Tuesday, November 27, 2018

हेमा मालिनींशी लग्‍न करण्‍यासाठी धर्मेंद्र यांनी बदललं होतं नाव


बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनी यांची लव्‍ह स्‍टोरीचे किस्‍से आपण ऐकला असाल. कदाचित तुम्‍हाला माहिती नसेल की, हेमा मालिनी यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्मेंद्र यांनी आपलं नाव बदललं होतं. धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. या दोघांची लव्‍ह स्‍टोरी इंटरेस्‍टिंग आहे. 

dinsta
अभिनेता धर्मेंद्र चित्रपटात येण्‍यापूर्वी त्‍यांचं लग्‍न प्रकाश कौर यांच्‍याशी झालं होतं. धर्मेंद्र १९५८ मध्‍ये चित्रपटात आले. त्‍यांचा पहिला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे.' तर हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट होता...'सपनों का सौदागर'. हा चित्रपट १९६८ मध्‍ये झाला होता. १९७० मध्‍ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. शराफत आणि तुम हसीन मैं जवां या चित्रपटांनंतर दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाल्‍याचे वृत्त येऊ लागले होते. 
dinsta
आपल्‍या पहिल्‍या चित्रपटाबद्‍दल (सपनों का सौदागर) हेमाजी म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'माझा पहिला चित्रपट चालला नाही, तरीही तो रिलीज झाल्‍यानंतर मला बरेच चित्रपट मिळाले, हे एक आश्‍चर्यचं होतं. तो का चालला नाही, मला आजवर कळलेलं नाही. सुदैवाने त्‍याच्‍यानंतर मला मिळालेले बहुतेक चित्रपट चांगले चालले. सपनों का सौदागरच्‍या अपयशाचा शोक कुणालाच नव्‍हता. चित्रपट पूर्ण झाला आणि थिएटरमध्‍ये लागला, हेच माझ्‍यादृष्‍टीने खूप मोठं होतं. मद्रासमधल्‍या माझ्‍या तमिळ चित्रपटाचा जो दु:खद अनुभव आला होता, त्‍यानंतर हिंदीतला पहिला चित्रपट सुरळीत रिलीज झाला, हीच ईश्‍वराची मोठी कृपा.'
dinsta
१९७० नंतर एका मागोमाग एक हेमा आणि धर्मेंद्र एकत्र चित्रपटांत काम करू लागले. दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. धर्मेंद्र विवाहीत होते. परंतु, दुसरं लग्‍न करणं धर्माविरुध्‍द होतं. हेमा मालिनी दाक्षिणात्‍य कुटुंबातील होत्‍या. चित्रपट 'शोले'पर्यंत (१९७५) हेमा-धर्मेंद्र यांच्‍यातील प्रेम वाढत गेलं. 
धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्म बदलला आणि दिलावर खान असं स्‍वत:चं नाव करवून घेतलं. त्‍याचशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी  १९७९ मध्‍ये लग्‍न केलं. 
hema Malini and dharmendra साठी इमेज परिणाम
अनेक चित्रपट केले एकत्र
धर्मेंद्र - हेमा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'नया जमाना,' 'सीता और गीता,' 'राजा जानी,' 'पायल,' 'प्रतिज्ञा,' 'बर्न‍िंग ट्रेन,' 'दिल का हीरा,' 'अलीबाबा और ४० चोर,' 'आसपास,' 'रजिया सुल्‍तान' या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांचा समावेश आहे. 
 

'ड्रीमगर्ल'चे 'ते' सर्वांत मोठे फॅन








आज १६ ऑक्‍टोबर ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचा ७० वा वाढदिवस. हेमा मालिनी यांचे चाहते जगभरात आहेत. परंतु, त्‍यांचा डाय हार्ट फॅन असणारे एक दिग्‍गज व्‍यक्‍ती होते, ते म्‍हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. दुर्देवाने अटलजी आपल्‍यात नाहीत. परंतु, खुद्‍द हेमाजींनी हा खुलासा एका कार्यक्रमात केला होता. कवीमनाचे, साहित्‍यिक, राजकीय नेते अटलबिहारी वाजपेयीजी आपले डाय हार्ड फॅन असल्‍याचं त्‍यांनी म्‍हटलं होतं. 

