Monday, September 9, 2019

मैफिलीतील सुरेल गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी



केसांच्या मधून पाडलेली भांग, कपाळावर लावलेली गोल मोठी टिकली, त्याखाली लावलेला टिळा, नाकात दोन्हीकडे घातलेली नथणी, कानात घातलेली छोटी फुले (दागिना), स्मितहास्य असं सुब्बुलक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचं तेज. त्यांच्या या सौंदर्याबरोबरच त्यांच्या गायकीतील सुरेल सौंदर्याने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी' अर्थातच एम. एस. सुब्बुलक्ष्मी प्रसिध्‍द गायिका. कुंजम्मा या नावाने त्यांना बालपणी लाडाने बोलवत असत. त्यांची आई अक्कमलाई या प्रसिध्‍द व्हायोलिन वादक होत्या. संगीताचं बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या आईकडूनच मिळालं. १६ सप्‍टेंबर त्‍यांचा आज जन्‍मदिवस. सुब्बुलक्ष्मी यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊयात. 

देशातीलच नव्‍हे तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरची ख्‍यातनाम गायिका. गायिकाच नाही तर त्या संगीतकार देखील होत्‍या. व्‍यकंटेश स्तोत्रामुळे त्‍या प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. त्‍यांचे गाजलेले गाणे म्‍हणजे विष्णुसहस्रनाम. त्‍यांचं भक्‍ती संगीत भारतातल्‍या घराघरांत पोहोचलेलं. संपन्‍न घराण्‍यातल्‍या त्‍या गायिका. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. 

वयाच्‍या दहाव्‍या वर्षी त्यांची पहिली मैफिल झाली. पुढे जवळजवळ ७५ वर्षे त्‍यांनी मैफिली केल्‍या. त्‍याचं वैशिष्‍ट्‍ये असं की साधारणपणे, १९८४-८५च्‍या नंतर त्‍यांनी जाहिर कार्यक्रम मोफत केले. त्‍या-त्‍या संस्‍थेसाठी म्‍हणून त्‍या बिदागी (मानधन) घ्‍यायच्‍या नाहीत. कोट्‍यवधीं रुपयांची मदत त्‍यांनी संस्‍थांना केली. त्‍यातल्‍या प्रमुख संस्‍था म्‍हणजे, पुण्‍यातलं महात्‍मा गांधी ट्रस्‍ट, गांधी स्‍मारक निधी, कस्‍तुरभा स्‍मारक निधी, अशा राष्‍ट्रीय पातळीवरच्‍या संस्‍थांसाठी त्‍यांनी मैफिली केल्‍या. अनेक सार्वजनिक संस्‍थेसाठी त्‍यांनी कार्यक्रम केले. 
अनेक थोर गायकांशी त्‍यांचे निकट संबंध होते. बडे गुलाम अली खाँ हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांचा उल्‍लेख करताना 'सुस्‍वरलक्ष्‍मी शुभलक्ष्‍मी' असे करायचे. विलायत खाँ हेदेखील त्‍यांना खूप मानायचे. त्‍यानंतर पंडित रविशंकर, पंडित जसराज, अमजद अली खान यासारखे अनेक मोठे कलावंत त्‍यांचा आदर करायचे. परमेश्‍वरी साधना आणि ईश्‍वरभक्‍ती ही त्‍यांच्‍या गाण्‍यांची वैशिष्‍ट्‍ये. 

महात्‍मा गांधी, नेहरू गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. महात्‍मा गांधी यांचं आवडतं भजन 'हरि तुम हरि' हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी गायलं होतं, असे म्‍हटले जाते. नेहरू त्‍यांना आपली मुलगी मानायचे. पंडित नेहरू सुब्‍बुलक्ष्‍मींना म्‍हणायचे, 'तू माझी पहिली मुलगी आहेस आणि इंदू दुसरी.' (इंदिरा गांधी)

