही ओळखले जायचे. त्‍यांनी आपल्‍या करिअरची सुरूवात १९६६ मध्‍ये आलेला चित्रपट 'आखिरी खत'पासून केली होती.

आयुष्‍य जगायला शिकवतात राजेश खन्ना यांचे सदाबहार डायलॉग्‍ज -
* पुष्‍पा, मुझसे ये आंसू नहीं देखे जाते. आय हेट टीयर्स
- अमर प्रेम १९७२
* जिसमें इंसान की भलाई हो, वो काम कभी बुरा नहीं होता
- बावर्ची १९७२
* बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए...लंबी नहीं
- आनंद १९७१ 
* ऐ, बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं उसे न आप बदल सकते हैं न मैं.
- आनंद १९७१ 
* ये तो मैं ही जानता हूं कि जिंदगी के आखिरी मोड पर कितना अंधेरा है.
- सफर १९७० 
* मैं मरने से पहले मरना नहीं चाहता
- सफर, १९७० 
* एक छोटा सा जख्‍म बहुत गहरा दाग बन सकता है और एक छोटी सी मुलाकात जीवनभर का साथ बन सकती है
- आराधना, १९६९  
अनेक चित्रपटातील त्‍यांचा रोमँटिक अंदाज, त्‍यांच्‍या अभिनयातील वेगळा अंदाज आजही लक्षात राहणारा आहे. 

राजेश खन्ना यांना असे मिळाले 'काका' नाव



आपल्या चतुरस्त्र अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या अंत:करणावर अधिराज्य गाजवणारे आणि 'काका' या लाडक्या नावाने ओळखले जाणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा १८ जुलैला स्मृतिदिन. सत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.  राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ७० च्या दशकातील एक सदाबहार मेलडी युग संपुष्टात आले. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ एकापेक्षा एक १५ सुपरहिट चित्रपट दिले. 
चित्रपटात एन्ट्री 
राजेश खन्ना यांनी चेतन आनंद यांच्या १९६५ मध्ये आलेल्या आखरी खत या चित्रपटापासून सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली. त्यानंतर आनंद, आराधना, आन मिलो सजना, मर्यादा, दो रास्ते, अंदाज, बावर्ची, मेरे जीवन साथी, कटी पतंग, हम दोनो, अवतार, अमर प्रेम, स्वर्ग यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. दो दिलों के खेल मे हा २०१० ला रिलीज झालेला चित्रपट अखेरचा ‍ठरला. तब्बल १०१ चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो हिरो म्हणून काम केले. 
Image result for rajesh khanna hd
१४ फिल्मफेअर नामांकन, ४ वेळा पुरस्कार 
राजेश खन्ना यांचे फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन जाहीर झाले होते. आनंद (१९७२),  बावर्ची (१९७३),  नमक हराम (१९७४) आणि अमृत (१९८७) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके ॲवॉर्ड, आयफा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, अप्सरा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. 
Related image
राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान आहे.  किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून राजेश यांना आवाज दिलाय. तर  आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले. मेरे सपनों की राणी कब आएगी तू म्हणत शर्मिला टागोर यांच्या रेल्वेमागे गाडीने पिच्छा करणारा, जिंदगी कैसी हे पहेली...कभी ये हसाए कभी ये रूलाए म्हणत आयुष्याची गणिते मांडणारा तर कधी एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई म्हणत तिच्या सौंदर्याचे गुणगाण करणारा, गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है...म्हणत प्रेमाचे गीत गाणारा तर कधी ये जो मोहब्बत है म्हणत नशेत बुडून आता प्रेम कधीच करणार नाही म्हणणारा रोमँटिक हिरो राजेश खन्नांची आठवणीतील गाणी अनेकांच्या तोंडावर गुणगुणताना दिसतात. 
Related image
राजकारणात उडी 
१९९२ मध्ये राजेश खन्ना यांनी राजकारणात उडी मारली. काँग्रेसच्या तिकिटावर ते खासदार म्हणूनही निवडून आले. परंतु, लवकरच सक्रीय राजकारणातून बाहेर पडणे, योग्य मानले.  
चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण 
त्यांनी ३ चित्रपटांची निर्मिती केली होती. यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. 
डिंपल कपाडियाशी लग्न  
Related image
राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले होते. १९८४ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. त्यामुळे ते एकाकी पडले होते. 
असे मिळाले 'काका' नाव 
आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान राजेश यांनी त्यांना काका नाव कसे मिळाले, याविषयी सांगितले होते. काका या शब्दाचा अर्थ पंजाबीमध्ये लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा सिनेजगतात पाऊल ठेवले, त्यावेळी मी तरूण होतो. त्यामुळे सर्वजण काका म्हणू लागले. अनेकवेळा पंजाबीमध्ये काके अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारली जायची. हळूहळू काका हेच नाव पुढे लोकप्रिय झाले. 


महमूद यांच्यामुळे घडलं अमिताभ यांचं करिअर






ड्रायव्‍हर ते ॲक्‍टर असा प्रवास करणारे कॉमेडियन अभिनेता, गायक, दिग्‍दर्शक, निर्माते महमूद यांनी ज्‍या भूमिका साकारल्‍या, त्‍या भूमिकांमध्‍ये जिवंतपणा आणला. महमूद यांचा २३ जुलैला स्मृतिदिन. महमूद यांच्या आयुष्‍याशी निगडित अशा काही गोष्‍टी आहेत, ज्या कदाचित खूप कमी लोकांना माहिती असतील. 

