Tuesday, August 13, 2019

कारगिल युद्धावर आधारीत 'हे' ६ बॉलिवूडपट


आजच्याच दिवशी २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. या युद्धात अनेक भारतीय सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. याची आठवण म्हणून आजचा दिवस (२६ जुलै रोजी) हा कारगिल विजय दिवस म्हणून संबोधण्यात आले. कारगिल युद्धावर आधारित गेल्या अनेक वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यात आले आहेत.

कारगिल युद्धावर आधारित चित्रपटात अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्सनी आपल्या अभिनयाच्या छटा उमटवल्या. यामध्ये संजय दत्त, आयुब खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, रवीना टंडन, शाहिद कपूर, ओम पुरी, गुल पनाग, ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यासारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. 
एलओसी कारगिल 
'एलओसी कारगिल' हा चित्रपट २००३मध्ये जे.पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट कारगिलच्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात पाकिस्तानच्या सैन्याविरोधी कारवाईला सामोरे जाताना भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या पराक्रमांची गाथा दाखवण्यात आली आहे. 'कारगिल' या चित्रपटात अभिषेक बच्चन, सैफ अली खान, आयुब खान, सुनील शेट्टी, संजय दत्त या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.  
लक्ष्य 
फरहान अख्तर दिग्दर्शित 'लक्ष्य' हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैन्याला लावण्यात येणारी शिस्त आणि त्याचे आयुष्य यावर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटिंग लडाखमधील तंग्लांग्ला येथे २४ फुटावरून क्रेनच्या सहाय्याने करण्यात आले आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन, प्रीति जिंटा, अमिताभ बच्चन, अमरीश पुरी आणि ओम पुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 
Image result for फरहान अख्तर लक्ष्य फिल्म
धूप 
'धूप' हा चित्रपट २००३मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला. या चित्रपटात कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या एका कॅप्टन (अनुज नय्यर)च्या कुटुंबाची होणारी परिस्थिती दाखवण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात शहीद कुंटुंबीयांची सरकारी अनुदानासाठी होणारी धडपड दाखवण्यात आले होते. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ओम पुरी आणि गुल पनागची मुख्य भूमिका साकारली आहे. 
टँगो चार्ली 
कारगिलच्या युद्धावर आधारित 'टँगो चार्ली' हा चित्रपट २००५ मध्ये आला होता. या चित्रपटात भारताच्या सीमेवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांच्या जीनवावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगन, बॉबी देओल आणि संजय दत्त या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक मणी शंकर यांनी केले आहे.  
      
स्टंप्ड 
कारगिल युद्धावर आधारित 'स्टंप्ड' हा चित्रपट २००३ मध्ये आला होता. या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडनने एका सैन्यदल अधिकाऱ्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
मौसम 
कारगिल युदधावर आधारित बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘मौसम’ (२०११) हा चित्रपट साकारण्यात आला होता.
Related image
उरी: द सर्जिकल स्ट्राईक
दिग्दर्शक रोनी स्क्रूवाला 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट २०१९मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला होता. हा चित्रपटात भारतीय लष्‍कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका साकारली होती.
Related image

मलायका म्हणते, 'छैया-छैया' गाण्यावेळी असं काही घडलं की...


अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमुळे चर्चेत असलेली मलायका अरोरा डान्स रिॲलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये हजेरी लावली. शोमध्ये तिने आयटम सॉन्ग 'छैया-छैया'च्या शूटिंगवेळचा अनुभव सांगितला. दिल से या चित्रपटातील छैया-छैया हे गाणे रेल्वेच्या वर शूट करण्यात आले होते. 

मलायका अरोराने सांगितले की, 'छैया-छैया'च्या शूटिंगवेळी मलायकाच्या कंबरेला दोरी बांधली जात असे. कारण -ती चालत्या रेल्वेवर शूट करत होती. ज्यावेळी दोरी हटवण्यात आली, त्यावेळी तिच्या कंबरेतून रक्त येऊ लागलं. 
मलायका या गाण्याच्या शूटिंगवेळी अनेकवेळा पडली होती. मलायका म्हणाली- रेल्वेवर हवेमुळे मी राईट-लेफ्ट होत होती. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने माझ्या घाघऱ्यापासून कंबरेपर्यंत आणि नंतर कंबरेपासून रेल्वेपर्यंत दोरी बांधली होती. दोरीमुळे बॅलेन्स होण्यास मला मदत मिळत होती. धावत्या रेल्वेवर डान्स मुव्ह्ज करता येत नव्हते. ज्यावेळी मी दोरी हटवली, त्यावेळी माझ्या कंबरेतून रक्त येत होतं. त्यामुळे सर्व चिंतेत होते. क्रू आणि कास्ट माझी खूप काळजी घेत होते. त्यावेळचे क्षम मी कधीच विसरू शकत नाही. आजदेखील मी ते क्षण आठवून खुश होते. मी आजदेखील या गाण्यावर परफार्म करून खुश होते. 
'दिल से'मध्ये प्रीति जिंटा आणि मनीषा कोईराला यांच्या महत्वाच्या  भूमिका होत्या. 