इंदिरा गांधी आणि सुब्‍बुलक्ष्‍मी एका कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसल्‍या होत्‍या. राजीव गांधी त्‍यावेळी ४ वर्षांचे होते. त्‍यावेळी कार्यक्रमात राजीव खूपच दंगा करत असल्‍यामुळे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी इंदिराचींच्‍या हतातून राजीव यांना घेतले. त्‍यांना थोपटलं आणि शांत केलं, अशी आठवण सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर एका ठिकाणी बोलून दाखवली होती. नेहरू-गांधी परिवाराशी सुब्‍बुलक्ष्‍मी यांचे संबंध होते. 
असं म्‍हटलं जातं की, त्‍यांचे गाणं-स्‍तोत्र ऐकल्‍याशिवाय लोक कामाला सुरुवात करायचे नाहीत. त्‍यांनी जी गाणी गायली त्‍यात व्‍यकंटेशस्‍तोत्र तर आहेच. शिवाय, त्‍याच्‍यापलीकडे मीरा, तुलसीदास, कबीर, सूरदास आणि तुकारामांचे अभंग (मराठी) अशा थोर संतांच्‍या रचनाही त्‍यांनी गायल्‍या.  लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी बंगाली रवींद्र संगीतदेखील त्‍यांनी गायले आहे. 

अखेरच्‍या काळात त्‍यांनी बिदागी (मानधन) घेऊन त्‍यांनी एकही मैफिल केली नाही. २०० पेक्षा अधिक मैफिली त्‍यांनी सार्वजनिक कार्यासाठी आणि ३ कोटी रुपयांहून अधिक देणग्‍या त्‍यांनी विविध कामांसाठी दिल्‍या. त्‍यांचे पती ‘कल्‍की’ नावाचे साप्‍ताहिक चालवायचे. सुब्‍बुलक्ष्‍मी आणि त्‍यांचे पती यांनी मिळून ‘सावित्री’ हा चित्रपट काढला होता (१९४१). त्‍यात सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी नारदाची भूमिका केली. तर सावित्रीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारली होती.  

अनेक संस्‍थांना त्‍यांनी मदत केली. तिरुपती बालाजी, चेन्‍नईचा गांधी मेमोरिअल मंडप, हिंदी प्रचार सभा, रामनाथ स्‍वामी मंदिर, अमेरिकेतल्‍या हिंदू मंदिरांसाठी मदत, शाळा आणि महाविद्‍यालये आणि अनेक संगीत संस्‍थांना मदत त्‍यांनी केली होती. 

दक्षिणेतील लोकप्रिय साप्‍ताहिक कल्‍की नंतरच्‍या काळात तोट्‍यात आलं. आर्थिकदृष्‍ट्‍या तोट्‍यात आल्‍यामुळे त्‍यांनी साप्‍ताहिक बंद केलं. चेन्‍नईत त्‍यांचा 'कल्‍की गार्डन्‍स' नावाचं एक बंगला होता. आर्थिकदृष्‍ट्‍या अडचणीत आल्‍यामुळे त्‍यांनी तो बंगला विकला आणि साध्‍या घरात राहायला गेल्‍या. बंगला विकून त्‍यांनी कामगारांची देणी भागवली.  

'संत मीरा' नावाचा चित्रपट सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी काढला. तो दाखवण्‍यासाठी सुब्‍बुलक्ष्‍मी या दिल्‍लीत पं. नेहरूंच्‍या निवासस्‍थानी गेल्‍या होत्‍या. त्‍या सिनेमाचं स्‍क्रिनिंग नेहरूंसाठी ठेवण्‍यात आलं होतं, असं म्‍हटलं जातं. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपलं संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केलं. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.

सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते -

चाकर राखो जी (हिंदी), पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मधुराक्षतम्‌, मोरे आँगना में (हिंदी), मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी), श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌, विष्णुसहस्रनाम, वृंदावन कुंज भवन (हिंदी), हनुमान चालिसा, हरि तुम हरो (हिंदी).

पुरस्कार -

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी, संगीत कलाशिखरमणी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॅमन मॅगसेसे पुरस्कार.

११ डिसेंबर २००४ मध्‍ये त्‍यांचं निधन झालं. 

