Friday, June 20, 2025

ऐश्वर्याचा मिस वर्ल्डपर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा

Unmulscreen

INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरात… गातात वंदे मातरम्

 madhavir agrawal 02 Mar 2022 5:48 pm0


SHARECOPY LINK


‘जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू शकत नाही.


राजाश्रय देणारं संस्थान म्हणून कोल्हापूर संस्थानाची देशातच नाही तर जगात ओळख आहे. त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पोलंडचे नागरिक जगभर आश्रय मागत होते, कोणीही त्यांना आश्रय द्यायला तयार नव्हते. त्यावेळी पोलंडच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापुरात आश्रय दिला गेला.


विशेष प्रतिनिधी


कोल्हापूर :गोष्ट दुसऱ्या महायुद्धातील. हिटलरने पोलंडवासीय ‘ज्यू’नागरिकांचा अमानुष नरसंहार सुरु केल्याने त्यांच्यावर ‘दे माय  धरणीठाय’ अशी अवस्था ओढवली होती. जगातील अनेक देशांनी  निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रयाचे दरवाजे बंद केले असताना हिंदुस्थातील दोन संस्थानांनी ज्यूंना आपल्या पदरात घेतले. ही संस्थाने होती कोल्हापूर आणि जामनगर. आज इतक्या वर्षांनंतरही करवीर नगरी आणि पोलंडवासीयांचे दृढ संबंध आहेत…ते वंदे मातरम् देखील आत्मीयतेने गातात…



ही तर ऋणांची परतफेड …युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी पोलंड देश पुढे सरसावला आहे. पोलंडकडून भारतीय नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.मात्र या निमित्ताने दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी पोलंडच्या नागरिकांना केलेल्या मदतीची आठवण होत आहे. पोलंडमधील नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने मदत केली होती. साधारण पाच हजाराहून जास्त नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला होता. त्यावेळेपासून आजतागायत कोल्हापूर आणि पोलंडचे संबंध आहेत.




पोलंडवासी आणि कोल्हापूरच नातं दुसऱ्या महायुद्धपासूनच आहे. हिटलरच्या छळाला कंटाळून पोलंडचे नागरिक आश्रय शोधत होते. त्या वेळी केवळ कोल्हापूर आणि जामनगर संस्थानांनी यांना आश्रय दिला. 1943 ते 1948 दरम्यान कोल्हापूरच्या वळीवडे या ठिकाणी शहाजी महाराज यांनी पोलंडच्या नागरिकांसाठी वसाहत उभा केली. त्यामुळेच गेली 80 वर्षे पोलंडचे नागरिक कोल्हापूर संस्थानाचे ऋण व्यक्त करत आहेत.INDIA-POLAND: The world rejected but India accepted! Kolhapur is an institution that gives sanctuary to Poland! Five thousand Poles in Kolhapur for five years during the Second World War




वळीवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण कार्यकमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज, खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पोलंडचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की, पोलिश एअरलाईनचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की, कौन्सुल जनरल डॅमियन आयर्झीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह वळीवडेत वास्तव्य केलेले पोलिस नागरिक व त्यांचे नातेवाईक.


काय म्हणाले होते पोलंडचे पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रिझीदॅज…


जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू शकत नाही. ८० वर्षांनंतरही कोल्हापुरातील वळिवडे गावाविषयीच्या आमच्या भावना कायम आहेत. प्रेम, मैत्री, मानवतेचा सेतू कायम रहावा,’ अशी भावना पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रिझीदॅज यांनी व्यक्त केली. वळिवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण प्रिझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आले होते.




ज्या पाच वर्षात पोलंडचे नागरिक कोल्हापूरमध्ये राहिले होते त्यावेळी त्यांनी काही नाते संबंध निर्माण केले होते. कोल्हापूरने नेहमीचं गरजूंना आपल्या पदरात घेतलंय. ज्या वेळी संपूर्ण जगाने पोलंडला नाकारलं होतं त्यावेळी कोल्हापूर संस्थानाने पोलंडच्या नागरिकांना आश्रय दिला.




जगभरात युद्धज्वर शिगेला पोचला असताना या छावणीत दहा हजार पोलिश ‘ज्यू’ नागरिक अत्यंत गुण्यागोविंदाने रहात होते. कित्येकांचे बालपण तर इथे गेले, पण कित्येकांची जन्मभूमीही हीच छावणी ठरली ! यातून  कोल्हापूरच्या वळिवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे. येथे जन्मलेली पोलिश मुले ‘वळिवडे कॅम्प’  ही आमची पहिली जन्मभूमी आहे, अशा भावना व्यक्त करतात.



दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंड वासीयांना कोल्हापूरकरांनी आश्रय दिला होता. यातील काही नागरिकांनी कोल्हापूरला भेट देऊन आपल्या आठवणी जागृत केल्या होत्या.

5555555555555555555555

पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५ हजार निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने

सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते ४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतिस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.

भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध

55555555555555555555555


start -

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

सप्टेंबर १, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. जर्मनीचा नेता ॲडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोव्हिएत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोव्हिएत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डम व फ्रान्सने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले.

666666666666666666666666666666666666

व्हाईटनुसार पोलंडविरुद्ध युद्धव्युहात एकूण ६० जर्मन सैन्याच्या डिव्हिजन्स उतरवण्यात आल्या होत्या. त्यात ५ पॅंझर रणगाड्यांच्या डिव्हिजन्स ज्यात एका डिव्हिजनमधे ३०० रणगाडे होते, ४ लाइट डिव्हजन्स ज्यामधे काही जुनी घोडदळे आणि छोटे रणगाडे होते. यांच्या सोबतीला ४ डिव्हिजन्स मोटर/लॉरीमधून जलद हालचाली करू शकणारे असे पायदळही होते. ३६०० लढाऊ विमाने व आख्खे नौदलही या कामाला लावण्यात आले. याच्या विरूद्ध पोलंडकडे सगळे मिळून ३० डिव्हजन पायदळ, ११ कॅव्हलरीच्या ब्रिगेडस, ३०० छोटे रणगाडे, ११५४ तोफा आणि ४०० युद्धात भाग घेऊ शकतील अशी विमाने असे सैन्यदल होते. यांच्याबरोबर ४ युद्धनौका आणि ५ पाणबुड्याही जोडल्या तर सगळे मिळून १० लाखसैनिकही होत नव्हते. जर्मन सेनानी बॉक याच्या साडेसहा लाख आणि जवळजवळ जनरल रुनस्टेडच्या नऊ लाख सैनिकांबरोबर या सैन्याची गाठ पडली तेव्हा काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी.


१ सप्टेंबरची पहाट फटफटली आणि तासाला ३५० कि.मी. उडणार्‍या हेंकेल-११ बाँबफेकी विमानांनी २००० किलो प्रत्येकी बाँब घेऊन पोलंडवर हल्ला चढवला.

++++

दुसरे महायुद्ध भाग - १

https://www.misalpav.com/node/20771

व्हाईटनुसार पोलंडविरुद्ध युद्धव्युहात एकूण ६० जर्मन सैन्याच्या डिव्हिजन्स उतरवण्यात आल्या होत्या. त्यात ५ पॅंझर रणगाड्यांच्या डिव्हिजन्स ज्यात एका डिव्हिजनमधे ३०० रणगाडे होते, ४ लाइट डिव्हजन्स ज्यामधे काही जुनी घोडदळे आणि छोटे रणगाडे होते. यांच्या सोबतीला ४ डिव्हिजन्स मोटर/लॉरीमधून जलद हालचाली करू शकणारे असे पायदळही होते. ३६०० लढाऊ विमाने व आख्खे नौदलही या कामाला लावण्यात आले. याच्या विरूद्ध पोलंडकडे सगळे मिळून ३० डिव्हजन पायदळ, ११ कॅव्हलरीच्या ब्रिगेडस, ३०० छोटे रणगाडे, ११५४ तोफा आणि ४०० युद्धात भाग घेऊ शकतील अशी विमाने असे सैन्यदल होते. यांच्याबरोबर ४ युद्धनौका आणि ५ पाणबुड्याही जोडल्या तर सगळे मिळून १० लाखसैनिकही होत नव्हते. जर्मन सेनानी बॉक याच्या साडेसहा लाख आणि जवळजवळ जनरल रुनस्टेडच्या नऊ लाख सैनिकांबरोबर या सैन्याची गाठ पडली तेव्हा काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी.