जेव्हा दिलीप कुमार यांनी शरीफांना फटकारले


वीस वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै, १९९९ रोजी कारगिल युद्धात भारताने विजय मिळवला होता. आज कारगिल विजयला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युध्दात ५२७ भारतीय जवान शहीद झाले होते तर १३६३ जवान जखमी झाले होते. भारताने ही लढाई ८४ दिवसांत जिंकली होती. कारगिलच्या लढाईमध्ये भारतीय सैन्याचे धाडसाचे खुप किस्से सांगितले जातात. परंतु, खूप कमी लोकांना माहिती असेल की, कारगिल युद्धादरम्यान एक प्रसंग असा आला की, ज्यावेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दिलीप कुमार यांचे बोलणे घडवून आणले होते.  

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे संबंध खूप चांगले होते. कारगिल युद्धादरम्यान एक प्रसंग सांगितला जातो. वाजपेयींसाठी दिलीप कुमार यांनी तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फटकारले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी शरीफ यांना विनम्र राहण्याचा सल्ला दिला होता. 
दिलीप कुमार अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत १९९७ मध्ये लाहौर दौऱ्यावर गेले होते. आणि त्याचवर्षी दिलीप कुमार यांना पाकिस्‍तानने सर्वोच्‍च सन्मान 'निशान ए इम्तियाज'ने सन्मानित केले होते.
Related image
असे होते प्रकरण
दिलीप कुमार यांनी थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडसवण्याचे इतपत काय झाले होते, हे समजून घेण्यासाठी वायपेयींची लाहोर यात्रा आणि १९९९चे लाहोर घोषणापत्र काय होते? हे समजून घेतले पाहिजे. 
पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी एक मोठे पाऊल उचलले होते आणि मैत्रीचा हात पुढे केला होता. लाहोर घोषणापत्रामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला होता की, दोन्ही देशांमध्ये मैत्री होईल. या घोषणा पत्रात दोन्ही देशांनी शिमला करार लागू करण्याचे मान्य केले होते. वाजपेयींच्या या यात्रेला पाकमधील कट्टरपंथीयांनी विरोधदेखील केला होता. तसेच ‘मीनार-ए-पाकिस्तान’ची स्वच्छतादेखील केली होती. पण मैत्रीचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली आणि दोन्ही देशांचे संबंध पुन्हा बिघडले.  
त्यानंतर कारगिल भारतीय लष्कराने पुन्हा मिळवले. यासंदर्भात पाकचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद कसूरी यांनी ‘नीदर ए हॉक नॉर ए डव’ या पुस्तकात दिलीप कुमार यांच्याबद्दलचा एक प्रसंग लिहला आहे. कारगिल घुसखोरीनंतर वाजपेयींनी शरीफ यांच्याबद्दल दिलीप कुमार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. कारण, १९९७मध्ये वाजपेयी यांच्यासोबत बसमध्ये दिलीप कुमारदेखील होते आणि त्याचवर्षी पाकिस्तानने दिलीप कुमार यांना ‘निशान ए इम्तियाज’ या सर्वोच्च पुरस्काराने सम्मानित केले होते. 
कारगिल घुसखोरी ही वाजपेयींच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होते. वाजपेयी यासंदर्भातील तक्रार दिलीप कुमार यांच्याकडे केली. एका बाजूला शरीफ लाहोरमध्ये शांततेची चर्चा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुशर्रफ यांना घुसखोरी रोखण्यापासून थांबवतादेखील आले नाही.    
Related image
कसूरी यांनी लिहिल्याप्रमाणे, वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली आणि फोन अचानक दिलीप कुमार यांच्याकडे दिला. फोनवर दिलीप कुमार यांचा आवाज ऐकून शरीफ घाबरले. फोनवर दिलीप कुमार म्हणाले, 'मियां साहिब, आपने हमेशा अमन के बडे समर्थक होने का दावा किया है इसलिए हम आपसे जंग की उम्मीद नहीं करते. तणाव के हालत में भारतीय मुसलमान बहुत असुरक्षित हो जाते हैं , इसलिए हालात को काबू करने में बराय मेहरबानी कुछ किजिए.' 
वाजपेयी यांनी यासंदर्भात सरताज अजीज यांनादेखील फोन करून नाराजी सांगितली होती. त्यावेळी पाकिस्तानमध्ये असलेले भारताचे उच्चायुक्त पार्थसारथी यांच्या मते, दिलीप कुमार यांच्या बोलण्यामुळे शरीफ यांना मोठा धक्का बसला होता. एका बाजूला ते सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसऱ्या बाजूला कारगिलच्या घटनेमुळे त्यांची प्रतिमा किती मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे याचा अंदाजदेखील त्यांना आला नाही.