Tuesday, September 3, 2019

'या' अभिनेत्रीला शेवटी भाड्याच्या घरात राहावं लागलं  

बॉलिवूड अभिनेत्री साधना हिंदी सिनेमा जगतातील एक प्रसिध्द चेहरा आहे. 'मेरा साया', 'आरजू', 'एक फूल दो माली', 'लव इन शिमला', 'वक्त' आणि 'वो कौन थी' यासारख्या चित्रपटांसाठी साधना ओळखल्या जातात. वयाच्या १५ व्या वर्षांपासून साधना महाविद्यालयातील नाटक स्पर्धेत भाग घ्यायच्या. एकदा एका चित्रपट निर्मात्याची नजर साधना यांच्यावर पडली आणि साधनाला सिंधी चित्रपट अबानासाठी साईन केलं. 
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा साधना यांचा एक फोटो मॅगझीनमध्ये  छापण्यात आला होता. त्यावेळचे प्रसिध्द चित्रपट निर्माते शशिधर मुखर्जी यांची नजर साधना यांच्या फोटोकडे गेली. शशिधर मुखर्जी यांनी साधना यांना आपल्यासोबत  हिमालय ॲक्टिंग स्कूलमध्ये घेऊन गेले. त्यांनी साधना यांना आपल्या मुलासोबत लविंग शिमला चित्रपटात लॉन्च केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. के. नय्यर यांनी केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर साधना यांना मागे वळून पाहावे लागले नाही. यानंतर साधना यांनी अनेक चित्रपट केले. 
Image result for actress sadhana
साधना पहिल्यांदा ज्यावेळी चित्रपट ४२० च्या एका गाण्यासाठी आला होती. त्यावेळी एका छोट्याशा गोष्टीवर राज कपूरसोबत वाद झाला होता. त्यानंतर, साधना ह्या राज कपूर यांचा द्वेष करू लागल्या.  
हेअरस्टाईलवर खास लक्ष 
साधना आपल्या हेअरस्टाईलवर खास लक्ष द्यायच्या. असं म्हटलं जातं की, सेटवर त्या आपल्या हेअरस्टाईलवर खास लक्ष द्यायच्या. ही गोष्ट राज कपूर यांना अजिबात आवडायची नाही. राज कपूर रागाच्या भरात साधना यांना म्हणाले होते की, अभिनय सोडून त्यांनी लग्न केले पाहिजे. यावर साधना यांना राग आला आणि त्या सेट सोडून तेथून निघून गेल्या. परंतु, काही काळानंतर मात्र दोघांनी दुल्हा-दुल्हनमध्ये एकत्र काम केले होते. 
Image result for actress sadhana
एकुलती एक मुलगी होती साधना
पाकिस्तानच्या कराचीमध्ये जन्मलेल्या साधना यांचे कुटुंबीय भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुंबईत आले होते. साधना एकुलती एक मुलगी होती. लाडात वाढलेल्या साधना हिचे नाव तिच्या वडिलांनी आपली आवडती अभिनेत्री साधना बोसच्या नावावरून ठेवले होते. 
खूप कमी लोकांना माहिती आहे की, साधनाचे वडील आणि अभिनेत्री बबिताचे वडील हरि शिवदासानी सख्खे भाऊ होते.  (बबिताच्या दोन मुली म्हणजे करीना कपूर आणि करिश्मा कपूर होय.)
साधनाला अभिनेत्री बनायचं होतं. त्यामुळे ती कराचीतून मुंबईत आली. साधनाला चित्रपट ४२० मधील एका गाण्यासाठी  (इचक दाना इचक दाना) मध्ये काम मिळालं. साधना यांनी नंतर संघर्ष चित्रपट साईन केला.
Image result for actress sadhana
शेवटी भाड्याच्या घरात राहावं लागलं  
साधना लक्स साबणाच्या जाहिरातीची मॉडल होती. साधना तत्कालीन अभिनेत्रींमध्ये सर्वात अधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. साठच्या दशकात केवळ अभिनेत्री वैजयंती मालाला सर्वात अधिक मानधन दिले जायचे. तर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री नंदा होती. १९९५ मध्ये पतीच्या निधनानंतर साधना एकट्या राहू लागल्या. शेवटी त्या मुंबईच्या एका जुन्या बंगल्यात भाड्याच्या घरात राहू लागल्या. हा बंगला आशा भोसले यांचा होता.  पुढे त्यांना थायरॉईडची समस्या उद्भवली होती. 
Image result for actress sadhana
साधना यांचे जवळचे कोणी नव्हते. प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांकडे मदत देखील मागितली. परंतु, कोणीही पुढे आले नाही. या गोष्टीचा खुलासा खुद्द साधना यांची खास मैत्रीण आणि अभिनेत्री तबस्सुम यांनी २०१५ मध्ये एका मुलाखतीत केला होता. अखेर, २५ डिसेंबर, २०१५ रोजी मुंबईमध्ये साधना यांचे निधन झाले. 