Related image
महमूद अली यांचा २९ सप्‍टेंबर, १९३२ रोजीचा जन्‍म. महमूद यांनी १९४५ मध्‍ये चित्रपट 'संन्यासी'मधून आपल्‍या करिअरला सुरूवात केली. त्‍यांनी 'किस्मत' चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. महमूद यांनी मोठ्‍या पडद्‍यावर येण्‍यापूर्वी छोटी-मोठी कामे केली. एकेकाळी महमूद दिग्‍दर्शक राजकुमार संतोषीचे वडील पी. एल. संतोषी यांचे ड्रायव्‍हर होते. नंतर राजकुमार यांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात काम दिलं. त्‍याशिवाय, महमूद मीना कुमारी यांना टेबल टेनिसदेखील शिकवत होते. 
मेहमूद यांचे वडील मुमताज अली एक स्टेज ॲक्टर आणि उत्तम डान्‍सर होते. 
Related image
मेहमूद यांनी मीना कुमारी यांची मोठी बहिण मधु यांच्‍याशी विवाह केला. नंतर काही कारणांमुळे त्‍यांनी मधु यांच्‍याशी घटस्‍फोट घेतला. 
अमिताभ बच्‍चन यांना केली होती मदत
ज्‍यावेळी महानायक अमिताभ बच्‍चन स्ट्रगल करत होते. त्‍यावेळी महमूद यांनी मुंबईमध्‍ये आपल्‍या घरात त्‍यांना एक खोली राहायला दिली होती. परंतु, नंतर दोघांच्‍या नात्‍यात दुरावा आला. 
Image result for amitabh and mehmood
अमिताभ बच्चन महमूद यांना आपले वडिल मानत होते. परंतु, असा एक प्रसंग घडला की, महमूद यांना धक्का बसला. एका मुलाखतीत महमूद यांनी म्‍हटले होते की, 'आज माझ्‍या मुलाकडे चित्रपटांची लाईन लागली आहे. ज्‍या व्‍यक्‍तीकडे सक्सेस असतं, त्‍याचे दोन वडिल असतात. एक ज्‍याने जन्‍म दिला आणि दुसरा ज्‍याने यशाच्‍या पायरीपर्यंत पोहोचवलं. मी त्‍या व्‍यक्‍तीला मदत केली. अनेक चित्रपटांत काम दिलं. त्‍याला माझ्‍या घरात राहायला जागा दिली. खरंतरं अमित माझा खूप आदर करतो. परंतु, त्‍याच्‍या एका वर्तनामुळे मला धक्‍का बसला. त्‍याचे वडिल हरिवंशराय बच्चन पडले होते, त्‍यावेळी त्‍यांना पाहायला मी अमिताभ बच्चनच्‍या घरी गेलो. परंतु, माझी बायपास सर्जरी झाल्‍यानंतर अमिताभ आपल्‍या वडिलांसोबत ब्रीच कँडी हॉस्‍पिटलमध्‍ये आला. मात्र, तो मला भेटला नाही. अमिताभने सिध्‍द केलं की, खरे वडिल हे खरेच असतात. आणि नकली वडिल नकलीच.'
जुलै २००४ मध्‍ये मेहमूद यांच्‍या निधनानंतर अमिताभ यांनी लिहिलं होतं की, 'एक अभिनेता म्‍हणून ओळख बनवण्‍यासाठी त्‍यांनी माझी नेहमीच मदत केली. महमूद भाईंनी मला माझ्‍या करिअरच्‍या सुरूवातीला मदत केली. ते पहिले निर्माते होते, ज्‍यांनी मला मुख्‍य भूमिका दिली होती – ‘बॉम्बे टू गोवा’मध्‍ये. एकानंतर एक अनेक चित्रपट फ्लॉप झाल्‍यामुळे मी घरी परतण्‍याचा विचार केला होता. परंतु, महमूद साहेबचे भाऊ अनवर यांनी मला थांबवलं.'
Image result for amitabh and mehmood
'बॉम्बे टू गोवा' 
'बॉम्बे टू गोवा' चित्रपटातील एक मजेदार प्रसंग आहे. अमिताभ बच्चन आणि महमूद यांच्‍यावर 'देखा ना हाय रे सोचा ना' हे गाणं चित्रीत करण्‍यात आलं होतं. अमिताभ यांनी या गाण्‍यावर डान्‍स करावं, अशी महमूद यांची इच्‍छा होती. अमिताभ यांना डान्‍स करायला येत नव्‍हते. अमिताभ महमूद यांना म्‍हणाले, 'भाईजान मला डान्‍स करायला येत नाही.' पण, महमूद यांनी त्‍यांचं ऐकलं नाही. महमूद म्‍हणाले, 'जो चालू शकतो तो डान्‍सही करू शकतो.' अमिताभ यांनी विनंती करूनदेखील मेहमूद यांनी त्‍यांचं काहीही ऐकलं नाही. आणि अमिताभ यांच्‍याकडून डाक्‍स करवून घेतला. हे गाणं सुपरहिट झालं.

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...