...म्हणून संजय दत्तचा मोडलेला संसार

संजय दत्त २९ जुलैला आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची प्रोफेशनल लाईफ शानदार आहेच, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार झाले. वाढदिवसाच्या औचित्याने त्याच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेऊया.  
संजयने मान्यता दत्तशी लग्न करण्यापूर्वी रिया पिल्लईशी १९९८ मध्ये लग्न केलं होते.
Image result for sanjay dutt wife rhea pillai
पहिले लग्न १९८७ मध्ये अभिनेत्री रिचा शर्माशी केले होते. 
sanjay richa
रिचाने संजयसाठी आपले सिनेकरिअर सोडून दिले होते. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला. रिचाला ब्रेन ट्युमर झाला होता. रिचा अपना इलाज उपचारासाठी युएस गेली होती. तीन वर्षे ती तेथेच राहिली होती. उपचारानंतर ती भारतात परतली. त्यावेळी तिला समजले की, संजयचे माधुरीशी अफेअर सुरू आहे. 
Image result for sanjay dutt
रिचाने एका मुलाखतीत म्हटले होते, 'मला वाटतं की, संजय माझ्या आयुष्यात परत यावे. आम्ही दोघे दीर्घकाळ एकमेकांपासून वेगळे राहत आहोत. मी संजयला विचारले होते की, त्याला घटस्फोट घ्यायचा आहे का? त्याने म्हटलं होतं नाही. मलाही घटस्फोट घ्यायचा नव्हता. काहीही असो माझे त्याच्यावर प्रेम आहे. मी नेहमीच त्याच्यासोबत असेन.' 
Related image
रिचा आपला संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहिली. तेव्हा तिला समजलं की, तिला पुन्हा ट्युमर झालं आहे. रिचा पुन्हा न्यू-यॉर्क गेली.  अखेर दोघांना घटस्फोट घ्यावा लागला. एका मुलाखतीत संजय दत्तची मेहुणी एनाने आपल्या बहिणीचा संसार तुटण्यामागे माधुरीला जबाबदार ठरवले होते. 
Image result for sanjay dutt
एका मुलाखतीत संजयने म्हटले होते, 'रिचाच्या आजारपणामुळे आमचा संसार मोडला नाही. मी असा व्यक्ती नाही, जो आपल्या पत्नीला केवळ यासाठी सोडून देईल. कारण-तिचे केस गळत होते. रिचासोबत माझे नाते संपुष्टात आले आहे. आता आम्ही एकत्र येऊ शकत नाही. रिचाचे पॅरेंट्स आमच्या आयुष्यात खूपच लक्ष देत होते. ते नेहमी माझ्यावर काही ना काही आरोप लावत असत. आमचे नाते तुटण्यामागे रिचाची बहिण एना जबाबदार होती. आमच्या दोघांमध्ये ती गैरसमज पसरवत असे.'
Image result for sanjay dutt
संजय म्हणाला होता, 'जेव्हा तिला कॅन्सर नव्हता, त्यावेळी ती सर्वांना सांगत असे - मला भारतात राहायचं नाही. न्यूयॉर्कमध्ये माझे वडील हे आहेत...ते आहेत.. ती मला नेहमी म्हणायची, तुझे काम मला अजिबात आवडत नाही. तू रात्री १० वाजेपर्यंत काम का करतोस. ८ वाजेपर्यंत घरी का येत नाहीस. तिनेदेखील एक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. तिला माहिती आहे की, चित्रपट इंडस्ट्रीत कसं काम असतं. लोकांना वाटतं की, तिच्या आजारपणामुळे आमचं नातं संपलं.'

