Tuesday, November 27, 2018

ॲशने नाकारलेले 'हे' ९ चित्रपट झाले सुपरहिट

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९४ मध्‍ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणार्‍या ऐश्वर्याने 'ताल,' 'हम दिल दे चुके सनम,' 'धूम-२,' 'देवदास,' 'रोबोट' 'और 'गुरू' यासारखे दमदार चित्रपट करून इंडस्‍ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, तुम्‍हाला माहिती आहे का? ऐश्वर्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारले होते. 

राजा हिंदुस्तानी
१९९६ मध्‍ये आलेला 'राजा हिंदुस्‍तानी' या चित्रपटात करिश्मा कपूरची भूमिका पहिल्‍यांदा ऐश्वर्या रायला मिळणार होती. ॲशला ऑफर देखील देण्‍यात आली होती. परंतु, तिने नकार दिला. त्‍यामुळे दिग्‍दर्शक धर्मेश दर्शन यांना आमिर खानसोबत करिश्मा कपूरला साईन करावं लागलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. 
Image result for film raja hindustani
कुछ कुछ होता है
१९९८ मध्‍ये 'कुछ कुछ होता है' रिलीज झाला. करण जोहरने टीनाच्‍या भूमिकेसाठी ऐश्वर्याला ऑफर दिली होती. परंतु, ॲशला त्‍यात इंटरेस्‍ट नव्‍हता. नंतर या भूमिकेसाठी राणी मुखर्जीला ऑफर देण्‍यात आली. 
Image result for film kuch kuch hota hai
मुन्नाभाई एमबीबीएस
आपल्‍या करिअरमध्‍ये ऐश्वर्या राज कुमार हिरानीसोबत काम करू शकली नाही. 'मुन्नाभाई एमबीबीएस'साठी ॲशला विचारण्‍यात आले होते. त्‍यावेळी शाहरुख खान 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्‍ये मुख्‍य भूमिका साकारणार होता. परंतु, नंतर शाहरुखेने नकार दिला. त्‍यामुळे संजय दत्तला साईन करावं लागलं आणि त्‍याच्‍यासोबत प्रमुख भूमिकेत ग्रेसी सिंहला घेण्‍यात आलं. 
Image result for film munna bhai mbbs sanjay dutt and gracy singh
वीर-जारा
यश चोप्राचा हिट चित्रपट 'वीर जारा'मध्‍ये आधी ऐश्वर्याला घेण्‍यात येणार होतं. परंतु, तिने या चित्रपटात काम करण्‍यास नाकर दिल्‍यानंतर प्रिती जिंटाला ऑफर देण्‍यात आली. या चित्रपटातील अभिनयासाठी प्रीतीचं भरभरून कौतुकही झालं होतं. 
Image result for veer zaara film
भूल भुलैया
मंजोलिकाच्‍या भूमिकेत दिसलेल्‍या विद्या बालनने 'भूल भुलैया' मध्‍ये दमदार अभिनय केला होता. हा चित्रपट आधी ॲशला मिळणार होता. परंतु, तिने स्‍वत:च नकार दिल्‍याने तिच्‍या हातातून हा चित्रपट गेला. 
Image result for bhul bhulaiya film
नमस्ते लंडन
विपुल शाहचा 'नमस्ते लंडन' चित्रपट हिट ठरला होता. त्‍यात कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका होती. ऐश्‍वर्याने चित्रपट सोडल्‍यामुळे कॅटला या चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. 
Related image
दोस्ताना
ऐश्वर्याला 'दोस्ताना' मध्‍येही मुख्‍य भूमिका मिळाली होती. ही भूमिका तिने नाकारल्‍याने प्रियांका चोप्राला घेण्‍यात आले. 'देसी गर्ल' प्रियांका चित्रपटामुळे फेमस झाली. 
Related image
चलते चलते
चित्रपटात राणी मुखर्जीच्‍या आधी ॲशला ऑफर देण्‍यात आली होती. याच चित्रपटाच्‍या सेटवर सलमान खानने गोंधळ घातल्‍यानंतर ॲशने हा चित्रपट सोडला होता.
Related image
क्रिश
ॲशला 'क्रिश'साठी विचारण्‍यात आल्‍यानंतर तिने नकार दिला. तिच्‍या जागी प्रियांका चोप्राला रिप्‍लेस करण्‍यात आले होते. 
Image result for film krrish

सुष्मिता-ऐश्वर्यात झाला होता टाय...


मिस वर्ल्डचा मुकुट परिधान करून ऐश्वर्या रायने संपूर्ण जगात भारतीय सुंदरतेचे दर्शन घडवलं. परंतु, १९९४ मध्‍ये 'फेमिना मिस इंडिया'च्‍या स्‍पर्धेत सुष्मिता सेनने दिलेल्‍या एका उत्तरामुळे ऐश्‍वर्याला 'मिस इंडिया'चं मुकूट मिळवता आलं नाही. ऐश्‍वर्या केवळ २ गुणांनी हारली होती. 

