Sunday, November 24, 2019

जेव्हा 'या' अभिनेत्रीने साकारली समलैंगिक भूमिका




नंदिता दासने न केवळ बॉलिवूडमध्ये पारंपरिक ब्यूटीला आव्हानच दिले नाही तर तिला मॉर्डन जगाची स्मिता पाटील असेही म्हणण्यात आले. नंदिताने दीपा मेहता यांच्या फायरमध्ये समलैंगिक भूमिका साकारली होती.

Related image
शबाना आझमी आणि नंदिता दास 
नव्वदच्या दशकामध्ये नंदिता दासने आपल्या भूमिकांच्या आधारांवर  बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवली. नंदिता दासचा जन्म ७ नोव्हेंबरला मुंबईमध्ये झाला होता. 
Image result for nandita das hd
नंदिताने दीपा मेहता यांच्या फायर चित्रपटात समलैंगिक भूमिका साकारली. या चित्रपटात फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला होता. एक रुढीवादी कुटुंब दाखवण्यात आलं होतं. या कुटुंबातील दोन महिलांना एकमेकींशी प्रेम होतं. 
Image result for nandita das earth film
या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भारतामध्ये हा चित्रपट रिलीज होण्यास अडचणीदेखील निर्माण झाल्या. या चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या दोन दशकानंतर समलैंगिकता विषयावर संवेदनशील चित्रपट येऊ लागले. चित्रपट महोत्सवातही फायरचे कौतुक करण्यात आले होते.   फ्रान्स, स्पेन, युके आणि अमेरिकेमध्ये १४ पुरस्कार मिळवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. फायरनंतर दीपा मेहता यांच्या अर्थ चित्रपटातही नंदिता दासने काम केलं होतं. 
दिग्दर्शनातही पदार्पण
Image result for nandita das hd
प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्यूरी म्हणन काम केलेल्या नंदिताने अभिनयाशिवाय दिग्दर्शनातही नशीब आजमावलं. त्यांनी श्याम बेनेगल, मणिरत्नम यासारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं. विविध भाषांमधील ४० हून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. २००८ मध्ये त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट फिराक रिलीज झाला होता.
Image result for nandita das earth film
२०१८ मध्ये त्यांनी लेखक मंटो यांचा बायोपिक आणला. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने काम केल होतं. समीक्षकांकडून या चित्रपटाला वाहव्वा मिळाली. चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाचे कौतुक झाले. 

चित्रपटात येण्यापूर्वी अनुष्‍का 'हे' करत होती काम


अनुष्का शेट्टीचा ७ नोव्‍हेंबरला वाढदिवस




'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीचा ७ नोव्‍हेंबरला वाढदिवस. 'बाहुबली : द कन्क्लूजन'च्‍या माध्‍यमातून अनुष्का शेट्टीने केवळ साऊथ चित्रपट इंडस्ट्रीच नाही तर जगभरात ख्‍याती मिळवली. तिच्‍या ३८ व्‍या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्‍याबद्‍दल या खास गोष्‍टी. 
Image result for anushka shetty hd
अनुष्का शेट्टीने आपलं शिक्षण बंगळूरमधून पूर्ण केलं. तिने २००५ मध्‍ये तेलगू चित्रपट 'सुपर'मधून डेब्यू केलं होतं. या चित्रपटात तिच्‍यासोबत नागार्जुन आणि आएशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. या चित्रटातील तिच्‍या अभिनयाचे कौतुकही झाले होते. 
अनुष्काने 'मगधीरा,' 'रुद्रमादेवी,' 'वेदम,' 'अरुंधति' आणि 'सिंघम' सीरीज यासारख्‍या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. 
Image result for anushka shetty hd
अनुष्का शेट्टीचे खरे नाव स्वीटी शेट्टी असं आहे. अनुष्काने २००५ मध्ये 'सुपर' चित्रपटातून डेब्यू केलं होतं. अनुष्काच्या फॅमिली बॅकग्राउंडमधून कोणीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. 
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अनुष्का शेट्टी मंगळुरुमध्ये एक योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायची. तिचे सौंदर्य पाहून एका चित्रपटामध्ये तिला ऑफर देण्यात आली. तो चित्रपट होता-'सुपर' (२००५). यानंतर तिने अनेक तेलुगु चित्रपट केले.  
अनुष्काचा 'साईज झिरो' हा लोकप्रिय चित्रपट आहे. चित्रपटासाठी तिने आपले वजन २० किलो वाढवले होते. अनुष्काने २०१० मध्ये तमिळ चित्रपट 'सिंघम'मध्ये काम करून प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. 
Image result for anushka shetty hd
लक्झरी गाड्या 
तिला लक्‍झरी गाड्‍यांचा छंद आहे. इतकचं नाही तर तिने आपल्‍या गाडी चालकाचं काम पाहून त्‍याला १२ लाखांची कार गिफ्ट दिली होती. 
Image result for anushka shetty hd
इतके घेते मानधन 
चित्रपटांशिवाय ती अनेक ब्रँडेड कंपन्‍यांची ब्रँड ॲम्‍बेसेडर आहे. तिने अनेक जाहिरातीत काम केलं आहे. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. 
Image result for anushka shetty hd
इतक्या कोटींची मालकीण 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्काजवळ एक़ूण १४० कोटींची प्रॉपर्टी आहे. तिचं घर हैदराबादमधील जुबली हिल्स स्थित वुड्स अपार्टमेंटच्‍या ६ व्‍या मजल्‍यावर आहे. 
Related image
'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत अनुष्का शेट्टीचं नाव जोडलं गेलं आहे. मध्‍यंतरी, दोघे एकमेकांना डेट करत असल्‍याचे आणि डिसेंबरमध्‍ये लग्‍न करणार असल्‍याचे वृत्त होते. परंतु, या वृत्तावर प्रभासने स्‍पष्‍टीकरण देत म्‍हटले होते की, अनुष्का आणि तो बालपणीचे मित्र आहेत. दोघांच्‍यामध्‍ये कुठलंही अफेअर नाही.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण





बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये  ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अँग्री यंग मॅन अशी ओळख बनवणाऱ्या अमिताभ बच्चनने १९६९ मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. परंतु, अमिताभ बच्चन यांनी जंजीर, शोले आणि दीवार यासारखे एकापेक्षा एक चित्रपट देऊन सर्वांची मने जिंकली. 
Related image
बॉलिवूडमध्ये त्यांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या खास औचित्याने बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चनने बिग बींसाठी एक ट्विट केलं आहे. 
अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर करून एक मेसेज लिहिला आहे. अभिषेक बच्चनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "केवळ एक त्यांच्या मुलाच्या नात्यानेच नव्हे तर एक अभिनेता आणि फॅन होण्याच्या नात्याने, आम्ही सर्व आपली उदारता आणि महानतेमुळे धन्य आहोत. आपली प्रशंसा करण्यासाठी, आपल्याकडून शिकण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी खूप काही आहे. सिनेमा लव्हर्सच्या अनेक पिढ्या म्हणणार आहे की, आम्ही बच्चन यांच्या  जमान्यात राहत होतो." 
Image result for amitabh height pic
उंची अधिक असल्याने अडचण 
७ नोव्हेंबर, १९६९ रोजी आजपासून ५० वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाचे नाव होते-'सात हिंदुस्तानी.' दिग्गज लेखक-दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांचा हा चित्रपट होता. 
अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, "मी मॅगजीन फिल्मफेअर-माधुरी स्पर्धेसाठी एक फोटो पाठवला होता. त्यावेळी चित्रपटात आपले स्थान मिळवणाऱ्या चेहऱ्यांसाठी फिल्मफेअर एक चांगले व्यासपीठ  होतं. माझा फोटो रिजेक्ट करण्यात आला होता, काय ही आश्चर्याची गोष्ट आहे? 
Related image
परंतु, अमिताभ यांनी चित्रपटामध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता. ते कोलकातामध्ये आपली चांगली नोकरी सोडून मुंबईला आले होते. 
त्यावेळी केए अब्बास गोव्याच्या स्वातंत्र्य संघर्षावर चित्रपट 'सात हिंदुस्तानी' बनवण्याची तयारी करत होते. त्यांना सात हिरो हवे होते, जे एकमेकांपेक्षा अगदी वेगळे असतील. यातील एका भूमिकेसाठी अब्बास यांनी टीनू आनंदला घेतले होते. टीनू आनंद अब्बास यांचे मित्र आणि प्रसिध्द लेखक इंदर राजचा मुलगा होता. टीनू आनंदची एक मैत्रीण होती नीना सिंह, जी मॉडेल होती. सात हिंदुस्तानीसाठी नीनाला चित्रपटात घेण्यात आले होते. अमिताभ बच्चन दूर दूरपर्यंत चित्रपटाचा भाग नव्हते.
Image result for saat hindustani amitabh
नीना सिंहने अब्बास  यांना अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवलं होतं. या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून नीना काम करणार होत्या. आणि टीनू आनंद अमिताभ यांच्यासाठी अब्बास यांच्याकडे गेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही चित्रपट करू शकले नाहीत. अमिताभ मात्र या चित्रपटातून पुढे गेले. अनेकदा उंचीमुळे नाकारण्यात आलेल्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी साईन केला. ७ नोव्हेंबर, १९६९ रोजी ही चित्रपट रिलीज झाला.
आगामी चित्रपटात झळकणार 
अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र,' 'झुंड,' 'चेहरे' , 'गुलाबो-सिताबो' या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. 