कंडक्टर ते विनोदी अभिनेता जॉनी वॉकर

कॉमेडी अभिनेते जॉनी वॉकर म्हणजेच बदरुद्दीन जमालुद्दीन काजी यांचा २९ जुलैला स्मृतिदिन. सिनेरसिकांना पोट धरून हसायला लावणारे जॉनी वॉकर यांनी २९ जुलै, २००३ मध्ये जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडचे एक उत्तम कॉमेडियन जॉनी वॉकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलिवूडचे सुपरस्टार जॉनी वॉकर यांच्या आयुष्याशी संबंधित या खास गोष्टी जाणून घेऊया. 
वॉकर यांनी चित्रपटात आल्यानंतर आपलं नाव बदललं होतं. घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे त्यांना ६ व्या इयत्तेतच शाळा सोडावी लागली होती. 

'सीआयडी' चित्रपटातील गाणे 'ऐ दिल है मुश्किल जीना यहां, जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जां', जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. गाण्यात मुंबईमधील बसची स्थिती दाखवण्यात आली होती. चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेले जॉनी वॉकर यांना सुरूवातीला बस कंडक्टरची नोकरी करावी लागली होती. यासाठी त्यांना महिन्याला २६ रुपये मिळत होते. जॉनी वॉकर लोकांची मिमिक्री करत असत. त्यामुळे बसमध्ये मिमिक्री करून ते प्रवाशांचे मनोरंजन करायचे. 

जॉनी वॉकर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट बस सर्व्हिसमध्ये काम करत होते. अनेक वर्षे त्यांनी हे काम केले. एकदा दिग्गज कलाकार बलराज साहनी यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यावेळी ते गुरु दत्त यांचा चित्रपट बाजी लिहित होते. साहनी यांनी जॉनी यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करून दिली. दत्त साहब यांनाही जॉनी यांचा अभिनय आवडला. 

जॉनी वॉकर यांचे कौशल्य पाहून त्यांना पहिली संधी गुरु दत्त यांनी दिली. चित्रपट होता 'बाजी'. या चित्रपटानंतर त्यांना मागे वळून पाहावे लागले नाही. जॉनी वाकर यांनी गुरुदत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये 'आर-पार', 'प्यासा', 'चौदहवी का चांद', 'कागज के फूल', 'मधुमती,' 'मिस्टर एंड मिसेज 55', 'टॅक्सी ड्रायव्हर,' 'देवदास,' 'मिलाप,' 'सीआयडी,' 'आनंद,' 'दो रास्ते', 'चाची 420' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. 

मधुमती चित्रपटासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. शिखर या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट कॉमेडियन ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.


मुमताज यांच्‍या लग्नानंतर निराश होते राजेश खन्ना


हसतमुख, चुलबुली अभिनेत्री मुमताज यांचा आज ३१ जुलैला वाढदिवस. एक काळ असा होता की, मुमताज यांना मोठ्‍या पडद्‍यावर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असायची. त्‍यांनी आपल्‍या अभिनयाने आणि अदाकारीने सिनेरसिकांची मने जिंकली. मुमताज आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

