Thursday, April 4, 2019

बोनी कपूर जान्‍हवीला म्‍हणायचे, 'चिकन लेग्‍ज'





बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्‍हवी कपूर ६ मार्चला २२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम कपूरने तिला स्पेशल बर्थडे विश केले आहे. धडक चित्रपटानंतर जान्‍हवी सोशल मीडियावर सेंसेशन बनली आहे. तिचा जिम लूक नेहमीच फॅन्‍सना आवडतो. 

जान्‍हवीने चित्रपट धडकमधून बॉलिवूडमध्‍ये डेब्यू केले होते. परंतु, तुम्‍हाला माहिती आहे का, जान्‍हवीने आपल्‍या डेब्यू चित्रपटासाठी आपले इन्‍स्‍टाग्राम अकाउंट डिलीट केले होते.
ज्‍यावेळी जान्‍हवीच्‍या चित्रपटाची घोषणा झाली, त्‍यावेळी तिने इन्‍स्‍टाग्राम अकाउंट पब्लिक केले होते. याआधी तिचे इन्‍स्‍टा अकाऊंट प्रॅायव्‍हेट होते आणि तिने त्‍यावरील सर्व जुने इन्‍स्‍टा पोस्ट डिलीट केले होते. 
एका मुलाखतीत जान्‍हवीने म्‍हटले होते, ''आधी माझे इन्‍स्‍टा अकाउंट प्रायव्‍हेट होते. नंतर फॅन्‍ससाठी मी इन्‍स्‍टा अकाउंट सार्वजनिक करावे, असे सांगण्‍यात आले. माझे इन्‍स्‍टा अकाऊंट सार्वजनिक करण्‍याआधी मी माझे सर्व जुने पोस्‍ट डिलीट केले होते.''
जान्‍हवीच्‍या धडक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. तिचे इन्‍स्‍टाग्राम अकाउंटवर ३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. 
बोनी कपूर म्‍हणत होते, चिकन लेग्‍स 
जान्‍हवी लहान असताना तिचे वडील बोनी कपूर तिला चिडवत असत. जान्‍हवीने एका मुलाखतीत सांगितले होते, 'माझे टोन्ड आणि शेप्ड लेग्स पाहून बालपणी माझे वडील मला चिडवत असत. ते माझ्‍या पायांना ''चिकन लेग्स'' म्‍हणत असत. त्‍यामुळे मी माझ्‍या पायांसाठी मेहनत घेतली.'
धडक चित्रपटानंतर जान्‍हवीला काही चित्रपट मिळाले आहेत. त्‍यापैकी एक चित्रपट म्‍हणजे 'तख्त' आणि दुसरा गुंजन सक्सेना यांचा बायोपिक असणार आहे. जान्‍हवीने गुंजन सक्सेना यांच्‍या बायोपिकचे शूटिंग सुरू केले आहे. यामध्‍ये ती IAF पायलट गुंजनच्‍या भूमिकेत दिसणार आहे. आपल्‍या भूमिकेसाठी जान्‍हवी खास तयारी करत आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, जान्‍हवीला ६ ते ७ किलो वजन वाढवण्‍यास सांगण्‍यात आले आहे. 