१ सप्टेंबरची पहाट फटफटली आणि तासाला ३५० कि.मी. उडणार्‍या हेंकेल-११ बाँबफेकी विमानांनी २००० किलो प्रत्येकी बाँब घेऊन पोलंडवर हल्ला चढवला.

सोबत होती डॉर्नियर आणि जुंकर्स JU-87. या विमान हल्ल्याचे लक्ष होते पोलंडमधील रस्ते, रेल्वेचे जाळे, दारूगोळा जेथे साठवला होता ती केंद्रे, पेट्रोलचे साठे इ. वॉर्सावर जे राजधानीचे शहर आहे त्यावर पोलंडच्या नागरिकांची प्रतिकाराची इच्छा नष्ट करण्यासाठी तुफान बाँबवर्षाव करण्यात आला. हा हल्ला करायला स्टूका वापरण्यात आली. या विमानांवर मोठे कर्णकर्कश्य आवाज करणारे भोंगे बसवण्यात आले होते, हे जेव्हा बाँब वर्षावासाठी खाली सूर मारत तेव्हा येणार्‍या आवाजाने नागरिकांचा भीतीने थरकाप उडत असे. पोलंडचे बहुतेक विमानदल जमिनीवरच गारद झाले. त्यांना उडायला वेळच मिळाला नाही. आकाशावर थोड्याच वेळात जर्मन विमानदल म्हणजे लुफ्तवाफेची अनिर्बंध सत्ता प्रस्थापीत झाली. जर्मनांच्या मेसरश्मिट विमानांपुढे, जी तासाला ४७० कि.मी या वेगाने उडू शकत होती, त्यांच्या पुढे कितीही शूर वैमानिक असले तरीही पोलंड्च्या जुनाट विमानांचा टिकाव लागणे कठीण नाही अशक्यच होते.

जर्मनांच्या या आक्रमणामुळे पोलंडच्या जनतेत घबराट उडाली आणि त्यांनी अधिक सुरक्षित जागी जाण्यासाठी आपली घरे सोडली. ही सगळी जनता रस्त्यांवर आल्यामुळे पोलंडच्या सैन्याला हालचाली करण्यावर मर्यादा येऊ लागल्या. ब्लिट्झ्क्रीग अंतर्गत या रस्त्यावर विमानातून जेव्हा मशिनगनचा मारा करण्यात आला तेव्हा पोलंडभर गोंधळाचे वातावरण पसरले. कोणाचा पायपोस कोणात राहिला नाही.

जर्मनीच्या पूर्व सीमेवर हल्ला होण्याच्या भीतीने हिटलरला पोलंड लवकरात लवकर काबीज करायचे होते. आणि ते तो लगेचच करतील अशी त्याला शंका होती. परंतू त्या रविवारी ११ वाजेपर्यंत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारले नव्हते.

जर्मन प्रसिद्धी माध्यमे जी डॉ. जोसेफ गोबेल्सच्या ताब्यात होती त्यांनी हे अगोदरच पसरवले होते की पोलंडमधील जर्मन लोकसंख्या ही जर्मानांच्या आक्रमणाच्या बाजूने आहे. यामुळे त्या भागात पोलीश आणि जर्मन समाजांमधे कमालीचा तणाव उत्पन्न झाला. या बातम्यांमुळे पोलंडमधील ७००० जर्मन वंशाच्या लोकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांची कत्तल करण्यात आली. ही युक्ती नंतर जर्मनांनी व रशियनांनी अनेक वेळा वापरली आणि युद्ध छेडण्यासाठी त्याचा वापर करून घेतला. या वेळी मात्र पोलंडमधील जनतेने जर्मनवंशाचे लोक हे देशद्रोही आहेत असे समजून त्यांचा काटा काढला. पुढे हेच फार मोठ्या प्रमाणावार होणार होते, पण ते शुद्धवंश हाच जगायला लायक आहे या गंडापायी.

५ सप्टेंबर पर्यंत पोलीश कॅरिडॉर हा पोलंडपासून तोडण्यात आला. उत्तरेला ८ सप्टेंबरला पोलीश पमोझ सेनेला वेढा घालण्यात आला ( ही एक सेना त्या विभागाच्या संरक्षणासाठी उभी केले गेली होती) १७ सप्टेंबरला जनरल वाल्थर फॉन राईशनाऊच्या १०व्या सेनेनी आणि जनरल ब्लास्कोविट्झच्या ८व्या सेनेनी क्राकोव्ह आणि उछ येथील पोलीश सैन्याला वेढले आणि त्याचा नाश चालवला. पोलंडच्या सरकारने देश सोडून पळ काढला आणि त्यांनी रोमानियामधे आश्रय घेतला अर्थात नंतर हिटलरच्या दबावाखाली त्यांना तो देश नंतर सोडायला सांगण्यात आले.

*****************************************************

https://www.trip.com/travel-guide/attraction/undi-1753428/tourist-attractions/

https://www.google.com/maps/place/Chandramauleshwara+Temple,+Hubballi/@15.3647083,75.0518569,10731m/data=!3m1!1e3!4m11!1m3!2m2!1shubli+tourist+places!6e1!3m6!1s0x3bb8d0d1a64f4e5d:0xad3d16853ef53a82!8m2!3d15.3768134!4d75.1164712!15sChRodWJsaSB0b3VyaXN0IHBsYWNlcyIzUjEvZ2VvL3R5cGUvZXN0YWJsaXNobWVudF9wb2kvcG9wdWxhcl93aXRoX3RvdXJpc3RzWhYiFGh1YmxpIHRvdXJpc3QgcGxhY2VzkgEMaGluZHVfdGVtcGxlmgEjQ2haRFNVaE5NRzluUzBWSlEwRm5TVVI0YVZrM2IyRlJFQUXgAQD6AQQIABA_!16s%2Fg%2F11c2pyccs6?entry=ttu&g_ep=EgoyMDI0MTExOS4yIKXMDSoASAFQAw%3D%3D

************************************************************


******************************************

redmi note 9 talkback is on press and hold volume and volume for 3 seconds to turn off

https://www.youtube.com/watch?v=UTgWTdoqfRo - imp

https://www.youtube.com/watch?v=h7TtWrQA3ks

**************************************************

https://www.youtube.com/watch?v=Ex1PvYdtQSA

https://www.youtube.com/watch?v=-OolaBA4Npc

https://www.youtube.com/watch?v=XGjzmGcb0GA

https://www.youtube.com/watch?v=R3eGHQyAEQw

https://isha.sadhguru.org/hi/wisdom/article/jaanein-aapkaa-shriir-aur-mn-kaise-kaary-krte-hain - vimp

https://isha.sadhguru.org/hi/wisdom/article/apnii-mncaahii-ciijon-ko-kaise-paaen - vimp

---------------------------------------------------

https://www.youtube.com/watch?v=p1yEQhYcpi4

vaat -https://www.youtube.com/watch?v=qAOn7MR8JP0

https://www.youtube.com/watch?v=xpiNu61BYZI

*****************************************

check fact deep fake images and photos

m - mis informtion - कोणतीही चुकीचा उद्देश नसतो..पण चुकीची माहिती असते

*disinformation - जाणूनबुजून चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात

* https://toolbox.google.com/factcheck/explorer/search/list:recent;hl=en - या टूलवर काहीही सर्च करू शकता

****************************

* investing photos or images

फेक फोटो कसे ओळखावे - google reverse ला जाऊन एखाद्या फोटोची लिंक किंवा फोटो पेस्ट करावे आणि सर्च करावे...व्हेरिफिकेशनसाठी ... सिमिलर इमेज दाखवतील...त्यावर जाऊन क्रॉस करू शकता

गुगल लेन्सवरूनही - फोटो, लिंक आणि टेक्स्ट कॉपी करून ..गुगलला सर्च करून ... व्हेरिफिकेशन करा

समजा एखादा फोटो सर्च केलाय...तर त्या फोटोच्या वरती  find image source  असा मेसेज येईल, त्यावर क्लिक करा.