फेमिना मिस इंडियामध्‍ये ९.३३ गुणांवर टाय 
गोव्‍यात झालेल्‍या स्‍पर्धेत ऐश्‍वर्या आणि सुष्‍मिता सेनला एकसारखे गुण मिळाले होते. दोघींच्‍यात ९.३३ गुणांवर टाय झाला होता. जजेसने टाय ब्रेक करण्‍यासाठी दोघींना एक-एक प्रश्‍न विचारला होता. ज्‍यामध्‍ये ऐश्वर्याला विचारण्‍यात आलं होतं की, 'जर तुला तुझ्‍या पतीमध्‍ये कोणते गुण आहेत, हे शोधायचं असेल तर तू काय करशील? समज, तुला द बोल्ड ॲण्‍ड ब्यूटीफुलचे रिज फॉरेस्टर आणि सांता बारबराच्‍या मेसन कॅपवेल यांच्‍यापैकी कुणाला निवडशील?' ऐश्वर्याने उत्तर दिलं...'मेसन.' ती म्‍हणाली, 'कारण आमच्‍या दोघांत अनेक सारख्‍या गोष्‍टी आहेत. मेसनचा स्‍वभाव खूप केअरिंग आहे आणि त्‍यांचा सेन्‍स ऑफ ह्यूमर देखील चांगलं आहे.' 
Image result for sushmita and aishwarya
सुष्मिताने या प्रश्‍नाचं उत्तर देऊन जिंकलं मुकुट 
सुष्मिता सेनला विचारण्‍यात आलं होतं की, 'आपल्‍या देशातील टेक्सटाईल हेरिटेजबद्‍दल काय जाणतेस? हे किती जुनं आहे आणि तुला घालायला आवडेल?' सुष्‍मिता म्‍हणाली, 'मला वाटतं की, हे सर्व महात्मा गांधी यांच्‍या खादीपासून सुरू झालं होतं. तेव्‍हापासून याचा दीर्घकाळ प्रवास आहे. परंतु, टेक्साटाईल हेरिटेजच्‍या मूळ गोष्‍टी तेथूनच आहेत.' 
मिस इंडियाच्‍या फायनल राउंडमध्‍ये ऐश्वर्या-सुष्मिता या दोघींच्‍यामध्‍ये टक्कर पाहायला मिळाली होती. सुष्मिताला विचारण्‍यात आलं होतं की, 'जर तू एखाद्‍या ऐतिहासिक घटनेला बदलू शकली असतीस तर ती कुठली गोष्‍ट असती?' यावर सुष्मिताने म्‍हटलं होतं, 'इंदिरा गांधी यांचा मृत्यू'. 
Related image
या एका उत्तराने सुष्मिताचं भाग्‍य उजळलं आणि ती 'मिस इंडिया' बनली. 
टाय ब्रेकअपनंतर 'मिस इंडिया'चा मुकूट सुष्‍मिता सेनला परिधान करण्‍यात आला. (१९९४) ऐश्‍वर्याला केवळ २ गुणांनी ही स्‍पर्धा जिंकता आली नव्‍हती. 
Image result for sushmita and aishwarya
स्‍पर्धेत होस्‍ट म्‍हणून हे उपस्‍थित
स्‍पर्धेत होस्ट म्‍हणून दिलीप ताहिल उपस्‍थित होते. तर माजी मिस इंडिया स्‍पर्धक नम्रता शिरोडकर, पूजा बत्रा आणि तरविंदर कौर देखील उपस्‍थित होते. 
Related image
ऐश्वर्या रायचा जन्‍म १ नोव्‍हेंबर १९७३ रोजी मंगळुर, कर्नाटकात झाला. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज मरीन इंजिनिअर होते. तिच्‍या आईचे नाव वृंदा राय. त्‍या लेखिका आहेत.  ऐश्वर्याचा एक मोठा भाऊ देखील आहे. त्‍याचं नाव आदित्य  राय असं आहे. ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलु आहे. शिवाय, तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषा देखील येतात. ऐश्वर्या रायचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता ७वी पर्यंत) हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्‍ये झालं. त्‍यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईत आले. मुंबईत ॲशने सांताक्रूज येथील आर्य विद्या मंदिर आणि नंतर डी. जी. रुपारेल कॉलेज, माटूंगा येथे शिक्षण घेतलं. शिक्षणासोबत तिने मॉडलिंगकडे देखील लक्ष दिलं. 
ऐश्वर्याला मॉडलिंगचा पहिला प्रस्ताव कॅमलिन कंपनीकडून मिळाला होता. त्‍यावेळी ॲश नववीत शिकत होती. नंतर ती कोक आणि पेप्सीच्‍या जाहिरातीत दिसली. 