'सीता और गीता' हा आपला चित्रपट अटलजींनी २५ वेळा पाहिला आहे. त्‍यामुळे जेव्‍हा अटलजींना मी पहिल्‍यांदा भेटले तेव्‍हा ते लाजले होते, असेही हेमा मालिनी म्‍हणाल्‍या होत्‍या. अटलबिहारी वाजपेयी आपले प्रशंसक असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या. अटलजींना 'सीता और गीता' हा चित्रपट इतका आवडला होता की, त्‍यांनी हा चित्रपट २५ वेळा पाहिला आहे. जेव्‍हा अटलजींना पहिल्‍यांदाच भेटले तेव्‍हा ते लाजले होते, असे त्‍या कार्यक्रमात म्‍हणाल्‍या.
Hema Malini film seeta aur geeta साठी इमेज परिणाम
'मी राजकारणात विशेषत: भाजपमध्‍ये येण्‍याचे श्रेय अभिनेते विनोद खन्‍ना यांना जाते. १९९९मध्‍ये गुरुदासपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि विनोद यांनी आपणास प्रचारासाठी बोलवले होते. प्रचारादरम्‍यानचे भाषण ऐकून लालकृष्‍ण अडवाणी यांनी बिहारमध्‍ये प्रचार करण्‍याचे आमंत्रण दिले होते. यानंतर भाजपच्‍या प्रचारासाठी मी जात होते आणि २००३ मध्‍ये त्‍यांनी राज्‍यसभा सदस्‍यत्‍व देऊन माझ्‍यावर जबाबदारी सोपवली होती,' असेही हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या. 
Atal Bihari Vajpayee साठी इमेज परिणाम
हेमा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक आठवणही सांगितली होती. 'जेव्‍हा मी पदाधिकार्‍यांना सांगितले की, मी भाषणात अटलजींचा नेहमीच उल्‍लेख करते. मात्र, त्‍यांना कधीही भेटलेले नाही. यानंतर त्‍यांना भेटण्‍याचा योग आला. मी पदाधिकार्‍यांना विचारलं की, अटलजी व्‍यवस्‍थित का बोलत नाहीयेत? तेव्‍हा ते माझे प्रशंसक असल्‍याचे समजले. १९७२ मध्‍ये आलेला माझा 'सीता और गीता' हा चित्रपट त्‍यांनी २५ वेळा पाहिल्‍याचे त्‍यांनी सांगितले,' असे हेमामालिनी म्‍हणाल्‍या होत्‍या.

ओमपुरी यांचे ९ फेमस डायलॉग्‍ज


'मुल्‍क सेल्‍फ सफिशिएंट नहीं हो गया है... हां कुछ लोग सेल्‍फ-सफिशिएंट जरूर हो गए हैं...बिजली, पानी, घर, दवा, कानून, शिक्षा...कौन सी चीज है जो आम आदमी को नसीब हो गई है? ६० परसेंट लोग अभी भी गरीबी की रेखा से नीचे हैं, और वो सिर्फ गरीब ही बदनसीब भी हैं, ४० बरस हो गए हैं, हाफ ए सेंचुरी...आखिर कब तक इंतजार करें?' 