******************************************************

* investing videos-

हे टुल्स वापरून तुम्ही video व्हेरिफिकेशन करा.

invid eu chrome extension

analysis वर क्लिक करा...video link copy and submitt---channel ची माहिती येते सर्व

now - राईट क्लिक ...सर्च गुगल फॉर इमेज वर क्लिक करा किंवा व्हिडिओच्या खाली रिव्हर्स इमेज असा ऑप्शन येतो


**************************

''invide''- is fake video tools (सर्व सोशल मीडिया वरील व्हिडिओ ची खरी माहिती दाखवतो)-हे डाऊनलोड करा.

key frames means screen shots

yandex - raussian search engine

google reverse

baidu

reveye

*identyfying deepfake existing tools

deepfake o meter - या टूलवर साईन अप करावा लागतो

या खाली request human analyasis - वर क्लिक करून अन्य फॉरेन्सिक माहिती मागवू शकता

***********

https://www.ifcncodeofprinciples.poynter.org/ - for IFCN SECREATORY ---- Pl check eligibility and process ...job 


Saturday, May 24, 2025

कोराकरी – कोल्हापुरी चपलांची आधुनिक कारागिरी

"ओ कोराकरी!" – हे नाव जरी आज एक फॅशन ब्रँड म्हणून ओळखलं जात असलं, तरी त्यामागे दडलेली गोष्ट एका बाप-लेकाच्या गोड आठवणींतून सुरू झालेली आहे. डॉ. दिलीप मोरे यांचा मुलगा कोल्हापुरात चप्पल बनवताना चप्पलांचा ढिग पाहतो आणि तो वडिलांना विचारतो, " पप्पा, हे काय आहे?" त्यावेळी वडील उत्तर देतात – "कोल्हापुरी चप्पल." आणि बोबड्या स्वरात मुलगा म्हणतो – "ओ कोराकरी!"हेच नाव पुढे एक बुटीक स्टाईल ब्रँड झालं – कोल्हापूरच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा ‘कोराकरी’ ब्रँड आज नावारुपास आला. कोराकरी ही केवळ चप्पलांची गोष्ट नाही – ती आहे कौटुंबिक वारसा, भारतीय परंपरा, आणि ग्रामीण कारागिरांच्या कलेला दिलेलं ग्लोबल व्यासपीठ. २०१४ पासून या व्यवसाय सुरूवात झालीय.

कोल्हापूरची कारागिरी म्हणजे कोराकरी. याचे उद्योजक हे डॉ. दिलीप मोरे आहेत. मुळचे म्हाळुंगे (ता. करवीर) गावातील.  B.E. (Mechanical Engg.), M.Tech (IIT Dhanbad), PhD (IIT Bombay). Ex. Faculty- IIM Calcutta येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.
रंजक इतिहास
त्यांचे आजोबा हे चप्पल बनवायचे. म्हाळुंगे गावी त्यांची ४० जणांची को-ऑपरेटिव्ह संस्था होती. त्यावेळी डॉ. दिलीप हे पाच ते सहा वर्षांचे होते. चप्पला कशा बनवल्या जातात, हे सगळे काम बघत होते. एकदा काळम्मावाडीच्या धरणाला भेट द्यायला इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यावेळी आजोबांनी त्यांना भेटवस्तू म्हणून कोल्हापुरी चप्पल दिली होती. ती त्यांना इतकी आवडली की, इंदिरा गांधींनी त्यांना निधनापर्यंत पेन्शन सुरू ठेवली. हा व्यवसाय पुढच्या पिढीने कुणी फारसा केला नाही. पण दिलीप यांनी तो पुढे नेला.
ऑनलाईन बिझनेसच भारी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता येथे प्रोफेसर म्हणून काम करत असताना त्यांनी कोल्हापुरी चप्पलांचे ट्रेडिंग सुरू केले. सुरुवातीला ते दुकानदारांकडून घेऊन ऑनलाईन विकत असत. पण क्वालिटीची समस्या निर्माण झाल्याने त्यावर अभ्यास करून दिलीप यांनी स्वत:चा बिझनेस सुरु केला. पुढे कारागीर घेऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कोराकरीचा ऑनलाईन बिझनेस सुरु आहे
झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसायाला सुरुवात
या चपला घरोघरी बनवल्या जातात. त्यामुळे फॅमिली बिझनेस म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याकाळी कारागीर चप्पल बनवून द्यायला तयार व्हायचे नाहीत. पण, दिलीप यांना उत्तम दर्जाचे लेदर वापरून बिझनेस उभा करायचा होता. म्हणून कोल्हापुरातील आर के नगर येथे त्यांनी चार-पाच कारागीरांना हाताशी घेऊन झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बिजनेस सुरू केला. ऑनलाईन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मागणी वाढली, त्यांनी 40 ते 50 लाखांची गुंतवणूक केली.
कंदलगाव येथे उभारला मोठा कारखाना
कंदलगान (तालुका करवीर) येथे दिव्यम लेदर क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाने कारखाना सुरू केला. या कंपनीत पार्टनर कम इन्वेस्टर म्हणून अमित कुमार त्यांना जॉईन झालेले आहेत. त्यांनी 55 लाखांची गुंतवणूक या बिजनेसमध्ये केलेली आहे.
चेन्नईवरून आणला जातो माल
चेन्नईवरून लेदर आणलं जातं.  स्टूल, रापी, पॉलिश, आयर्न असा कच्चा माल लागतो. मोजे कुरुंदवाडी, कापशी, शाहू, असे विविध प्रकारचे कोल्हापुरी चपला याठिकाणी तयार केल्या जातात. खास म्हणजे पूर्वीच्या विंटेजची चपलांना आधुनिकतेचीजोड देऊन जनरेशन झेडला देखील वापरता येईल असे, कम्फर्टेबल, अट्रॅक्टिव्ह, फॅशनेबल चपला बनवल्या जातात. फिनिश लेदर चेन्नई वरून आणतात, ज्यामुळे चप्पल टिकाऊ बनतं. एकावेळी आठ ते दहा लाखांचं मटेरियल मागवलं जातं.
१००० हून अधिक डिझाईन्स
स्वतः मोरे डिझाईनचं स्केच तयार करतात. नंतर इतर प्रोसेस प्रोडक्शनमध्ये तयार होते. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक डिझाईन तयार केलेले आहेत. सर्व कारागीर हँडमेड चप्पल बनवतात. थोड्या प्रमाणात हायड्रोलिक मशीनवर सोल कट केलं जातं. शंभरहून अधिक कारागीर त्यांच्याकडे काम करतात. चेन्नईवरून आणलेले १९ लाखांचे आठ ते दहा मशीन्स आहेत. त्या मशीन्सवर कटिंग, शिलाई, एम्बुस (चपलांची अप्पर डिझाईन बनवले जाते) केले जाते.
खासियत कोराकरी चपलांची
कोराकरी चपला कम्फर्टेबल, मऊ, टिकाऊ आहेत. जखम होण्यासारखे किंवा त्वचा निघण्यासारखे प्रकार होत नाहीत.  काही चपलांच्या टाचांना विमान किंवा रबरी सोल लावले जाते. काही चपलांना पूर्ण टीपीआर लावलं जाते. टीपीआर हे एक लेदर असतं ज्यामुळे स्लीप होत नाही.
२०१४ मध्ये त्यांनी https://www.korakari.com नावाची वेबसाईट सुरू केली. यामाध्यमातून प्रोडक्ट विकले जातात. ॲमेझॉन, नायका, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स वेबसाईटवरूनह माल विकला जातो. आता फॅब इंडिया आणि मिंत्रा- हाऊस ऑफ पतौडी ब्रँडसाठी काही डिझाईन प्रोडक्शन करून दिले जाते.
मोठमोठ्या ब्रँड कंपनीचे सीईओ यांच्याशी नेटवर्क बनवलं गेलं. त्यासाठी मोरे यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा झाला. मिंत्राचे मोठे ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला गती आली. नीरज मथाने यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या ऑर्डर्स त्यांना मिळत गेल्या आणि उद्योग साकारण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
डी टू सीचा फंडा
डी टू सी (डायरेक्ट टू कस्टमर) हा फंडा वापरून सर्व माल वेबसाईटच्या माध्यमातून आणि ऑनलाईन ई-कॉमर्सच्या माध्यमातून जगभरात विकला जातो. ऑर्डर प्लेस केल्यानंतर कुरियर एजंटच्या माध्यमातून चपला निश्चित स्थळी पोहोच केल्या जातात. आतापर्यंत यूएसए , ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कोराकरी चप्पल निर्यात केले आहेत.
4500 पर्यंत किंमतीचे चप्पल
850 पासून 4500 पर्यंतचे चप्पलचे किमती आहेत. एक चप्पल बनवण्यासाठी साधारण दोन तास लागते आणि अवघड असेल तर ते चार ते पाच दिवस लागतात. खूप वर्क असणारे चप्पल चार हजार पाचशे रुपये किंमतीला जाते.
चप्पल बनवण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी
म्हणजे कारागीरांना मजुरी मिळत नाही, या लोकांकडे फारसे साहित्य उपलब्ध होत नाही. पावसाळ्यात तर पूर्ण व्यवसाय बंद राहतो. तसेच या इंडस्ट्रीमध्ये लीडर कोणीही नाही जो कारागिरांना मार्गदर्शन करेल, अशा खूप सार्‍या समस्या आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अधिक करून कुणी वळत नाही. ही कला पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आता मोरे यांनी कारागिरांनाही प्रोत्साहन, प्रेरणा देण्यास सुरुवात केली आहे. हे चप्पल बनवण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली तरच कोल्हापुरी चप्पल अस्तित्वात राहील. त्यामुळेच डॉक्टर मोरे या व्यवसायाकडे वळले आहेत.
डॉ. दिलीप मोरे - 7558581451, 9822950246