... म्‍हणून ॲश-सलमानचा झाला ब्रेकअप

सलमानच्‍या आयुष्‍यात अनेक अभिनेत्री आल्‍या. पण, अशी एक अभिनेत्री त्‍याच्‍या आयुष्‍यात आली, जिची सर्वांत अधिक चर्चा रंगली. ती सुंदर अभिनेत्री म्‍हणजे ऐश्वर्या राय. ॲश सलमानच्‍या आयुष्‍यात आली आणि सलमानच्‍या प्रेमकहाणीला पुन्‍हा सुरुवात झाली. रुपेरी पडद्‍यावर देखील सलमान ॲशची प्रेम कहाणी हिट ठरली. सलमान खान आणि ऐश्वर्याची लव्‍ह स्टोरी बॉलिवूडमधील चर्चित प्रेमकहाणींमध्‍ये न विसरण्‍याजोगी आहे. आज ऐश्वर्या रायचा वाढदिवस. त्‍याऔचित्‍याने सलमान आणि ऐश्‍वर्याच्‍या रिलेशनशीपबद्‍दल जाणून घेऊयात. 

Image result for aishwarya rai and salman khan
सलमानशी असं सुरू झालं नातं 
सलमान आणि ऐश्वर्याची प्रेम कहाणी १९९७ मध्‍ये सुरू झाली होती. सलमान खान सुपरस्टार होता. तर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री केली होती. त्‍यावेळी सलमान आणि सोमीच्‍या अफेअरची चर्चा रंगली होती. सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमान सोमीबद्‍दल खूप सीरिअस होता आणि तिच्‍याशी लग्‍न देखील करणार होता. सलमानची नजर ऐश्‍वर्यावर पडली. आणि सलमानने सोमी अलीचा साथ सोडला.
एका मासिकाने दिलेल्‍या माहितीनुसार, मन्‍सूर अलीचा चित्रपट 'जोश'मध्‍ये ऐश्‍वर्याची मुख्‍य भूमिका होती. या चित्रपटात काम करण्‍यास सलमानने यासाठी नकार दिला, कारण ऐश्वर्याच्‍या भावाची भूमिका सलमानला करायची होती. नंतर ॲशच्‍या भावाची भूमिका शाहरुख खानने साकारली. 
Related image
सलमानने ऐश्वर्याची मदत केली
सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमानने ऐश्वर्याची इंडस्‍ट्रीतील नौका पार केली. तिचं करिअर घडवण्‍याची जबाबदारी सलमानने आपल्‍यावर घेतली. त्‍यामुळे ऐश्‍वर्याला 'हम दिल चुके सनम' या चित्रपटात मोठा ब्रेक मिळाला. सलमानचे मित्र संजय लीला भन्‍साळी यांनी ॲशला या चित्रपटात संधी दिली. येथून सलमान आणि ऐश्वर्याच्‍या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. चित्रपटाच्‍या शूटिंग वेळी दोघांची जवळीक वाढली. 
सलमानचे मित्र ॲशला म्‍हणत होते वहिनी भाभी
ऐश्वर्या राय आणि सलमानच्‍या अफेअरच्‍या चर्चा रंगू लागल्‍या होत्‍या. ॲश सलमानच्‍या कुटुंबीयांना देखील भेटत असे. सूत्रांच्‍या माहितीनुसार,  सलमानचे मित्र ॲशला वहिनी म्‍हणून बोलावत असत. परंतु, ॲशच्‍या आई-वडिलांना तिची सलमानसोबत असलेली मैत्री आवडत नव्‍हती. इतकचं नाही तर त्‍यांनी ॲशला सलमानशी दूर राहायला सांगितलं होतं. त्‍यानंतर, ॲश इतकी निराश झाली की, घर सोडून एकटी राहू लागली. 
Related image
सलमान-ॲशच्‍या नात्‍यात फूट
सूत्रांच्‍या माहितीनुसार, एक दिवस मध्‍यरात्री सलमान ॲशच्‍या घरी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. संतापलेल्‍या सलमानने १९ व्‍या मजल्‍यावरून उडी मारण्‍याची धमकी देखील दिली. मध्‍यरात्री ३ वाजेपर्यंत सलमान दरावाजा वाजवत होता. सलमानच्‍या हातातून रक्‍त येत होतं, असेही काहीजण म्‍हणतात. सलमानने घातलेल्‍या गोंधळामागे कारण होतं, ते म्‍हणजे सलमानला ॲशशी लग्‍न करायचं होतं. परंतु, ॲशची इंडस्‍ट्रीत चलती होती. त्‍यावेळी तिला लग्‍न करायचं नव्‍हतं. नंतर ॲशच्‍या वडिलांनी सलमानविरोधात पोलिस ठाण्‍यात केस देखील दाखल केली होती, असे वृत्त समोर आले होते. 
Image result for aishwarya rai and salman khan break up
सलमान-ॲशचा ब्रेकअप
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ॲश-सलमानची मैत्री असताना सोमी अलीचा सलमानला फोन आला. सोमी अलला आपल्‍या वडिलांच्‍या ऑपरेशनसाठी मदत हवी होती. सलमान ऐश्वर्याला न सांगताच अमेरिकेला निघून गेला. ज्‍यावेळी ॲशला ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी नाराज झालेल्‍या ॲशने नातं संपवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यानंतर सलमानने ऐश्वर्याचा चित्रपट 'कुछ ना कहो'च्‍या सेटवर पुन्‍हा एकदा गोंधळ घातला. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्‍य भूमिकेत होता. सलमानने ॲशच्‍या गाडीची तोडफोड देखील केली होती. त्‍यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. 
अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटांमध्‍ये अभिनय केला आहे. दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' आणि 'कुछ न कहो'मध्‍ये काम केलं होतं. चित्रपटामुळे ॲश-अभिषेकची केवळ मैत्री होती.
Image result for aishwarya rai and salman khan
अभिषेकने ॲशला असं केलं प्रपोज
त्‍यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने 'बंटी आणि  बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्‍यात एकत्र काम केलं. सूत्रांच्‍या माहितीनुसार, या गाण्‍याच्‍या शूटिंगनंतर दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. 
प्रपोज केल्‍यानंतर लग्‍न
ॲश-अभिषेकने मणिरत्‍नम यांच्‍या 'गुरु' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आणि चित्रपटाच्‍या प्रीमियरनंतर टोरांटोमध्‍ये अभिषेकने अॅशला लग्‍नासाठी प्रपोज केलं. ॲशनेही पटकन होकार दिला. २० एप्रिल २००७ मध्‍ये दोघे विवाहबंधनात अडकले. 