सर्वांधिक रेप सीन करून व्हिलन बनला 'शक्ती' 

सहाशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले शक्ती कपूर हिंदी सिनेमा जगतातील प्रसिद्ध व्हिलन आहेत. शक्ती कपूरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास ८० हून अधिक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. 
'आऊ...' हे प्रसिद्ध शब्द म्हणत हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या शक्तीला 'कुर्बानी' चित्रपटातून ओळख मिळाली. शक्तीचा जन्म ३ सप्टेंबचा. शक्ती ६६ वाढदिवस साजरा करत आहे. जन्मदिनाच्या औचित्याने त्यांच्याविषयी या खास गोष्टी जाणून घेऊया. अनेक चित्रपटांमध्ये शक्ती कपूरने रेप सीन्स केले आणि व्हिलन म्हणून ते हिट झाले. 
Image result for shakti kapoor film angare
गुमसुम
दयानंद दिग्दर्शित १९८२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट गुमसुममध्ये शक्ती कपूरचा रेप सीन वादग्रस्त ठरला. शक्तीने 'मेरे आगोश में'मध्ये सर्वात अधिक कॉन्ट्रोवर्शियल सीन दिले होते. शक्तीने टॉपलेस ॲक्ट्रेससोबत कॉन्ट्रोवर्शियल सीन दिले होते. सेन्सॉर बोर्डाने अनेक महिने या चित्रपटाला मंजूरी दिली नव्हती. 
Image result for shakti kapoor
गुंडा
१९९८ मध्ये गुंडा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामुळे माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेला एक नवा दृष्टीकोण मिळाला. मुख्य अभिनेता होता 'मिथुन चक्रवर्ती'. चित्रपटात एकापेक्षा एक कलाकार होते. त्यापैकी एक होता शक्ती कपूर. या चित्रपटामध्येही रेप सीन चित्रीत करण्यात आले होते. 
अंगारे
'अंगारे' १९८६ मध्ये रिलीज झाला होता. शमिता पाटीलचा रेप करण्याचा प्रयत्न करतानाचा यामध्ये सीन होता. या सीनमुळे शक्ती कपूरची खूप चर्चा झाली होती. यामध्ये शमिता पाटीलसोबत राज बब्बरची मुख्य भूमिका होती. 
Image result for shakti kapoor film angare
मेरा फैसला
मेरा फैसला चित्रपट १९८४ मध्ये रिलीज झाला होता. जया प्रदा सोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या एका सीनमध्ये जया प्रदासोबत शक्ती कपूरने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता, असा सीन होता. 
Image result for shakti kapoor

बर्थडे स्‍पेशल : अनेक पिढ्यांना 'दिवाना' करणारा ऋषी



‘बॉबी’मधला तो ऋषी कपूर पाहिला की, अंगात स्‍वेटर घातलेला २१ वर्षांचा तो तरुण आठवतो. भारतीय मनोरंजन जगताला ऋषी कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी, जी त्‍याने सुंदर अभिनेत्रींसोबत चित्रीत केली होती. त्‍यांची त्‍या-त्‍या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत असलेली केमिस्‍ट्रीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस कायमस्‍वरूपी उतरली.

एकेकाळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरने ‘बॉबी’ या चित्रपटातून नव्हाळीतल्या प्रेमाचा विषय हाताळला. 'बॉबी'मध्‍ये ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचा ऐन तारुण्‍यातील प्रेम पडद्‍यावर दाखवण्‍यात आलं. बॉबी पाहिल्‍यानंतर ऋषीचा अभिनयासाठीच जन्‍म झाला असावा, असं वाटतं. प्रेमातील अनेक प्रसंग ऋषी कपूरने अजरामर करून ठेवले आहेत. त्याचा काळ आणि त्याच्या नंतरच्या काळानेही ऋषीच्या प्रेमासारखं आपलं प्रेम पाहिजे म्‍हणून प्रेमात पडणारी पिढी त्याकाळी निर्माण झाली होती, आणि त्याच्या प्रेमाखातरच मग ऋषीच्या स्‍वेटरचा जमानाही अस्‍तित्‍वात आला म्‍हणून त्याचं उत्‍कृष्‍ट अभिनेता म्‍हणून त्‍याचं कौतुक होत राहतं.