Monday, May 19, 2025

आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग भारतातील 'नवलाईची हायड्रोपोनिक शेती'


मातीविना शेतीची नवी क्रांती : अक्षय थोरात यांचा प्रेरणादायी प्रवास


आजच्या धकाधकीच्या युगात, शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळवणे, आणि ती सांभाळत आयुष्य काढणे हीच तरुणांची ठरलेली वाट आहे. मात्र, काही धाडसी आणि दूरदृष्टी असलेले तरुण या चौकटीबाहेर विचार करून स्वतःचा वेगळा मार्ग निवडतात. वाळवा (जि. सांगली) येथील अक्षय रामचंद्र थोरात हा असाच एक तरुण, ज्याने मातीशिवाय शेती करून कृषी क्षेत्रात नाव कमावले आहे.

अक्षय थोरातचा जन्म वाळव्याच्या अहिर गल्लीत एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी हुतात्मा किसन अहिर विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून, इस्लामपूरमधील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे त्याने संजय घोडावत युनिव्हर्सिटीमधून बी.टेक पदवी प्राप्त केली. शिक्षणाच्या काळात उद्योगपती संजय घोडावत यांची व्याख्याने ऐकून ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचारसरणी त्याच्या मनात खोलवर रुजली.

परदेशातून मागवल्या जातात विविध बिया 

पदवी घेतल्यानंतर अक्षयने टीसीएस कंपनीत नोकरी स्वीकारली. मात्र, ही नोकरी त्याच्या मनातील विचारांना पुरेशी वाटली नाही. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. याच दरम्यान त्याला ‘हायड्रोपोनिक शेती’ म्हणजेच मातीविना शेती विषयी माहिती मिळाली. या आधुनिक शेतीत मातीऐवजी पाण्यात पोषकद्रव्यांच्या साहाय्याने भाजीपाला, फळे, आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये अक्षय lettuce (लेट्युस) जे सलाडमध्ये वापरतात आणि curly kail  - (कर्ली केल) - ब्युटी प्रोडक्ट वापरतात, याचे उत्पन्न घेतात. यासाठी विविध बिया परदेशातून मागवल्या जातात आणि त्याची रोपे याठिकाणीचं स्वत: तयार केली जातात. या शेतीसाठी घरातील सदस्यच राबतात. 

हायड्रोपोनिक शेती भारतात अजूनही नवलाईची गोष्ट 

हायड्रोपोनिक शेती ही भारतात अजूनही नवलाईची गोष्ट आहे, विशेषतः ग्रामीण भागात. पण अक्षयने धाडसी निर्णय घेतला. मु. पो. बावची, ता. वाळवा, (जि. सांगली) येथे त्याच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी १५ गुंठे जमीनीत पॉलिहाऊस उभारण्याचे ठरवले. एकूण ३०-३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने ‘हुतात्मा बँक’ आणि काही मित्रांकडून मदत घेतली. आर्थिक आव्हानांवर मात करत त्याने २०२४ मध्ये शेतीत पहिले पाऊल टाकले. 

सर्व तांत्रिक बाबी समजून घेतल्या 

सकाळ मीडिया समूहाच्या माध्यमातून पुण्यातील "लँड क्राफ्ट ऍग्रो" कंपनीशी संपर्क साधून अक्षय घोरपडे यांच्या मदतीने पूर्ण तांत्रिक माहिती मिळवली. यानंतर त्याने आपल्या पॉलिहाऊसमध्ये २७ रॅक्स उभे केले आणि भाजीपाला उत्पादनास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे, त्याने आधी बाजारपेठ निश्चित केली आणि मग उत्पादन सुरू केलं – जे पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य होतं.

हार कधीच मानली नाही 

वाळवा, आष्टा आणि इस्लामपूर येथून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अक्षयने थेट मुंबई, पुणे आणि गोवा येथील मोठमोठ्या मॉलना भेटी दिल्या. त्याने “जय किसान हायड्रोपोनिक” या नावाने स्वतःचा ब्रँड तयार केला आणि नामवंत मॉल्समध्ये उत्पादन पोहोचवलं. मायक्रो ग्रीन्स, मशरूम, आणि केमिकल फ्री भाजीपाला यासारख्या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली. वेळोवेळी आई जयश्री, वडील - रामचंद्र थोरात आणि पत्नी रुचिता यांची मदत आणि पाठिंबा मिळाला आहे. 

महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न 

आज अक्षय हायड्रोपोनिक शेतीतून दर महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. एक भाजीपाला उगवण्यासाठी ४५ दिवस लागतात. असे २७ सायकल निर्माण केल्याने दररोज विशिष्ट असे उत्पादन मिळते. हे उत्पनेन भाजीपाला योग्य पद्धतीने पॅकिंग करून तो पुणे, मुंबई, गोवा याठिकाणी पाठवला जातो.

हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण 

जर या शेतीची कुणाला आवड असेल तर त्याला प्रशिक्षणही देण्याचे उत्तम काम अक्षय थोरात करतात.

 अक्षयचा प्रवास केवळ आर्थिक यशापुरता मर्यादित नाही. त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अन्ननिर्मितीचा ध्यास घेतला आहे. विषमुक्त आणि नैसर्गिक उत्पादन देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आज अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ घालवत असताना, अक्षयने स्वावलंबनाचा मार्ग निवडून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. सकस आहार किट तयार करून ते देश-विदेशात निर्यात करण्याच्या विचारात अक्षय आहे. २०२४ मध्ये त्याने १५ लाखांचे  उत्पन्न मिळवले आहे. आता येत्या वर्षात कर्ज फेडून १ कोटींचा बिझनेस करण्याचे उद्दिष्ट अक्षय थोरातने ठेवले आहे. 

- अक्षय थोरात. मो. क्र- ९८६०७१८१६२ 


Friday, May 16, 2025

लाकूड व्यावसायिक - विजय मेस्त्री आणि बंधू

एक काळ होता, जेव्हा न्यू पॅलेसच्या कामासाठी कोकणातून खास कारागीर बोलावले. याच प्रवासात भला मेस्त्री हे कोल्हापुरात आले आणि आज त्यांचीच पुढची पिढी 'मेस्त्री बंधू' कोल्हापुरातचं वास्तव्यास असून आजोबा  भला मेस्त्री यांचा लाकूड व्यवसायाचा वारसा पुढे चालवत आहेत. एक लाकूड व्यावसायिक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू हवी तशी नक्षी, डिझाईनमध्ये करून देण्यात 'मेस्त्री बंधूं'चा हातखंडा आहे.   