शाहरुख चित्रपटात कसा आला, माहिती आहे का?


छोट्‍या पडद्‍यावरून आपल्‍या करिअरची सुरुवात करणार्‍या शाहरुखला 'बॉलिवूडचा बादशाह' म्‍हणून ओळख निर्माण करायला बराच संघर्ष करावा लागला. आजदेखील लाखो-करोडो लोकांच्‍या मनावर रुजी घालणारा तो शाहरूखच आहे. 

चित्रपट इंडस्‍ट्रीत 'किंग खान' अशी ओळख असलेल्‍या शाहरुखचा जन्‍म २ नोव्‍हेंबर १९६५ रोजी दिल्‍लीत झाला. त्‍याचे वडिल टान्‍सपोर्ट व्‍यवसायाशी संबंधित होते. 

शाहरुखने जामिया मिलिया इस्‍लामिया विद्‍यापीठातून पदवी घेतली. 
Image result for shahrukh khan in tv serial circus
१९९८ मध्‍ये शाहरुख खानने टीव्‍हीवरील 'फौजी' मालिकेतून करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्‍ये आपले स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो मुंबईत आला. अजीज मिर्झा यांनी शाहरुखला आपली मालिका सर्कसमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. त्‍याचवेळी हेमा मालिनी यांना त्‍यांचा पहिलाच दिग्‍दर्शित चित्रपट 'दिल आशना है'साठी नायक म्‍हणून नव्‍या चेहर्‍याचा शोध सुरू होता. त्‍यात दिव्‍या भारतीची प्रमुख भूमिका होती. 
Related image
शाहरुखला ज्‍यावेळी ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी आपल्‍या मित्रांच्‍या मदतीने या चित्रपटाच्‍या स्‍क्रिन टेस्‍टसाठी जाण्‍याचा शाहरुखने निर्णय घेतला. 
हेमा मालिनी यांना अखेर नायक सापडला...
हेमा मालिनी यांना मात्र, 'त्‍या' अज्ञात नायकाबद्‍दल खात्री वाटत नव्‍हती. ठरवल्‍याप्रमाणे हेमा मालिनी हैदराबादचा कार्यक्रम आटोपून मुंबईला आल्‍या. सवयीनुसार, घरी आल्‍यानंतर हेमा यांनी टीव्‍ही लावला. चॅनेल बदलत असताना अचानक टीव्‍हीचा रिमोट 'फौजी' मालिकेजवळ येऊन थांबला. तिथे त्‍यांना एक लक्षवेधी चेहरा दिसला होता. त्‍या तरुण नटाचा चेहरा असामान्‍य देखणा नव्‍हता; पण एक वेगळाच उत्‍साह 'त्‍या' तरुणात दिसत होता. हेमा यांनी तत्‍काळ ऑफिसमधल्‍या माणसांना त्‍या नटाचं नाव आणि पत्ता शोधायला सांगितलं. हेमा यांच्‍या स्‍टाफने त्‍या नटाचा पत्ता शोधून काढला. नाव होतं-शाहरुख खान. पत्ता-दिल्‍ली. त्‍याचा फोन नंबरही मिळाला होता. त्‍यानुसार, प्रभा यांनी (हेमा यांची मावस बहिण) शाहरुखला फोन लावला. खुद्‍द शाहरुखने फोन उचलला. हेमा यांच्‍या ऑफिसमधून फोन आलाय, याचा शाहरुखला विश्‍वासच बसेना. आपली कुणीतरी चेष्‍टा करतयं, असं वाटल्‍याने शाहरुखने प्रभा यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खरचं हा फोन हेमा यांच्‍या हुकमाप्रमाणे करण्‍यात आलाय, हे पटवून देण्‍यासाठी प्रभा यांना तारेवरची कसरत करावी लागली. अखेर प्रभा म्‍हणाल्‍या, 'तुला मी हेमाचा डायरेक्‍ट नंबर देते. तू स्‍वत:च फोन करून खात्री करून घे. मग शाहरुखने होकार देत हेमा यांना फोन केला.' 
Image result for shahrukh khan and hema malini
जेव्‍हा हेमा यांना पहिल्‍यांदाच भेटला शाहरुख
त्‍यानंतर दोनच दिवसांनी शाहरुख खान मुंबईत हेमा यांच्‍या घरी चाचणीसाठी आला. हेमा यांना त्‍याचा अभिनय माहित होता. त्‍याचा अभिनय त्‍यांना आवडलाही होता. हा नट मोठ्‍या पडद्‍यावर कसा दिसेल, याचा विचार हेमा यांच्‍या डोक्‍यात सुरू होता. त्‍यांची प्रत्‍यक्ष भेटही झाली. शाहरुखच्‍या चेहर्‍यावर तेज होतं, आत्‍मविश्‍वास होता, ते हेमा यांना आवडलं. 
सारखे कपाळावर येणार्‍या त्‍याच्‍या केसामुळे त्‍याचा चेहरा झाकून जात होता. हेमा त्‍याला म्‍हणाल्‍या, 'तू जरा केस एका जागी ठेवशील का?' लगेच शाहरुखने केसातून हात फिरवला. आता तो व्‍यवस्‍थित दिसत होता. परंतु, हेमा यांनी मेकअप मॅनला बोलावलं. त्‍याने शाहरुखच्‍या केसांना जेल लावून केस नीटनेटके बसवले. हे सुरु असताना धर्मेंद्र यांची एन्‍ट्री झाली. 'हा माझ्‍या नव्‍या सिनेमाचा हिरो- शाहरुख खान' असे म्‍हणत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्‍याशी शाहरुखची ओळख करून दिली. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍या चॉईसला दाद दिली. त्‍यावेळी 'दिल आशना है'साठी शाहरुखची नायक म्‍हणून निवड झाली. 
Image result for shahrukh khan hair
याबद्‍दल एकदा हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या, 'फौजी बनवणार्‍यांना शाहरुख चांगला नट आहे, हे लगेचं कळत होतं. पण, तो एक दिवस देशाचा इतका मोठा स्‍टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसले.' 