राज कपूर यांनी शंकर-जयकिशनऐवजी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन 'बॉबी'साठी काम केलं तर ऋषी कपूरच्‍या गाण्‍यांना मुकेश यांना गायला न सांगता शैलेंद्र सिंग यांना गायला सांगितले. विशेष म्‍हणजे, 'बॉबी'तली गाणी सुपरडूपर हिट ठरली म्‍हणून काळ लोटला तरी ऋषी कपूरची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळतात.

हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्‍वप्‍न म्‍हणजे राज कपूर. प्रत्येक भूमिकेला त्याने जिवंतपणाचा ओलावा दिला. त्‍यांच्‍याच मुलांपैकी एक ऋषी कपूर. ऋषी कपूरसारखं स्‍पिरीट इतरांकडे म्‍हणावं तसं नव्‍हतं. 'बॉबी'ला मिळालेल्‍या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट ऋषीने दिले. ऋषीने डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्‍या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत काम केले.

ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्‍यांना डेब्यू चाईल्ड अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्‍हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्‍यांना उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार मिळाला.

सिनेजगतातल्‍या २५ वर्षांच्‍या करकिर्दीत स्वेटर्स घालून, अभिनेत्रींभोवती पिंगा घालण्‍याशिवाय आणि गाणी गाण्यापलीकडे आपण काहीच केले नसल्‍याने त्‍यांनी खुद्‍द कबूल केले आहे.

... तेव्‍हा खचला ऋषी

राज कपूर यांनी आर. के. फिल्म्सची कंपनी स्थापन करून चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्‍टुडिओत झाले होते. 'बॉबी' चित्रपटाचे चित्रीकरणही तेथेच झाले होते. ‘श्री. ४२०’चं शूटिंगदेखील तिथलंचं. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं आठवतयं? ‘श्री. ४२०’ मधील या रोमँटिक गाण्‍यात ऋषी केवळ दोन वर्षांचे होते. त्‍यावेळचा शूटिंगचा एक किस्‍सा सांगितला जातो. दोन वर्षांच्‍या ऋषीला भर मुसळधार पावसातून रडत चालायचे होते. परफेक्‍ट सीनसाठी रिटेकवर रिटेक होतात. शूटिंग लांबते. त्‍यामुळे चिंब भिजलेला ऋषी वैतागतो आणि पावसात न जाण्‍याचा हट्‍ट धरतो. तेव्हा ‘तू पपा सांगतील, त्याप्रमाणे केलंस, तर मी तुला चॉकलेट देईन’, असे आमिष अभिनेत्री नर्गिस ऋषीला दाखवले होते. तेव्हापासून ऋषीचं आर. के. स्टुडिओशी वेगळं नातं आहे. म्हणूनच आर. के. स्‍टुडिओला आग लागली, तेव्हा ऋषी पुरता खचला होता.

ऋषीची खास आठवण

ऋषी आणि नीतू यांच्या विवाहानंतरच्या जंगी पार्ट्या आर. के. स्‍टुडिओतच झाल्‍या होत्‍या. त्यामुळे ऋषीला आर. के. स्‍टुडिओची लाईफटाईम आठवण राहणारी आहे.

ऋषीचं 'त्‍या' तरुणीशी अफेअर 

अभिनेत्री नीतू सिंह यांच्‍याशी लग्‍न होण्‍यापूर्वी ऋषीने यास्मीन नावाच्‍या तरुणीला डेट केल्‍याचे म्‍हटले जाते. परंतु, आपण नीतूला कधी धोका दिला नाही, असे खुद्‍द ऋषीने एका मुलाखतीत म्‍हटलं होतं. जेव्‍हा बॉबी चित्रपट आला होता, त्‍यावेळी ऋषी २१ वर्षांचा होता. बॉबी रिलीज झाला, त्‍यावेळी ऋषीचा ब्रेकअप झाल्‍याचे त्‍याने सांगितले होते.