विजय गुंडोपंत मेस्त्री (वय ६७) यांच्यासह अन्य तिघे भावंडे लाकूड व्यवसायात आहेत.  मोठे बंधू रत्नाकर, विजय, सुनील,  दिलीप मेस्त्री ही चार भावंडे मूळचे हातखंबा (रत्नागिरी) येथील आहेत. पुढे त्यांनी मोर्वी (पावसच्या पुढे, जि. रत्नागिरी) येथे स्थलांतर केलं. गेले ४० वर्षे विजय मेस्त्री या व्यवसायात आहेत. आज मेस्त्री बंधूंचा 'नावेचा कारखाना' या नावाने लाकूड व्यवसाय सुरु आहे. 

विजय यांचे आजोबा भला मेस्त्री यांनी कोकणात लाकूड व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी कोल्हापुरातील न्यू पॅलेसच्या कामासाठी भला मेस्त्री आणि आणखी दोघा-तिघांना कोल्हापुरातून आमंत्रण आलं. त्यावेळी कोकणात लाकडी कामे करणारी माणसे भेटत असत. त्यामुळे २-३ काष्ठशिल्पींना कोल्हापुरात आणण्यात आले आणि न्यू पॅलेसचे नक्षीदार दरवाजे, लाकडी कामे या काष्ठशिल्पींनी केले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हे मेस्त्री कुटुंब कायमचे स्थायिक झाले.

 'नावेचा कारखाना' म्हणून कोल्हापुरात प्रचलित

विजय यांचे वडील गुंडोपंत यांनी १९५२-५३ च्या जवळपास रत्नाकर बोट अँड फर्निचर वर्क्स नावाने जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे कारखाना उभारला. हाच कारखाना आता 'नावेचा कारखाना' म्हणून ओळखला गेला. मेस्त्री भावंडांचे घर आणि कारखाना एकाच ३ गुंठ्यामध्ये विस्तारले आहे. सुरुवातीला वडील पुराच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या लकडाच्या बोटी बनवत असत. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून या बोटींना मागणी असायची.  तसेच दरवाजे, टेबल, खुर्च्या, किरकोळ फर्निचर ते बनवू लागले. पूर्वी वडील घरोघरी जाऊन फर्निचरची कामे करत होते. १९८६ साली वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी ५० वर्षे हा लाकूड व्यवसाय केला.

 वडिलांनंतर व्यवसायाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ रत्नाकर यांच्याकडे आली होती. सोबतच छोटी भावंडे देखील व्यवसायात मदत करू लागली. सुरुवातीला लाकूड कितीला आणायचे, वस्तू किती किंमतीला विकायच्या, यात अडचणी आल्या. पण मोठे बंधू हुशार असल्यामुळे त्यांनी जबाबदारी पेलून नेली. रत्नाकर, विजय, सुनील, दिलीप या चार भावंडांनी हा व्यवसाय पुढे नेला. सोबतच त्यांची आई शांताबाई यांची मोलाची साथ मिळाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन वयाच्या ११-१२ व्या वर्षांपासून मेस्त्री बंधूंनी लाकूड व्यवसाय करण्यासाठी लागणारे विविध कौशल्य शिकले. काही महिन्यांपूर्वी मोठे बंधू रत्नाकर यांचे निधन झालं होतं. आता विजय, सुनील, दिलीप हे तिघेजण काम पाहतात.

 

मागणी तसा पुरवठा  


विविध वस्तू बनवण्यासाठी टिंबर मार्केटमधून लाकूड आणलं जातं. सर्व वस्तू सागवानमध्ये बनवल्या जातात. क्वचितच किरकोळ वस्तू जंगली लाकडांचा वापर करून केला जातो. सागवान हे टिकाऊ आणि फिनिशिंगसाठी चांगले असते. ऑर्डर येईल तसे काम घेतले जाते. टिंबर मार्केटमध्ये लाकडांची साईज आणि कोणत्या वस्तूसाठी लाकूड हवाई ह्याचं माप दिलं जातं. त्यानंतर लाकूड कटिंग करून मिळते. पुढे त्याची वेगवेगळ्या मशीनवर प्रक्रिया केली जाते. त्यांच्याकडे साधारणतः तीन-चार लाख रुपयांचे  रंधा मशीन, टर्निंग मशीन, झिगझॅग मशीन आणि ड्रिल मशीन आहेत, जे गुजरातमधून आणण्यात आले आहेत.


या लाकडी वस्तूंना अधिक मागणी

 

टेबल, खुर्च्या, पालखी देवघर, डायनिंग टेबल, ऑफिस चेअर, अशा वस्तू तयार केल्या जातात. पालखी आणि देव्हाराला अधिक मागणी आहे. खुर्च्यांचे कुशन, ऑफिस टेबल, सनमाईक लाकडाचे काम करून हवे असेल तर तेही करून दिलं जातं. हवी तशी डिझाईन्समध्ये वस्तू बनवून देणं, हा त्यांचा हातखंडा आहे.

सकाळी साडेनऊ ते दुपारी एक पर्यंत आणि दुपारी अडीच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कारखाना सुरू असतो.

 

अशी केली जाते प्रक्रिया


टिंबर मार्केटमधून हव्या त्या साईचे लाकूड आल्यानंतर पुढे रंधा मशीनवर साईज करावी लागते. त्यानंतर नक्षी किंवा हवे तसे डिझाईन मशीनवर बनवले जाते. पुढे फिटिंग केलं जातं. यासाठी स्क्रू, फेविकॉल, स्पिरिट लाख, पेपर, पॉलिश अशा वस्तू लागतात. पॉलीश दोन कलरमध्ये उपलब्ध असतात. एक लाकडाचा ओरिजनल कलर जो नॅच्युरल असतो आणि दुसरा शिसम. (काळपट रंग) असतो. ग्राहकांना या दोन्हीपैकी जसे हवा तशा कलरमध्ये वस्तू तयार करून दिल्या जातात. कोल्हापूर जिल्हा आणि पंचक्रोशीतून ग्राहक येतात.

 

एक खुर्ची तयार करायला तीन दिवस लागतात. पालखी दोन महिने. दरवाज्याची चौकट दोन दिवसात तयार होते. जर नक्षीदार दरवाजे असतील तर चार ते आठ दिवस लागतात. देवघर बनवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. एक देव्हारा १५ ते १७ हजार रु. ना विकला जातो. पालखी २५ ते ३० हजारांच्या पुढे, चौकट ७ ते ८ हजारांच्या पुढे, दरवाजा १० हजारांच्या च्या पुढे, टेबल ८ हजार, एक खुर्ची (ऑफिस) ८ हजार,  डायनिंग खुर्च्या ७ ते ८ हजारांना विकले जातात.


व्यवसायात हा ठरला टर्निंग पॉईंट

 

कोल्हापूर जि. प.ने सागवानाच्या बोटी घेणे बंद केल्यामुळे व्यवसायात वेगळेपण आलं. लाकडाची जागा फायबर आणि प्लायवूडने घेतली. दरवाजे, चौकटी, टेबल, खुर्च्या प्लास्टिकमध्ये मिळत असल्यामुळे हा व्यवसाय कमी झाला. शिवाय, लाकडाच्या किंमती दुप्पट-तिपटीने वाढल्या.

 

मेस्त्री बंधूंची हिच खासियत

ग्राहकांनी जरी कमी पैसे दिले असले तरी उत्तम लाकूड आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू तयार करून देणं हीच मेस्त्री बंधूंची खासियत आहे. 