थाटामाटात चित्रपटाचा मुहूर्त
मुंबईच्‍या एका हॉटेलमध्‍ये मोठ्‍या थाटामाटात हेमा यांच्‍या चित्रपटाचा मुहूर्त झाला. 'दिल आशना है' असं चित्रपटाचं नाव. 'दिल आशना है'ची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्‍या 'लेस' या गाजलेल्‍या कादंबरीवर आधारीत होती. तीन स्‍त्रियांमध्‍ये विशिष्‍ट परिस्‍थितीत निर्माण होणार्‍या भावबंधनाची ती कथा आहे. या चित्रटासाठी हेमा यांनी डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया या त्‍याकाळी गाजलेल्‍या अभिनेत्री आणि दिव्‍या भारतीची निवड केली होती. हा चित्रपट स्‍त्री प्रधान होता. तर शाहरुख खान, कबीर बेदी, जीतेंद्र, असीफ हे मुख्‍य नायक होते. स्‍त्री प्रधान चित्रपट म्‍हणजे त्‍याकाळी 'भलतचं काहीतरी' असं असायचं. त्‍याची या नायकांना जाणीव होती. याबद्‍दल हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'कुणी नाराज नव्‍हतं. सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. हे नट सेटवर आले की, वातावरण बदलायचं. मी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करीत होते, तरीही कॅमेर्‍यातून त्‍यांच्‍याकडे पाहताना माझ्‍यातली अभिनेत्री जागी व्‍हायची आणि त्‍यांचं निरीक्षण करायची. आणि या नात्‍यानंसुध्‍दा कॅमेर्‍यासमोर उभं राहून त्‍यांच्‍या चेहर्‍यावरचे भघव न्‍याहाळण्‍याऐवजी कॅमेर्‍यामागून ते वाचणं वेधक वाटत होतं.'
१९९१ मध्‍ये 'दिल आशना है' रिलीज झाला.
Related image
दरम्‍यान, दीवानामध्‍ये काम करण्‍याची शाहरुखला संधी मिळाली. ऋषी कपूर या प्रसिध्‍द अभिनेत्‍याबरोबर काम करून शाहरुखने त्‍याला मिळालेल्‍या संधीचं सोनं केलं. 'दीवाना'साठी शाहरुखला फिल्‍मफेअर पुरस्‍कार देखील मिळाला. त्‍याचवेळी दिग्‍दर्शक अली अब्‍बास यांची नजर शाहरुखवर पडली. अली अब्‍बास यांना इंग्रजी कादंबरी 'ए किस बिफोर डेथ'वर एक चित्रपट काढायचा होता. शाहरुखला त्‍यांच्‍या चित्रपटात घेण्‍यात आलं. १९९३ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'बाजीगर' सुपरहिट ठरला. त्‍यामुळे इंडस्‍ट्रीत शाहरुखला वेगळी ओळख मिळाली. 
१९९३ मध्‍ये यश चोप्रा यांच्‍या 'डर' चित्रपटात काम करण्‍याची संधी शाहरुखला मिळाली. 'क...क...क...किरण' हा शाहरुखचा डायलॉग चांगला गाजला. १९९५ मध्‍ये यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'मध्‍ये काम दिलं. हा चित्रपट ब्‍लॉकबस्‍टर ठरला. 
निर्मिती क्षेत्रात पदार्पण
१९९९ मध्‍ये शाहरुख खानने चित्रपट निर्मितीकडे लक्ष वळवले. अभिनेत्री जूही चावलासोबत मिळून शाहरुखने ड्रीम्‍स अनलिमिटेडची स्‍थापना केली. या बॅनरअंतर्गत शाहरुखने 'फिर भी दिल है हिंदुस्‍तानी' चित्रपट बनवला. चांगली पटकथा आणि अभिनय असतानाही बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही. याच बॅनरखाली त्‍यांनी 'अशोका' चित्रपट बनवला. हा देखील चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. परंतु, तिसरा चित्रपट 'चलते चलते' सुपरहिट झाला. 
२००४मध्‍ये शाहरुख खानने 'रेड चिली एंटरटेनमेंट' कंपनीची निर्मिती केली. या बॅनरखाली 'मैं हू ना' बॉक्‍स ऑफिसरवर आणला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्‍यानंतर 'पहेली,' 'ओम शांती ओम,' 'बिल्‍लू बार्बर,' 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'हॅप्‍पी न्‍यू इयर,' 'दिलवाले' यासारखे चित्रपट बनवले. 
२००७ ला त्‍याचा लंडनमध्‍ये मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभा करण्‍यात आला. 
Image result for shahrukh khan statue in london madame tussaud museum
सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता
शाहरूखला त्‍याच्‍या सिनेकरिअरमध्‍ये आठ वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता फिल्‍म फेअर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. शाहरुखची ऑनस्‍क्रीन जोडी काजोल आणि माधुरी दीक्षित यांच्‍यासोबत चांगली जमली. 
आता शाहरुखचा 'जीरो' चित्रपट रिलीज होण्‍याच्‍या मार्गावर आहे. आनंद एल राय यांच्‍या दिग्‍दर्शनाखालील 'जीरो'मध्‍ये शाहरुखने बुटक्‍या व्‍यक्‍तीची भूमिका केली आहे. 
 