'माचिस' चित्रपटातील हे संवाद गुलजार यांनी लिहिले होते आणि ओम पुरी यांनी या संवादाला आपला आवाज दिला. केवळ माचिस चित्रपटच नाही तर 'अर्ध-सत्‍य,' 'आक्रोश,' 'चक्रव्‍यूह' असे चित्रपट ओम पुरी यांच्‍या आवाजाने सजले आहेत. 
ओम पुरी यांचे प्रसिध्‍द संवाद
- इस देश में पॉलिटिक्‍स ही सबसे बडा हत्‍यारा है
चित्रपट : देव  
- मुल्‍क सेल्‍फ-सफिशिएंट नहीं हुआ है, हां, कुछ लोग जरूर सेल्‍फ सफिशिएंट हो गए हैं.
चित्रपट : माचिस 
- संसार में शक्‍ति का संतुलन बहुत जरूरी है, आग को पानी का डर बना रहना चाहिए
चित्रपट : मकबूल
- मजहब इंसानो के लिए बनता है, मजहब के लिए इंसान नहीं बनते
चित्रपट : ओह माय गॉड 
- कभी-कभी फैसले सहीं होते है, लकिन उन्‍हें बताने का वक्‍त हाथ से निकल जाता है
चित्रपट : क्‍यो हो गया न 
- अगर अपने आप पर भरोसा हो तो दोस्‍ती और भी कामयाब बना देती है...और, अपने पर शक हो तो बर्बाद भी कर सकती है 
चित्रपट : लंडन ड्रीम्‍स 
- परंपराओं की लकीरें जब धुंधली पड जाती हैं...तो नई लकीरें खींचने से परहेज नहीं करना चाहिए  
चित्रपट : बाबूल
- होता है, अक्‍सर होता, इश्‍क में अक्‍सर ऐसा होता है, चोट कहीं लगती है जाकर, जख्‍म कहीं पर होता है
चित्रपट : मिर्ज्या 
- बुढापे को मौत का नहीं...अकेलेपन का डर होता है 
चित्रपट : इलाका 
ओम पुरी यांचं ६ जानेवारी, २०१७ ला निधन झालं. ते आज आपल्‍यात नाहीत. परंतु, त्‍यांचा अभिनय, त्‍यांचे चित्रपट कायमचे लक्षात राहिले आहेत.  

इंडस्‍ट्रीत श्रीदेवी यांचं शोषण? स्‍मिता पाटील यांनी केलेले खुलासे


काही दिवसांपूर्वी राज बब्‍बर यांचा मुलगा प्रतीक बब्‍बरने आपली आई स्‍मिता पाटील यांचा एक कोट इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केला होता. या कोटमध्‍ये लिहिलं होतं की, 'श्रीदेवी माझी चांगली मैत्रीण आहे. मला प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍याशी बोलण्‍याची इच्‍छा आहे. त्‍यांना मला विचारायचे आहे की, त्‍यांना महिती आहे का की, कशा प्रकारे त्‍यांचं शोषण होत आहे?' प्रतीकने शेअर केलेल्‍या फोटोला पाहून समजलं की, फोटोतील कोट स्‍मिता यांच्‍या एका मुलाखतीतला आहे. 