त्‍यावेळी रोहित शेट्‍टीने केली होती तिच्‍या साडीची इस्‍त्री


ॲक्‍शनचा गुरू रोहित शेट्‍टी 


'ॲक्‍शन मास्‍टर' अशी ओळख असलेल्‍या रोहित शेट्‍टीचा १४ मार्चला वाढदिवस. रोहित शेट्‍टी आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितने आपल्‍या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्‍यानंतर तो इंडस्‍ट्रीत यशस्‍वी झाला आहे. रोहितने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिग्‍दर्शित केले आहेत. काही महिन्‍यांपूर्वी  रिलीज झालेल्‍या 'सिंबा'ने धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्‍य भूमिकेत होता. बॉक्‍स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्‍स तोडले. या चित्रपटांशिवाय, 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'गोलमाल,' 'गोलमाल' सीरीज यासारखे ब्‍लॉकबस्‍टर हिट चित्रपट रोहितने बॉलिवूडला दिले आहेत. रोहितने आपल्‍या करिअरची सुरुवात सन २००३ मध्‍ये 'जमीन' या चित्रपटापासून केली. त्‍याचा हा दिग्‍दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. परंतु, हा चित्रपट सटकून आपटला.  
रोहित शेट्टी अनेक रिॲलिटी शोचा जज होता. यामध्‍ये 'कॉमेडी सर्कस' आणि 'खतरों के खिलाडी'चा समावेश आहे.  रोहित शेट्टीचा जन्म १४ मार्च, १९७३ ला मुंबईमध्‍ये झाला. रोहित शेट्टीचे वडील एम. बी. शेट्टी चित्रपट इंडस्ट्रीमध्‍ये ॲक्शन कोरिओग्राफर, स्टंटमॅन आणि अभिनेते होते. तर आई मधु चित्रपटांमध्‍ये ज्‍युनिअर आर्टिस्ट म्‍हणून काम करत होत्‍या.  रोहित शेट्टी यांचे दोन भाऊ - उदय शेट्टी आणि ह्रदय शेट्टी आहेत. त्‍यांना चार बहिणी आहेत. रोहितने आपले शिक्षण मुंबईच्‍या सेंट मेरी स्कूलमधून पूर्ण केले. 
रोहित शेट्टीने १४ वर्षांचे असताना ठरवले होते की, त्‍याला दिग्‍दर्शक बनायचे आहे. रोहितने अनेक सुपर-डुपर चित्रपट आणले. ॲक्‍शनचा गुरू रोहित शेट्‍टी यांनी आपल्‍या सुरुवातीच्‍या करिअरमध्‍ये खूप संघर्ष केला. सतरा वर्षांचा असताना रोहितने दिग्‍दर्शक कुकु कोहलीसोबत अजय देवगनच्‍या 'फूल और कांटे'मध्‍ये काम केले. या चित्रपटात त्‍याने सहाय्‍यक दिग्‍दर्शक म्‍हणून काम केले होते. याचवेळी अजय आणि रोहितची चांगली मैत्री झाली. पुढे दोघांनी एकत्र जवळपास १० चित्रपटांमध्‍ये काम केले. 
सूत्रांच्‍या माहितीनुसार, १९९५ मध्‍ये रोहितने तब्‍बूच्‍या 'हकीकत' चित्रपटातील एका सीनसाठी तिची साडी इस्‍त्री केली होती. रोहित शेट्‍टी अभिनेत्री काजोलची स्‍पॉटबॉयदेखील होता. 
रोहित शेट्‍टीने बॉक्‍स ऑफिसवर आतापर्यंत असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्‍यांनी १०० कोटींचा गल्‍ला जमवला आहे. यामध्‍ये शाहरुख खानचा 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'गोलमाल ३' आणि 'सिंबा' या चित्रपटांचा समावेश आहे. 
आता रोहित अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' हा चित्रपट आणणार आहे.  
रोहित शेट्‍टीची पत्‍नी लाईमलाईटपासून दूर 
२००५ मध्‍ये माया नावाच्‍या एका तरुणीशी रोहितने विवाह केला. माया एक बँकर आहे. ती नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहते. माया आणि रोहित यांचा एक मुलगा ईशान आहे. 

या चित्रपटात आमिरला किस करण्‍यास जूहीने दिला होता नकार


#HappyBirthdayAamirKhan

मुंबई : पुढारी ऑनलाईन 
'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा आज ५३ वा वाढदिवस. आमिर खानचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला होता. आमिरचं पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असं आहे. आमिर हरहुन्‍नरी अभिनेता असून आपल्‍या अभिनयाने त्‍याने बॉलिवूडमध्‍ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्‍याच्‍या वाढदिवसानिमित्त त्‍याच्‍याविषयी जाणून घेऊया. 