- विजय मेस्त्री - ९८२३४३१८३८


Friday, May 9, 2025

अदिती टोपकर-कुलकर्णी

अदिती टोपकर-कुलकर्णी सध्या कोल्हापुरात आपल्या सेंद्रीय खतांच्या उद्योगात आहेत. बी.कॉम, एलएलबीमधून शिक्षण घेतलेल्या अदिती सध्या डिप्लोमा इन गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट करत आहेत. तर एमबीएमधून ॲग्रीकल्चर ऑपरेशन मॅनेजमेंटमधूनही शिक्षण घेतले आहे. पुण्यात सीए करत असताना कोविड काळात त्या कोल्हापुरात परतल्या. त्याचवेळी सेंद्रीय खतांचे उत्पादन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या आई शैला शरद टोपकर सायकॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांसाठी रमाई एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून खतांचे उत्पादन करायच्या. त्यामुळे अदिती यांना खतांचे प्राथमिक ज्ञान आपल्या आईकडून मिळाले.

सुरुवातीलाशेतकऱ्यांना खते पुरवठा केला जायचा. पुढे Urban Line सुरु केली. त्यामध्ये फळझाडे, फळबागा, छोटी झाडे त्यांच्यासाठी सेंद्रीय खते उपलब्ध करून देण्यात आली. (Land Scaping, Home Home gardenings) यासाठी त्यांनी वेबसाईट सुरु केली. सोशल मीडिया टीम, मार्केटींग टीम उभारली. सेंद्रीय खतांचे दोन प्लँट उभारण्यात आले. एक हमीदवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि दुसरा जयसिंगपूर (कोल्हापूर)

साडे तीन ‍वर्ष ते या सेंद्रीय शेणखत उद्योगात आहेत. त्यांनी गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट (शिवाजी विद्यापीठ) येथून प्रशिक्षण घेतले आहे.  फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर अंतर्गत शासनाचे लायसन (उत्पादनाचे) त्यांच्याकडे आहे. त्यांची उद्योगातील टीम देखील कुशल आणि चांगली असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. अदिती यांच्याकडे १० फिक्स कामगार आहेत. प्रोडक्शन टीममध्ये पाच ते सहा लोक काम करत आहेत. दोन ऑफिस स्टाफ, एक टेक्निकल एक्सपर्ट आणि एक मार्केटिंग हेड असे लोक आहेत. मोठे ऑर्डर असेल तर अधिकचे कामगार डेली बेसिसवर घेतले जातात.

प्रोडक्ट लाईनमध्ये शेणखत (देशी गायीचे शेण) कंपोस्ट बाय प्रॉडक्ट म्हणून वापरतात. डी कंपोझिंग कल्चरमध्ये घरातील ओला कचरा असतो. नंतर गोमूत्र निमपेड वापरून कच्च्या मालापासून खते तयार केले जाते.

सुरुवातीला पाच ते सात लाखांची गुंतवणूक करण्यात आली.

एकूण सात प्रकारची उत्पादने आहेत. यामध्ये लिक्विड स्वरूपात ४ आहेत. (गार्डन मॅन्युअल, enriched वर्मी कंपोस्ट) व  पोट मिक्स-३ इत्यादी. टोपकर यांची काही प्रसिद्ध उत्पादने आहेत. यामध्ये जीवामृत लिक्विड टॉनिक, दशपर्णी अर्क, बायो ॲक्टिव्ह.

जीवामृत -जीवामृत लिक्विड टॉनिकला चांगली मागणी आहे. झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी हे वापरतात. जीवामृत हे १५ ते १८ महिने कालावधीपर्यंत टिकतात. यामध्ये गोमूत्र, काळा गुळ वापरले जाते.

दशपर्णी अर्क- हे लिक्विड दुर्मीळ उत्पादन आहे. झाडांना, प्राण्यांना यापासून कोणतीही हानी नाही. शिवाय घरातल्या मुलांना सुद्धा यापासून कोणतेही नुकसान नाही. गुलाब, जास्वंद झाडांसाठी बुरशी लागू नये म्हणून हे वापरले जाते.

बायो ऍक्टिव्ह- झाडांचे फळे उत्तम येण्यासाठी. बियांचे जर्मिनेशन पूर्ण होण्यासाठी वापर होतो. या प्रोडक्टलाही अधिक मागणी आहे.
कोल्हापूर-गोवा येथे या उत्पादनांना खूप मागणी आहे. ही उत्पादने ॲमेझॉनवर देखील उपलब्ध असल्यामुळे भारतात सगळीकडे वितरण होतं. पुण्यात गिरमे फार्म, मगरपट्टा सिटी गार्डन, जगताप नर्सरी, कोल्हापुरातील शिवाजी युनिव्हर्सिटीला देखील खते पुरवली गेली आहेत. शिवाय सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याला सुद्धा खतांचा पुरवठा केला गेलाय. अनेक इंडस्ट्रीजना हा पुरवठा केला जातो. गोव्यातील २० ते ३० नर्सरीत खते पुरवली जातात. यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न २५ ते ५० लाखापर्यंत आहे.

कल्चर जे आहे त्या टेक्नॉलॉजी वापरतात मायक्रोबेस यामध्ये तयार केले जातात आणि नंतर जैविक खत म्हणून कल्चरचा वापर होतो
आधी खते गार्डनिंग सोल्युशन्स देखील जात गार्डन्स मेंटेनन्स त्याने सुरू केलेला आहे लँडस्केपिंग साठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा केला जातो यामध्ये विजिट केलं जातं ठिकाणी त्या त्या ठिकाणी गार्डनचे हेल्थ चेकअप केलं जातं त्यामध्ये मातीचे परीक्षण बुरशी आहे का झाडांची परिस्थिती पाहून त्यांना खते आणि इतर संबंधित गोष्टी पुरवल्या जातात

गार्डन अंडर वन रूप संकल्पना- हा टोकरी यांचा नेक्स्ट प्रोजेक्ट आहे यामध्ये ॲग्री मॉल किंवा ॲग्री शॉपी सुरू करणार आहेत त्यामध्ये झाडे खुरप अवजारे रोपे, कुंड्या मिळतील शिवाय ऑरगॅनिक व्हेजिटेबल्स प्रोजेक्ट सुरू करणार आहेत आणि त्याचबरोबर बुक कॅफे आणि गार्डन शॉपी असा एक प्लांट बेस्ड कॅफे असणार आहे

खते तयार केली गेली की ती लेप टेस्टिंगसाठी पाठवली जातात खतामध्ये एनपीके चे प्रमाण किती आहे म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तपासले जातात

सेंद्रिय खताबाबत अद्यापही जागरूकता कमी आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी भरमसाठ रसायनांचा वापर केला जातो पण आज आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या यामुळे उद्भवल्या आहेत त्यामुळे सेंद्रिय खत वापरणं किती गरजेचा आहे भविष्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने हे समोर येतं केमिकल्स च्या बडीमारामुळे मातीची क्षमता ही कमी होत आहे व्यावसायिक दृष्ट्या पाहिले तसेच उत्पादने खूप महत्त्वाचे आहेत प्राईस देखील त्याची अधिक असल्यामुळे त्यामध्ये जागृती कमी आहे

ठोकळ्यांचा हम करे सेंद्रिय क्रांती हा टॅगच असून त्यांचा उद्योग करण्याचा पहिल्यांदा विचार नव्हता झाडांवर प्रेम करायला गेल्यानंतर त्यांना कामात देखील ऋची निर्माण झाली आणि रोज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही म्हणून त्यांनी हा उद्योग स्वीकारलेला आहे

निर्माल्या असेल तुमच्या वेस्ट मॅनेजमेंट मध्ये टिंटन पेक्षा अधिक गोळा केलं गेलं गणपती उत्सवानंतर आणि त्याचं खतात रूपांतर केले गेले हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता या त्यांनी हे निसर्गाबद्दलच प्रेम व्यक्त केलं या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेत पिके झाडे फळे झाडांनाही खते वापरतात बागा शेतीसाठी सेंद्रिय खते वापरले जातात शेणखत वगैरे नॅनो केमिकल्स असल्यामुळे कशाही प्रकारचे नुकसान होत नाही झाडे आणि मानवी शरीरालाही हानिकारक नाही

सध्या सांगली जत येथे ऑर्गानिक मॅंगो शेतीसाठी काम सुरू आहे एप्रिल मे च्याही लागवड केली जाणार आहे
 Ramaiorganic.com