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत स्‍मिताजी भारतीय सिनेमातील बदल याविषयावर बोलल्‍या होत्‍या. त्‍यावेळी दाक्षिणात्‍य सिनेसृष्‍टीसह श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्‍यावर त्‍यांनी प्रश्‍न उपस्‍थित केले होते. 
स्‍मिता यांनी मुलाखतीत म्‍हटले होते, 'इंकलाबमध्‍ये एक स्‍विमिंग पूल गाणं आहे. मला चिंता होते की, महिला हे सर्व पाहतात. त्‍यांना नक्‍कीच लाज वाटत असणार की, आजकालच्‍या अदाकारा अशा प्रकारे अंगप्रदर्शन करतात. मला वाटतं की, यावर महिला प्रेक्षकांनी आवाज उठवायला हवा. दिल्‍लीमध्‍ये सहेली समूहाने मल्‍याळम चित्रपटांतील अश्‍लील दृश्‍यांविरोधात आंदोलन केले होते. आणि त्‍यावर प्रतिबंध घालण्‍यास ते यशस्‍वी झाले होते.' 
त्‍यानंतर स्‍मिता यांनी श्रीदेवी यांच्‍याबद्‍दल बोलताना म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'श्रीदेवी माझी चांगली मैत्रीण आहे. मला प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍याशी बोलण्‍याची इच्‍छा आहे. त्‍यांना मला विचारायचे आहे की, 'त्‍यांना महिती आहे का की, कशा प्रकारे त्‍यांचं इंडस्‍ट्रीत शोषण होत आहे?' 
'चक्र'दरम्‍यान, मला समजलं नाही की, त्‍या बाथ सीनचा अर्थ काय आहे? हे समजण्‍यासाठी मला चार वर्षे लागली. त्‍यावेळी मी हा सीन करण्‍यास तयार झाले होते. नंतर मला या गोष्‍टीचं खूप दु:ख झालं. परंतु, साऊथ इंडस्‍ट्रीच्‍या अभिनेत्रींना असा विाचर करण्‍याची संधीदेखील मिळत नाही. त्‍यांच्‍या अवती-भोवतीचे लोक त्‍यांना मानसिकरित्‍या तसा विचार करू देत नाहीत. लहानपणापासूनच त्‍यांना अभिनेत्री बनण्‍यासाठी तयार केले जाते. त्‍या सेटवर जातात आणि सर्वकाही आपल्‍या आई-वडिलांच्‍या म्‍हणण्‍यानुसार करतात. त्‍यांचं फक्‍त एकच उद्‍देश असतो की, पैसे कमवणे आणि लग्‍न करणे. त्‍यांना शेवटपर्यंत हे समजत नाही की, इंडस्‍ट्रीत त्‍यांचं कशा प्रकारे शोषण होत आहे,' असे त्‍या म्‍हणाल्‍या. 
त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, या साऊथ इंडस्‍ट्रीच्‍या अभिनेत्री केवळ सेक्‍स -ऑब्‍जेक्‍टस समोर ठेवून काम करतात. त्‍यांना शोषणाबद्‍दल काही वाटत नाही. याच अभिनेत्रींना मोठ्‍या पडद्‍यावर कशा प्रकारे सादर केले जाते आणि त्‍यामुळे प्रेक्षकांवर काय प्रभाव पडेल, याचा विचार केला जात नाही. आता पाहा की, 'तोहफा,' 'मवाली' हिट ठरले. प्रत्‍यक्षात मात्र, ते निराशाजनक आहेत. चित्रपट एक मजबूत माध्‍यम आहे. या माध्‍यमातून खूप काही करता येऊ शकतो. श्रीदेवी एक शानदार अभिनेत्री आहे परंतु, पाहा की ती स्‍वत: काय करत आहे? मी 'जाग उठा इन्‍सान' पाहिला. त्‍यातील त्‍यांचा अभिनय आणि नृत्‍याने मला प्रभावित केलं होतं. मला वाटतं की, त्‍यांनी काही चांगले चित्रपट करायला हवेत. 'सदमा'मध्‍ये देखील त्‍यांचा अभिनय उत्‍कृष्‍ट होता. परंतु, त्‍यानंतर त्‍यांनी 'तोहफा' आणि 'मक्‍सद' यासारखे चित्रपट केले. 
'मला वाटतं की, अभिनेत्रींनी आपण काय करायचं आहे, हे ठरवायला हवं. मी अनेक वर्षांपर्यंत स्‍वत:ला रेखा, हेमा समजले. या भ्रमात मी अनेक चुकीचे चित्रपट साईन केले. परंतु, आता मी स्‍पष्‍ट आहे. जर मी एक अभिनेत्री म्‍हणून यशस्‍वी असेल तर मी यशस्‍वी झाले आहे. मला बॉक्‍स ऑफिसची चिंता नाही, जेथे अभिनेत्री काहीही करतात,' असेही त्‍या म्‍हणाल्‍या.  

इंटिमेट सीनला जया प्रदाने लगावलेली कानाखाली



बॉलिवूडमध्‍ये #MeToo मोहीम तीव्र झाल्‍यानंतर अभिनेते सतर्क झाले आहेत. नुकताच अभिनेते दलीप ताहिल यांनी एका चित्रपटातील रेप सीन शूट करण्‍यास नकार दिला. दिग्‍दर्शकांनी त्‍यांना समजवलं की, हा सीन चित्रपटासाठी गरजेचा आहे. त्‍यावेळी दलीप ताहील म्‍हणाले, 'आधी त्‍या अभिनेत्रीकडून लिहून घ्‍या की, रेप सीन करण्‍याआधी आणि नंतर तिला कोणतीही हरकत नसेल.' 