या चित्रपटांचा जगभरात डंका 
अलिकडच्‍या काळात आमिर खानच्‍या काही चित्रपटांनी जगभर डंका वाजवला आहे. 'पीके', 'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' यासारख्‍या एकापेक्षा एक सरस चित्रपटांनी वर्ल्ड बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'दंगल'- १,९०८, कोटी रुपये, 'सीक्रेट सुपरस्टार' - ८७४ कोटी रुपये आणि 'पीके' - ८३१ कोटी रु. कमाई केली आहे. 
Related image
ट्विटरवर २२ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स
आमिरला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्‍हणूनही ओळखले जाते. 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून आपल्‍या बॉलिवूड करिअरची सुरूवात करणार्‍या आमिरचे ट्विटरवर २२ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. 
आमिरला किस करण्‍यास जूहीने दिला होता नकार 
आमिर खान आणि जूही चावला यांचा १९८८ मध्‍ये आलेला चित्रपट 'कयामत से कयामत तक' हा आमिरच्‍या करिअरमधील पहिला चित्रपट. या चित्रपटानंतर आमिर रातोरात स्टार बनला. आमिरचा हा पहिला सुपरहिट चित्रपट होता. ८०च्‍या दशकात कयामत से कयामत तकच्‍या शूटवेळी जूहीने आमिरला किस करण्‍यास नकार दिला होता. परंतु, स्‍क्रिप्‍टच्‍या मागणीमुळे जूहीला हा सीन करावा लागला. प्रेक्षकांच्‍याही पसंतीस हा सीन उतरला. त्‍यामुळे आमिर-जूहीची जोडी प्रेक्षकांना आवडली. त्‍यानंतर आमिर-जूहीने अनेक चित्रपट केले. 'कयामत से कयामत' हा आमिर खानचा दुसरा आणि जूही चावलाचा तिसरा चित्रपट होता. 
Image result for aamir khan juhi
कयामत से कयामत तक मध्‍ये जूहीने दिलेला किसींग सीन शूट करणे तिच्‍यासाठी खूपच कठीण होते. परंतु, स्क्रिप्टच्‍या मागणीनुसार, चित्रपटातील गाणे 'अकेले हैं तो क्या गम है'च्‍या शूटिंगवेळी जूही चावलाला आमिरला गाल आणि कपाळावर किस घ्‍यायचा होता. परंतु, जूहीने हा सीन करण्‍यासाठी नकार दिला होता. 
Related image
जूहीच्‍या नकारानंतर चित्रपटाचे डायरेक्टर मन्‍सूर खान यांनी शूटिंग जवळपास १० मिनिटे थांबवले. थोड्‍या वेळानंतर जूहीला लक्षात आले की, ही स्क्रिप्टची डिमांड आहे. त्‍यावेळी जूहीने आमिरला किस करण्‍याच्‍या शूटसाठी होकार दिला. नंतर पुन्‍हा शूटिंग सुरू झाले. ही एक रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरले. चित्रपट रिलीज झाल्‍यानंतर आमिर आणि जूहीची केमिस्‍ट्री प्रेक्षकांना भावली. या चित्रपटामध्‍ये जूही आणि आमिरचे रोमँटिक सीन्स होते.
Related image
या चित्रपटातील आणखी एक किस्सा सांगितला जातो की, ऐंशीच्‍या दशकात प्रचार करण्‍यासाठी मोजकेच माध्‍यम असत. त्‍यामुळे 'कयामत से कयामत तक'च्‍या रिलीजसाठी चित्रपटातील कलाकार आमिर खान आणि जूही चावलाने खुद्‍द आपल्‍या चित्रपटाचे पोस्टर रिक्षा चालकांना वाटले होते. आणि हे पोस्‍टर्स रिक्षाच्‍या मागे लावण्‍याची विनंती केली होती. बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट यशस्‍वी ठरला. 

जेव्‍हा शशी कपूर यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले...