सलमानने ॲशसाठी सेटवर घातलेला गोंधळ

अभिनेत्री ऐश्वर्या रायला मिस वर्ल्डचं मुकूट १९९४ मध्ये मिळालं. मिस वर्ल्ड जमैकाची रहिवासी असणारी लिसा हन्नाने घातलं होतं. ऐश्‍वर्याने आंतरराष्‍ट्रीय कॉन्‍ट्रॅक्‍ट अंतर्गत एक वर्षापर्यंत मॉडेलिंग, चित्रपटात काम करू शकत नव्‍हती. विशेष म्‍हणजे याकाळात तिच्‍याकडे २४ चित्रपटांचे प्रस्‍ताव आले होते. त्‍यानंतर ऐश्‍वर्या चित्रपटात आली. मणीरत्‍नम यांचा 'इरुवर' या तामीळ चित्रपटातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. तिचे एकामागोमाग एक तीन चित्रपट फ्‍लॉप ठरले. परंतु, ऐश्‍वर्याने हार मानली नाही. 

Image result for aishwarya rai
१९९९ मध्‍ये अभिनेता अक्षय खन्‍नासोबत तिने 'आ अब लौट चले' चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्‍यानंतर एकापेक्षा एक चित्रपट तिला मिळत गेले. संजय लीला भन्‍साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट केला. त्‍यात अजय देवगण आणि सलमान खान यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये तिने यशाचं शिखर गाठलं. सुभाष घई यांचा 'ताल' आणि भन्‍साळी यांच्‍या 'देवदास'ने ऐश्‍वर्याच्‍या अभिनयात चारचाँद लावले. ऐश्वर्या दुसरी इंडियन मॉडल आहे. ऐश्वर्या राय बच्चनला २०१४ च्‍या 'मिस वर्ल्ड पीजेंट' दरम्‍यान 'सक्सेसफूल मिस वर्ल्ड'ने गौरवण्‍यात आलं होतं. डिसेंबर २०१४ मध्‍ये मिस वर्ल्ड स्‍पर्धेत ऐश्‍वर्याला चीफ गेस्ट म्‍हणूनही आमंत्रित करण्‍यात आलं होतं.  
Related image
'देवदास'मुळे नवी ओळख
ऐश्वर्या राय आणि शाहरुख खानने एकत्र ‘देवदास’ चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. परंतु, एक वेळ अशी होती की, ॲश आणि शाहरूख एकमेकांकडे पाहायचे देखील नाहीत. शाहरुखने ॲशला आपल्‍या चित्रपटातून बाहेरचा रस्‍ता दाखवला होता. शिवाय, तिच्‍यासोबत सर्व संबंध संपुष्‍टात आणले होते. 
Image result for aishwarya rai and shahrukh khan in devdas
खरंतरं, दोघे एकमेकांच्‍यासोबत बोलत नव्‍हते.  सलमान खानमुळे ॲश-शाहरुख बोलत नसल्‍याचं म्‍हटलं जात होतं. तब्‍बल १४ वर्षे शाहरुख आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत बोलत नव्‍हते. त्‍यावेळी शाहरुख आणि सलमान खानची घट्‍ट मैत्री होती. त्‍यावेळी ऐश्वर्या सलमानला डेट करत होती. सलमान ॲशसोबत राहायचा नेहमी प्रयत्‍न करायचा. कधी-कधी भांडण देखील करायचा. त्‍यादिवशीही असाच वाद झाला. 
Related image
ऐश्वर्या शाहरुखसोबत 'चलते चलते' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्‍यावेळी सलमानने सेटवर जाऊन गदारोळ घातला. ॲशच्‍या गाडीची देखील तोडफोड केली. शाहरुखने कुठलाही विचार न करता आपल्‍या मित्राचे समर्थन केले. आणि ॲशला 'चलते चलते'मधून डच्‍चू दिला. इतकच नाही तर आणखी ४ चित्रपटांतून ऐश्वर्याला बाहेर केले. 
Related image
या प्रकारामुळे ऐश्वर्याला दु:ख झालं. तिच्‍या करिअरवर देखील बराच परिणाम झाला. शाहरुख आणि सलमानची मैत्री तुटल्‍याच्‍या काही वर्षांनंतर ॲशची माफी मागितली. आज शाहरुख-ॲशची चांगली मैत्री आहे. 
'चलते चलते'मधून बाहेर केल्‍यानंतर देखील ॲशने शाहरुखसोबत 'देवदास' चित्रपटात एकत्र काम केलं. ते दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले. 
Related image