दलीप यांनी एका मुलाखतीत म्‍हटले की, ''२५-३० वर्षांपूर्वी एका रेप सीन दरम्‍यान घटना घडली होती. एका चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी दिग्‍दर्शकाने मला बाजूला बोलावून म्‍हटले की, रेप सीन खराखुरा वाटलं पाहिजे, अशी ॲक्‍शन करा.' हे ऐकून मी अवाक झालो. मी म्‍हणालो, 'मी एक थिएटर आर्टिस्‍ट आहे, प्रोफेशनल देखील आहे. आणि माझं मन हे करण्‍यास परवानगी देत नाही.' त्‍यावेळी दिग्‍दर्शक म्‍हणाला, 'काय दलीप भाई, कसल्‍या गोष्‍टी करत आहात.' मग मी म्‍हणालो, 'तुम्‍ही जे हे बोलत आहात, ते अभिभनेत्रीसमोर बोलून दाखवा.' हे ऐकल्‍यानंतर दिग्‍दर्शक घाबरला. अभिनेत्रीला ही गोष्‍ट समजल्‍यानंतर ती रडू लागली.'' 
Image result for dalip tahil
एका चित्रपटात दलीप ताहिल आणि जया प्रदा एकत्र काम करत होते. शूटिंग दरम्‍यान, जया प्रदासोबत असं काही घडलं की, दलीप यांना सर्वांसमोर मान खाली घालावी लागली. खरं म्‍हणजे, एका चित्रपटात जया प्रदा यांना दलीप ताहिलसोबत इंटीमेट सीन शूट करायचा होता. जशी शूटची सुरूवात झाली, दलीप ताहील यांनी भान ठेवता ॲक्‍शन करायला सुरुवात केली. जया प्रदा स्‍वत:ला सोडवण्‍याचा प्रयत्‍न करत होती. अखेर जया यांनी दलीपला जोरात  कानाखाली लगावली. जया दलीप यांना म्‍हणाली, 'ही रील लाईफ आहे, रियल लाईफ नाही.' या घटनेमुळे काही वेळ शूटिंग ठप्‍प झाले होते.

मल्लिकाने दुसर्‍या चित्रपटात दिलेले १७ किस सीन!


अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा आज ४२ वा वाढदिवस. तिचा जन्‍म २४ ऑक्‍टोबर १९७६ ला हिसारमधील मोथ येथे झाला. 

मल्लिकाने 'जीना सिर्फ मेरे लिए'मधून बॉलिवूडमध्‍ये पाऊल ठेवलं. मल्लिकासोबत चित्रपटात करीना आणि तुषार कपूर मुख्‍य भूमिकेत होते. त्‍यानंतर मल्‍लिकाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिला ओळख मिळाली ती 'मर्डर' या चित्रपटातून. त्‍यामध्‍ये इम्रान हाशमीची प्रमुख भूमिका होती. 
मल्लिका सध्‍या लाईमलाईटपासून दूदर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमी ॲक्‍टिव्‍ह राहते. आपले बोल्‍ड आणि हॉट फोटोज ती शेअर करत असते. 
मल्लिकाने चित्रपटांशिवाय, टीव्‍ही मालिकामध्‍येही काम केलं आहे.  'साराभाई vs साराबाई', 'द बॅचलैरेट इंडिया' या मालिकांचा समावेश आहे.  'साराभाई vs साराबाई' मधली तिची भूमिका प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली होती. 
मल्‍लिकाने दुसर्‍या चित्रपटात १७ किसींग सीन दिले होते. अभिनेता इमरान हाशमीसोबत 'मर्डर' चित्रपटात बोल्ड सीन दिल्‍यानंतर तिने 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटात देखील बोल्‍ड सीन दिले होते. विशेष म्‍हणजे तिने ६५ वर्षीय अभिनेते ओमपुरी यांच्‍यासोबत इंटिमेट सीन्स दिले होते. या चित्रपटात  मल्लिकाने 'अनोखी देवी'ची भूमिका साकारली होती. 
पारंपरिक जाट फॅमिलीतून असल्‍यामुळे मल्‍लिकाला चित्रपटात येण्‍यासाठी आपल्‍या फॅमिलीविरोधात जावं लागलं होतं. चित्रपटात येण्‍यापूर्वी मल्‍लिकाने अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान सोबत जाहिरातीत काम केलं होतं. विावाहपूर्वीचे आडनाव शेरावत होते. 
खूप कमी लोकांना माहितीये की, मल्लिकाने आयएएस व्‍हावं, असं तिचे वडिल मुकेश लाम्बा यांना वाटत होतं. एका मुलाखतीत त्‍यांनी म्‍हटलं होतं की, 'मला मल्‍लिकाला आयएएस बनवायचं होतं. परंतु, तिला अभिनय क्षेत्रात जायचं होतं. चित्रपटात आली नसती तर ती एअरहोस्‍टेस झाली असती.' 