नूतन यांनी संजीव यांच्या मारलं होतं थोबाडीत


संजीव कुमार - स्मृतीदिन




बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजीव कुमार आज या जगात नाहीत. परंतु, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ते नेहमी आपल्या प्रेक्षकांच्या मनात अमर राहतील. आजदेखील संजीव कुमार यांचे चित्रपट पाहावे असे आहेत. संजीव कुमार यांचा अभिनय असो वा डान्स किंवा इतर कोणतीही ॲक्टिव्हीटी, त्यांची हेअरस्टाईल नेहमी मेनटेन असायची. अनेक दमदार अॅक्शन सीन्स केल्यानंतर देखील संजीव कुमार यांचे केस हलायचे नाही. संजीव कुमार यांचा ६ नोव्हेंबरला स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्याचा आणि करिअरचा आढावा थोडक्यात जाणून घेऊया. 

* ९ जुलै, १९३८ रोजी जन्‍मलेले अभिनेते संजीव कुमार यांचं खरं नाव हरीहर जेठालाल जरीवाला असं होतं. 
* सूरतमध्‍ये त्‍यांचा जन्म झाला. सुरुवातीला ७ वर्षे तेथे राहिल्‍यानंतर त्‍यांचे कुटुंबीय मुंबईला आले. 
*संजीव कुमार यांनी स्टेजवर अभिनय करण्‍यास सुरुवात केली. त्‍यानंतर ते इंडियन नॅशनल थिएटरशी जोडले गेले. 
*हम हिंदुस्तानी (१९६०) संजीव कुमार यांचा पहिला चित्रपट होता. त्‍यांनी अनेक चित्रपटात छोट्‍या-मोठ्‍या भूमिका केल्‍या. या भूमिकेतूनच त्‍यांना अभिनेता म्‍हणून ओळख मिळाली. 
Image result for sanjeev-kumar hd
*१९६८ मध्‍ये रिलीज झालेला 'राजा और रंक' या चित्रपटाच्‍या यशानंतर संजीव कुमार बॉलिवूडमध्‍ये मागे वळून पाहावे लागले नाही. 
*संघर्ष (१९६८) मध्‍ये ते दिलीप कुमार यांच्‍यासोबत एका छोट्‍या भूमिकेत दिसले. परंतु, या चित्रपटात त्‍यांनी आपल्‍या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्‍याबरोबरच दिलीप कुमार यांचंही मन जिंकलं. 
* संजीव कुमार वृध्‍द व्‍यक्‍तीची भूमिका साकारण्‍यासाठी ओळखले जायचे. २२ वर्षांचे असताना त्‍यांनी एका नाटकात वृध्‍द व्‍यक्‍तीची भूमिका साकारली होती. 
* १९७२ मध्‍ये गुलजार यांनी संजीव कुमार यांचा 'सुबह-ओ-शाम' हा चित्रपट पाहिला. गुलजार यांना संजीव यांचा अभिनय आवडला होता. त्‍यानंतर गुलजार आणि संजीव कुमार यांनी मिळून (१९७३), आंधी (१९७५), मौसम (१९७५), अंगूर (१९८०), नमकीन (१९८२) यासारखे चांगले चित्रपट केले. 
*'नया दिन नई रात' (१९७४) मध्‍ये संजीव कुमार यांनी ९ भूमिका करून आपल्‍या अभिनयाची छाप सोडली. संजीव कुमार यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये प्रत्‍येक प्रकारच्‍या भूमिका केल्‍या. 
Image result for sanjeev-kumar hd
* संजीव कुमार यांच्‍या फॅमिलीत कुठलाही पुरुष ५० वर्षांपेक्षा अधिक आयुष्‍य जगू शकला नाही. संजीव यांनाही नेहमी वाटायचं की, आपणही अधिक वर्षे जगू शकणार नाही. त्‍यांचा लहान भाऊ नकुल यांचा मृत्यू संजीव यांच्‍याआधीच झाला होता. नंतर ६ महिन्‍यांनी त्‍यांचे मोठे भाऊ किशोर यांचे निधन झालं. संजीव कुमार यांचं देखील वयाच्‍या ४७ व्‍या वर्षी निधन झालं. ६ नोव्‍हेंबर १९८५ ला त्‍यांनी जगाचा निरोप घेतला. 