मुंबई : पुढारी ऑनलाईन 
बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांचा१८ मार्चला जन्‍मदिवस. १८ मार्च, १९३८ मध्‍ये जन्मलेले शशी, कपूर फॅमिलीतील असे पहिले व्‍यक्‍ती होते, ज्‍यांनी परदेशी तरुणीशी विवाह केला होता. शशी यांनी १९५८ मध्‍ये जेनिफर केंडलशी विवाह केला. त्‍यावेळी शशी २० वर्षांचे तर जेनिफर २५ वर्षांच्‍या होत्‍या. परंतु, शशी यांच्‍या जीवनात असे एक वळण आले की, त्‍यांना आर्थिक समस्‍येलाही सामोरे जावे लागले होते. परंतु, या अडचणीतही त्‍यांची पत्‍नी जेनिफरने शशी यांना साथ दिली. ६० च्‍या दशकात शशी कपूर यांचे चित्रपट हिट ठरत होते. परंतु, अचानक त्‍यांना काम मिळणे बंद झाले. या कारणामुळे शशी यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. या गोष्‍टीचा खुलासा शशी यांचा मुलगा कुणाल कपूरने  एका मुलाखतीत केला होता. 

कुणालने म्‍हटले होते, वडील शशी कपूर यांनी ६० च्‍या दशकात काम मिळणे बंद झाले होते. त्‍यावेळी शशी यांनी आपली आवडती स्पोर्ट्स कार विकली होती. तसेच जेनिफर यांनाही पैशांकरिता घरातील साहित्‍य विकावे लागले होते. त्‍यावेळी टॉपची अभिनेत्रीही शशी यांच्‍यासोबत काम करण्‍यास नकार द्‍यायची. पुढे अभिनेत्री नंदाने शशी यांच्‍यासोबत 'फूल खिले' हा चित्रपट केला. सा चित्रपट सुपरहिट ठरला. 
शशी यांना विकावी लागली संपत्ती 
अबिनयासोबतच शशी कपूर यांनी चित्रपटांची निर्मितीही केली. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'अजूबा'(१९९१)चे दिग्‍दर्शन आणि निर्मिती दोन्‍ही शशी यांनी केले होते. त्‍या काळात या चित्रपटाचे बजेट ८ कोटी होते. हा सर्वात महागडा चित्रपट होता. परंतु, अजूबा सुपरफ्लॉप ठरला आणि शशी यांना ३.५० कोटींचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे त्‍यांची आर्थिक स्‍थिती ढासळली. अखेर, शशी यांना आपली संपत्ती विकून नुकसान भरपाई करावी लागली. आणखी एक चित्रपट 'उत्सव'मध्‍ये त्‍यांना जवळपास १.५ कोटींचे नुकसान झाले होते. 
७५ रुपयांचा पहिला पगार 
शशी कपूर यांनी १९४४ मध्‍ये थिएटर जॉईन केले. त्‍यांचा पहिला पगार ७५ रुपये होता. शशी यांनी हिंदीच नाही तर हॉलिवूड चित्रपटांतही काम केले होते. 'हीट ॲण्‍ड डस्ट' हा त्‍यांचा पहिला हॉलिवूड चित्रपट. कान्स चित्रपट महोत्‍सवात हा चित्रपट नॉमिनेट झाला होता. १९६३ ते १९९८ पर्यंत शशी कपूर यांनी जवळपास १० हून अधिक हॉलिवूड चित्रपटात काम केले. शशी कपूर यांनी इस्माइल मर्चेंट आणि जेम्स आयवरी यांच्‍यासोबत मिळून 'द हाउसहोल्डर', 'शेक्सपीयर वाला', 'बॉम्बे टाकी' यासारख्‍या चित्रपटात का मकेले. काही चित्रपटामध्‍ये त्‍यांच्‍यासोबत जेनिफरदेखील दिसल्‍या. 
पृथ्‍वी थिएटर
पृथ्‍वी थिएटरमध्‍ये प्रत्‍येक नाटकाचा शो पाहण्‍यासाठी शशी कपूर जेनिफर सोबत या थिएटरमध्‍ये जात होते. नेहमी तिकिट खरेदी करून शो पाहत होते. शशी यांनी 'फिल्मवालाज'ची स्थापना केली. त्‍यांनी 'जुनून', '३६ चौरंगी लेन', 'कलयुग', 'विजेता', 'उत्सव' आणि 'अजूबा' यांसारखे चित्रपट आणले. श्यान बेनेगल, अपर्णा सेन, गोविंद निहलानी यासारख्‍या चित्रपट निर्मात्‍यांना संधीही शशी यांनी दिली. यामागे जेनिफर यांचेही योगदान होते. परंतु, जेनिफर यांना कॅन्‍सर (१९८२) झाला. 
शशी यांनी मुंबई, लंडन येथील डॉक्टरांकडून जेनिफर यांच्‍यावर उपचार केला. ७ सप्‍टेंबर, १९८४ ला जेनिफर यांचे निधन झाले. शशी कपूर एकटे पडले. 'शशि कपूर- द हाउसहोल्डर, द स्टार'मध्‍ये असीम छाब्रा यांनी जेनिफर यांच्‍यानंतर शशी कपूर यांच्‍या जीवनावर एक चॅप्टर लिहिला. यामध्‍ये शशी यांचा मुलगा कुणाल कपूरच्‍या हवाल्‍याने सांगण्‍यात आले होते की, जेनिफर यांच्‍या मृत्‍यूनंतर पहिल्‍यांदा शशी तेव्‍हा रडले होते, जेव्‍हा ते गोव्‍याच्‍या समुद्री किनार्‍यावरून एक बोट घेऊन समुद्रात गेले होते. 
(Photo : shashikapoor.fc, tfk_dil_se_filmi, filmhistorypics insta)