सारा अली खानचं नाही तर 'या' स्‍टारकिड्‍सचीही बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री!


बॉलिवूड स्‍टार्सची मुले देखील आपल्‍या आई-वडिलांच्‍या पावलावर पाऊल ठेवून सिनेइंडस्‍ट्रीत येताना दिसताहेत. श्रीदेवी यांची मुलगी जान्‍हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्‍टर या स्‍टारकिड्‍सनी इंडस्‍ट्रीत पाऊल ठेवलं आहे. तर जान्‍हवी कपूरची बहिण खुशी कपूर, अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन, सुनील शेट्‍टीचा मुलगा अहान शेट्‍टी आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्‍या पांडे हे बॉलिवूड इंडस्‍ट्रीत येण्‍यास सज्‍ज झाले आहेत. 

जान्‍हवी कपूर 
अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्‍हवी कपूरचा डेब्‍यू चित्रपट 'धडक' २० जुलै २०१८ रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. परंतु, या चित्रपटाला म्‍हणावे तसे यश मिळाले नाही. या चित्रपटात जान्‍हवीसोबत ईशान खट्‍टरची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात नेगेटिव्‍ह भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष राणाने जान्‍हवीबद्‍दल प्रतिक्रिया देताना म्‍हटले होते, 'गेल्‍या काही काळापासून जान्‍हवी इंडस्ट्रीत आहे. तिच्‍याजवळ श्रीदेवींसारखा चार्म नाही. आणि तशा प्रकारचा चार्म आणण्‍याचा प्रयत्‍नही तिने केला नाही. मी तिच्‍यासोबत काम करताना एन्‍जॉय केला. ती खूप प्रोफेशनल आहे. आणि लक्ष देऊन कामही करते. तिच्‍या कामावरून वाटतयं की ती बॉर्न ॲक्‍टर आहे.' 
Image result for janhvi kapoor
'धडक'नंतर जान्‍हवीच्‍या झोळीत आणखी एक चित्रपट पडला. तो म्‍हणजे करण जोहरचा 'तख्त'. हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार आहे. रणवीर सिंग, करीना कपूर खान, जान्हवी कपूर, अनिल कपूर आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांच्‍या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. खुद्‍द करण जोहरने 'तख्त' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
त्‍यानंतर जान्‍हवीला आणखी एक चित्रपट मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी चित्रपटात जान्‍हवी वरुण धवनसोबत रोमान्‍स करताना दिसणार आहे. 'रणभूमी' असे चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट शशांक खैतान बनवत आहेत. वरुण पहिल्‍यांदाच जान्‍हवीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली 'रणभूमी'ची निर्मिती होत आहे. 
सारा अली खान 
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या सारा अली खानचा 'केदारनाथ' हा चित्रपट रखडत का होईना, प्रदर्शनाच्‍या मार्गावर आहे. ‘केदारनाथ’बरोबरच ‘सिम्बा’ देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यापैकी ‘सिम्बा’ हा २८ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. 
Image result for sara ali khan
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘हटके’ चित्रपट करण्यासाठी मोठे धाडस साराने दाखवले. पहिलाच चित्रपट ‘केदारनाथ’मुळे पदार्पण लांबणीवर पडलेल्या सारा अली खान अतिशय काळजीपूर्वक चित्रपटाची निवड करत आहे. 'केदारनाथ,' 'सिम्‍बा' असे चित्रपट सुरुवातीलाच मिळाल्‍यानंतर तिला ‘हिंदी मीडियम-२’साठी विचारण्‍यात आले होते. दिनेश विजान आपला हिट चित्रपट ‘हिंदी मीडियम’चा सिक्वेल बनवणार आहे. परंतु, या सिक्‍वेलसाठी साराने नकार दिला होता. 
Image result for sara ali khan kedarnath
ईशान खट्‍टर 