* 'शोले' चित्रपटात संजीव कुमार यांनी ठाकूरची भूमिका केली होती. ही भूमिका धर्मेंद्र यांना करायची होती. दिग्‍दर्शक रमेश सिप्पी हे विचारात पडले. त्‍यावेळी धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्‍या प्रेमात होते. त्‍याचबरोबर संजीव कुमार देखील हेमा यांच्‍यावर प्रेम करत होते. रमेश सिप्पी धर्मेंद्र यांना म्‍हणाले, 'तुला वीरूची भूमिका करताना जास्‍तीत जास्‍त हेमासोबत रोमान्‍स करण्‍याची संधी मिळेल. जर तू ठाकूरची भूमिका केली तर मी संजीव कुमारला वीरूची भूमिका देईन.' त्‍यामुळे धर्मेंद्र यांनी ठाकूरची भूमिका सोडली. ठाकूरच्‍या भूमिकेमुळेच संजीव कुमार यांना आज देखील स्‍मरणात आहेत. 
Image result for sanjeev-kumar hd
* संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडायच्‍या. परंतु, हेमा यांच्‍या आयुष्‍यात धर्मेंद्र आले. दरम्‍यान, संजीव यांचं नाव सुलक्षणा पंडितशी जोडलं गेलं. त्‍यांच्‍या अफेअरची चर्चा होऊ लागली. 
* एक अभिनेता म्‍हणून संजीव कुमार यांचा धाक होता. त्‍यांच्‍यासोबत काम करणार्‍या अनेक कलाकारांचं म्‍हणणं होतं की, त्‍यांच्‍यासोबत काम करणं कठीण आहे. असं म्‍हटलं जातं की, 'विधाता' चित्रपटात दिलीप कुमार हे संजीव कुमार यांच्‍यासोबत शॉट देण्‍यासाठी लवकर तयार व्‍हायचे नाहीत. 
* शत्रुघ्न सिन्हा, सचिन आणि अमिताभ बच्चन यांच्‍याशी संजीव कुमार यांची चांगली मैत्री होती. 
Image result for sanjeev-kumar hd
* संजीव कुमार यांना दोन वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'दस्तक' (१९७१) आणि 'कोशिश' (१९७३) या चित्रपटासाठी हे पुरस्‍कार मिळाले होते. १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी ते नॉमिनेट झाले होते. दोन वेळा उत्‍कृष्‍ट अभिनेता (आंधी-१९७६ आणि अर्जुन पंडित-१९७७) आणि एक वेळ उत्‍कृष्‍ट सहाय्‍यक अभिनेता (शिकार-१९६९) चा ॲवॉर्ड जिंकला होता. 
*एकदा अभिनेत्री नूतन यांनी संजीव कुमार यांच्‍या श्रीमुखात लावली होती. त्‍यावेळी नूतन आणि संजीव यांच्‍याबद्‍दल अफेअरचे वृत्त पसरले होते. त्‍यामुळे नूतन यांच्‍या वैवाहिक आयुष्‍यात वादळ आलं होतं. नूतन यांना वाटलं की, या सर्व गोष्‍टी संजीव पसरवत आहेत. ते आमने-सामने आल्‍यानंतर नूतन यांनी संजीव यांच्‍या श्रीमुखात लगावली. 
Image result for sanjeev-kumar and nutan
*सूरतमध्‍ये एक रस्‍त्‍याचे नाव आणि एका शाळेचे नाव संजीव कुमार यांच्‍या नावाने ठेवण्‍यात आलं होतं. २०१३ मध्‍ये एक टपाल तिकिट देखील संजीव कुमार यांच्‍या स्‍मरणार्थ काढण्‍यात आले होते. 
*संजीव कुमार हे आपला दमदार अभिनय आणि त्‍यातील विविधतेसाठी ओळखले जात होत. त्‍यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये आव्‍हानात्‍मक भूमिका केल्‍या. रोमँटिक, हास्य आणि गंभीर भूमिका त्‍यांची खासियत होती. 
*संजीव कुमार यांच्‍या निधनानंतर १० पेक्षा अधिक त्‍यांचे चित्रपट रिलीज झाले. काही चित्रपटांचे शूटिंग अपूर्ण राहिले. नंतर कथेत फेरबदल करून ते चित्रपट प्रदर्शित करण्‍यात आले. १९९३ मध्‍ये संजीव कुमार यांचा शेवटचा चित्रपट 'प्रोफेसर की पडोसन' प्रदर्शित झाला होता.
Image result for sanjeev-kumar hd