'गँगस्‍टर'ची गर्लफ्रेंड नसती तर पोर्न स्‍टार बनली असती कंगना

कंगना राणावतचा २३ मार्चला वाढदिवस. आपल्‍या टॅलेंटच्‍या जोरावर बॉलिवूडमध्‍ये सर्वात यशस्‍वी अभिनेत्रींच्‍या यादीमध्‍ये कंगनाचे नाव समाविष्‍ट झाले आहे. इतकेच नाही तर एका चित्रपटासाठी सर्वात अधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींमध्‍ये कंगनाचे नाव जोडले गेले आहे. पण, अशी एक वेळ होती की, कंगना चित्रपटाच्‍या शोधात पोर्न इंडस्ट्रीपर्यंत पोहोचली होती.  कंगना बॉलिवूडची क्वीन अशीच नाही बनलेली नाही. १७ वर्षांची असताना तिने आपले करिअर सुरू केले. कंगनाने आतापर्यंत एकापेक्षा एक आव्‍हानात्‍मक भूमिका साकारल्‍या आहेत.  

एका टीव्‍ही शोला दिलेल्‍या मुलाखतीत कंगनाने म्‍हटले की, कशाप्रकारे ती हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्‍ये सेटल झाली. इंडस्‍ट्रीत येण्‍यापूर्वी ती तिने एक अडल्ट चित्रपट साईन केला होता. कंगनाने सांगितले की, 'मला चित्रपटासाठी फोटोशूट करायचा होता. परंतु, ज्‍यावेळी मी तेथे पोहोचले, त्‍यावेळी मला काही ठीक वाटलं नाही.' 
कंगना त्‍यावेळी कुमारवयीन होती, ज्‍यावेळी तिला ही भूमिका ऑफर झाली होती. कंगना म्‍हणते की, 'मला माहित होते की, हे चुकीचे आहे. परंतु, मी ठरवले की, ठीक आहे. हे मी करेन. परंतु, नंतर तो फोटोशूट मला अश्लील चित्रपटासारखा वाटत होता. आणि मला वाटले की, हे योग्‍य नाही. तो चित्रपट खरंच चांगला नव्‍हता. अनुराग बसुने जर गँगस्टर चित्रपटात संधी दिली नसती तर कदाचित आज मी वेगळीकडे असते. गँगस्टरसाठी मी अनेकदा ऑडिशन्स दिले. अनेक महिने प्रतीक्षा केली. परंतु, हा चित्रपट मला मिळाल्‍यानंतर माझ्‍या करिअरला एक नवी दिशा मिळाली आणि मी या गोष्‍टींपासून दूर गेले. हा चित्रपट मिळाल्‍यानंतर मी अभिनयासाठी प्रचंड मेहनत घेतली. आणि एकापेक्षा एक आव्‍हानात्‍मक भूमिका स्‍वीकारल्‍या.'     
कंगनाला २०१६ मध्‍ये तिचा चित्रपट 'तनु वेड्स मनु'साठी तिसरा राष्ट्रीय पुरस्कार देण्‍यात आला. याआधी चित्रपट 'क्वीन'साठी तिला सर्वोत्‍कृष्ट अभिनेत्री आणि 'फॅशन' चित्रपटासाठी सर्वोत्‍कृष्‍ट सहाय्‍यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गँगस्टर’ ते ‘सिमरन’पर्यंतचा तिचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. अनेक अडचणींना सामोरे जात कंगना बॉलिवूडची क्‍वीन बनली. 