अशी सुरू झाली अॅश-अभिषेकची लव्‍ह स्‍टोरी

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचे लग्‍न २००७ मध्‍ये झाले होते. अभिषेक आणि ऐश्वर्या रायची लव्‍ह स्टोरी खूपच खास आहे. ॲश आणि अभिषेक यांची लव्‍ह स्‍टोरी कशी आणि कधी सुरू झाली, हे पाहुयात. 

Related image
अनेक चित्रपटात एकत्र काम
अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. दोघांनी सुरुवात 'ढाई अक्क्षर प्रेम के' आणि 'कुछ ना कहो' में काम केलं होतं. त्‍यावेळी दोघांची केवळ मैत्री होती. याआधीही अभिषेक-ॲश 'प्यार हो गया' (१९९७) चित्रपटाच्‍या सेटवर भेटले होते. या चित्रपटात अभिषेक बॉबी देओलसोबत काम करत होता. त्‍यादरम्‍यान, ॲश सलमानसोबत तर अभिषेक करिश्मा कपूरशी एंगेज्‍ड होता. अभिषेक बच्चनचं लग्‍न अभिनेत्री करिश्मा कपूरशी होणार होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. ऐश्वर्या राय पहिल्‍यांदा सलमान खान आणि नंतर विवेक ओबरायसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती. 
Image result for ash and abhishek hd pics
ॲशला अभिषेकने असं प्रपोज केलं
त्‍यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी  'बंटी और बबली' चित्रपटातील गाणं 'कजरा रे'मध्‍ये एकत्र काम केलं. चित्रपटातील हे गाणं सुपरहिट झालं. त्‍यानंतर दोघांच्‍या अफेअरच्‍या चर्चा जोर धरू लागल्‍या. दोघांनी मणि रतनम यांच्‍या 'गुरु' चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं. आणि चित्रपटाच्‍या प्रीमियरनंतर टोरांटोमध्‍ये अभिषेकने ऐश्वर्याला लग्‍नासाठी प्रपोज केलं. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनचे प्रपोजल स्वीकारलं. 
Image result for ash and abhishek hd pics
एका मुलाखतीत अभिषेकने म्‍हटलं होतं, 'मी एकदा न्यू-यॉर्कमध्‍ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्‍यावेळी मी एका हॉटेलमधील रूमच्‍या बाल्‍कनीत उभा राहून विचार करत होतो. की जर मी ॲशशी लग्‍न केलं तर किती छान होईल. काही वर्षांनंतर गुरुच्‍या प्रीमियरनंतर आम्‍ही त्‍याच हॉटेलमध्‍ये गेलो आणि त्‍याच बाल्‍कनीत मी ॲशला लग्‍नासाठी प्रपोज केलं.' 
Image result for ash and abhishek hd pics
प्रपोज केल्‍यानंतर ॲश-अभिषेक मुंबईत परतले. १४ जानेवारी, २००७ मध्‍ये दोघांनी साखरपुडा केला. त्‍यानंतर ते एकत्र मूव्‍हीज पाहायला आणि नाईट क्लब जाऊ लागले. एका मुलाखतीत ॲशनेही म्‍हटलं होतं, 'अभिषेकने तिला गुरु चित्रपटाच्‍या सेटमध्‍ये असलेली नकली अंगठीसोबत प्रपोज केलं. ते मला खूपच रिअल वाटलं होतं.' 
Related image
लग्‍नात होती अडचण
लग्‍नाच्‍या आधी ॲश-अभिषेक यांच्‍या आयुष्‍यात चढ-उतार आले. पहिली अडचण म्‍हणजे, ॲशच्‍या कुंडलीमध्‍ये दोष होता. दोष दूर करण्‍यासाठी ॲशला एका झाडाशी लग्‍न करायचं होतं.  दुसरी अडचण अशी की, 'धूम-२' चित्रपटातील ॲश आणि ऋतिक रोशनचे किसिंग सीन. सूत्रांच्‍या माहितीनुसार, ॲशचे हे बोल्‍ड सीन देणे बच्चन कुटुंबीयांना आवडले नव्‍हते. 
Related image
बहुप्रतिक्षित लग्‍न
अभिषेक-ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ मध्‍ये लग्‍न केलं. दोघांच्‍या लग्‍नाची चर्चा संपूर्ण मीडियात झाली होती. दोघांनी लग्‍नाच्‍या कपड्‍यांपासून लग्‍नात येणार्‍या पाहुण्‍यांच्‍या यादीपर्यंत ही चर्चा होती. परंतु, अभिषेक बच्चनच्‍या आजी तब्‍येत बिघडल्‍याने हे लग्‍न खासगी ठेवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. 
एका मुलाखतीत ॲशने म्‍हटलं होतं की, अभिषेक माझ्‍यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. तो खूप सपोर्टिव आहे. ज्‍यावेळी मी गोंधळाच्‍या परिस्‍थितीत असते. तेव्‍हाअभिषेक माझी समस्‍या पटकन मिटवतो. 
Image result for ash and abhishek hd pics
मुलीचा जन्‍म
१६ नोव्‍हेंबर २०११ ला ॲशने मुलीला जन्‍म दिला. तिचं नाव आराध्‍या असं ठेवण्‍यात आलं. आराध्‍याच्‍या जन्‍मानंतर ॲशने चित्रपटात काम केलं नाही. आराध्‍या चार वर्षांची झाल्‍यानंतर 'जज्‍बा' चित्रपटातून ॲशने कमबॅक केलं. 
Image result for ash and abhishek hd pics with aradhya