Monday, March 3, 2025

अनिल काशीकर - दिग्दर्शक असताना जोपासला छंद अन्‌ त्याच व्यवसायातून घेतली भरारी



टिंबर मार्केटचे फर्निचर व्यापारी अनिल वसंतराव काशीकर. कोल्हापुरातील प्रसिद्ध टिंबर मार्केट मधील व्यावसायिक उद्योजक हे प्रसिद्ध लाकडांचे व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारच्या लाकडांपासून वस्तू बनवणे आणि त्याचा पुरवठा करणे, असा त्यांचा उद्योग आहे. टिंबर मार्केटमध्ये विविध कलाकृती बनवण्याचा कारखाना आहे. आणि तयार झालेल्या वस्तूंसाठी स्वतंत्र अशी आर्ट गॅलरी देखील आहे. काशीकर यांनी बनवलेल्या लाकडी वस्तूंसारख्या कलाकृती कोल्हापुरात इतरत्र कुठेही मिळणार नाही. अनिल वसंतराव काशीकर हे लाकडी उत्पादनांचे व्यावसायिक आहेत. शिवाय अनेक चित्रपट, लघुपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपट व्यवसाय सुरु असतानाच त्यांनी लाकडी वस्तूंचे उत्पादन बनवण्याचा छंद जोपासला. हा छंद पुढे दुय्यम व्यवसाय म्हणून नावारुपास आला तो आज त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून अविरतपणे सुरु आहे.  


'धमाल बाळाची' आर्ट गॅलरी

'धमाल बाळाची' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे जो पडद्यावर अद्याप आलेला नाही. यावरूनच त्यांनी धमाल बाळाची आर्ट गॅलरी असे नाव ठेवले. चित्रपट व्यवसायाला १९८४ पासून सुरुवात केली. विविध कलाकृती तयार करण्याची आवड तर होतीच. नंतर १९८६ मध्ये दुय्यम व्यवसाय म्हणून लाकडाचा उद्योग सुरू केला. छोटे-मोठे व्यवसाय करताना लाकूड संबंधित कामे ते करू लागले.  त्यावेळी १२ सुतार हाताखाली घेऊन कामाची सुरुवात केली. अमित वॉल पोस्टर्स नावाचे दुकाने थाटले. लाकडांपासून बनवलेल्या विविध वस्तू, कलात्मक कृती या दुकानात विक्रीसाठी ठेवले जायचे. पुढे जाऊन हे नाव बदलून 'धमाल बाळ्याची' असे नाव ठेवले. आता काशीकर संपूर्णपणे लाकूड उद्योगात उतरले आहेत.

बहुतांशी वस्तू हँडमेड

आर्ट गॅलरीमध्ये कलात्मक वस्तू व कॅनवास पेंटिंग उपलब्ध होतात. काशीकर हे स्वतःच्या कारखान्यात या वस्तूंचे उत्पादन करतात. कॅनव्हास पेंटिंग्ज, कार्विंग, सागवानी फ्रेममधील कलाकृती येथे तयार केल्या जातात. यासाठी सुरुवातीला लाकूड उद्योगधंद्याचा अभ्यास केला. या उद्योगाचा फारसा अनुभव नसताना स्वहिमतीवर हा उद्योग त्यांनी उभारला. चित्रपट व्यवसायातून जे काही पैसे मिळत होते, ते या लाकूड उद्योगात गुंतवले. हळूहळू उद्योग वाढीस लागला आणि होलसेल मालाचा पुरवठा ते करू लागले. सुरुवातीला पाट, पोळपाट, रवी,  विळती अशा घरगुती लागणाऱ्या वस्तू तयार केल्या जात होत्या. यासाठी मुंबईहून 'ड्राय लाकूड' (मशीनद्वारे लाकडातील सर्व पाण्याचा अंश काढून टाकला जातो) आणले जात असे. वस्तू बनवण्यासाठी पाईन लाकूड वापरले जात होते.

हँडमेड वस्तूंची खासियत

आता पाट, पोळपाट, लाटणे, मंदिरे, चौरंग, कॅनव्हासच्या फ्रेम्स, कॅनव्हास पेंटिंग्ज, खेळणी, कोरीव काम केलेल्या वस्तू बनवल्या जातात. या कलात्मक वस्तूंसाठी सागवान लाकडाचा वापर केला जातो. लायटिंगचे देव्हारे, देवदेवतांचे फोटो असणारे कार्व्हींग्ज देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. लायटिंगमध्ये देव्हारे दीड हजार ते ४ हजार पर्यंत किंमती आहेत.कच्च्या मालामध्ये लाकूड, यंत्र, ड्रिल्स, आणि गाईडर्स अशी मशीन्स लागतात. या वस्तू हँडमेड असतात. क्वचितच काही गरज भासल्यास मशीनचा वापर केला जातो .लाकूड घेतल्यानंतर मशीनवर कार्विंग किंवा डिझाईन केलं जातं. सागवान लाकूड टिकाऊ असल्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणत्याही काळात उत्तम टिकते. शिवाय पॉलिश केल्यामुळे या वस्तूंना त्यांची चमक टिकून राहते. पॉलिशमध्ये केमिकल, लाख, चंद्रस असतो. त्यामुळे टिकाऊपणा वाढतो. शिवणसारखी हलक्या लाकडांना वाळवी लागते. पण दर्जेदार लाकूड वापरल्याने वाळवी लागत नाही. वर्षानुवर्षे वस्तू जशी आहे, तशी टिकून राहते.

उत्तम दर्जाचे लाकूड

मुंबईहून ही लाकडे मागवली जातात. चित्रपटाचे शूटिंगसाठी जे सेट तयार केले जातात, शूटिंग संपल्यानंतर तो सेट तोडला जातो. त्या सेटच्या लाकडांचा पुनर्वापर केला जातो. मुळाच सेटचे लाकूड उत्तम दर्जाचे असल्याने त्याचा वस्तू बनवण्यासाठी उपयोग केला जातो. काशीकर कर्नाटकातून सागवान, शिसम होलसेल मागवतात. कोकणातूनही कोकण सागवान मागवले जाते.

उद्योगात आणली प्रयोगशीलता

काशीकर यांनी प्रयोगशीलता आपल्या उद्योगात आणली. विविध प्रयोग करण्यात काशीकर यांचा हातखंडा आहे. आता आर्ट गॅलरी टिंबर मार्केटमध्ये या कलात्मक वस्तूंसोबत इतर काही वस्तू तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये लाकडाच्या पेट्यांना ॲल्युमिनिअमची जाळी बसवली जाते. त्याचा वापर सर्प ठेवण्यासाठी, कोंबड्या, कबुतर, कुत्रे ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर, कांदे-बटाटे, लसूण ठेवण्यासाठी लागणाऱ्या खास पेट्या देखील काशीकर यांनी बनवल्या आहेत. पाटावरील पेंटिंग्जही बनवल्या जातात. ही वस्तू जावळसाठी, शोकेस किंवा वॉल पेपर म्हणून घरात ठेवता येऊ शकतात, तसेच भेटवस्तू म्हणून दिल्या जाऊ शकतात.

अगणित वस्तू बनवाव्या लागतात. कारण कधी आणि किती वस्तूंची मागणी येईल सांगता येत नाही. लग्नसराईत विविध वस्तूंची मागणी अधिक असते. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मालाचा पुर‍वठा केला जातो. घाऊक दुकानदार, व्यापाऱ्यांना या वस्तूंचा पुरवठा केला जातो. किरकोळ विक्री आणि होलसेल विक्री देखील केली जाते. लाकडाच्या या उद्योगात यासाठी अनिल काशीकर यांच्या पत्नीची मोलाची मदत मिळालीय. 

Tuesday, February 25, 2025

सचिन पाटील यांचा ग्लास उद्योग महाराष्ट्रात भारी

             


टिंबर मार्केटमधील सचिन माधवराव पाटील हे एक कोल्हापूरचे मोठे उद्योजक आहेत. सम्राटनगरचे मिरर आणि ग्लासचे डील उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. फर्निचर ग्लास, ॲल्युमिनिअम विंडो ग्लास, टफन ग्लास, काचेवर जे डिकोरेटिव्ह-डिझाईन असतं ते इचिंग, डायमंड पॉलिश, बेंड ग्लास, बिव्हिलिंग सर्व प्रकारच्या काचा हव्या तशा डेकोरेटिव्ह करून देणे अशी डील केल्या जातात. विविध प्रक्रिया करून काचेला एखाद्या दागिन्यासारखा घडवणे, विविध कोरीव नक्षीकाम करणे, पेंटिंग करणे अशा अनेकविध किमया करण्याची कला सचिन यांच्याकडे आहे.