'या' कारणामुळे आरके स्‍टुडिओच्‍या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद



होळी आली म्‍हणजे आठवतात ते राज कपूर. आरके स्‍टुडिओमध्‍ये खेळली जाणारी रंगपंचमीची आजदेखील चर्चा होते. कारण, राज कपूर यांच्‍या घरी होणार्‍या रंगपंचमीसारखं सेलिब्रेशन आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही. 

Image result for raj kapoor
आरके स्‍टुडिओमध्‍ये रंगाने भरलेल्‍या पाण्‍याच्‍या टाकीत बुडवून ही होळी (रंगपंचमी) साजरी केली जायची. होळीला येणार्‍या सर्व पाहुण्‍यांना हा खास मान दिला जायचा, असे मिश्‍किलपणे म्‍हटलं जायचं. रंगपंचमीच्‍या निमित्तानं राज कपूर आपल्‍या फॅमिलीसोबत सेलिब्रेशनसाठी हजर असायचे. त्‍यांचे भाऊ शम्मी आणि शशी कपूर, तीन मुले-रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर तसेच सुना आणि नातवंडे सर्वजण येथे असायची. चित्रपट सृष्‍टीतील कलाकारही या सेलिब्रेशनमध्‍ये सहभागी व्‍हायची.
आरके स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत रंगपंचमीचं सेलिब्रेशन झालं नाही. 
Image result for rk studio holi
 