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्‍ये माजिद मजीदी यांच्‍या 'बियॉन्‍ड द क्‍लाऊड्‍स' या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्‍यात ईशानसोबत मालविका मनमोहन हिने  भूमिका साकारली होती. ए. आर. रहमान यांनी संगीत दिले होते. त्‍यानंतर त्‍याला 'सैराट' या मराठी चित्रपटाचा रिमेक असलेला चित्रपट 'धडक' मिळाला. जान्‍हवी कपूर आणि ईशानची त्‍यात मुख्‍य भूमिका होती. ईशान हा त्‍याच्‍या डान्‍समुळे ओळखला जातो. कारण, ईशानचे डान्‍सचे अनेक व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत. 
मीडिया रिपोर्टनुसार, ईशानला आणखी एक चित्रपट मिळाला होता. परंतु, त्‍याच्‍या एक्‍स गर्लफ्रेंडमुळे त्‍याला हा चित्रपट गमवावा लागला. टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द ईअर-२' ईशान मुख्‍य भूमिकेत दिसणार होता. परंतु, अभिनेत्री तारा सुतारियामुळे त्‍याला हा चित्रपट मिळू शकला नाही. आधी तारा आणि ईशान एकमेकांना डेट करत होते. त्‍यामुळे हे एक्स लव्‍हबर्ड्स चित्रपटात यायला नको, असे करण जोहरला वाटले होते. त्‍यामुळेच ईशानला हा चित्रपट मिळाला नाही.  
प्रनूतन
सलमान खान बॉलिवूडमध्‍ये अनेकांचा गॉडफादर आहे. सलमान लेजेंडरी अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतचा गॉडफादर बनला आहे. सलमान प्रनूतनला बॉलिवूडमध्‍ये लॉन्च करणार आहे. प्रनूतन बहल आपल्‍या डेब्यू चित्रपटात न्यूकमर जहीर इकबालसोबत दिसणार आहे. चित्रपटाला सलमान खान फिल्मस, मुराद खेतानी, अश्विन वर्देच्‍या बॅनर खाली प्रोड्यूस केलं जाणार आहे. हा चित्रपट नितीन कक्कड डायरेक्ट करणार आहे.  
अहान शेट्‍टी 
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी पुढच्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियादवाला अहानला लॉन्‍च करणार आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘RX 100’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत. २०१९च्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे साजिद यांनीच सुनील शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्‍च केले होते. ‘वक्त हमारा है’ या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Related image
अनन्‍या पांडे 
'स्टुडंट ऑफ द ईअर-२'मध्‍ये टायगर आणि तारासोबत अभिनेते चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे. अनन्‍या या चित्रपटातून डेब्यू करत आहे. हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्‍दर्शित करत असून करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली तयार केला जात आहे. अनन्‍या स्‍टारर 'स्‍टुडंट ऑफ द ईअर-२' हा चित्रपट करण जोहरचा २०१२ मध्‍ये आलेला 'स्टुडंट ऑफ द ईअर'चा सीक्वेल आहे. 
अनन्या ही शाहरूखची कन्या सुहाना आणि संजय कपूरच्या कन्येची खास मैत्रीण आहे. या तिघींचे फोटो नेहमीच सोशल मीडियात झळकत असतात. त्यावेळेपासूनच अनन्या चित्रपटसृष्टीत हिरोईन होण्यासारखीच आहे, असे म्हटले जात होते. जुन्या जमान्यातील अभिनेत्री नलिनी जयवंत यांची आठवण करून देणारा तिचा चेहरा आहे. फराह खानने तर ‘चंकीची कन्या आणि इतकी सुंदर?’ असे गंमतीने म्हटले होते!  
Image result for chunky pandey daughter ananya pandey
स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टारकिड्सनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, आर्यन खान, आहाना पांडे यांसारखे स्टारकिड्स येत्या एक-दोन वर्षात मोठ्‍या पडद्‍यावर झळकतील, असे म्‍हटले जात आहे. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...