काच हाच उद्योग निवडण्यामागे हे होतं कारण त्याकाळी काच कारखाने अधिक नसल्यामुळे आपण काच उद्योग सुरु करावा, असे त्यांनी ठरवलं. स्पर्धा देखील त्यावेळी कमी होती.




भाड्याच्या दुकानात सुरु केला उद्योग

१५ बाय २० फुटाच्या दुकानात सचिन यांनी या ग्लास उद्योगाची सुरुवात केली होती. खिडक्यांचा उद्योग सुरुवातील उभा केला. त्यामध्ये ॲल्युमिनिअम खिडक्या, लाकडी खिडक्या, फर्निचरची काच, टेबल टॉप, टी-पॉय या वस्तूंचा समावेश होता. या उद्योगाला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद मिळत गेल्याने हाच व्यवसाय पुढे विस्तारला.



असा सुरु झाला काच कारखाना

१९९७ साली सुरु झालेला हा कारखाना सध्या टिंबर मार्केट, कोल्हापूर येथे आहे. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना सचिन यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न साकारलं. वडील वकील होते. सचिन यांनी एम कॉमचे शिक्षण घेतले आहे. भावोजी टाईल्स उद्योगात होते. त्यामुळे इच्छापूर्ती करण्यासाठी ते काच उद्योगात उतरले. एम कॉम २०१६ मध्ये पूर्ण केलं. कायमची नोकरी न करता उद्योजक व्हायचं, असा ठाम निर्णय सचिन यांनी घेतला होता.



इतक्या कमी भांडवलात सुरु केला उद्योग

सचिन यांनी सुरुवातीला २-३ महिने पुण्याला काच दुकानात (पुणा ग्लास डेपो) नोकरी केली. आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वत:चा छोटेखानी दुकान सुरु केलं. सचिन यांनी एक ते दीड लाखात या उद्योगात गुंतवणूक केली. खूप काळजीपूर्वक आणि मेहनतीचे काम असले तरी त्यांनी आपला उद्योग अविरतपणे सुरु ठेवला. ऑर्डर घेणे, बाहेरुन माल तयार करून आणून ग्राहकाला देणे, असे पहिली २-३ वर्ष सुरु होते.




ऑफिस कामासाठी लागणाऱ्या काचा, प्रायव्हसीसाठी लागणारी काच, इंटिरिअर डिझायनर्सच्या मागणीनुसार, तशी काच घडवून तयार केली जाते. काचेचा उद्योग आता इतका मोठा झाला आहे की, त्यामध्ये फिगर ग्लासेस, डिझायनच्या ग्लासेस, मॉलला लागणाऱे प्लेन ग्लास, ऑफिससाठी रिफ्लेक्टिव्ह ग्लास, साऊंड प्रुफ ग्लास, डीजेओ ग्लास (आतील आवाज बाहेर जात नाही आणि बाहेरचा आवाज आत येत नाही), केनोपिला ग्लास (कार पार्किंगसाठी वापरण्यात येणारी काच), अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून प्रतिबंध करण्यासाठीची काच तयार करून दिले जातात. इंपिरिअर ब्ल्यू, फॉरेस्ट जीन या काचांमुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव होतो. इमारतीला स्ट्रक्चर ग्लेझिंगसाठी या काचा वापरल्या जातात. इतकेच नाही तर या काचेपासून वीजबील अधिक येत नाही. शिवाय एसीदेखील कुलिंग पटकन होते.  



विविध राज्यांतून मागवली जाते काच

फिगर ग्लास, प्लेन काच, रिफ्लेक्टिव्ह काच, टफन ग्लास चेन्नई, पेरुमल्लूर, भरुच गुजरात या ठिकाणांहून या काचा मागवल्या जातात.





*कच्ची उत्पादने अन्‌  लाखोंच्या मशीन्सवर काम*

स्टिकर्स, प्रोटरवर्क, कॉम्प्युटर प्रिंट, रंग, गम असे कच्ची उत्पादने लागतात. ही उत्पादने मुंबई आणि अहमदाबादवरून होलसेल मागवली जातात. स्टेटलाईन डायमंड पॉलिश मशीन, बिव्हिलींग मशीन, कॉम्प्रेसर, कटिंग टेबल यासारख्या लाखोंच्या मशीनवर काम केले जाते. मिरर, बाहेरून येणाऱ्या काचेवर प्रक्रिया करून विविध उद्देशांसाठी काच बनवली जाते. चमचा, तलवार, काचेच्या ब्रिक्स, फ्लोअर आणि संपूर्ण बंगला (ग्लास हाऊस) देखील काचेपासून बनवता येतो. सर्व वस्तू काचेपासून बनवता येतात. शोपीस, तुमच्या फोटोची छबी देखील काचेच्या लूकमध्ये मॉडिफाय करून दिले जाते. काच कापण्यासाठी हिरकणीचा वापर केला जातो. (हिऱ्याचे अशुद्ध रुप असलेला धातू हिरकणीमध्ये वापरला जातो) यासाठी बेळगावहून ग्राहक कोल्हापुरात येतात.

खास प्रशिक्षित कामगार

सध्या २२ कामगार असून सर्वजण प्रसिक्षित आहे. सिंगल आणि डबल शिफ्टमध्ये साडे नऊ ते रात्री ८ पर्यंत काम चालते. कोरीव काम करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतलेले कामगार आहेत. ग्लास कलर वापरून पेंटिंग्जदेखील तयार केले जातात.  



या काचांना सर्वाधिक मागणी

सगळ्यात जास्त मागणी प्लेन काचेची (साडे एमएम पासून १९ एमएमएम) आहे. त्यामध्ये ४ बाय ८, ६ बाय ८, ७ बाय १२ अशा साईज असतात. एवढी रेंज मेंटेन करणे कोल्हापुरात कुणालाही जमू शकलेले नाही. खिडक्यांना ४ एमएमचं काच बसवावी लागते. रेलिंगला १२ एमएम काच बसवली जाते. याची सर्वाधिक मागणी आहे. २ एमएमच्या नाजूक काच ते १९ एमएमपर्यंत जाडीची काच बनवता येते. टेबल टॉप, मोठ्या फिश टँक (फरशी, म्युझियम, स्काय वॉक) साठी १९ एमएमची काच बसवली जाते. कोणत्याही प्रकारची नक्षी फोटो प्रतिमा दिली तर ती हुबेहूब काचेवर डिझाईन तयार करून दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, विविध देवदेवतांच्या प्रतिमा, पादुका, निसर्ग चित्रे देखील काचेवर रेखाटता येतात.         


ग्राहकांचा असा जिंकला विश्वास.                         

माऊथ पब्लिसिटी आणि विश्वास या आधारावर व्यवसायाला चालना मिळत गेली. आता संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण, गोवा, बेळगाव, निपाणी, कर्नाटक या ठिकाणी त्यांचे ग्राहक अधिक आहेत. सुरुवातीला एक लाख रुपयांचं कर्ज आणि वडिलांनी दिलेले 50 ते 60 हजार रुपये घेऊन सचिन यांनी व्यवसाय सुरू केला होता. आता सचिन ग्लासची वार्षिक आर्थिक उलाढाल अडीच ते तीन कोटी रुपये आहे वारणा बँक, तळवळकर जिम, रॉयल फ्रीस्टेज, स्टेट बँक, कॉसमॉस बँक, एचडीएफसी एटीएम, सायबर कॉलेजचे प्रोजेक्टसाठी त्यांनी काचेचा पुरवठा केला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर होलसेल आणि रिटेलमध्ये सचिन यांचा ग्लास उद्योग भरारी घेत आहे.                                    

 *उद्योजक सचिन पाटील.                       
मोबाईल - 9822061455*

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...