सध्या त्‍या त्‍यांची मुलगी आणि जावयाबरोबर रोममध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत. काही दिवसांपूर्वी मुमताज यांच्‍याबद्‍दल मोठी चर्चा झाली होती. त्‍यांचं निधन झाल्‍याचे वृत्त सगळीकडे पसरलं होतं. पण, रोममधून त्‍यांची मुलगी तान्या माधवानीने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून हे वृत्त खोटे असल्‍याचे सांगितले. 
Related image
ज्‍युनिअर आर्टिस्‍ट म्‍हणून काम 
मुमताज यांचा जन्‍म ३१ जुलै १९४७ रोजी मुंबईत झाला. त्‍यांना अभिनेत्री बनायचं होतं. मुमताज यांची आई नाज आणि काकी निलोफर दोघीही अभिनय क्षेत्रात होत्‍या. त्‍यामुळे अभिनयाचे धडे त्‍यांना मिळाले. मुमताज यांनी ज्‍युनियर आर्टिस्ट म्‍हणून काम सुरू केले. साठच्‍या दशकात मुमताज यांनी छोट्‍या-मोठ्‍या भूमिका करण्‍यास सुरुवात केली. 
Related image
दारा सिंह यांच्‍यासोबत चित्रपटात काम 
मुमताज यांचा नशीब उघडलं ते म्‍हणजे दारा सिंह यांच्‍यासोबत त्‍यांना काम करायला मिळालं. त्‍यावेळच्‍या अभिनेत्री दारा सिंह यांच्‍यासोबत काम करण्‍यास तयार होत नसत. परंतु, मुमताज दारा सिंह यांच्‍यासाबेत काम करण्‍यास तयार झाल्‍या. त्‍यानंतर त्‍यांनी दारा सिंह यांच्‍यासोबत १६ चित्रपट केले. पैकी १० चित्रपट हिट ठरले. येथून मुमताज यांचा यशस्‍वी प्रवास सुरू झाला. 
मुमताज यांनी दारा सिंह, दिलीप कुमार, शम्मी कपूर, देवानंद, संजीव कुमार, जितेंद्र, शशी कपूर या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. परंतु, राजेश खन्नासोबत त्यांची जोडी चांगली जमली. 
Related image
राजेश खन्ना-मुमताज यांची केमिस्‍ट्री 
दारा सिंह यांच्‍यानंतर मुमताज यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्‍यासोबत काम करण्‍याची संधी मिळाली. येथून मुमताज यांच्‍या आयुष्‍यातील गोल्डन टाईम सुरू झालं. राजेश खन्ना आणि मुमताज यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच असायची. या जोडीने 'दो रास्ते', 'सच्चा-झूठा', 'आपकी कसम', 'अपना देश', 'प्रेम कहानी', 'दुश्मन', 'बंधन' आणि 'रोटी' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. 
Image result for actress mumtaz and rajesh khanna
१९७४ मध्‍ये मुमताज यांनी मयूर मधवानी यांच्‍याशी विवाह केला. परंतु, राजेश खन्ना यामुळे निराश होते, असे म्‍हटले जाते. कारण, मुमताज यांनी आता लग्‍न करू नये, अशी राजेश खन्ना यांची इच्‍छा होती. लग्‍नानंतर मुमताज यांनी चित्रपटात काम करणं सोडून दिलं. 
मुमताज यांनी १५ वर्षांच्‍या करिअरमध्‍ये तब्‍बल १०८ चित्रपट केले. टॉप अभिनेत्रींमध्‍ये त्‍यांची गणना व्‍हायची. १९८९ मध्‍ये त्‍या 'आंधियां' चित्रपटात दिसल्‍या. परंतु, हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्‍यानंतर त्‍यांनी इंडस्‍ट्री सोडली.
कॅन्‍सरशी संघर्ष
मुमताज यांना वयाच्या ५३ व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्‍सरचा सामना करावा लागला. 
Image result for actress mumtaz
अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित 
संजीव कुमारसोबत 'खिलौना' चित्रपटासाठी (१९७१) त्‍यांना फिल्मफेअरचा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्‍कार मिळाला. १९९६ मध्‍ये त्‍यांना फिल्मफेअरने लाईफटाईम अचीव्‍हमेंट पुरस्‍कार देण्‍यात आला. 
Related image

'यांना' पाहून बच्चन, गोविंदा यांनी शिकला डान्स

'एक अलबेला' २०१६ मध्ये आलेला चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, रायटर, निर्माता, डान्सर भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित होती. शेखर सरतांडेल दिग्दर्शित या चित्रपटात भगवान दादा यांची भूमिका मराठी अभिनेता मंगेश देसाई याने साकारली होती. यात विद्या बालनने लोकप्रिय अभिनेत्री गीता बालीची भूमिका साकारली होती. भगवान दादांचा १ ऑगस्टला जन्मदिवस. या निमित्ताने भगवान दादांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया. 