जॉनी वॉकर यांचा पहिला पगार किती होता?


जन्मदिन विशेष
 


कॉमेडी अभिनेते जॉनी वॉकर म्हणजेच बदरुद्दीन जमालुद्दीन काजी यांचा ११ नोव्हेंबरला जन्मदिन. सिनेरसिकांना पोट धरून हसायला लावणारे जॉनी वॉकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर, १९२६ रोजी इंदोरमध्ये झाला. बॉलिवूडचे एक उत्तम कॉमेडियन जॉनी वॉकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलिवूडचे सुपरस्टार जॉनी वॉकर यांच्या आयुष्याशी संबंधित या खास गोष्टी जाणून घेऊया. 

वॉकर यांनी चित्रपटात आल्यानंतर आपलं नाव बदललं होतं. घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे त्यांना ६ व्या इयत्तेतच शाळा सोडावी लागली होती. 
Image result for johnnie walker actor
'सीआयडी' चित्रपटातील गाणे 'ऐ दिल है मुश्किल जीना यहां, जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जां', जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यात मुंबईमधील बसची स्थिती दाखवण्यात आली होती. चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेले जॉनी वॉकर यांना सुरूवातीला बस कंडक्टरची नोकरी करावी लागली होती. यासाठी त्यांना महिन्याला २६ रुपये मिळत होते. जॉनी वॉकर लोकांची मिमिक्री करत असत. त्यामुळे बसमध्ये मिमिक्री करून ते प्रवाशांचे मनोरंजन करायचे. 
Image result for johnnie walker actor
जॉनी वॉकर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट बस सर्व्हिसमध्ये काम करत होते. अनेक वर्षे त्यांनी हे काम केले. एकदा दिग्गज कलाकार बलराज साहनी यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यावेळी ते गुरु दत्त यांचा चित्रपट बाजी लिहित होते. साहनी यांनी जॉनी यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करून दिली. दत्त साहब यांनाही जॉनी यांचा अभिनय आवडला. 
Image result for johnnie walker actor
जॉनी वॉकर यांचे कौशल्य पाहून त्यांना पहिली संधी गुरु दत्त यांनी दिली. चित्रपट होता 'बाजी'. या चित्रपटानंतर त्यांना मागे वळून पाहावे लागले नाही. जॉनी वाकर यांनी गुरुदत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये 'आर-पार', 'प्यासा', 'चौदहवी का चांद', 'कागज के फूल', 'मधुमती,' 'मिस्ट
Image result for johnnie walker actor
मधुमती चित्रपटासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. शिखर या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट कॉमेडियन ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. 

श्रीदेवी बोनी कपूर यांच्या आयुष्यात कशी आली?


बर्थडे स्पेशल
  


बॉलिवूडचे प्रसिध्द निर्माते बोनी कपूर यांचा ११ नोव्हेंबरला वाढदिवस. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 'मिस्टर इंडिया', 'नो एंट्री', 'जुदाई' आणि 'वॉन्टेड' यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी विवाह केला होता. २०१८ मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते. एका कार्यक्रमात बोनी कपूर म्हणाले होते, श्रीदेवीसमोर आपलं प्रेम व्यक्त करायला त्यांना १२ वर्षे लागली होती. 