आर. के. स्‍टुडिओची आठवण
आर. के. स्टुडिओ १९४८ मध्‍ये उभारण्‍यात आला होता. राजकपूर यांच्‍या नावाने हा स्‍टुडिओ उभारण्‍यात आला होता. शो मॅन नावाने प्रसिध्‍द असणारे अभिनेते राज कपूर यांनी अधिकतर चित्रपटांचे शूटिंग याच स्‍टुडिओत केले आहे. हा स्‍टुडिओ जवळपास २ एकर परिसरात आहे. 
Related image
हिंदी चित्रपट 'आवारा,' 'श्री ४२०,' 'मेरा नाम जोकर' आणि 'बॉबी' यासारख्‍यां अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे झाले होते. मुंबईच्‍या चेंबूरमध्‍ये असणारा हा स्‍टुडिओ ७० वर्षे जुना आहे. या स्‍टुडिओच्‍या एका भागात गेल्‍यावर्षी एका रिॲलिटी शोच्‍या शूटिंग दरम्‍यान आग लागली होती. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रींचे पोशाख, ज्वेलरी, मेरा नाम जोकरचा क्लोन मास्क, जिस देश में गंगा बहती है मधील बंदूके तसेच आवारा, संगम आणि बॉबी चित्रपटातील ग्रँड पियानो देखील जळाले होते. 
रजा मुराद यांनी सांगितली आठवण 
Related image
पाचशेहून अधिक चित्रपटात काम करणारे अभिनेते रजा मुराद यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपले आरके स्‍टुडिओशी निगडित अनुभव शेअर केले आहेत. त्‍यांनी बॉलिवूडकरांच्‍या रंगपंचमीविषयी आपले अनुभव सांगितले आहेत. त्‍यांनी सांगितले की, आर. के स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीचा उत्सव खूपच शानदार असायचा. 
मुराद म्‍हणाले, आर. के. स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीच्‍या उत्सवाचा अर्थ भांग आणि फूड फेस्टिव्‍हल असे होते. स्टुडिओमध्‍ये एक तात्‍पुरता विहिरीसारखे एक डबके बनवले जायचे. त्‍यामध्‍ये प्रत्‍येकाला उडी मारण्‍यास भाग पाडले जायचे. मला पहिल्‍यांदा स्टुडिओमध्‍ये ज्‍यावेळी रंगपंचमी उत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळाली, त्‍यावेळी मला खूप आनंद झाला होता. अनेक वर्षे हा उत्‍सव स्‍टुडिओत साजरा होत राहिला.
Image result for r k studio holi amitabh
राजकपूर यांची रंगपंचमी बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडपर्यंत प्रसिध्‍द होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत अनेक कलाकारदेखील आर के रंगपंचमीचा उत्‍सव साजरा करण्‍यास स्‍टुडिओत येत असत. 
देव आनंद कधीच सहभागी झाले नाहीत
दिलीप कुमार, मनोज कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्‍यासारखे सेलिब्रिटीज आर के स्टुडिओच्‍या रंगपंचमी पार्टीत दिसत होते. परंतु, बॉलिवूडचे एक असे सुपरस्टार होते, जे या पार्टीत कधीच सहभागी झाले नाही. राज कपूर यांच्‍याआधी बॉलिवूडमध्‍ये याप्रकारे भव्य पध्‍दतीने रंगपंचमी सेलिब्रेट करण्‍याची परंपरा नव्‍हती. परंतु, राज कपूर यांनी स्‍टार्ससाठी रंगपंचमी पार्टी सुरू केली.
Related image
आर के स्टुडिओमध्‍ये राज कपूर यांच्‍या पार्टीमध्‍ये बॉलिवूडचे तमाम कलाकार सहभागी व्‍हायचे. परंतु, सदाबहार अभिनेते देव आनंद त्‍या पार्टीमध्‍ये कधीच सहभागी होत नसत. असे म्‍हटले जायचे की, देव आनंद आणि राज कपूर यांच्‍यामध्‍ये कोणताही वाद नव्‍हता. दोघे चांगले मित्र होते. परंतु, देव आनंद कधीच रंगपंचमीसाठी या स्‍टुडिओत गेले नाहीत. त्‍यांना रंगपंचमी साजरी करणे आवडत नसायचे. ते नेहमी सण-उत्‍सवापासून दूर असायचे. राज कपूर यांना देव आनंद यांची ही गोष्‍ट माहिती होती. त्‍यामुळे त्‍यांनी कधीही देव आनंद यांना आर के स्टुडिओच्‍या होळी पार्टीमध्‍ये आमंत्रण दिले नाही. 
Related image
१९८८ पर्यंत आर. के. मध्‍ये रंगपंचमी साजरी व्‍हायची. परंतु, राज कपूर यांच्‍या निधनानंतर आर. के. स्टुडियोच्‍या रंगपंचमीचा सिलसिला कायमचा थांबला. 
आरके स्टुडिओमध्‍ये होळीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत होळीचं सेलिब्रेशन झालं नाही. 

काही न करता 'हा' इमरान रातोरात बनला स्‍टार

बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी तुम्‍हाला माहितीच आहे. पण, पाकिस्‍तानचा इमरान हाशमी तुम्‍हाला माहिती नसणार. काही वर्षांपूर्वी इमरान हाशमीचा डुप्‍लीकेटचे फोटोज सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. हा व्‍यक्‍ती हुबेहुब इमरान खानसारखा दिसतो. त्‍या व्‍यक्‍तीचे नाव मजदाक जान असे आहे. मजदाक हा इमरानचा डुप्‍लिकेट आहे. तो पाकिस्‍तानमध्‍ये राहतो. 

कोण असली, कोण नकली, ओळखणं कठीण!


बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी तुम्‍हाला माहितीच आहे. पण, पाकिस्‍तानचा इमरान हाशमी तुम्‍हाला माहिती नसणार. काही वर्षांपूर्वी इमरान हाशमीचा डुप्‍लीकेटचे फोटोज सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. हा व्‍यक्‍ती हुबेहुब इमरान खानसारखा दिसतो. त्‍या व्‍यक्‍तीचे नाव मजदाक जान असे आहे. मजदाक हा इमरानचा डुप्‍लिकेट आहे. तो पाकिस्‍तानमध्‍ये राहतो. 