रोमॅटिंक ऋषीच्‍या गंभीर भूमिका

गेल्या काही वर्षांमध्‍ये ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, कपूर ॲण्‍ड सन्‍स, राजमा चावल, बेशरम, स्‍टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, ‘मुल्क’ अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ऋषीने रंगवल्‍या. प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट असणारा ऋषीने रोमँटिकचं नव्‍हे तर गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 'मुल्‍क' या चित्रपटातील त्‍याची एका मुस्‍लिम व्‍यक्‍तीची रेखाटलेली भूमिका कौतुकास्पद आहे. 'मुल्‍क'मधील त्‍याची अत्‍यंत सुंदर भूमिका आहे, त्‍यात तापसी पन्‍नूचीदेखील महत्त्‍वाची भूमिका होती.

या चित्रपटांतून साकारल्‍या वेगळ्‍या भूमिका

मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज, प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्‍थोनी, बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्‍ह आज कल, प्‍यार के काबिल, नमस्‍ते लंडन, रफू चक्‍कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्‍या चित्रपटांतून ऋषी कपूरने वेगवेगळ्‍या भूमिका पार पाडल्‍या.

Friday, August 23, 2019

पत्नी सायरा असतानाही दिलीपकुमार यांनी केलं होतं दुसरं लग्‍न


सायरा बानो आणि दिलीपकुमार यांची खास लव्हस्टोरी 












बॉलिवूडचे सुपरस्टार, हॅण्‍डसम अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची प्रेम कहाणी खूपच रोमँटिक आहे. बॉलिवूडच्या या कपलचा रोमँटिक प्रवास सर्वश्रृत आहे. सायरा सुरूवातीपासूनच दिलीपकुमार यांची चाहती होती. सायरा बानो यांचा २३ ऑगस्टला वाढदिवस. या औचित्याने सायरा यांच्याविषयी जाणून घेऊया या खास गोष्टी.

आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या सायरा बानो दिलीपकुमार यांच्‍या पत्‍नी. दोघांना पुत्रसुख नाही. सायरा बानो आई का बनू शकल्‍या नाहीत? याचा खुलासा खुद्‍द दिलीपकुमार यांनी केला होता. 
Image result for saira banu and dilip kumar
सायरा बानो यांचा जन्म १९४४ मध्ये मसूरीमध्ये झाला होता. त्यांच्या आयुष्याची कथा फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाही. सायरा हिंदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्‍या. सायरा यांचं बालपण लंडनमध्‍ये गेलं. १९६० मध्‍ये त्‍या मुंबईत आल्‍या. सायरा यांना आपल्या आईप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री बनायचे होते. त्यांचे वडील मियां एहसान-उल-हक चित्रपट निर्माते होते. त्यांनी मुंबईत 'फूल' आणि पाकिस्तानमध्ये 'वादा' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. 
सायरा यांचे 'जंगली'मधून डेब्‍यू