Image result for bhagwan dada
१. मुंबईच्या दादर भागात लालूभाई मेंशन नावाची चाळ होती. गणेश उत्सवाच्या वेळी अनेक मंडळे या चॉळीच्या समोर थांबायचे आणि भोली सूरत दिल के खोटे गाणे वाजवून डान्स करायचे. भगवान दादा आपल्या चाळीतून बाहेर पडायची प्रतीक्षा करत. मग, भगवान दादा बाहेर येऊन डान्स स्टेप करून दाखवत. 
२. भगवान दादा हिंदी चित्रपटांचे पहिले ॲक्शन हिरो होते. 
३. हिंदी चित्रपटांचे पहिले डान्सिंग स्टार होते.
४. त्यांनी भारतीय पहिली हॉरर चित्रपट भेडी बंगला (१९४९) बनवला होता. व्ही. शांताराम यासारखे दिग्गज चित्रपट निर्मात्यांना भगवान दादा यांचे काम आवडले होते.
५. भगवान दादा यांचे वडील मिलमध्ये मजुरी करत होते.
६. महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये १९१३ मध्ये भगवान दादा यांचा जन्म झाला. पूर्ण नाव - भगवान अभाजी पलव असं होतं. पुढे त्यांना भगवान, मास्टर भगवान आणि भगवान दादा नावाने ओळखले जाऊ लागले. 
Related image
७. भगवान दादा यांचे बालपण दादर, परेल येथे गेले. चौथ्या इयत्तेत असताना त्यांनी शिक्षण सोडलं. 
८. सायलेंट चित्रपटांच्या काळात त्यांनी काम करणे सुरू केले. जवळपास १९३१ ते १९९६ पर्यंत जवळपास ६५ वर्षे ते सक्रीय होते. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि अन्य भूमिका त्यांनी साकारल्या. 
९. भगवान दादांना त्यांचे मित्र राज कपूर यांनी सल्ला दिला होता की, त्यांनी सोशल मॅसेज देणारे चित्रपट बनवावेत. त्यावर भगवान दादांनी अलबेला दिग्दर्शित केला. हा चित्रपट १९५१ मध्ये रिलीज झाला. त्यावेळी राज कपूर यांचा आवारा चित्रपट आला. 'शोला जो भडके, दिल मेरा धडके दर्द जवानी का सताए बढ बढ के...' हे अलबेलामधील गाणे आजही लोकप्रिय आहे. 
Related image
१०. अलबेला त्यावर्षीचा तिसरी सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट होता. पहिल्या क्रमांकावर राज कपूर यांचा आवारा आणि दुसऱ्या क्रमांकावर गुरु दत्त यांचा बाजी चित्रपट होता. 
११. भगवान दादा यांनी अलबेला नंतर झमेला आणि लाबेला यांसारखे चित्रपट बनवले. परंतु, ते यशस्वी झाले नही. 
१२. भगवान दादा यांनी 'हंसते रहना' या चित्रपटासाठी आपल्याकडील सर्व पैसा, पत्नीचे दागिने खर्च केले. यात अभिनेते होते किशोर कुमार. परंतु हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. नुकसानीमुळे पुढे त्यांना दादरमध्ये चाळीत राहावं लागलं. तेथेच त्यांचं निधन झालं.
१३. बॉम्बे टू गोवा (१९७२) कमर्शियल आणि सोलो हिरो म्हणून अमिताभ बच्चन यांचा हा पहिला चित्रपट होता. परंतु, त्यांना डान्स करता येत नव्हते. एक गाणं होतं-'देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जां...'  पुढे बच्चन डान्स करायला शिकले. हात पुढे काढून हळू-हळू पाय हलवणे आणि ठुमके लगावणे, ही भगवान दादा स्टाईल होती. 
Image result for bhagwan dada
१४. गोविंदा, मिथुन, ऋषी कपूरसह अनेक स्टार्स भगवान दादा यांची डान्स  स्टाईल शिकले. ऋषी कपूर यांना खुद्द भगवान दादा यांनी डान्स स्टेप शिकवले होते. 
१५. गीतकार आनंद बक्शी यांना चित्रपटात भगवान दादा यांनी आणले होते. बक्शी यांनी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, अमर प्रेम, आराधना, शोले, परदेस, मोहरा, यादें, खुदा गवाह यासारखे ६०० हून अधिक चित्रपटांची गाणी लिहिली होती.
१६. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झालं. 
१७. महत्त्वाचे चित्रपट- फरार, शंकर शंभू, खेल खिलाडी का, चाचा भतीजा, शिक्षा, साहस, कातिलों के कातिल, दर्द-ए-दिल, बिंदिया चमकेगी, सनी, झूठा सच, रामकली, लवर बॉय, काली बस्ती, फर्ज की जंग, गैर कानूनी यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. 
 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...