Related image
बोनी कपूर हे प्रसिध्‍द निर्माते सुरिंदर कपूर यांचे चिरंजीव. बोनी कपूर यांनाही आपण चित्रपट निर्माते बनावे, अशी इच्‍छा होती. बोनी यांनी काही बिग बजेट चित्रपट आणले. ते ब्लॉकबस्टरही झालेत. झगमगत्‍या दुनियेत वावरताना बोनी यांच्‍या आयुष्‍यात आली ती सुंदर तरुणी श्रीदेवी. या औचित्‍याने त्‍यांची दिवंगत पत्‍नी आणि अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्‍या लव्‍हस्‍टोरीविषयी या गोष्टी वाचाच. 
Related image
वडिलांच्‍या चित्रपट निर्मितीची परंपरा बोनी यांनी आपल्‍या खांद्‍यावर घेतली. १९८० ते २०१२ या कालावधीत त्‍यांनी तब्‍बल ३२ चित्रपटांची निर्मिती केली. आपला धाकटा भाऊ अनिल कपूरला अभिनेता म्‍हणून त्‍यांनी चित्रपटसृष्‍टीत आणले. बोनी कपूरनी 'वो सात दिन' हा चित्रपट आणला आणि बॉलिवूडमध्‍ये अनिल कपूरने आपले बस्‍तान बसवले. 
Image result for boney old pics
बोनी यांची 'मिस्टर इंडिया' चित्रपट आणण्‍याची मोठी योजना होती आणि त्‍यानुसार त्‍यांनी हा चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर आणला. 'मिस्टर इंडिया'साठी अभिनेत्रीचा शोध सुरू असताना त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री म्‍हणून श्रीदेवी यांचे नाव होते. बोनी कपूर यांना या चित्रपटात श्रीदेवी यांनाच साईन करायचे होते. 
श्रीदेवी यांना या चित्रपटात आणणे इतके सोपे नव्‍हते. श्रीदेवी आधी विचार करूनच मगच चित्रपट साईन करायच्‍या. बोनी चेन्नईमध्‍ये श्रीदेवी यांना साईन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी पोहोचले. त्‍यांना श्रीदेवी यांच्‍याकडून वेळ मिळाला नाही. बोनी सतत श्रीदेवी यांच्‍या घरी जायचे आणि श्रीदेवी यांना भेटायचा प्रयत्‍न करायचे. बोनी यांनी खुद्‍द निवेदन दिल्‍यानंतर ७ दिवसांनी त्‍यांना भेटण्‍यासाठी वेळ देण्‍यात आला. 
बोनी यांना वाटलं की, टाळाटाळ केली जात आहे. त्‍यांनी चेन्नईमध्‍ये थांबण्‍याचा निर्णय घेतला. एक दिवस, बोनी श्रीदेवी यांना भेटलेच आणि आपल्‍या चित्रपटात काम करावे, अशी विनंती केली. अखेर त्‍यांच्‍या विनंतीला मान देऊन श्रीदेवी चित्रपटात काम करायला तयार झाल्‍या. नंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपट आला आणि चित्रपटाने १९८७ मध्‍ये मोठे यश मिळवले. (मि. इंडियाचा सीक्‍वल येणार अशी चर्चा मध्‍यंतरी होती. बोनी यांनी त्‍यास हिरवा कंदीलही दाखवला होता. परंतु, हा चित्रपट अजून झाला नाही.) 
Image result for boney old pics
त्‍यानंतर बोनी यांनी आपला आणखी एक महत्वाकांक्षी चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' श्रीदेवी यांना मुख्‍य भूमिकेत घेऊन बनवला. जो अयशस्‍वी ठरला. श्रीदेवी सहजतेने कुणावर विश्‍वास करायच्‍या नाहीत. परंतु, बोनी यांच्‍यावर त्‍यांचा विश्वास बसला. 
बोनी हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी स्‍टारर 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. त्‍यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना सोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. 
श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी यांच्‍याशी प्रेम झाले. 
'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. त्‍यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी बोनी यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. मीडियापासूनची ही गोष्‍ट लपवून ठेवण्‍यात आली होती. 
Related image
श्रीदेवी यांनी जुदाई चित्रपटानंतर काही काळ अभिनयापासून गॅप घेतला. दरम्यान, बोनी कपूर यांचे जीवन विस्‍कळीत बनले होते. त्‍यांच्‍यावर कर्जाचा डोंगर होता. त्‍यांचं स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडं लक्ष नव्‍हते. बोनी यांच्‍या आयुष्‍यात श्रीदेवी यांची एन्‍ट्री झाल्‍यानंतर त्‍यांना आयुष्‍य कसे जगायचे, हे शिकवले. श्रीदेवी, बोनी, जान्‍हवी आणि खुशी यांचे एक छोटं कुटूंब शांतीने राहू लागलं. 
Related image

'या' चित्रपटाने जुही झाली सुपरहिट!


दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही मिळाले काम
 


प्रेमळ हास्‍य आणि अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाचा १३ नोव्‍हेंबरला वाढदिवस. 'मिस इंडिया' (१९८४) म्‍हणून ख्‍याती मिळवलेल्‍या जूहीला सुरुवातीपासूनच ग्लॅमर वर्ल्डचं वेड होतं. 

Related image
*जूही चावलाने पूजनाबमध्‍ये शालेय शिक्षण घेतल्‍यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले होते.
*मिस इंडिया (१९८४) चा किताब जिंकल्‍यानंतर तिने 'मिस युनिव्‍हर्स' स्‍पर्धेत भाग घेतला. या स्‍पर्धेत तिला 'बेस्ट नॅशनल कॉस्ट्यूम्स' पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आलं. दरम्‍यान, काही जाहिरातींमध्‍ये तिला काम करण्‍याची संधी मिळाली. जूही चावलाने आपल्‍या चित्रपट करिअरची सुरुवात १९८६ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'सल्तनत' आणि 'जरीना'मधून केली होती. परंतु, दोन्‍ही चित्रपट फ्‍लॉप ठरले. 
Image result for juhi
*जूहीचा हा डेब्यू चित्रपट 'सल्तनत' फ्लॉप झाल्‍यानंतर तिला हिंदी चित्रपटात काम मिळणे बंद झाले. त्‍यामुळे तिने दाक्षिणात्‍य चित्रपटांकडे मोर्चा वळवला. १९८७ मध्‍ये तिने  'रविचंद्रन' दिग्‍दर्शित कन्नड चित्रपट 'प्रेमालोक'मध्‍ये काम केलं. हा चित्रपट हिट ठरला. पुढील वर्षी नासिर हुसैन यांच्‍या बॅनर खाली रिलीज झालेला चित्रपट 'कयामत से कयामत तक'ने प्रचंड यश मिळवलं आणि जूहीची एक अभिनेत्री म्‍हणून इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण झाली. चित्रपटांमध्‍ये दमदार अभिनयासाठी तिला त्‍याचवर्षी नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 
आमिर खान आणि जूही चावला
*आमिर खानची पहिली किसिंग क्वीन जूही चावला होती. तसेच आमिरने 'हम हैं राही प्यार के' आणि 'इश्क' चित्रपटातही जूहीसोबत किसींग सीन दिले आहेत. या सीननंतर चित्रपटात किसींग सीन्‍सचा ट्रेंड आला. 
Image result for kayamat se kayamat tak
*१९९२ मध्‍ये राजेश खन्ना आणि गोविंदासोबत तिने 'स्वर्ग' या चित्रपटात काम केलं. 
Image result for swarg film juhi
*'चॉक ॲण्‍ड डस्टर' चित्रपटातल्‍या जूही चावलाच्‍या अभिनयाचे कौतुकही झाले. या चित्रपटात प्रमोशनवेळी मीडियाशी बोलताना जूही चावलाने एक किस्‍सा शेअर केला होता. तिने म्‍हटलं होतं, 'आमिर खान वरून साधा माणूस दिसतो. परंतु, तो तसा नाही. एका चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी मला घाबरवण्‍यासाठी तो साप घेऊन माझ्‍या मागे लागला होता. 
*जूही चावलाने आपल्‍या सिनेकरिअरमध्‍ये जवळपास ८० चित्रपटामध्‍ये काम केलं. त्‍यात पंजाबी चित्रपटांचाही समावेश होता.
Image result for gentleman film shahrukh and
'कयामत से कयामत तक', 'बोल राधा बोल', 'प्रतिबन्ध' (१९९०), 'राजू बन गया जेंटलमैन', 'हम हैं राही प्यार के', 'डर' यासारखे एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्‍यानंतर जूहीने 'कयामत से कयामत तक'मध्‍ये काम केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. 
Related image
*तिने १९९५ मध्‍ये उद्‍योगपती जय मेहताशी लग्‍न केलं. तिला जान्‍हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. 
*जूहीने शाहरुख खानसोबत मिळून निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी, अशोका आणि चलते चलते' या चित्रपटांची त्‍यांनी निर्मिती केली. 
*जूही चावलाने छोट्‍या पडद्‍यावर 'झलक दिखला जा'च्‍या सीजन-३ ला देखील जज केलं होतं.  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...