सायरा १९६० मध्‍ये मुंबईत आल्‍या. त्‍यावेळी त्‍यांची भेट निर्माता-दिग्‍दर्शक शशीधर मुखर्जी यांच्‍याशी झाली. येथून त्‍यांच्‍या करिअरला सुरूवात झाली. १९६१ मध्‍ये त्‍यांनी बॉलिवूडमध्‍ये चित्रपट 'जंगली'मधून डेब्यू केलं. त्‍यात शम्मी कपूर यांची मुख्य भूमिका होती. जंगलीमध्ये सायरा यांची काश्मीरी मुलीची भूमिका होती. त्यांची चांगली अभिनेत्री म्‍हणून ओळख असली तरी त्‍या त्‍यांच्‍या लव्‍हस्‍टोरीमुळे त्या अधिक ओळखल्‍या जातात. 
Image result for saira banu
१९६८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'पडोसन'ने सायराला लोकप्रियता मिळवून दिली. सायरा यांच्यासाठी १९६४ चं वर्ष खूपच खास होतं. यावर्षी त्याचा दूर की आवाज, आओ प्यार करें, आई मिलन की बेला आणि अप्रैल फूल यासारखे चित्रपट केले. साठ-सत्तरच्या दशकात सायरा बानोचे नाव बॉलिवूडच्या प्रसिध्द आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतलं जायचं. 
Image result for saira banu
बालपणापणापासूनच सायरा यांना दिलीपजींचे आकर्षण 
सायरा बानो १२ वर्षांच्‍या होत्या. त्यांना सुपरस्टार दिलीपकुमार आवडायचे. एक फॅन ते एक पत्नी होण्‍यापर्यंतचा त्‍यांचा प्रवास इंटरेस्‍टिंग आहे. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, '१२ वर्षांची असल्‍यापासून ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार मला आवडायचे.' 
Image result for saira banu
सायरा यांनी पहिल्‍यांदा दिलीपकुमार यांना १९५२ मध्‍ये 'आन' चित्रपटात पाहिलं होतं. तेव्‍हाच त्‍यांना दिलीपकुमार यांच्‍याशी प्रेम झालं. १९६६ मध्‍ये सायरा यांनी अभिनेता दिलीपकुमार यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी सायरा २२ वर्षांच्‍या तर दिलीपकुमार ४४ वर्षांचे होते. लग्‍नानंतर दोघांच्‍याही जीवनात अनेक चढ-उतार आले. दिलीपकुमार यांनी दुसरं लग्‍न देखील केलं. दिलीप कुमार यांनी आसमा नावाच्‍या महिलेशी लग्‍न केलं होतं. सायरा बानो आई होऊ शकत नव्‍हत्‍या, म्‍हणून दिलीप यांनी हे लग्‍न केल्‍याचं म्हटलं जातं. परंतु, हे लग्‍न फार काळ टिकू शकलं नाही. दिलीप पुन्‍हा सायरा यांच्‍याकडे आले. 
Image result for saira banu
सायरा का आई बनू शकल्‍या नाहीत?
अभिनेता दिलीपकुमार यांनी आपल्‍या पुस्‍तकात 'द सब्सटेंस ॲण्‍ड द शॅडो'मध्‍ये सायरा बानो यांच्‍याशी लग्‍न केल्‍याचं म्‍हटलं होतं. १९७२ मध्‍ये सायरा प्रेग्नेंट होत्‍या, हा खुलासाही खुद्‍द दिलीप यांनी केला होता. दिलीपकुमार यांनी पुस्‍तकात म्‍हटलं होतं की, 'प्रेग्नेंसीच्‍या आठव्‍या महिन्‍यात सायरा बानो यांना हाय ब्‍लड प्रेशरचा त्रास होता. त्‍याचदरम्‍यान, आम्‍ही आमचं बाळ गमावलं. नंतर आम्‍हाला कळालं की, मुलगा होता. आम्‍ही त्‍याला वाचवू शकलो नाही. त्‍यानंतर सायरा कधी आई बनू शकल्‍या नाहीत.'
Image result for saira banu and dilip kumar