विशेष म्‍हणजे तो जेव्‍हा सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्‍हा लोक त्‍याच्‍याभोवती सेल्‍फी घेण्‍यासाठी गराडा करतात. मजदाक सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्‍ह राहतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या सोशल मीडिया अकाऊंटमुळे तो प्रसिध्‍दीझोतात आला आहे. 
मजदाकला यायचयं अभिनय क्षेत्रात  
मजदाकला ॲक्‍टिंगची आवड आहे. तो लवकरच मॉडलिंग सुरू करणार असल्‍याचं समजतं. मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले, आपल्‍या चेहर्‍यामुळेच तो स्‍टार बनला आहे. जेव्‍हा लोक माझ्‍याकडे येऊन सेल्‍फी घेतात. माझ्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करतात, तेव्‍हा मला चांगलं वाटतं. मला प्रसिध्‍दी मिळाली. यासाठी मला काहीच कराव लागलं नाही. मी खूप खूश आहे.' 
हुबेहुब चेहर्‍यामुळे रातोरात बनला स्टार
मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले होते, काही न करता केवळ चेहर्‍यामुळे तो रातोरात स्टार बनला आहे. मजदाक म्‍हणाला होता, "मला काहीच करावं लागलं नाही. मी इमरान खानचा डुप्‍लीकेट असल्‍यामुळे पाकिस्तानमध्‍ये मी स्टार बनलो आहे."
अशी आहे अभिनेता इमरान खानची फॅमिली...
इमरानचे वडील अनवर हाशमी तर आई माहेरा हाशमी आहे.इमरानने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून पदवीचे शि२ण घेतले आहे. अभिनेत्री पूजा भट्ट, दिग्‍दर्शक मोहित सूरी आणि अभिनेत्री स्माइली सूरी (कलयुग) इमरानचे कझिन आहेत. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट इमरानचे मामा लागतात. इमरानने २००६ मध्‍ये परवीनशी विवाह केला होता. दोघांचा एक मुलगा अयान आहे. 

(Photo : mazdak.jaan insta) 





[X] Close
[X]
[X]

विशेष म्‍हणजे तो जेव्‍हा सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्‍हा लोक त्‍याच्‍याभोवती सेल्‍फी घेण्‍यासाठी गराडा करतात. मजदाक सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्‍ह राहतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या सोशल मीडिया अकाऊंटमुळे तो प्रसिध्‍दीझोतात आला आहे. 
मजदाकला यायचयं अभिनय क्षेत्रात  
मजदाकला ॲक्‍टिंगची आवड आहे. तो लवकरच मॉडलिंग सुरू करणार असल्‍याचं समजतं. मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले, आपल्‍या चेहर्‍यामुळेच तो स्‍टार बनला आहे. जेव्‍हा लोक माझ्‍याकडे येऊन सेल्‍फी घेतात. माझ्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करतात, तेव्‍हा मला चांगलं वाटतं. मला प्रसिध्‍दी मिळाली. यासाठी मला काहीच कराव लागलं नाही. मी खूप खूश आहे.' 
हुबेहुब चेहर्‍यामुळे रातोरात बनला स्टार
मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले होते, काही न करता केवळ चेहर्‍यामुळे तो रातोरात स्टार बनला आहे. मजदाक म्‍हणाला होता, "मला काहीच करावं लागलं नाही. मी इमरान खानचा डुप्‍लीकेट असल्‍यामुळे पाकिस्तानमध्‍ये मी स्टार बनलो आहे."
अशी आहे अभिनेता इमरान खानची फॅमिली...
इमरानचे वडील अनवर हाशमी तर आई माहेरा हाशमी आहे.इमरानने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून पदवीचे शि२ण घेतले आहे. अभिनेत्री पूजा भट्ट, दिग्‍दर्शक मोहित सूरी आणि अभिनेत्री स्माइली सूरी (कलयुग) इमरानचे कझिन आहेत. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट इमरानचे मामा लागतात. इमरानने २००६ मध्‍ये परवीनशी विवाह केला होता. दोघांचा एक मुलगा अयान आहे. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...