ॲश ७५ लाखांची साडी नेसून येताच अभिषेक म्‍हणाला...

सुंदर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्‍हा एकदा अभिषेक बच्चनसोबत मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहे. हे दोन्‍ही स्‍टार आगामी चित्रपट 'गुलाब जामुन'मध्‍ये दिसणार आहे. १ नोव्‍हेंबरला ऐश्वर्या राय-बच्चन आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्‍या औचित्‍याने ऐश्वर्याच्‍या आयुष्‍यातील काही खास गोष्‍टींबद्‍दल जाणून घेऊयात.

Related image
Image result for aishwarya and abhishek
Image result for aishwarya and abhishek
ऐश्वर्या-अभिषेकचं लग्‍न बॉलिवूडकरांसाठी आश्‍चर्यचकित करणारं होतं. कारण, लग्नात सर्वांत अधिक चर्चा झाली ती, ऐश्वर्या रायच्‍या महागड्‍या लेहंगा आणि साडीची. 
Related image
लग्‍नात ऐश्वर्याच्‍या साडीने सर्वांचं लक्ष आपल्‍याकडे वेधून घेतलं होतं. ॲशच्‍या लग्‍नात नीता लूलाने तिचा लेहंगा डिझाईन केला होता. ॲशने ७५ लाखांची साडी नेसली होती. अॅशचं लग्‍न आणि तिची साडी दीर्घकाळ 'टॉक ऑफ द टाउन' बनला होता. 
Image result for aishwarya and abhishek
Image result for aishwarya and abhishek
चित्रपट जगतात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्‍या लग्‍नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. एक वर्षे डेट केल्‍यानंतर दोघांनी २० एप्रिल, २००७ ला लग्‍न केलं होतं. त्‍यावेळी ऐश्वर्या ३३ वर्षे आणि अभिषेक ३१ वर्षांचा होता. वयावरून अभिषेक आणि ॲशची जोरदार चर्चा देखील झाली. अनेक प्रश्‍न देखील उपस्‍थित करण्‍यात आले होते. 
Image result for aishwarya and abhishek
Related image
ॲश आणि अभिषेकच्‍या लग्‍नात आणखी एक आकर्षण ठरले ते बिग बी अमिताभ बच्‍चन. ॲशला सून म्‍हणून करून आणण्‍यासाठी अमिताभ बच्चन एक्सायटेड होते.
Related image 
ऐश्वर्याने लग्‍नात गोल्डन कलरची कांजीवरम साडी नेसली होती. ती या साडीत खूपचं सुंदर दिसत होती. लग्‍नाला उपस्‍थित असणार्‍यांचा नजरा ॲशवर खिळल्‍या होत्‍या. ऐश्वर्याच्‍या लग्‍नाची साडी तब्‍बल ७५ लाख रुपये होती. इतकी महागडी साडी नेसून ॲश ज्‍यावेळी समोर आली, त्‍यावेळी तिच्‍या सुंदरतेकडे आणि लुककडे अभिषेक पाहत राहिला होता. 
Related image

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...