जेव्हा 'ती' मुंबईच्या रस्त्यावर न्यूड धावली...


स्मृतीदिनानिमित्त 

न 
धाडसी कामे तर खूप लोक करतात, परंतु या धाडसामध्ये काहीतरी वेगळे करून दाखवण्याची हिम्मत खूप कमी लोकांमध्ये असते. ओडीसी नृत्यांगना आणि मॉडल प्रोतिमा बेदीने असेच धाडस केले होते. ते धाडस पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली होती. प्रोतिमा बेदी सिनेब्लिड्ज मासिकासाठी मुंबईच्या जुहू बीचवर अशी धावली होती की, ती रातोरात चर्चेत आली. प्रोतिमा बेदीचा आज स्मृतिदिन. तिच्या आयुष्याची कहाणी जरा हटकेच होती. कुणालाही विश्वास बसणार नाही, अशी घटना तिच्या आयुष्यात घडली. 
Image result for protima bedi
दिल्लीची राहणारी प्रोतिमा बेदीने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७० मध्ये मॉडलिंग सुरू केले. तिनं मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश करावा, हे तिच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हतं. आपल्या कुटुंबीयांविरोधात जाऊन ती मॉडलिंग क्षेत्रात उतरली. परंतु, तिने घेतलेला हा निर्णय चुकीचा नव्हता. या निर्णयानेच तिला तिच्या आयुष्यात यश मिळवून दिले. 
सत्तरच्या दशकातील गोष्ट. मॉडेल असणारी प्रोतिमा बेदीने मुंबईच्या रस्त्यावर चक्क नग्न धाव घेतली होती. ही घटना होती १९७४ मधील. त्या काळात न्यूड सीन्स देणेही फार धाडसाचं काम होतं आणि चक्क नग्न धावणे म्हणजे किती भयानक असेल! किती मोठं धाडस असेल ना! पण, इतका धाडसीपणा तिच्यात आला तरी कुठून? आणि हे धाडस तिने का केलं असावं?
Image result for protima bedi
'सिनेब्लिट्झ' नावाचं मासिक होतं. त्यामध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्व गप्पाटप्पा पाहायला मिळायच्या. त्यावेळी बाजारात चित्रपटविषयक बरीच मासिके येत होती. परंतु, त्यामध्ये ‘सिनेब्लिट्झ’चं वेगळंपण असावं, असं मासिकाच्या मालकाला वाटत होतं. त्यामुळे नग्न धावणाऱ्या मॉडेलचे छायाचित्र असलेले मासिक बाजारात आले. न्यूड मॉडेल म्हणून प्रोतिमा बेदीसारखं धाडस कुणीही करू शकणार नाही, असे धाडस तिने केलं होतं. सर्व बंधने झुगारून प्रोतिमा १९७४ मध्ये मुंबईच्या जुहू बीचवर न्यूड धावली आणि मासिकाच्या छायाचित्रकाराने तिचे फोटो कॅमेराबध्द केले होते.   
असं म्हटलं जातं की, प्रोतिमा ही बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध होती. प्रोतिमा बेदीचे आयुष्य वादग्रस्त होते. कधी लिव्ह इन, कधी एक्‍स्‍ट्रा मॅरिटल अफेअर, घटस्फोट तर कधी अफेअर्स. प्रोतिमाने आपल्या आत्मचरित्रात (Timepass) या सर्व गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत. 
प्रोतिमाने त्यावेळचे सिनेइंडस्ट्रीतील सर्वात हॅण्डसम मॅन कबीर बेदीशी प्रेम केलं होतं. ती कबीर बेदीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांचं हे नातं प्रोतिमाच्या कुटुंबीयांना अजिबात मान्य नव्हतं. 
Image result for protima bedi
१९६९ मध्ये प्रोतिमाने कबीर बेदीशी लग्न केले. दोघे १९७८ मध्ये वेगळे झाले. दोघांची दोन मुले होती, पूजा बेदी आणि सिद्धार्थ बेदी. १९९७ मध्ये सिद्धार्थने आत्महत्या केली. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्रोतिमाने एकटी राहू लागली. 
Image result for protima bedi
१८ ऑगस्ट, १९९८ मध्ये उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे भूस्खलनमध्ये तिचा मृत्यू झाला.

Tuesday, August 13, 2019

जरीना में वो 'फिल्मोवाली बात नही है'


बॉलिवूड अभिनेत्री जरीना वहाब यांचा १७ जुलैला ६३ वा वाढदिवस. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. पुणे येथील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनेत्री व्हायचे स्वप्न घेऊन त्या स्वप्ननगरी मुंबईत आल्या. येथे येऊन त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. खूप कमी लोकांना माहिती आहे की, याआधी जरीना यांना सिनेमासाठी अभिनेते राज कपूर यांनी रिजेक्ट केलं होते. जरीना सिंपल दिसणारी तरूणी होती. त्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. जरीनाबाबत सांगण्यात आले की, या तरूणीमध्ये ग्लॅमर नाही. राज कपूरच्या मते, तिच्यात फिल्मोवाली बात नव्हती. 
dinsta
जरीना यांच्या जागी जया बच्चनला मिळाला चित्रपट 
ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी चित्रपटात जरीना वहाब यांच्या जागी अभिनेत्री जया बच्चन यांना घेतलं. तरीही जरीना यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वत:कडे लक्ष दिलं. आपल्या लुक्सवर खूप लक्ष दिले. त्यांनी हाय सोसायटीतील तरूणींसारखे जीवनशैली, राहणीमान शिकले आणि स्वत:मध्ये बदल केला. 
dinsta
देव आनंद यांनी दिला पहिली ब्रेक
अभिनेते देव आनंद यांनी जरीना वहाब यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिला. जरीना वहाब यांना 'इश्क इश्क इश्क' हा चित्रपट मिळाला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट मिळाले आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ला सिध्द केले. आणि  जरीना यांचे नाव बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये समाविष्ट झाले. 
dinsta
आदित्य पंचोलीशी लग्न 
चित्रपट कलंक का टीकाच्या सेटवर जरीना वहाब यांची भेट अभिनेता आदित्य पंचोलीशी झाली. यानंतर १९८६ मध्ये  दोघांनी लग्न केले. दोघांची दोन मुले सारा आणि सूरज आहेत.  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...